वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो
पानगळ असली तरी मधुमास होतो
तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
मित्र म्हणणे जवळचा हे खास नाही
ते तसे होईल तेंव्हा खास होतो
तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो
फायदा नात्यातला चंद्रास होतो
केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी
स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो
बंधने तुडवीत जातो सहज सारी
हा तुझ्याइतका मलाही भास होतो
प्रेम इतके काय कामाचे जिथे की,
आपला वापर 'अजय' सर्रास होतो
💬 प्रतिसाद
(12)
आ
आत्मशून्य
Fri, 02/21/2014 - 10:14
नवीन
चांगला प्रयत्न आहे .
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 11:11
नवीन
इथे " जे " म्हणजे नक्की काय ?
ती नेमके असे काय बघते की नुसते बघितल्यानेही त्रास होतो ? "तरुण आहे रात्र अजुनि " मधल्या नायका सारखा ह्या नायकाचा 'प्रॉब्लेम' आहे काय ??
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 12:58
नवीन
आता जे म्हणजे काय सांगू तुम्हाला. 'जे' हे बोलीभाषेत सहज वापरले जाते. जसे 'काय रे..' यातले 'रे' म्हणजे काय असे नाही विचारू शकत. 'जे' याचा अर्थच बघायचा झाला तर, 'पण' असाही अर्थ होईल. अर्थात कोणाला नाही म्हणायचे असल्यास म्हणू शकतो.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 02/22/2014 - 13:35
नवीन
:)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 02/22/2014 - 13:36
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sat, 02/22/2014 - 14:05
नवीन
मस्त आहे! क्या बात !
जमलंय !!!!
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 12:59
नवीन
मनःपूर्वक धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 03/06/2014 - 13:01
नवीन
जमेश
मस्त :-)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 03/06/2014 - 13:39
नवीन
आवडले!!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 03/06/2014 - 15:21
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 10/24/2024 - 14:23
नवीन
कविता आवडली.
हे विशेष!
- Log in or register to post comments
O
OBAMA80
Sun, 10/27/2024 - 09:12
नवीन
खूप छान. आवडली.
तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो
फायदा नात्यातला चंद्रास होतो
हे फार भावले.
- Log in or register to post comments