Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

.......!

स — स्पंदना, Sun, 02/23/2014 - 23:23
कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा. कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा, माझ काळीज काढुन टांगल तरी खुळं वाजवतय पावा. कधी यायच भान म्हणते मी कधी यायच भान म्हणते मी पण सांग मला त्यानंतर जीवंत असेन का रे मी? कुठल्यातरी आशेवर कुठल्यातरी आशेवर पावल तरी उचलतात दिसत नसली सुखं तरी बळ वाढवुन जातात नऊ महिन्याच वज्ज नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते. नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते काय ठाव तिला काय ठाव तिला त्या वज्ज्याचा नशिब दगड करु पाहते. कुठं हसु उमलत कुठं हसु उमलत साजरा मुखडा बघुन. कुठं डोळं पाझरतात काळजाच तुकडं होउन. सगळ आतल्या आत सगळ आतल्या आत नुसत सोसायच तमाशा होउ नये म्हणुन आतल्या आत फाटायच अस वाटत अस वाट्त द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं. अस वाटत द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं घ्यावा खुल्ला श्वास सोडुन माणुस होण्याची लाज. पण पण पायाला लंगर पण पायाला लंगर समाजातल्या लांडग्यांचा त्यांच फावल त्यांच फावल म्हणुन पदर सावरायचा डुईचा म्हणुन पदर सावरायचा डुईचा. __/\__ अपर्णा

