आयला या बायका म्हणजे......हुS श
चांगला रविवार होता. सकळाच्या भरपेट नाश्तायानंतर आरामात सोफ्यावर पेपर वाचत पडलो होतो. ही खाली बाजारात १० मीनटात जावुन येते (खीक *lol* १० मी ) असे सांगुन गेलेली तो १/२ तास झाला तरी पत्ता नव्हाता. एवढ्यात बेल वाजली म्हणुन दरवाजा उघडला तर कोपर्यात चप्पल भिरकावत, माझ्याकडे रागाने बघत, फणकार्याने, तरातरा चालत आतमध्ये गेली. आयला जाताना तर "राजा! मी बाजारात जातेय तुला काही हवंय का?" म्हणणारी (कसं मोराचं पीस फिरवल्यागत वाटत होतं हो. आहा हा रविवार सार्थकी लागणार असं वाटत होतं) आल्यावर एवढी वाफेच्या इंजिनासाअरखी चेहरा लाल *blush* करुन खदखदत का होती, कुणास ठाउक (गेला संपुर्ण रविवार डबडयात गेला).
मी दरवाजा बंद करुन पुन्हा सोफ्यावर जावुन वाचायाचा क्षीण प्रयत्न करत होतो. पण अर्धे लक्ष आतमध्ये होतं. न जाणो कधी गरम कुकरचं झाकण उघडायचं आणि गरम वाफ बाहेर पडायची.
या बायकांचं एक समजत नाही. आता बघा, काय झालं हे नवर्याने स्वःतहा विचारल्याशिवाय तोंडतुन शब्द बाहेर पडेल तर शपथ (च्यायला एरव्ही बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात ते कसे काय बुवा), बरं नाही विचारलं तर आतमध्ये धुसफुस चालु होते. भांड्यांचा फुटबॉल, एखादी बशी फुटणं, गेला बाजार तोंडाची "माझं मेलीचं नशीब..., माझंच चुकलं... असं काहीतरी पुटपुटणं चालु. आणि समोर आली आणि कधी हा मला विचारतोय का असे चेहर्यावर दिसत असतं म्हणुन विचारतो तर एक तर फुरगुटुन बसावं किंवा फुटलेलं अंड जसं वाहात जावं किंवा पाण्याने ट्म्म भरलेल्या पिशवीला टाचणी लागावी तसे सगळं मनातलं (याच आठवड्याचं की गेले कित्येक दिवसांच हे काय माहित नाय) बाहेर येतं.
खरं तर कारण काही तरी क्षुल्लक असतं पण यांना आख्खा दिवस त्यावर खिंड
लढवता येते. कधी भाजीवाल्या भैयाने यांना वजनात गंडवलेलं असतं, तर कधी घरापर्यंत येतो सांगुन गल्लीच्या टोकावरच सामानासकट खाली उतरवणारा रिक्षावाला कारणीभुत असतो. कधी शेजारणीशी खटका उडालेला असतो. मग एरव्ही जिन्यात भेटल्यावर किमान १/२ तास हव्या त्या विषायावर काथ्याकुट करणार्या शेजारणीला पाण्यात पाहते ही.
यांचा मुड सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच. बरं मुड जाण्याची कारणे अजुनही कैक आहेत. त्यातली किमान अर्धा डझन कारणं माझ्या वागण्यामुळे (असं तिला वाटतं हा!) निर्माण होतात.
आता बघा मी परवा रात्री जेवायला टबलावर बसलो तर पानात दोन भाज्या, म्ह्टलं वा बाईसाहेब खुश दिसताहेत.
"बिरड्याच्या भाजीची चव अप्रतिम आहे एवढंच म्ह्टलं." तर झालं पापाड मोडला.
"हो बरोबर लागणारचं शेजारच्या काटे वहिनींनी दिल्येय ना" आख्खी वाटी भरुन खा."
" अगं आता मला काय माहित होतं का स्वप्न पडलं होतं की ही भाजी काटे वहिनींनी दिल्येय ती."
" अहाहा ती वाटी काय आपली आहे?" मेली मी इथं दिवसभर मरमर करुन.... मी शांत बसतो ( करतो काय) झालं म्हणजे आता जेवयच्या आधी ताट वाट्यांकडे लक्षपुर्वक बघायला लागणार उद्यापासुन.
