Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
मित्रांनो, पुर्वी पासून विचारणा करत होतो की जेंव्हा बांधीव रस्ते वा मार्ग नव्हते. तेंव्हा प्रवासात लोकांना पथ दर्शनाचे व त्या पथिकांचे सामान वाहायला काय सोय केली जात असावी?.... विशेषतः जंगले, नद्या, पहाड, वाळवंटे आदी कठीण भागातून जाताना, विविध राज्यांच्या गावा- शहरातून जाताना, वेगवेगळ्या भाषेच्या प्रदेशातून जाताना असे वाटाडे व भारवाहक, बैलगाडीवान, रथ-टांगा(?), पालखी, मेणा-डोली वाहक फार महत्वाचे ... या शिवाय पुर्वी प्रवास करताना येणाऱ्या कष्टांची व गैरसोईंची रंगतदार माहिती इतरांनी भर घालून सादर करावी ही विनंती... अशीच एक रंगतदार माहिती रेल्वेप्रवासात प्रातर्विधीची गैरसोय मांडणारे एका बंगाली बाबूचे इंग्रजीतील पत्र सध्याच्या या सोईचे जनक झाले असे वाचल्याचे आठवते ते पत्र मिळाले तर पुन्हा वाचायला आवडेल.... नुकतेच खालील लिखाण वाचनात आले. त्यातील काही शुद्ध लेखनाच्या दुरुस्त्या करून सादर... भोई समाज इतिहास लेखक-हर्षवर्धन वसंत मोरे पौराणिक कथेनुसार भोई कसा निर्माण झाला? भारव्दाज ऋषी - महर्षी भारव्दाज यांनी भोई धर्मासाठी खुप चांगले काम केले आहे. भोई लोकांना योग्य मार्गदर्शन केले. भारव्दाज ऋषी यांची तपश्चर्या गंगा नदीत चालू होती. ते रोज पहाटे गंगेच्याकाठी येत असे. गंगेकाठी कुंभमेळा चालू होता. ते रोज पहाटे नदीकाठी जप करत असे व प्रार्थना करत असत. एके दिवशी प्रार्थना करताना, त्याच ठिकाणी मासा व कासव यांची झुंज चालू होती. यातच मश्याच्या प्रहाराने चुकुन त्यांची तपश्चर्या भंग झाली. यात त्या माश्याचे नाव मछिंद्र तर कासवाचे भुझारी होते. भारव्दाज ऋषी खुप संतप्त झाले. माश्यांच्या सृष्टीचा नाश होवो असा शाप दिला. तर कासवाला तु कधिही कुणाशी भांडण करणार नाहीस व तुझे पुर्ण आयुष्य पाण्यातच जाणार.असा शाप दिला. नंतर बारा ऋषींच्या मदतीने एक माणुस निर्माण केला. आपल्या दिव्य दृष्टीने त्याचे 'केवट' मानवात परिवर्तन केले. तो मनुष्य त्यांने माश्यांना नष्ट करण्यासाठी निर्माण केला होता. भारव्दाज ऋषींनी त्याला 'भोई' हे नाव दिले. भोई म्हणजे मासे मारणारा. ..... गंगाराम तावडे यांच्या पुस्तकानुसार (उपेक्षित व भटकंतीचा एक बळी) 'भोई' कसा निर्माण झाला? प्राचीन युगाचा प्रारंभाच्या वेळेस मनुष्याने भरपुर प्रगती केलेली होती. या काळातील लोक टोळ्यांमध्ये राहत होते. या टोळ्यांतील शक्तीशाली मनुष्य हा त्या टोळीचा प्रमुख असे. टोळी प्रमुखाला ‘म्होरक्या’ म्हणत. त्याच्याकडे टोळीच्या सुरक्षिततेची जवाबदारी असायची. साम्राज्यविस्तारामुळे स्थलांतराला चालना मिळाली. स्थलांतराच्या प्रसंगी सोबतची सामग्री व बि-हाड घेवुन कूच करणे ही महत्वपुर्ण गरज असायची. या कामासाठी राजाने सक्षम व्यक्तींची नि॓वड करून त्यांचेकडे दुबळ्या – थकल्या, आजारी माणसांची आणि बि-हाड-सामाग्रीचे ओझे पाठीवर, खांद्यावर अथवा डोक्यावर घेवून वाहतूकचे काम सोपविले. सत्तेची गरज म्हणुन आशा व्यक्तीसमुहाकडे काम वाटले. तत्पुर्वी ही वाहतूक कारणारी माणसे होतीच परंतु आता राजाच्या हुकुमाने प्रवास व मालवाहतूकीची राज्यांत सुविधा करण्यात आलेली होती. कालांतराने प्रत्येक राजाकडे ही प्रथा सुरू होवुन कायमची रूढ झालेली आहे. आशा प्रकारे राजाज्ञाने राजांचे पदरी असलेला आणि माणसे ओझे यांची प्रवास व सामग्री वाहतुक करणारा तत्कालीन ‘रिझर्व्हड् टारक फोर्स’ दुसरे तिसरे कोणी नसुन नवा अश्मयुगांतील पालखी, मेणा, डोली अथवा कावड इ. साधनांनी प्रवास व सामग्रीची वाहतुक सेवा करणारी ‘आदी भोई जमात’ होती हे पारंपारिक ऐतिहासिक घटनांवरून सिध्द होते. ‘पालखी वाहणारा भोई ‘ तर भारतभर इतिहास प्रसिध्द आहे. .....
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मुंबईत भोईवाडा नावाची एक जागा आहे. त्याचा आणि भोई जमातीचा काही संबंध असावा असे वाटते. जसे की कोळीवाडा, आग्रीपाडा इत्यादी.

हे घ्या ते बंगाली बाबूचे पत्रः . १९०९ सालच्या 'ओखिल चन्द्र सेन' यांच्या या पत्रामुळे इंग्रज सरकारने आगगाड्यांमधे शिशू सुविधा सुरू केली.

हा भोई समाज आज हि अस्तित्वात आहे. आणि ते जात प्रमाणपत्रावर सुद्धा हिंदू-भोई असेच लिहितात (जातीबद्दल लिहिल्याबद्दल क्षमस्व) माझा एक मित्र आडनाव सुद्धा भोई असेच लावतो. बऱ्याच वेळेला भोई आणि भोइर या आडनावांची गल्लत होते.

हा विषय अचानक का सुचला ते मलाही कळले नाही . इतर वाहानांच्या तुलनेत पालखी आणि मेणे मला वाटतं "कुपे" पध्दतीमुळे भारत आणि मुस्लीम प्रदेशात फार वापरले गेले .कारण उघड आहे . १मांडी घालून खाली बसण्याची चाल . २ आतून बाहेर पाहाता येते पण आत कोण आहे ते दिसत नाही .स्त्रियांसाठी उत्तम . ३चार भोई ठेवणे हत्ती घोडे पाळण्यापेक्षा सोपे .पार्किँगची विवंचना कमी .४ महंत आणि मठाधिपती हे संन्यासी राजेच असत आणि यांचे पाय सतत दुखत असतात .भोईच नंतर पाय चेपत असतील .चालता येत नाही ते घोड्यावर कसले बसतात . ४वाराणसी सारख्या शहरात अरुंद बोळात उपयोगी . ५डोक्यावर सावली मिळते . ६बंगाली स्त्रिया बाहेर तोंडपण दाखवत नाहीत .धनिकांच्या बायकांना उपयोगी . ७राजे महाराजांसाठी अनेक वाहनांपैकी एक .शिवाय काही मेणे नंतर हत्तीच्या पाठीवर हौद्यासारखे ठेवता येत असतील . ८त्याकाळी या वाहानाला विशेष प्रतिष्ठासुध्दा असेल . पाहू पुढे मागे एखादा ठेवीन म्हटतो.मर्सिडीजसाठी इंकमटैक्स क्लिअरन्स लागते ना .

त्याकाळी या वाहानाला विशेष प्रतिष्ठासुध्दा असेल . त्याकाळी घोडा, पालखी इत्यादीं ठवण्या/वापरण्यासाठी राजाची परवानगी लागायची. त्याला पालखीचा मान वगैरे म्हणायचे. हत्ती बहुदा फक्त राजेमहाराजे वापरायचे.

पथिक विश्रामालय व दिशा दर्शक पाट्या यांच्या अभावामुळे गंतव्य स्थल किती दूर याची खात्री पूर्वक माहिती व भाषांतर यासाठी वाटाडे किती कामाला येत असतील...

आत्म साधनेची जुनी वाट पुन्हा पुनरुज्जीवित करून मार्ग प्रशस्त करणाऱ्या गोएन्काजींना सादर वंदना. त्यांच्या भोईपणामुळे लाखोंच्या मशाली पेटल्या.