Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयला या बायका म्हणजे......हुS श

आ
आंबट चिंच यांनी
Wed, 03/05/2014 - 12:41  ·  लेख
लेख
चांगला रविवार होता. सकळाच्या भरपेट नाश्तायानंतर आरामात सोफ्यावर पेपर वाचत पडलो होतो. ही खाली बाजारात १० मीनटात जावुन येते (खीक *lol* १० मी ) असे सांगुन गेलेली तो १/२ तास झाला तरी पत्ता नव्हाता. एवढ्यात बेल वाजली म्हणुन दरवाजा उघडला तर कोपर्‍यात चप्पल भिरकावत, माझ्याकडे रागाने बघत, फणकार्‍याने, तरातरा चालत आतमध्ये गेली. आयला जाताना तर "राजा! मी बाजारात जातेय तुला काही हवंय का?" म्हणणारी (कसं मोराचं पीस फिरवल्यागत वाटत होतं हो. आहा हा रविवार सार्थकी लागणार असं वाटत होतं) आल्यावर एवढी वाफेच्या इंजिनासाअरखी चेहरा लाल *blush* करुन खदखदत का होती, कुणास ठाउक (गेला संपुर्ण रविवार डबडयात गेला). मी दरवाजा बंद करुन पुन्हा सोफ्यावर जावुन वाचायाचा क्षीण प्रयत्न करत होतो. पण अर्धे लक्ष आतमध्ये होतं. न जाणो कधी गरम कुकरचं झाकण उघडायचं आणि गरम वाफ बाहेर पडायची. या बायकांचं एक समजत नाही. आता बघा, काय झालं हे नवर्‍याने स्वःतहा विचारल्याशिवाय तोंडतुन शब्द बाहेर पडेल तर शपथ (च्यायला एरव्ही बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात ते कसे काय बुवा), बरं नाही विचारलं तर आतमध्ये धुसफुस चालु होते. भांड्यांचा फुटबॉल, एखादी बशी फुटणं, गेला बाजार तोंडाची "माझं मेलीचं नशीब..., माझंच चुकलं... असं काहीतरी पुटपुटणं चालु. आणि समोर आली आणि कधी हा मला विचारतोय का असे चेहर्‍यावर दिसत असतं म्हणुन विचारतो तर एक तर फुरगुटुन बसावं किंवा फुटलेलं अंड जसं वाहात जावं किंवा पाण्याने ट्म्म भरलेल्या पिशवीला टाचणी लागावी तसे सगळं मनातलं (याच आठवड्याचं की गेले कित्येक दिवसांच हे काय माहित नाय) बाहेर येतं. खरं तर कारण काही तरी क्षुल्लक असतं पण यांना आख्खा दिवस त्यावर खिंड Submachine Gun लढवता येते. कधी भाजीवाल्या भैयाने यांना वजनात गंडवलेलं असतं, तर कधी घरापर्यंत येतो सांगुन गल्लीच्या टोकावरच सामानासकट खाली उतरवणारा रिक्षावाला कारणीभुत असतो. कधी शेजारणीशी खटका उडालेला असतो. मग एरव्ही जिन्यात भेटल्यावर किमान १/२ तास हव्या त्या विषायावर काथ्याकुट करणार्‍या शेजारणीला पाण्यात पाहते ही. यांचा मुड सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच. बरं मुड जाण्याची कारणे अजुनही कैक आहेत. त्यातली किमान अर्धा डझन कारणं माझ्या वागण्यामुळे (असं तिला वाटतं हा!) निर्माण होतात. आता बघा मी परवा रात्री जेवायला टबलावर बसलो तर पानात दोन भाज्या, म्ह्टलं वा बाईसाहेब खुश दिसताहेत. "बिरड्याच्या भाजीची चव अप्रतिम आहे एवढंच म्ह्टलं." तर झालं पापाड मोडला. "हो बरोबर लागणारचं शेजारच्या काटे वहिनींनी दिल्येय ना" आख्खी वाटी भरुन खा." " अगं आता मला काय माहित होतं का स्वप्न पडलं होतं की ही भाजी काटे वहिनींनी दिल्येय ती." " अहाहा ती वाटी काय आपली आहे?" मेली मी इथं दिवसभर मरमर करुन.... मी शांत बसतो ( करतो काय) झालं म्हणजे आता जेवयच्या आधी ताट वाट्यांकडे लक्षपुर्वक बघायला लागणार उद्यापासुन. जेवण झाल्यावर शांतपणे टी.