जेवण झाल्यावर शांतपणे टी.व्ही बघावा नी काय त्त्या रटाळं मालिका बघायच्या म्हणुन जरा नविन गाणी वाजवु म्हटलं तर
"हल्ली कोणतीच गाणी धड वाजवण्याच्या लायकिची नाहीत, ममता ने एक FTV हा Channel बंद केला पण तिला म्हणावं आत्ताच्या हिंदी पिक्चर मधली गाणी का नाही सेंसॉर होत?" मग रिमोट आपसुक तिच्या हातात जातो. मग सासु सुनेच्या रडक्या मालिका सुरु झाल्या की मी पुस्तक वाचत झोपी जातो.
कुठे बाहेर फिरायला गेलं की आम्ही आपलं फुटपट्टीसारखं सरळ चालावं, (हो काय बिशाद बाजुला असलेल्या हिरवळीचं ओझरतं जरी दर्शन घेतलं तर) तर हिला मध्येच काचेच्या शोकेस मधली भारीतली साडी दिसावी अन "चला ना नुसती किंमत तर पाहुन येवु ." म्हणत दुकानात शिरते न शिरते तर तो दुकानदारशेठ "हेS हेS हेS या मालक दुकान आपलंच आहे असं म्हणत " बारक्या, या मॅडमना नविन स्टॉक दाखवं" म्हणत दातांची बत्तीशी दाखवतो. तर इकडे क्रेडिटकार्ड वाकुल्या दाखवते.
शेजारची मीना परवा त्या वागळेंच्या मुलाच्या गाडीवरनं (बाई़क) घरी आली. त्या आधी फडकेंचा नातवाने तिला गल्लीच्या टोकापाशी सोडलं
" अगं हो. हो.. , बसेस येत नसतील वेळेवर म्हणुन एखादे वेळेस घेतली असेल लिफ्ट तर बिघडलं कुठे?"
"हो तुम्हाला भारी तिचा पुळका. महामाया आहे ती "मी बाई संतीण माझ्या मागे दोन तीन" अशी गत. या पुढे काय बोलणार.
"शेजारच्या बागड्यांची नमिता जीमला जातेय गेले दहा दिवस, वजन घटवायला,"
" बरं मग त्यात एवढं आश्र्चर्य काय?" आपल्या तब्येतीची काळजी घेते ही चांगली गोष्ट आहे की. तुला हवं असेल तर तुही लाव की? तेवढीच तिला सोबत होईल."
"जल्लं मेलं मला कशाला हवीत ही थेरं ती जातेय ते जाडी आहे अन लग्न जमत नाही म्हणुन. (याचा अर्थ-- माझं काय आता लग्न झालयं मी जाडी झाली तरी चालेल असा घ्यायचा का? *UNKNOWN*
नवर्याकडुन सुट्टीच्या दिवसात घरकांम कसं करुन घ्यायचं हे ह्यांना बरोबर माहित असतं. "अहो माझा हात पोहचत नाही त्या सिलिंगची जळमटं काढायचेत जरा मदत करा ना." "आज मला तुमच्या हातचा चहा प्यावासा वाटतो." "खाली जाताय तर जाताना दळणाची पिशवी भैयाला नेवुन द्या ना तेवढी." जरा मी शेजारच्या काकुंबरोबर साड्यांचं प्रदर्शन भरलंय तेवढं पाहुन अर्ध्या तासातच येते तुम्ही जरा ती वॉशिंग मशीनचा तिसरा राउंड झालाय तेव्हा तेवढे कपडे ड्रायरला लावता का?
कामं करायला काही वाटत नाही. पण मग हा एवढ्या गोड मधाळ आवाजात कशाला सांगायला पाहिजे. नीट सांगा ना.
आम्ही काय नाही म्हणतोय थोडंचं.
अरे त्या खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे मधमाशांना दुसरीकडे कुठे जायला नको. या बघा इथे प्रत्येक वाक्याला मध टपकतंय नुसतं.
तर काय हा असा या बायकांचा स्वभाव . काही कळत नाही आणि वळतही नाही.काय लोक्स तुमाला तुमच्या बायडीचा स्वभाव कळला काय? कळलाय मग लई बेस झालं.
साप शांतपणे पहुडला आहे तर कशाला उगाच त्याच्या शेपटीवर पाय देताय?+१