प्रतिक्रिया द्या
8199 वाचन

💬 प्रतिसाद (36)
ख
खटपट्या Mon, 02/24/2014 - 03:46 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/24/2014 - 04:01 नवीन
कुठेतरी आत पार काळजाला भिडलं
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/24/2014 - 04:32 नवीन
बहिणाबाईंची आठवण झाली. आणि अगदी एक्झॅक्ट संबंधित नाही, पण "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" याचीही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/24/2014 - 04:35 नवीन
सुरेख लिहिलंय अगदी.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/24/2014 - 07:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ल
लीलाधर Mon, 02/24/2014 - 05:09 नवीन
आवडेश बरं का छाण छाण
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 02/24/2014 - 05:32 नवीन
छान कविता. :(
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/24/2014 - 05:37 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 02/24/2014 - 05:41 नवीन
काळजात कळ आली. '....' का ?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 02/24/2014 - 06:06 नवीन
अपर्णातै ____/\____!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 02/24/2014 - 06:22 नवीन
अप्पुतै भारी है. एकदम भारी लिवलय. आवाडल. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/24/2014 - 06:25 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Mon, 02/24/2014 - 06:42 नवीन
सुन्न !!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 02/24/2014 - 06:42 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 02/24/2014 - 07:05 नवीन
.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 02/24/2014 - 07:36 नवीन
.....! मस्त....! .......... जाताजाता- बर्‍याच शब्दांवर . द्यायचे र्‍हायलेत. तेवढं बघा की जरा. वाचताना त्रास होतोय.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 02/24/2014 - 10:07 नवीन
कशाचा तमाशा होइल ठावं नाही अगदी खरं .. मर्मस्पर्शी कविता!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 02/24/2014 - 14:37 नवीन
झ्याक लिवलंयसा. आसंच लिवत र्‍हावा !! :)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 02/24/2014 - 14:39 नवीन
टोचणारी कविता :-(
  • Log in or register to post comments
ध
धन्या Mon, 02/24/2014 - 14:41 नवीन
सुंदर कविता !!! भाषेचा लहेजा विदर्भातील विशेषतः अमरावती भागातील वाटतो.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 02/24/2014 - 14:47 नवीन
खरच ! टोचणारी ..
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 02/24/2014 - 14:57 नवीन
कवितेचं शीर्षक भलतेच आवडले आहे. मुक्तछंदातील ही कविता आणि तिचे शीर्षक यातुन कवयित्रीने वाचकांना आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढण्याची मुभा दिलेली आहे. कवितेचंं कडवं १, ४, ५, ७ आणी ८ हे ग्रामीण ढंगात आणि २ आणि ३ प्रमाण भाषेत हे कवितेतल्या नायिकेची द्विधा मनःस्थिती दर्शवितात. त्याच त्याच शब्दांची वेगवेगळ्या ओळीमधे पुनराव्रुत्ती करुन कवयित्रीने कमीतकमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ॑ सांगीतला आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 02/24/2014 - 22:26 नवीन
मी माझ्या धाग्यावर अजिबात प्रतिसाद देत नाही, तरीही आज विचारते "सुचतय एखाद शिर्षक?" समर्पक असं? कडव नं.२ तुम्हाला प्रमाण भाषेत वाटु शकत, कारण ते माझ मन आहे,पण बाकी सगळी तिच्याच भाषेत आहेत. पुनरावृत्ती ही घडत गेली. मनाचा गुंता दर्शवत गेली. ही रचलेली कविता नव्हे. अन हे कल्पिलेलं वास्तव नाही, कविता घडते. जन्मते. तिला साधारण साफ सफाई ठिक आहे,पण अगदीच बांधत बसलात तर ती कलाकृती घडते, कविता नव्हे. या कवितेला शिर्षक द्यायची माझी हिम्मत नाही. कुणाच्या फाटल्या भावनेला नाव द्यायचा माझा अधिकार नाही. तरीही तुमचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
आ
आनन्दिता Mon, 02/24/2014 - 16:14 नवीन
असलं का लिहितेस गं.. :(
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Mon, 02/24/2014 - 17:09 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 02/24/2014 - 22:01 नवीन
लिहीलं कसंही असलं तरी विषय 'नेमका' मांडलाय, त्यामुळेच त्यातला अर्थ नेमका आतपर्यंत जावून पोचतो. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 02/24/2014 - 22:28 नवीन
धन्यवाद. मिका कोठे आहात?
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 04/13/2014 - 10:33 नवीन
शेवटचं कडवं अंगावर आलं अगदी. नेमकं मांडलयत तुम्ही अपर्णा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 04/13/2014 - 10:51 नवीन
अस वाटत द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं घ्यावा खुल्ला श्वास सोडुन माणुस होण्याची लाज. समाजात राहुन मोकळा श्वास घ्यायला कधी मिळतच नाही. समाजात वावरणे आणि २४ X ७ कॅमेर्‍या समोर रहाणे यात काहीच फरक नाही. काहिही केल / झाल तरी त्याची बातमी आणि मग त्या बातमीवर चर्चा. खरं/ खोट, चुक/बरोबर, चांगल/वाईट, काळं/पांढर अशी प्रत्येक कृतीची विभागणी होते. जीव नुसता गुदमरुन जातो. चालायचाच समाजात रहायच तर समुहाचे नियम पाळावेच लागतात. पण कधी तरी मोकळा श्वास घ्यावासा वाटतो खरा.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 04/13/2014 - 11:11 नवीन
फारच हृदयस्पर्शी आहे. ओळींच्या द्विरुक्तींमुळे तिचा आकांत आणि असहाय्यता दोन्हीही अधोरेखित होतात. मस्तच!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sun, 04/13/2014 - 13:04 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 04/13/2014 - 14:57 नवीन
कवितेच नाव ओझं कस वाटेल? कारण खरच बरेचदा आपण कसले ना कसले ओझ बाळगत असतो.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 04/13/2014 - 17:16 नवीन
_/\_ :(
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Tue, 04/15/2014 - 13:20 नवीन
ग्रेट !
  • Log in or register to post comments
स
सखी Tue, 04/15/2014 - 17:50 नवीन
सुरेख लिहील आहेस, वेदना आत जाऊन भिडते.
  • Log in or register to post comments
प
पुणे तिथे काय उणे Wed, 04/16/2014 - 13:40 नवीन
खरच. कधि कधि अस वाटत नको तो समाज, नको ति मानस, नको तो सन्सार. बास आपण आपल एकट असाव.जगतना नसेल कोणी कदचित बरोबर पण मेल्यावर ही रडणारे फारसे नस्तिल ना.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा