Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ज्योतिषशास्त्राचा फायदा

आ
आयुर्हित
Fri, 02/28/2014 - 17:37
🗣 93 प्रतिसाद
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत. ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो. थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो. मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे. आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत. यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो. कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल. माझ्या मते या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत व बऱ्याच लोकांचा हा व्यवसाय असल्याने त्यात व्यावसायिक फायदे/तोटे असणारच. पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.

प्रतिक्रिया द्या
38281 वाचन

💬 प्रतिसाद (93)
आ
आबा Fri, 02/28/2014 - 18:48 नवीन
सारकॅजम असेल तर ठिक आहे... गांभिर्याने लिहीले असेल तर शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 02/28/2014 - 18:56 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आयुर्हित Fri, 02/28/2014 - 19:05 नवीन
गांभिर्याने लिहीलेले आहे हो आबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
स
साळसकर Fri, 02/28/2014 - 19:10 नवीन
मी आपले उगाच समजायचो जो तकदीर मे लिखा होता है वहीच मिलेगा वगैरे वगैरे... एक माझाच शेर आठवला, अर्ज करतो. तू क्या बरबाद करेगा मुझे ए जमाने, तेरी खुद की तकदीर कोई और लिखता है..
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Fri, 02/28/2014 - 19:11 नवीन
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत.
विदा? किमानपक्षी काही उदाहरणे?
ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.
दिनदर्शिकेचा वापर माझ्या माहितीप्रमाणे तरी शनिवारी कोणती तारीख आहे/ अमुक तारखेला कोणता वार आहे हे बघण्यासाठी आहे. जे अतिशय अ‍चूक असते. आपल्याला असे म्हणायचे आहे का की ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते?
थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.
मी जन्माला आलो तेव्हा भारतात संगणक आलेले नव्हते/ नुकतेच आले असतील काही संशोधन संस्थांमधे वगैरे. आता त्या ज्योतिष्याला तेव्हा कसे माहित असणार की मी ह्यातच नोकरी करेन?
मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.
फुटलो. म्हणजे नोकरीच्या अप्लिकेशन बरोबर कुंडलीपण जोडायची असे काही म्हणायचे आहे का? भारतातले माहिती नाही पण अमेरिकेत तरी तुम्हाला तुमचे वय विचारणे निषिद्ध आहे मुलाखतीच्या वेळी. कुंडली तर दुरचीच गोष्ट.
आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.
परत तेच म्हणतो. ज्योतिष्यामुळे मला अचूक सांगता येईल का की मला वयाच्या ६० व्या वर्षी कॅन्सर होईल? नियमीत वैद्यकीय तपासणी करून बरेच आजार वेळीच निदर्शनास येऊ शकतात.
यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो.
मला कॅन्सर होणार असे समजा कळले ज्योतिष्यामधून तर काय मला उगाचच कीमोथेरपी सुरू करणार का? की हार्ट अ‍टॅक येईल म्हणून आधीच ओपन हार्ट सर्जरी करणार?
कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल.
शेअर मार्केट ८००० वर्षांपूर्वी होते? त्यासाठी कोणाची कुंडली मांडायची नक्की?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 02/28/2014 - 20:05 नवीन
मी मागील २ वर्षापासूनच अभ्यास करतो आहे, त्यामुळे सर्वच उत्तरे अगदी अचूक असतील असे नाही. पण तरी प्रयत्न करतो. जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना भरघोस फायदा होईलच. १) रामायण, महाभारत, भागवत यात कित्येक उदाहरणे आहेत, कित्येक खगोलीय घटना नमूद केलेल्या आहेत (उदा: महाभारतात जयद्रथाच्या वधाच्या वेळी सुटलेले सूर्य ग्रहण). यावर आता जगभरात खूप संशोधन सुरु आहेत. आजही आपण रामनमवी, कृष्णाष्टमी, दसरा, दिवाळी तिथीप्रमाणे साजरी करतोय, हे ज्योतिषशास्त्रातील कालगणनेचे/वापराचे एक उदाहरण आहे. २)ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते? : हो येते. ३)मी जन्माला आलो तेव्हा भारतात संगणक आलेले नव्हते/ नुकतेच आले असतील काही संशोधन संस्थांमधे वगैरे. आता त्या ज्योतिष्याला तेव्हा कसे माहित असणार की मी ह्यातच नोकरी करेन?: यात साधारण कल समजतो, कुठले कलागुण/अवगुण आहेत हेही समजते व त्यानुसार तुम्ही SWOT ANALYSIS करून अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात. (जसे उद्या तुमच्या शहरात जोराचा पाऊस असेल असे कळल्यावर आपण त्याप्रमाणे तुमचे वेळापत्रक बनवू/बदलवू शकता) ४)म्हणजे नोकरीच्या अप्लिकेशन बरोबर कुंडलीपण जोडायची असे काही म्हणायचे आहे का? होय, हि काळाची गरज ठरणार आहे.(अर्थात काही खास विशिष्ट IQ/EQ लागेल अशा कंपन्यांना तर MUST). आजच्या काळातही चीन मध्ये लहान मुलांच्या हातावरचे/बोटावरील ठसे/चिन्हे पाहून त्यांचा कल ठरवला जातो व जी मुले देशाला फायदा देतील त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च देश उचलतो. ५)ज्योतिष्यामुळे मला अचूक सांगता येईल का की मला वयाच्या ६० व्या वर्षी कॅन्सर होईल? कोणत्या अवयवाला,कोणता त्रास, कोणत्या ग्रहाच्या महादशेत/अंतर्दशेत (period) होईल हे अचूक सांगता येईल, त्यावर किती दिवस उपचार चालेल व तो उपयोगी/निरुपयोगी ठरेल हेही सांगता येते ६)मला कॅन्सर होणार असे समजा कळले ज्योतिष्यामधून तर काय मला उगाचच कीमोथेरपी सुरू करणार का? की हार्ट अ‍टॅक येईल म्हणून आधीच ओपन हार्ट सर्जरी करणार?: Preventive actions/Alternative Medicine/आहार, विहारात जाणीवपूर्वक बदल व योग,प्राणायाम,पथ्य हे उपचार आहेतच कि आजही. त्यांची माहिती मिळेलच कि. ७)जसे जसे नवे शोध लागतात त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्रात योग्य ते बदल घडत जातात. उदा: इंधनासाठी/ प्रदुषणासाठी युरो४ हे मानक दिल्लीत वापरले जाते ते पुढे जाऊन युरो ५ किंवा युरो १५ देखील होईलच कि कधीतरी. शेअर मार्केट साठी आपली स्वतःची(व कदाचित देशाचीही) कुंडली जरुरी आहे.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Fri, 02/28/2014 - 20:29 नवीन
त्या तिथी वगैरेंना खगोलीय कारणमिमांसा आहे जी आपल्या पूर्वजांना माहित असेल. त्याचा कोणाच्या भविष्याशी काय संबंध?
२)ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते? : हो येते.
तर मग पडताळा घेण्यासाठी मागील घटना अचूक वर्तवता आल्या पाहिजेत. जर मी तुम्हाला माझी जन्मवेळ कळवली तर मला कधी प्रमोशन मिळाले हे अचूकपणे सांगता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 02/28/2014 - 20:47 नवीन
आपली अचूक जन्मवेळ, जन्मगाव, जन्म दिनांक व्य नी कराळ का? मी नक्कीच प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ल
लॉरी टांगटूंगकर Sat, 03/01/2014 - 10:23 नवीन
यात साधारण कल समजतो, कुठले कलागुण/अवगुण आहेत हेही समजते व त्यानुसार तुम्ही SWOT ANALYSIS करून अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात. (जसे उद्या तुमच्या शहरात जोराचा पाऊस असेल असे कळल्यावर आपण त्याप्रमाणे तुमचे वेळापत्रक बनवू/बदलवू शकता) जर का हे खरं म्हणलं तर तुम्ही काय अ‍ॅक्शन्स घेणार हे पण पत्रिकेत लिहून ठेवलेलं असणार. ते वेळापत्रक बनवणे अथवा न बनवणे लिहीलेलंय. काही केसेसमध्ये बनवलेलं फेल जाणार हे पण लिहीलय. म्हणजे जर का सगळ आधीच ठरलेलं आहे तर त्यात कर्त्याचं काम काय?? कोणत्या अवयवाला,कोणता त्रास, कोणत्या ग्रहाच्या महादशेत/अंतर्दशेत (period) होईल हे अचूक सांगता येईल. आणि Preventive actions/Alternative Medicine/आहार, विहारात जाणीवपूर्वक बदल व योग,प्राणायाम,पथ्य हे उपचार आहेतच कि आजही. त्यांची माहिती मिळेलच. मग यात ज्योतिषाचा काय रोल? भीती वाढवायला?? जर का चांगले आहे तर लेट इट बी सरप्राइज, आणि वाईट असणार तर अत्ता पासून त्याचा डोक्याला का त्रास घ्या? कारण या थेअरी नुसार कर्त्याच्या हातात काहीच नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Sat, 03/01/2014 - 12:41 नवीन
योग्य inputs कर्त्याला योग्य निर्णयापर्यंत घेवून जातात. उदा: शिवाजी महाराज हेर खात्याचा पुरेपूर वापर करूनच योग्य ती कृती करत होते. मग तो अफजलखानाचा वध असो, मढेघाटाची लढाई असो कि सुरतेवरचा छापा असो! त्याचप्रमाणे आपल्याला, आयुष्यातील निर्णय योग्यप्रकारे घ्यायचे असतील तर योग्य inputs हवेत ना! योग्य वेळी inputs मिळाल्यामुळे कर्त्याला अजून जास्त वेळ मिळतो स्वत:ला Prepare करण्यासाठी. जर कर्त्याच्या हातात काहीच नाहीये असे गुहीत धरले तर आपण १)चांगल्या शाळेत/कॉलेज ला का जातो? २)परीक्षेसाठी अभ्यास का करतो? ३)चांगल्या लोकांच्या संपर्कात का रहातो? ४)चांगल्या डॉक्टरकडेच का जातो? ५)रेल्वेचे, विमानाचे आरक्षण का करतो? ६)इंटरव्ह्यू द्यायला का जातो? तर थोडक्यात काय तर आपण सर्वजण अंधारातून उजेडाकडे जाण्यासाठी (तमसो मा ज्योतिर्गमय) साठी प्रयत्न करतो (good to better, better to best life). आणि हे करण्यासाठीच सर्व योग्य Inputs मिळवून, विचार करून, योग्य तो निर्णय घेत असतो. माझे म्हणणे हेच आहे की, उद्या जर आपल्याला ५लाख रुपये मिळणार असतील तर त्याचे योग्य नियोजन करून, मिळणारी रक्कम पूर्ण सत्कारणी लावून आयुष्यात चांगला बदल घडवू शकतो. पण ज्याला विचार करायलाही वेळ मिळत नाही, तो अचानक हातात आलेले ५ कोटी घालवूनहि, होते त्यापेक्षाही वाईट परिस्थितीला पोचतात. जी लोक आपल्यासारखीच विचार करतात त्याच्यासाठी एक उदाहरण देतो: आपल्याकडे एक वर्ग आहे जो अशिक्षित आहे, कमीत कमी ५ मुलांना जन्म देतो, म्हणतो ये तो खुदा की देन है! पुढे काय होते, हि मुले लहानपणापासूनच मिळेल ती कामे करतात, अगदी पाव विकण्यापासून हमाली पर्यंत. ज्यांना अशीही कामे मिळू शकत नाही किंवा इतर कारणांमुळे अगदी १०००/- रुपयांसाठी खुन करणे हे त्यांच्या साठी अगदी सहज असते. आपल्याकडे दुसरा वर्ग आहे जो सुशिक्षित आहे, कमीत कमी मुलांना जन्म देतो, म्हणतो ये तो खुद की ही देन है! एकाला/दोघांना सांभाळता सांभाळताच नाकी नऊ येतात. त्यांच्या अभ्यासावर, आरोग्यावर योग्य तो पैसा खर्चून व छंद जोपासण्यापासून पूर्ण लक्ष पुरवितात कि दुसऱ्या/तिसऱ्या मुलाला जन्म देण्याचा विचारही करत नाही. आता विचार करा ह्या दुसऱ्या वर्गाने पहिल्या वर्गाप्रमाणे वागून चालणार आहे का? शक्यच नाही कारण शिक्षणामुळे त्यांना योग्य ती inputs मुलाला जन्मघालण्या आधीच मिळालेली/माहित असतात. मग यात ज्योतिषाचा काय रोल? भीती वाढवायला?? भीती म्हणजे काय? पुरेशी माहिती नसणे म्हणजेच भीती वाटणे. मला आगीची भीती वाटते पण जर मला firesuit बद्दल माहिती झाली तर तो मिळवून मी स्वत:च आगीत उडी मारेल कि नाही? अशीच भीती शेअरमार्केट बद्दल लोकांना वाटत असेत, त्यामुळे त्यापासून ते दूर राहतात व होणाऱ्या फायद्याला मुकतात. असेच बरेच फायदे असतात जीवनात! आणि जाणकार कर्त्याच्या हातातच सर्व काही असते! तेव्हा पुरेपूर फायदा घ्या आपल्या जीवनाचा व compromise विसरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
त
तिमा Sat, 03/01/2014 - 14:48 नवीन
आजही आपण रामनमवी, लेखाबद्दल काही मत व्यक्त करण्याचा मला अधिकार नाही, पण 'रामनमवी' हा एक मनोरंजक शब्द तुमच्यामुळे डोक्यांत फिट्ट बसला, त्याबद्दल धन्यवाद. त्या सगळ्या, राममंदिराच्या नांवावर रामाला आणि देशाला ओलिस ठेवणार्‍या भक्तांना हे नांव शोभून दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Sat, 03/01/2014 - 14:54 नवीन
यावरून तीन गोष्टी समजल्या १) आपल्याला मिळालेली तीक्ष्ण दृष्टी २) मिपावर मराठीत Spellcheck facility नसणे ३) हे कुठले स्पेक्ट्रम डीसऑर्डरचे लक्षण तर नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
पंतश्री Tue, 03/24/2015 - 06:37 नवीन
तुम्हि म्हणता ते बरोबर हि असेल, पन अम्हाला तर एकच उपयोग माहित आहे तो म्हणजे लग्न जुळवणे.
मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.
ह्यासथि अधि सर्वसामान्य लोकाना ज्योतिषशास्त्र कळले पाहिजे ना. इथे सर्वसामान्य लोकाचा लोचा आहे तर ते HR मॅनेजर पर्यन्त कधी पोहोचायचे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
क
काळा पहाड Fri, 02/28/2014 - 20:47 नवीन
अरे देवा! घुसलात तुम्ही पुन्हा शास्त्र विभागात!!
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Fri, 02/28/2014 - 21:30 नवीन
अप्रतिम (विनोदी) लेख... एक शंका: समजा मला उदा. टॉन्सिल्सचा त्रास होणार असं भविष्य आहे आणि मी लगेच टॉन्सिल्स काढून घेतले तर भविष्य खोटं ठरलं की खरं? बाकी ज्योतिष(शास्त्रात???) आजारांची माहीती कळते हे वाचून धन्य झालो. ज्योतिषांना डॉक्टरकडे जावंच लागत नसेल नाही? पण तुम्हाला असं वाटत नाही का कि कमीत कमी एकातरी ज्योतिषाच्या मरणाच्या एक दिवस अगोदर वर्तमानपत्रात बातमी यायला हवी होती की बुवा 'माझा या दिवशी या वेळी पत्रिकेत लिहिल्या प्रमाणे नैसर्गिक मॄत्यू होणार आहे. तेव्हां माझा रामराम घ्यावा.' असो... आमच्या शुभेच्छा... लवकर बरे व्हा... गेट वेल सून...
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 02/28/2014 - 21:55 नवीन
इथे भविष्य खरे किंवा खोटे ठरविणे हा मुद्दा नाही! हे एक शास्त्र आहे, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास मात्र हवा. सर्व साधारण लोकांना आपल्या मरणाआधीच कळते कि मरण येणार आहे, त्यासाठी ज्योतिषाकडे जायचीही गरज नाही. अगदी साधी सर्दी सुद्धा होतांना २ दिवस आधीच notice देते.फक्त आपले लक्ष्य हवे ना शरीर काय म्हणते त्याकडे! माझ्या आजोबांना(ते ज्योतिषी नसतांना देखील)हे आधीच कळले होते त्यांनी "आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा" हे बोलूनही दाखविले होते. असो... आमच्याही शुभेच्छा... लवकर बरे व्हा... गेट वेल सून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
आ
आयुर्हित Sat, 03/01/2014 - 13:05 नवीन
फक्त टॉन्सिल्स बद्दल बोलायचे झाल्यास, माझ्या लहानपणापासून अगदी आत्ता पर्यंत(म्हणजे अजूनही)डॉक्टर टॉन्सिल्स काढायला सांगतात. एक लक्षात घ्या एकदा दोनदा अगदी सातदा(एका वर्षातून)त्रास झाला तरी टॉन्सिल्स काढू नका! अधिक माहितीसाठी वाचा Tonsillectomy's long-term risks may outweigh pluses
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
ब
बॅटमॅन Fri, 02/28/2014 - 21:57 नवीन
छान विनोदी लेख. कसं सुचतं बॉ असं काही लिहायला!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/28/2014 - 23:48 नवीन
@कसं सुचतं बॉ असं काही लिहायला!!>>> एष धर्म: टन्ना टन्न: | ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 03/01/2014 - 07:28 नवीन
टना टनः =)) जबरीच हो आत्मूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
साती Tue, 03/04/2014 - 05:37 नवीन
एका धर्ममार्तंडाचे असे लिखाण पाहून मन सुन्नं आपलं टुन्नं झालंय. बॅटयासारखे संस्कृत पंडितही दात काढतायत. काय होणार या टन्नाटन्न धर्माचे भविष्यात? पत्रिका पाहिली पाहिजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/04/2014 - 05:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/05/2014 - 05:29 नवीन
@एका धर्ममार्तंडाचे असे लिखाण पाहून मन सुन्नं आपलं टुन्नं झालंय.>>> =)) आंम्म्ही धर्माचा मार बसलेले तंड नाही. =)) त्यातला जो जो भाग वाइट तो काढलाच पाहिजे या मताचे आहोत..मग आख्खी धर्मव्यवस्था बदलायला लागली तरी बेहत्तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/01/2014 - 09:44 नवीन
:) अशा लेखांनी मानसिक तणाव दूर होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आयुर्हित Fri, 02/28/2014 - 22:04 नवीन
असाध्य ते साध्य| करिता सायास| कारण अभ्यास| तुका म्हणे||
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 03/01/2014 - 06:03 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 03/01/2014 - 09:11 नवीन
_/\_..... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आयुर्हित Sat, 03/01/2014 - 09:46 नवीन
कधिच कुठल्याच दलाशी संबंध आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
ब
बॅटमॅन Sat, 03/01/2014 - 10:50 नवीन
पण ज्योतिषाचा काहीएक फायदा नक्कीच होतो एवढं खर्रंच आहेच्च्च्च. तसा तो होत नसता तर इतक्या ज्योतिषांची पोटं भरलीच नसती. तस्मात इतक्या लोकांच्या पोटापाण्याची सोय करणारे हे शास्त्र फायदेशीर आहे हे नक्कीच. मग बाकी कोणी काही म्हणो.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 03/01/2014 - 13:22 नवीन
पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 03/01/2014 - 13:31 नवीन
आर्युहित यांच्या चिकाटीला सलाम . त्यांच्या ज्योतिष अथवा आर्युवेद यावरील लेखाचा कुणाला फायदा होवो अथवा न होवो पण त्यांना त्याचा फायदा मिळो हि सदिच्छा . धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Sat, 03/01/2014 - 13:53 नवीन
उत्तम लेख
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 03/01/2014 - 19:38 नवीन
पुढच्या कट्ट्याला किती आणि कोण कोण "नक्की" येणार तितके जरी "अचुक" भविष्य सांगितले तरी मी ज्योतीष हे शास्त्र आहे असे मान्य करीन :)
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 03/01/2014 - 19:59 नवीन
अगदी सोपे आहे हे तर! आमचे मुवि तर कोणाचीही कुंडली न बघता सांगू शकतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आत्मशून्य Sat, 03/01/2014 - 20:52 नवीन
मी येणार की नाही याचे भविष्य वर्तवा ते जर खरे ठरले तर मग मानु अन्यथा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
म
मृगजळाचे बांधकाम Mon, 03/03/2014 - 04:38 नवीन
आमच्या धंद्याचे मोफत मार्केटिंग केल्याबद्दल वैश्विक पोपट वाले आणि कुडमुडे ज्योतिष मंडलाकडून झाहीर आबार!!!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 03/03/2014 - 13:49 नवीन
८००० वर्षे!!! कोणी लिहिलंय बॉ इतक्या आधी फलज्योतिषाबद्दल? आणि ज्योतिषशास्त्र की फलज्योतिषात तुम्ही घोळ घालताय. आर्यभट्टांपासून अनेकांनी ज्योतिषशास्त्र अर्थात आकाशातील ज्योतींच्या शास्त्राचा अभ्यास केलाय. फलज्योतिष ही नंतर चिकटवलेली परकीय कीड आहे असे म्हणतात!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 03/04/2014 - 05:29 नवीन
परकीय कीड
हे कोणी आणलं? ग्री़क?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ग
गवि Tue, 03/04/2014 - 05:37 नवीन
कीड नेहमी परकीय / परप्रांतीय का असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
साती Tue, 03/04/2014 - 05:39 नवीन
आपली ती गोजिरवाणी अळी , परकीयांची ती कीड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ऋ
ऋषिकेश Tue, 03/04/2014 - 07:06 नवीन
हा हा हा! नेमके! :D बाकी @अनुपः होय ग्रीक/रोमन प्रथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
प्रसाद गोडबोले Tue, 03/18/2014 - 10:28 नवीन
आपली ती गोजिरवाणी अळी , परकीयांची ती कीड!
ळॉळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
आ
आयुर्हित Tue, 03/04/2014 - 07:07 नवीन
ऋषिकेशजी, माझे वाक्य "आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहे" मी संपूर्ण ज्योतिष शास्त्राबद्दल लिहितोय, ज्यात सुरवात होते निरीक्षणापासूनच होते. जेव्हा आपण "वसुधैव कुटुंबकम" ही संकल्पना मांडली आहे, तेव्हा "परकीय" हा शब्द चुकीचा ठरतो. मी परत परत तेच सांगतोय भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ ज्ञानाच्या कक्षा मोठ्या करायच्या असतील तर आधी सर्व प्रकारचे भेद व भ्रम नाहीसे केले पाहिजेत. तेव्हा ऋषिकेशजी, मोठे व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
च
चिगो Tue, 03/04/2014 - 12:42 नवीन
आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.
अरेरे !! माझ्या कुंडलीत लिहीले होते की "ये बच्चा गणित का महापंडीत होगा.." च्यामारी, बारावीत गणितात नापास झालो मी.. मी वयाच्या बत्तिसाव्या वर्षी "राजपत्रित अधिकारी" होणार, असंही लिहीलंय कुंडलीत.. मला सव्विसाव्या वर्षीच सरकारी नोकरी मिळाली की हो..
आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.
माझी हृद्यरेखा लै स्ट्राँग आहे, असं म्हणतात हात पाहणारे.. हे जर स्वभावाच्या बाबतीत असेल तर मी अत्यंत दगड माणूस आहे, असं बरेच जण म्हणतात. हे जर तब्येतीच्या बाबतीत असेल, तर मग माझी कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढलेली आहे, हे पण सांगू इच्छीतो.. आता बोला.. माणसानं करावं तरी काय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/04/2014 - 14:34 नवीन
चीगो साहेब राजपत्रात नाव आले का? ते बहुधा सरकारी खाक्याप्रमाणे ३२ व्या वर्षी येईल म्हणजे तुम्ही ३२ व्या वर्षी राजपत्रित अधिकारी होणार. (दुष्काळ हा जोवर फ्यामिन आक्ट पास होत नाही तोवर असू शकत नाही मग तो भले पुढच्या पावसाळी सत्रात पास का होईना तसेच हे.) ज्योतिष्यांचे भविष्य कसे खोटे ठरेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Wed, 03/05/2014 - 08:51 नवीन
नोकरी कन्फर्म केली सरकारनी.. हे ढिंक चिका ढिंक चिका धत्तड तत्त्ड धत्तड तत्तड.. ;-) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/04/2014 - 14:43 नवीन
दुष्काळ हा जोवर फ्यामिन आक्ट पास होत नाही तोवर असू शकत नाही मग तो भले पुढच्या पावसाळी सत्रात पास का होईना तसेच हे. सर्कारी इनोद ! एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 03/05/2014 - 09:00 नवीन
एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.
एवढ्यापायीच (आणि एम पी एस्सीचा लांबलचक फॉर्म पाहून) एम पी एस्सीची परीक्षा द्यायची कधी हिंमत झाली नाही. कॉलेजात आणखी एक किस्सा ऐकला होता. एका पोराला एमपीएस्सीतून नोकरी लागली. घरच्यांनी मग नोकरीनंतर छोकरी म्हणत पोरी पहायला सुरुवात केली. लग्न जुळलं. तारीख जवळ आली आणि सर्कारी आदेश सुटला. "परीक्षा प्रक्रीयेत झालेल्या काही तांत्रिक चुकांमुळे ह्यावर्षीच्या सगळ्या नियुक्त्या रद्द करण्यात येत आहे.." :-( बोंबला!! आधी एमपीएस्सीच्या परीक्षा फॉर्म निघणे ते नियुक्ती होणे, एवढ्या वेळेत MBBS चा कोर्स पुर्ण व्हायचा म्हणे.. ;-) आता परीस्थिती बरीच सुधारली आहे, असे ऐकीवात आहे.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आयुर्हित Tue, 03/18/2014 - 08:43 नवीन
MH370 - फ्लाईट डीलेड..या धाग्यावरचा प्रश्न : अधिराज - Mon, 17/03/2014 - 16:54 हे विमान शोधण्यासाठी ज्योतिषतज्ञ किंवा एखादे सिद्धीप्राप्त बाबा / महाराज ह्यांची मदत होऊ शकते का? यावर त्यांना व्यक्तिगत संदेश पाठवण्यात आला आहे. नक्कीच शोधता येईल.... त्यासाठी प्रवाशांपैकी एकाची तरी खरी अचूक कुंडली घेवून, त्याप्रमाणे सध्या त्याच्यावर काय प्रसंग येणार आहे? आणि जर मरण निश्चित असेल तर जळून,पाण्यात(उथळ कि खोल)पडून किंवा वाळवंटी किंवा शस्त्राने किंवा आगीमुळे होणार आहे नक्कीच हा अंदाज आला असता.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/18/2014 - 09:23 नवीन
चांगली आयडिया आहे. याला ज्योतिषी तयार होतील काय? आन खरी अचूक कुंडली कुठून आणायची? विमान अपघातात अथवा भुकंप वा तत्सम आपत्तीत जेव्हा अनेक माणसे जातात त्यावेळी सगळ्यांच्या कुंडलीत त्या वेळी मृत्यु योग असतो काय? हा प्रश्न ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद मधे घेतला आहेच. http://mr.upakram.org/node/811 इथे वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा