मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी); मराठी भाषादीन २७ फेब्रुवारी २०१४ च्या निमीत्ताने चर्चा
विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी विकिपीडिया प्रकल्पातील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्यापी पुरेसा अद्ययावत नाही काही माहिती शिळी सुद्धा झाली आहे आणि काही माहिती कमतरता (इन्फर्मेशन गॅप) पण आहेत.
सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसांना इंटरनेटने एकत्र आणले आहे. आधुनिक जगाचे संवाद माध्यम असणाऱ्या सायबर विश्वात अगदी आत्मविश्वासाने संचार करून मराठीनेही ‘अमृताशी पैजा जिंकणारी भाषा‘ हा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. तुकारामाची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिरी काव्य ते थेट गदिमा, पुलंपर्यंतची मराठी मनात घर करून बसलेली अनेक श्रद्धास्थाने इंटरनेटवर दिमाखाने झळकत आहेत.बर्या पैकी मराठी संस्थळे युनिकोडात आली असली तरी काही महत्वाची संस्थळे अद्यापही युनिकोडात आलेली नाहीत उदाहरणार्थ पुढारी केसरी तरूण भारत इत्यादी ऑनलाईन वृत्तपत्रातील माहिती अद्यापही शोधणे अवघड जाते. ९९.९९ टक्के जुने मराठी अर्काईव्हज वृत्तपत्रांचे मासिकांचे जुन्या पुस्तकांचे मॅन्यूस्क्रिप्ट्सचे अद्यापही मराठी आंतरजालावर आणि तेही युनिकोडात उपलब्ध नाही. शेतकी विभागाकरताच शासनाच वेबसाईट अजूनही युनिकोडात नसल्या मुळे सर्चेबल नाही. हि सर्व एका अर्थाने आंतरजालावर मराठीची अनुपस्थिती म्हणावी काय ? यामुळे मराठी वाचन कमी होत म्हणून मराठी संस्थळांची (पोटेंशिअल)जाहीरात एवं उत्पन्नक्षमताही कमी होते अस तुम्हाला वाटत का? दुसर्या बाजूला प्रदेशानुसार सर्व महाराष्ट्रातील घटक मराठी आंतरजालावर हजेरी लावतात का ? का कोण जाणे माझी व्यक्तीगत ऑब्झर्वेशन्स म्हणजे काही प्रदेशात अगदी खेडे गावातील मराठी सुद्धा हजेरी लावताना दिसतात पण बर्याच शहर आणि तालूंक्यांतील लोकांची लक्षणिय अनुपस्थिती असावी असे वाटते जसे की कोल्हापूर गडचिरोली तर असे आहे का यात मला कोल्हापूर ठळकपणे नोंदवावेसे वाटते ?असे असेल तर मराठी संकेतस्थळांवर कमी रिप्रेझेंट होणारे प्रदेश कोणते कारण काय असावे ? यांना मराठी संकेतस्थळावरील अनुपस्थित मराठी म्हणावे का ? सामाजिक घटकांनूसार सुद्धा अनुपस्थिती जाणवते त्या बद्दल तर चर्चा करून हवीच आहे त्या शिवाय वर्षाला १४ लाख विद्यार्थी मॅट्रीक पास करून आंतरजालावर धडकतात त्या प्रमाणात मराठी संकेत स्थळांना शेअर मिळतो का ? इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या वर्षाकाठी जवळपास ३ लाख मराट्।ई मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा मराठी आंतरजालावर अनुपस्थिती आहे का ? सद्य परिस्थिती काय आहे ती कशी सुधारता येईल. धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद आणि मराठी दिनाच्या शुभेच्छा
प्रतिक्रिया