ज्योतिषशास्त्राचा फायदा
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत.
ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.
थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.
मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.
आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.
यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो.
कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल.
माझ्या मते या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत व बऱ्याच लोकांचा हा व्यवसाय असल्याने त्यात व्यावसायिक फायदे/तोटे असणारच. पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.
प्रतिक्रिया
दुष्काळ हा जोवर फ्यामिन आक्ट पास होत नाही तोवर असू शकत नाही मग तो भले पुढच्या पावसाळी सत्रात पास का होईना तसेच हे.सर्कारी इनोद ! एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.