व्ही बघावा नी काय त्त्या रटाळं मालिका बघायच्या म्हणुन जरा नविन गाणी वाजवु म्हटलं तर "हल्ली कोणतीच गाणी धड वाजवण्याच्या लायकिची नाहीत, ममता ने एक FTV हा Channel बंद केला पण तिला म्हणावं आत्ताच्या हिंदी पिक्चर मधली गाणी का नाही सेंसॉर होत?" मग रिमोट आपसुक तिच्या हातात जातो. मग सासु सुनेच्या रडक्या मालिका सुरु झाल्या की मी पुस्तक वाचत झोपी जातो.Sleeping कुठे बाहेर फिरायला गेलं की आम्ही आपलं फुटपट्टीसारखं सरळ चालावं, (हो काय बिशाद बाजुला असलेल्या हिरवळीचं ओझरतं जरी दर्शन घेतलं तर) तर हिला मध्येच काचेच्या शोकेस मधली भारीतली साडी दिसावी अन "चला ना नुसती किंमत तर पाहुन येवु ." म्हणत दुकानात शिरते न शिरते तर तो दुकानदारशेठ "हेS हेS हेS या मालक दुकान आपलंच आहे असं म्हणत " बारक्या, या मॅडमना नविन स्टॉक दाखवं" म्हणत दातांची बत्तीशी दाखवतो. तर इकडे क्रेडिटकार्ड वाकुल्या दाखवते. Bling bling शेजारची मीना परवा त्या वागळेंच्या मुलाच्या गाडीवरनं (बाई़क) घरी आली. त्या आधी फडकेंचा नातवाने तिला गल्लीच्या टोकापाशी सोडलं " अगं हो. हो.. , बसेस येत नसतील वेळेवर म्हणुन एखादे वेळेस घेतली असेल लिफ्ट तर बिघडलं कुठे?" "हो तुम्हाला भारी तिचा पुळका. महामाया आहे ती "मी बाई संतीण माझ्या मागे दोन तीन" अशी गत. या पुढे काय बोलणार. "शेजारच्या बागड्यांची नमिता जीमला जातेय गेले दहा दिवस, वजन घटवायला," " बरं मग त्यात एवढं आश्र्चर्य काय?" आपल्या तब्येतीची काळजी घेते ही चांगली गोष्ट आहे की. तुला हवं असेल तर तुही लाव की? तेवढीच तिला सोबत होईल." "जल्लं मेलं मला कशाला हवीत ही थेरं ती जातेय ते जाडी आहे अन लग्न जमत नाही म्हणुन. (याचा अर्थ-- माझं काय आता लग्न झालयं मी जाडी झाली तरी चालेल असा घ्यायचा का? *UNKNOWN* नवर्‍याकडुन सुट्टीच्या दिवसात घरकांम कसं करुन घ्यायचं हे ह्यांना बरोबर माहित असतं. "अहो माझा हात पोहचत नाही त्या सिलिंगची जळमटं काढायचेत जरा मदत करा ना." "आज मला तुमच्या हातचा चहा प्यावासा वाटतो." "खाली जाताय तर जाताना दळणाची पिशवी भैयाला नेवुन द्या ना तेवढी." जरा मी शेजारच्या काकुंबरोबर साड्यांचं प्रदर्शन भरलंय तेवढं पाहुन अर्ध्या तासातच येते तुम्ही जरा ती वॉशिंग मशीनचा तिसरा राउंड झालाय तेव्हा तेवढे कपडे ड्रायरला लावता का? कामं करायला काही वाटत नाही. पण मग हा एवढ्या गोड मधाळ आवाजात कशाला सांगायला पाहिजे. नीट सांगा ना. आम्ही काय नाही म्हणतोय थोडंचं. अरे त्या खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे मधमाशांना दुसरीकडे कुठे जायला नको. या बघा इथे प्रत्येक वाक्याला मध टपकतंय नुसतं. तर काय हा असा या बायकांचा स्वभाव . काही कळत नाही आणि वळतही नाही.काय लोक्स तुमाला तुमच्या बायडीचा स्वभाव कळला काय? कळलाय मग लई बेस झालं.

प्रतिक्रिया द्या
18388 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

ज
जेपी Wed, 03/05/2014 - 12:52 नवीन
=)) अवांतर - तुमची हे आपल धाग्याची शंभरी भरणार .
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच गुरुवार, 03/06/2014 - 03:51 नवीन
भरु द्या की माझी पण शंभरी (म्हणजे वयाची हो!) मग मी मिसळपावचा माजी सदस्य म्हणुन मनगटात जोर असे पर्यंत कळफलक बडवत खिंड लढवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
व
विटेकर Wed, 03/05/2014 - 13:11 नवीन
आवडलं , घरोघरी मातीच्या चुली. सवयीने आता त्याचे वैषम्य ही वाटत नाही . चालायचचं ! कधी तरी कांद्याचं थालीपीठ वगैरे .. हा पु लं ड्व्यायलॉग आठवावा ! जाऊ द्या !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 13:12 नवीन
शंभरी भरायच्या प्रतीक्षेत. स्वयंघोषित प्रवक्त्यांच्याही प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 03/05/2014 - 13:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मुक्त विहारि Wed, 03/05/2014 - 13:23 नवीन
झक्कास....
  • Log in or register to post comments
श
शिद Wed, 03/05/2014 - 13:33 नवीन
आपलेच दात आणि आपलेच ओठ... असो.........(येथे दिर्घ सुस्कारा सोडलेली स्मायली कल्पावी...)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/05/2014 - 13:45 नवीन
@आणि समोर आली आणि कधी हा मला विचारतोय का असे चेहर्‍यावर दिसत असतं म्हणुन विचारतो तर एक तर फुरगुटुन बसावं किंवा फुटलेलं अंड जसं वाहात जावं >>> Image removed. @ महामाया आहे ती "मी बाई संतीण माझ्या मागे दोन तीन" >>> Image removed. वारल्या गेलो आहे! Image removed. आता या धाग्यावर पाशवी शक्तिंचा जोरदार हल्ला होणार..असे भाकित वर्तवतो! Image removed. (सगळ्यांच्या कुंडल्यांमधले राहू/केतू कळणारा) ज्योतिषचंद्र-आत्मू! Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/05/2014 - 15:06 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/05/2014 - 16:46 नवीन
ज्योतिषचंद्र आत्मू ! :D धन्यवाद! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रमताराम Fri, 03/14/2014 - 07:57 नवीन
ज्योतिषचंद्र आत्मू ! >> ळॉळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Wed, 03/05/2014 - 15:11 नवीन
सारे कसे शांत शांत !(ही शांतता वादळापूर्वीची असं कोण म्हणालं ते? ) :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/05/2014 - 15:13 नवीन
असो... पळावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
माहितगार Wed, 03/05/2014 - 15:20 नवीन
८ मार्च अजून दूर आहे ! :)
  • Log in or register to post comments
म
मृगजळाचे बांधकाम Wed, 03/05/2014 - 15:21 नवीन
घरोघरी तेच आहे हो
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Wed, 03/05/2014 - 15:33 नवीन
ह्म्म्म , एकंदरित लेख वाचुन तुम्हाला झेपत नाहि असा अंदाज वर्तवावासा वाटतोय .
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 03/05/2014 - 16:21 नवीन
हाहाहा =)) =)) फुटले!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची
ब
बाबा पाटील Wed, 03/05/2014 - 15:49 नवीन
नुसती बत्तीच द्यायची तर आख्या दारुगोळ्याच्या कोठारालाच आग लावुन पळाले की राव.!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/05/2014 - 16:43 नवीन
एकदा बायकोच्या नावाने ओरडत होता. विसरलात काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
व
विनोद१८ Wed, 03/05/2014 - 18:46 नवीन
*mosking* विनोद१८
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच गुरुवार, 03/06/2014 - 04:04 नवीन
बॅटमॅन, सूड, मुक्त विहारि, शिद, अत्रुप्त आत्मा,शुचि,बाबा पाटील,विनोद१८- सर्वांना धन्यवाद . स्वगतः- अजुन अनाहितांचा हल्ला कसा झाला नाही कुणास ठाउक? Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 03/06/2014 - 04:34 नवीन
स्वगतः- अजुन अनाहितांचा हल्ला कसा झाला नाही कुणास ठाउक? फाट्यावर तर मारले नाही ना????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
इ
इरसाल गुरुवार, 03/06/2014 - 11:31 नवीन
अजुन अनाहितांचा हल्ला कसा झाला नाही कुणास ठाउक
अनाहिता हे नाव बदलुन "हाणा इथ" करावे ही लम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
भ
भाते गुरुवार, 03/06/2014 - 05:21 नवीन
साप शांतपणे पहुडला आहे तर कशाला उगाच त्याच्या शेपटीवर पाय देताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
ज
जेपी गुरुवार, 03/06/2014 - 06:11 नवीन
साप शांतपणे पहुडला आहे तर कशाला उगाच त्याच्या शेपटीवर पाय देताय? +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/06/2014 - 06:42 नवीन
@स्वगतः- अजुन अनाहितांचा हल्ला कसा झाला नाही कुणास ठाउक?>>> :D बघा....बघा...हो! आंम्ही जातकांचे मन कसें ओंळंखतोंsss.. ते बघा!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 06:46 नवीन
'अनाहितांचा हल्ला' असं सारखंसारखं वाचून कुठलं मधमाशांचं दळ आहे की काय असं वाटत राहतं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आंबट चिंच गुरुवार, 03/06/2014 - 07:04 नवीन
त्या मधमाशा नाही आहेत. आयला बॅट्या त्या निदान एकदा चावुन तरी सोडुन देतील पण या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 07:10 नवीन
ही ही ही ही ;) पाशवीपण, कालपण आजपण उद्यापण! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
म
मनीषा गुरुवार, 03/06/2014 - 04:16 नवीन
चिंच फारच आंबट हो... पण चिंचेबरोबर जरासा गूळ घातला, की आमटी चवदार होते बरं का.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 03/06/2014 - 04:30 नवीन
@ मनिषा :- आयला हे तर का खास शालजोडीतले मारलेत की.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/06/2014 - 06:03 नवीन
हॅहॅहॅ... हॅहॅहॅ... नारायण ! नारायण ! ;) चला जरा कळं लावुन {पक्षी :- काडी लावुन } जावे म्हणतो ! ;) मंडळी काय म्हणतात ते... हं लुफ्त घ्या हो खालच्या धाग्याचा ! ;) बायको ही सायको असते..डरकाळ्या आणि म्यांव..म्यांव . .. ... परत एकदा... नारायण ! नारायण ! ;)
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री गुरुवार, 03/06/2014 - 10:01 नवीन
नवर्याला उशाखालाचा काय म्हणतात माहिती आहे ना ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
आ
आंबट चिंच गुरुवार, 03/06/2014 - 10:22 नवीन
काय माहीत नाही ब्वॉ. जरा इस्कटुन इस्कटुन सांग ना आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
आ
आत्मशून्य गुरुवार, 03/06/2014 - 07:11 नवीन
Any man who can drive safely while kissing a pretty girl is simply not giving the kiss the attention it deserves.
- Albert Einstein
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील गुरुवार, 03/06/2014 - 07:20 नवीन
भुतावळ कुठे गायब झालीय ? नक्कीच काहीतरी झोल आहे ? त्या अतृप्त आत्म्याला विचारुन पाहिले पाहिजे ?
  • Log in or register to post comments
भ
भाते गुरुवार, 03/06/2014 - 07:35 नवीन
उद्या कुठलातरी जागतिक दिवस का असे काहीतरी आहे ना! त्यामुळे सगळी भुतावळ त्याची चर्चा करत असतील. :) पळा आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 07:47 नवीन
उद्या त्यांचा दिवस आहे हो. तो झाला की चरचा तर होनारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/06/2014 - 08:12 नवीन
@भुतावळ कुठे गायब झालीय ? नक्कीच काहीतरी झोल आहे ? त्या अतृप्त आत्म्याला विचारुन पाहिले पाहिजे ?>>> =)) नक्की कोणत्या दिशेनी हल्ला करायचा? यावर इचार करत असतील! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
स
स्पंदना गुरुवार, 03/06/2014 - 07:56 नवीन
श्या! काय घरच उगाळताहेत लोक? निवडणुका जाहिर झाल्यात. तिकडे जावं म्हणतेय.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/06/2014 - 08:13 नवीन
शतकी धाग्या साठी माणुस काय काय लिहीतो... जगदंब.. जगदंब...
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच गुरुवार, 03/06/2014 - 08:29 नवीन
ओ पीरातै ! असं नै कै ही पलिकडचा पण लेख लिहुन तयार आहे. फक्त डकवायची खोटी आहे. ओ अर्प्णातै :- त्यांचे निकाल काय जगजाहिर आहेत, ते काय बघायचं? आता त्यांचा (महिलांचा) झाला की " आपण जागतिक पुरुषदिन साजरा करु" Image removed. लेडीज फर्स्ट काय बॅट्या.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 08:33 नवीन
अगदी अगदी!!! मुळात एक दिवस साजरा करावा अशी परिस्थितीच अजून आलेली नाही! सर्व दिवस आमचेच. तशी स्थिती येईल तेव्हा पाहू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
क
कवितानागेश गुरुवार, 03/06/2014 - 08:33 नवीन
मला धागाच कळला नाही. प्रॉब्लेम काय आहे नक्की?
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 03/06/2014 - 08:43 नवीन
....मोड ऑन "एका विवाहीत पुरुषाच्या धाग्यावर अविवाहीत पोरांचा दंगा पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली" ....मोड ऑफ
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/06/2014 - 08:49 नवीन
जेपी! =)) Image removed. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्यारे१ गुरुवार, 03/06/2014 - 08:58 नवीन
___/\___ एक चित्र हजार शब्दांचं काम करतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आंबट चिंच गुरुवार, 03/06/2014 - 08:47 नवीन
ं मोड ऑन ( कायमचा) घ्या पोट्ट आमचं लग्न लावुन मोकळं झालं की ! काय चान्शच नाय ठेवला
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 03/06/2014 - 08:57 नवीन
वा वा, धाग्याची प्रगती बघुन बरे वाटले. सुरुवातीला धाग्याने जरा मान टाकली होती पण आता चांगलच बाळसं धरलयं खुद्द बुवा आणि बॅटमॅन जोरदार बॅटींग करतायत. होणार होणार, शतक होणार.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 09:48 नवीन
अहो आमच्या ब्याटिंगने काय होणार? पाशवी हल्ला झाला तरच धाग्यात काही मजा आहे. नैतर फक्त इतरांची ब्याटिंग पाहणे एक सजा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा