Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास

व
वैनतेय यांनी
Wed, 02/26/2014 - 08:00  ·  लेख
लेख
समस्त मिपाकार मंडळी, राम राम! बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न... १. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात? २. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात? वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा. किंवा तत्सम संघटना या अनुषंगाने अपेक्षित आहेत. मिपा सर्वे म्हणुयात का याला? तळटिप: कुठलाही वाद/प्रतिवाद (मिपाच्या terminology मध्ये काश्मीर) होऊ / करु नये हि विनंती...

प्रतिक्रिया द्या
11815 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

म
माहितगार गुरुवार, 02/27/2014 - 11:51 नवीन
जेव्हा राज्यशास्त्र राज्यसंस्था आणि विवीध शास्त्र शांखांचा संस्थांचा स्वतंत्र विकास नव्हता त्या काळातला सर्वव्यापी होऊ पहाणारा धर्मसंस्थांचा परीघ आधूनिक काळात बराच आक्रसला असला तरी स्थितीशील मानवी समाजाने तो अद्यापी नेटके पणाने अभ्यासलेला आहे असे म्हणणे धाडसाचे होते. त्यामुळे माझी आजही धर्म आणि संस्कृती धर्म आणि अर्थशास्त्र अशी कुठेही कशीही गल्लत होत रहाते. समुह म्हणून हा गुंता जेव्हा सुटायचा तेव्हा सुटेल. माझ्या स्वहितासाठी तो आधी माझ्या मनातन सुटावयास हवा. Image removed. ओव्हरलॅपींग सर्कल्स सौजन्य विकिमीडिया कॉमन्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम
आ
आयुर्हित गुरुवार, 02/27/2014 - 19:33 नवीन
कर्णवेध हिंदू रुढीनुसार प्रत्येक बालकाचे कान टोचणे अनिवार्य आहे. सामान्यपणे सोनाराकडून कानटोचून घेतात. सोनार एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वलय तयार करतो. मुलीचे कान टोचताना प्रथम डावा कान टोचण्याची प्रथा आहे. `देव-देवतांनो, आमच्या कानातून आम्हास परमोच्च आनंददायक गोष्टी ऐकू येऊ देत' अशा मंत्राने कर्णवेधाचे वेदामध्ये समर्थन केलेले आहे. (ऋग्वेद १.८९.८) मुलामुलींचे कान टोचणे. कानाचा संबंध शब्दग्रहणाशी असून शब्द हा आकाशाचा गुण आहे. आकाशाची व्याप्ती अगण्य आहे. कानात शब्द गुणाने वास करणारे आकाश अमर्याद असल्यामुळे त्याची शक्तीी प्रचंड आहे. या शक्तीकस वाव न मिळाल्यास काही वेळा अनर्थही घडू शकतो. ज्याप्रमाणे चांदीची पोकळ मुर्ती तयार करताना कारागीर त्या मूर्तीच्या बुडाशी एक छोटे छिद्र मुद्दाम करुन ठेवतो. तसेच न केल्यास उष्णतेचा संपर्क घडताच ती मुर्ती फुटुन विच्छिन्न होण्याची व तुटण्याची शक्यता असते. त्याप्रमाणे कानाला छिद्र नसेल तर डोक्यात साठून राहिलेल्या कामक्रोधाचे स्फोट होतात व सहनशीलता कमी होते. अशी पूर्वापार संकल्पना आहे. म्हणून स्त्रीयांचे कान टोचून त्यात कर्णफूले घातली जातात. कारण स्त्रियांना संसारात वावरताना बरीच सहनशीलता ठेवावी लागते. तसेच त्यांना अतिक्रोधी, अतिकामुक, अतिमत्सरी बनून चालत नाही. कान न टोचलेली व्यक्ती् जितकी कामुक, क्रोधी व व्देषी असते. तितकी कान टोचलेली व्यक्तीा असत नाही. दुसरे कारण कानाच्या पाळीमागे उपजतच असलेल्या सुक्ष्म खोलगट भागात दमा, खोकला, क्षय या रोगांच्या संबंधीत नसा असतात. तो भाग सच्छीद्र असल्यावर तो रोग बरा होण्यासाठी तथा त्या संबंधीचा त्रास अति तीव्रतेने बाधक न होण्यास मदत होते. या वरच आधारीत आजच्या काळी प्रसिध्दीस असलेली व चीनी शास्त्र म्हणून ओळखले जाणारे अक्युपंक्चर शास्त्र हे आपलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम
स
सेरेपी Fri, 02/28/2014 - 01:49 नवीन
अरे बापरे. कठीणच दिसतंय एकुणात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आदूबाळ Fri, 02/28/2014 - 10:57 नवीन
कान न टोचलेली व्यक्ती् जितकी कामुक, क्रोधी व व्देषी असते.
तरीच अ‍ॅडमला "ते" फळ खायची बुद्धी झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
च
चिगो Sat, 03/01/2014 - 05:05 नवीन
कान न टोचलेली व्यक्ती् जितकी कामुक, क्रोधी व व्देषी असते. तितकी कान टोचलेली व्यक्तीा असत नाही. हॅ हॅ हॅ.. मी वयाच्या सविस्साव्या वर्षी (स्वखुशीने) कान टोचून घेतले. असा काही फरक जाणवला नाही ब्वाॅ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 02/27/2014 - 13:02 नवीन
कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 02/27/2014 - 13:05 नवीन
कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा कॉलिन्ग थत्तेचाचा
  • Log in or register to post comments
म
मृगजळाचे बांधकाम गुरुवार, 02/27/2014 - 15:34 नवीन
आपण आपल्या धर्मविषयक प्रश्नांची,शंकांची उत्तरे विविध माध्यमांतून शोधण्याचा प्रयत्न करतो,ज्यामध्ये मुख्य माध्यम असते पुस्तक.आपण जर भारतीय लेखकांचे पुस्तके वाचत असू तर त्यांच्यामध्ये धर्मविषयक टिपिकल,पारंपारिक विचार व्यक्त केलेले आढळतात,ज्यांनी आपल्या पारंपारिक धर्मविषयक समाज धारणा अजूनच धृढ होतात. अर्थात काही लेखक याला अपवाद असतील,पण या सन्दर्भात आपण परकीय लेखकांची पुस्तके वाचली तर धर्मविषयक आपल्या धारणा,समज यामध्ये प्रचंड बदल घडून येतात,उदा रसेल सारखा लेखक आपल्या धर्मविषयक संकल्पनांनांच सुरुंग लावतो,रसेल ची पुस्तके इतकी तार्किक दृष्ट्या इतकी पटतात,कि आपल्या मूळ संकल्पना पाळ्या पाचोळ्या सारख्याच उडून जातात,आणि धर्माबद्दल आपण नव्याने विचार करण्यास प्रवृत्त होतो.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 02/27/2014 - 15:44 नवीन
मास्तराशी सहमत !! कॉलिंग थत्तेचच्चा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/27/2014 - 18:04 नवीन
हिंदुत्ववादी म्हणजे काय हो? भाजप हा एक हिंदुत्ववादी संघटनेचे औरस अपत्य आहे.( अर्थात ती संघटना हे पालकत्व उघडपणे मान्य करीत नाही हे वेगळे) मी पूर्वी शाखेत जायचो याचा अर्थ मी हिंदुत्ववादी होतो असे मानले तर आता मी शाखेतील मूल्ये मान्य करतो मात्र त्यांचा आंधळा इतरधर्म विरोध अमान्य करतो. मी न कळत्या वयात हिंदुत्ववादी होतो. आता मात्र त्या वेळची मते हास्यास्पद वाटतात. ( याचा अर्थ मी कोणत्या वादी गटात मोडतो?) ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी अशी दोन मते मान्य केली तर मग या दोन गटात हिंदुत्ववाद कुठे उरतो? जे लोक देवावर श्रद्धा ठेवतात ते हिंदुत्ववादी असे म्हणायचे आहे का? देव ही संकल्पनाच माननिर्मीत आहे. सोयीनुसार राजकीय आणि धार्मीक मतांची गल्लत करणे हे सर्वच धार्मीक आणि राजकीय संघटनांची प्राथमीक गरज असते.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित गुरुवार, 02/27/2014 - 18:47 नवीन
मीही लहानपणापासून शाखेत जायचो. ब्राह्मणगल्लीत राहायला असल्याने इतर धर्मियांशी संबंध यायचे तसे काही कारण नव्हते. पण (तुमच्या साठी)आश्चर्य(असेल ही कदाचित)म्हणजे ज्या शाखेत जायचो तया शाखेत काही मुसलमान बंधूही यायचे व अजूनही आम्ही शाखेसाठी/समाजासाठी/भारतदेशासाठी एकत्र काम करत असतो. शाखेत आपल्या संस्कृतीनुसार स्वत:ला सुसंस्कारित करायलाच वेळ पुरत नाही तेथे इतरधर्म विरोध हे कधीच शिकवले गेले नाही आणि जाणारही नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मृगजळाचे बांधकाम Sat, 03/01/2014 - 14:46 नवीन
कानाला छिद्र नसेल तर डोक्यात साठून राहिलेल्या कामक्रोधाचे स्फोट होतात,आणि सहनशीलता कमी होते,फारच विनोदी लिहिले आहे ब्वा.कानाला छिद्र ठेवायला देव का विसरला असेल बरे?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा