चिंचेचा भात (tamarind rice ) आणि कलिंगड रायता
Primary tabs
चिंचेचा भात (tamarind rice )
कालच्या कारल्याच्या काचऱ्या खाऊन आणि काही लोक पाहून तृप्त झाले आहेत ,काहींची तोंडे कडू झाली असतील तर आज मुद्दाम काहीतरी आंबट चिंबट खाऊया ...चालेल न .
चला चला चिंचेचा भात आणि कलिंगडाचा रायता बनवूया ...
त्यासाठी साहित्य लागेल : बासमती तांदूळ २ वाट्या ,चिंचेची पेस्ट २ चमचे ,प्रत्येकी अर्धा चमचा मुगदाळ आणि चणाडाळ २० मी. भिजवून ठेवलेली ,अर्धा चमचा हळद ,अर्धा चमचा तिखट ,मीठ चवी प्रमाणे ,कढीपत्ता ४ -५ पाने, मोहरी अर्धा चमचा ,२ हिरव्या मिरच्या ,३ लाल सुख्या मिरच्या ,संभार मसाला अर्धा चमचा तेल ३ चमचे , शेंगदाणे आवडीप्रमाणे कमी जास्त ,काजू हि तसेच आवडत असतील तर बिनधास्त घ्या ...१ मुठ .. थोडा गुळ (अर्धा चमचा चालेल)
कृती: सर्व प्रथम तांदूळ धुऊन त्याचा मीठ टाकून मोकळा भात शिजवून घ्या आणि गार करायला ठेवा .
आता एका कढाई मध्ये तेल तापवून त्यात सर्व प्रथम शेंगदाणे ,काजू घाला ,ते परता मग मोहरी ,कढीपत्ता ,हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आणि लाल मिरच्या तोडून टाका ..
ते थोडे परतून झाले कि भिजवलेली मुग आणि चणाडाळ टाका ..आता हे २ मी. परतून घ्या
मग त्यात चिंचेचा कोल ( हा मी रेडीमेड वापरला आहे ) टाका .त्यावर थोडे पाणी शिपडून घ्या महणजे फक्त सर्व एकजीव होण्याकरिता हा.
आता वर दिलेल्या प्रमाणात हळद ,लाल तिखट ,संभार मसाला ( हा हि हवा असल्यास नसला तरी चालतो ) मीठ ,आणि थोडा गुळ टाका .आणि नीट mix करा ..
आता त्यात शिजवलेला भात टाकून नीट एकजीव करा .१ -२ वाफ येऊ द्या ...
मग चिंचेचा भात तयार ...
आता या सोबत गरम गरम रस्सम असेल तर क्या बात .. पण असो मी नाही बनविले .
माझ्याकडे कलिंगड होता घरात म्हणून मग त्याचा रायता केला .
त्यासाठी मी कुठलेही प्रमाण असे ठेवीत नाही हा ..जे जसे असेल तसे आवडीप्रमाणे टाकते ..
कलिंगड रायता : दही १ वाटी घेऊन ते नीट फेटून घेतले त्यात मीठ ,साखर ,आणि ला तिखट टाकले
आता कलिंगडाचे scoops करायला घेतले पण scooper नसल्यामुळे ते नीट झाले नाहीत मग सरळ कापले आणि दही मध्ये टाकले .. नीट एकजीव केले आणि थोडा टेस्ट केला आहा मस्त चव लागली ..

आता
भरल्या कारल्यांची भाजी पण येवू दे...
हो हो मु वि काका नक्की देणार भरले कारले ची रेसिपी खास कारले प्रेमींसाठी ....
चिंचेच्या भातात गुळ नाही घालत (चव बदलते असे माझे मत आहे).
सांबार मसालाऐवजी मेथीदाणे+तीळ ह्यांची पूड वापरुन मी हा राईस बनवते
कलिंगडाचे रायते हा नवीन प्रकार समजला, छान वाटत आहे करुन बघायला हवे.
अरे सानिका मला माहित नव्हते हि रेसिपी येथे आधीच आहे ते
आणि हो मी अगदी थोडा घातला गुळ फार नाही त्यामुळे मला तरी चव चांगली वाटली ...
अगं पाकृ आधी असली म्हणून काय झाले, प्रत्येकाची पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते आणी येऊ दे तुझ्या पाकृ आम्हाला ही नवीन काही शिकता येतील आणी तुला ही :)
+ १
हर गार्डाची शिट्टी न्यारी आणि हर आचार्याची आमटी वेगळी.
"हर गार्डाची शिट्टी न्यारी आणि हर आचार्याची आमटी वेगळी. " हे मस्त!!!
आजवर ऐकुन होते. मग बाजारातुन ती रेडीमेड पावरड आणली टॅमरिंड राईसची पण हे काही वेगळच प्रकरण दिसतय.
करेंगे। चखेंगे। फिर बोलेंगे।
कलिंगड रायता नविन , ट्राय करुन बघेन
एक शंका - कलिंगडाचे रायते पाणी सुटुन पांचट नाही होत का?
हाच प्रश्न मला पडला. रायत्यात मीठ घातल्यानंतर कलिंगडाला पाणी सुटलं मग रायतं आणखी पातळ नाही का होणार? भरीस भर कलिंगड+दही कसं लागेल याबद्दल साशंक आहे.
अजया ताई मी हि हा पहिल्यांदाच बनविला आहे म्हटले काहीतरी वेगेळे बनवून बघूया म्हणून ...पण माझ्याकडील दही थोडे घट्ट होते आणि कलिंगड घातल्यावर १ तास रायता चांगला होता त्यानंतर तो संपला ....त्यामुळे त्याला पानी सुटून तो पांचट नाही झाला ...पण मला येथील expert लोकांनी मदत करावी या बाबतीत ..आणि माझ्यामते खायच्या थोडावेळ आधी कलिंगड टाकून बनवावे ..+)
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
सहीच :)
हा अशाच पद्धतीचा भात आंध्र प्रदेशात करतात. त्याला आंध्रात बहुदा पुलिहोरा म्हणतात. माझी एक मैत्रीण मुळची आंध्रची पण सध्या महाराष्ट्रात स्थायिक झालेली, ती बरेचदा हा भात घेवुन यायची. आम्ही सगळ्या मैत्रीणी तुटून पडायचो ह्या भातावर.
हा भात करून पहायची इच्छा होती पण कृती मिळत नव्ह्ती, आता नक्की करुन बघेन.
>>शेंगदाणे ,काजू घाला ,ते परता मग मोहरी ,कढीपत्ता ,हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आणि लाल मिरच्या तोडून टाका .
आधी शेंगदाणे आणि काजू मग मोहरी ,कढीपत्ता ,हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या असा क्रम का ते कळलं नाही. असं करुन मोहरी नीट तडतडेल?
मला वाटते की आधी शेन्गदाणे, काजू परतून बाजुला काढून मग मोहरी टाकली असेल. नाहितर ती कडू होईल.
माऊ ताई अगदी बरोबर आणि मोहरी जास्त जळाली असती म्हणून असे केले आहे ..+)
मस्तच!