सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक
पृथ्वी गोल आहे हे विज्ञानानी सांगितलेल सत्य आपण बहुसंख्य भारतीय लोक बर्यापैकी सहजतेन स्विकारतो नाही ? पृथ्वी गोल आहे हे सत्यच आहे पण युरोपियन आणि ख्रिश्चन लोकांना हे सत्य स्विकारण एककाळी कठीण गेल हे ठिक पण आजही आमेरीकेत फ्लॅट अर्थ सोसायटी आहे ज्यांच्या मतानुसार पृथ्वी सपाटच आहे. हा विनोद नाही आजच्या काळात अत्यल्प असेल पण एका अत्याधुनिक राष्ट्रातलेही काही नागरीक का होईनात वस्तुस्थितीस नाकारतात. या धागाचर्चेचा उद्देश अपवादात्मक असलेल टोकाच उदाहरण देण्याचा नाही; वस्तुस्थितीस नकार ही आणि तार्कीक उणीवा अशा स्थिती असतात जेव्हा स्वतःशी संबंधीत नसतात तेव्हा अधिक सहजतेने समजण्यास मदत होते. वस्तुस्थितीस नकार हा तात्कालीक अथवा कायम केवळ एका व्यक्तीपुरता किंवा समुहा बद्दलही असु शकतो (आणि माझ्या सहीत प्रत्येक मानवात या ना त्या बाबतीत तात्कालीक का असेना असू शकते). बर्याचदा ती स्वाभाविक मानवी प्रतिक्रीया असते.
आपल्या सभोवताली अशी बरीच व्यक्तीगत आणि सामुहीक अशी उदाहरणे दिसतात का ? उदाहरणे नमूद करा पण जाणीवपुर्वक दुखावणे टाळा; चर्चेत विरोधाभास दाखवणे ठिक पण "तुम्ही सुद्धा" पद्धतीची चर्चा करताना काळजी घ्या कारण त्याची पण या धागा मालिकेतून चर्चा होणारच नाही हे सांगणे कठीण असेल. धाग्याचे वाचक असाल तर चर्चेत येणारी उदाहरणे हलके घेण्याचा खेळाडूपणे घेण्याचा प्रयत्न करा. परस्पर चर्चा करताना कुठे खूप अडचणीचे गेले तर तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवांची शास्त्रीय चर्चा उपयूक्त ठरणार असेल तर तसे पहा (तो धागा येत्या काळात केव्हा तरी काढेन). इथे उद्देश वाद वाढवणे नाही. कुठे वस्तुस्थितीस नकार असेल तर; शास्त्रीय आणि अभ्यासपुर्ण सोडवणूक कशी केली जाऊ शकेल? याची चर्चा करूया. येत्या काळात इतर काही (तार्कीक उणीवा इत्यादी) धागे काढून परत या धाग्या कडे यावे लागू शकते; म्हणून या चर्चा धाग्यास प्रतिसादांची घाई नाही चर्चा सावकाशपणे चालू द्यात.
या विषयावर मराठीत लेखन कमी असणार आहे.(त्यामुळे सध्या केवळ दुवे देतो आहे) आपणा पैकी कुणी विकिपीडियावर इंग्रजी ते मराठी विकिपीडिया अनुवाद करून देत असेल किंवा अधिक शास्त्रीय लेखन करू शकत असेल तर त्याचेही स्वागत असेल.
* Denial
* Denialism
* Techniques of neutralization
* How to Recognize and Address Denial
* To vent, inform, or learn
नेहमी प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन विकिप्रकल्पा करता वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे कॉपीराईट फ्री प्रताधिकार मुक्त होत आहे. कुणाची काही उदाहरणे खुपच दुखावणारी अथवा खुपणारी असल्यास सौम्य स्वरूपात मांडण्यास अथवा वगळण्यास विषयांतरे टाळण्यास मिपा सदस्य आणि संपादक प्रशासनाने साहाय्य करावे हि नम्र विनंती.
आपल्या प्रतिसादांकरीता धन्यवाद.
प्रतिक्रिया