.....हु S श जळली मेली पुरुषजात ती
टीप :- हा धागा वाचण्या पुर्वी आयला या बायका म्हणजे......हुS श हा धागा वाचावा.
"चल गं मी गेलो " असे म्हणाले आणि हे दार लावुन ऑफिसला निघुन गेले. जरा वेळाने स्वंयपाक घरातुन बाहेर आले. म्ह्टंल सकाळपासुन नुसतं काम काम. चला आता जरा कालच्या मालिका बघायच्या राहिल्या होत्या त्या पाहुया म्हणुन सोफ्यावर बसले, तर समोर टीपॉय वर हे पाकिट तसेच विसरुन गेलेले. " कप्पाळ , किती हा विसराळुपणा" आता टी.सी ने पकडले म्हणजे गे S ली यांची १२ डब्यांची लोकलगाडी कारशेड मध्ये. किती हा धांदरटपणा, जर आपण ऑफिसला जाणारे कपडे रोज नवे घालतो तर जुन्या कपड्यातील पाकीट, मोबाईल , रुमाल या वस्तु स्वःताच्या स्व:तहा नको का व्यवस्थित घ्यायला, का ते पण बायकोनेच आठवणीत ठेवायचे. लग्न झाल्यापासुन पाहतेय हे, मी म्हणुन सांभाळुन घेते. लग्नात पाहायला आले होते तेव्हा कांदेपोहे खाताना( हो कांदेपोहेच मग काय सागुती पाहिजे होती, अजुन कशात काय नाय नी) तर एवढा जोरात ठसका लागला की तोंडातुन.... जावुदे. नंतर चहा पिताना ईSS ई ती सगळी मिशी त्या चहात न्हावुन निघालेली पाहिली मी. मग घरी सगळ्यांनी आग्रह केला म्हणुन बाईकवरुन(ते पण मित्राच्या) लॉग ड्राईव्हला नेले तर बसल्यावर एक हात खांद्यावर तर, एक मांडी वर ठेवला (कसलं रोमँटीक वाटंत होतं) तर हा Sहा Sहा S ही S ही S ही हु S हु S झाली "ह" ची बाराखडी चालु, म्ह्टलं "काय झालं?" तर " काही नाही पहिल्यांदाच एक पोरगी ( अॅ हे S हेS हे S कोणाला सांगताय, मी काय पाळण्यात आहे
) मला हात लावतेय ना! गुदगुल्या होतायत तिथे. मग त्या भेटीत तेव्हाच सांगुन टाकलं हे ओठांवरचं मैदान साफ करायचं, नाहीतर कातरुन ठेवायची तर म्हणाले "हॅ हॅ मुछें तो मर्दो की शान है." कप्पाळ माझं. लग्न झाल्यावर अमोल पालेकरचा गोलमाल चांगली झीट येई पर्यंत दाखवला पाहिजे.
आता परवाचीच गोष्ट यांना म्हटलं शुक्रावारी नविन पिक्चर लागलाय तर आपण फर्स्ट डे फर्स्टच्याच पण लास्ट शो ला रात्री ९-१२ ला जाऊया का? तर म्हणतात "तुला माहिती आहे ना हल्लीचे दिवस कसे खराब आहेत. रात्री उशिरा बाहेर थांबणे बरे नव्हे." आता कुठे गेला हो तो मर्दपणा.
हेरवी माझ्या बरोबर रस्त्याने फुटपट्टी सारखे सरळ (खीSक *lol* सरळ म्हणे. मेली सगळी पुरुषजात लो**) चालल्याचा आंव आणतात पण नजर कुठे? तर समोर येणार्या जाणार्या इतर बालिकांकडे.(मला माहिती आहे सगळे पुरुष त्यांच्या भाषेत हिरवळ म्हणतात)
डोळे फाडून बघातात.
अरे बघायचे आहे ना तर बिंधास्त बघा ना, नाही कोण म्हणतंय?. एखादी सुंदर वाटली तर तारिफ पण करा की . "सौंदर्याची मुक्तपणे स्तुती करावी" मी काय नाही म्हणते आहे?" पण नाही फक्त वरवर बघत असल्यचा आंव आणायचा आणि नजर तर पार आरपार गेलेली ( शोधुन काढलं की नाही ढॅSण्टSण्टॅSटॅSण
) मला अंधुकस आठवतय या विषयावर मागे एकदा मित्राने यांना छेडलं होतं तर त्याला टाळी देत काही तरी कोटी केली होती, काय तर म्हणे " हॉटेलात गेलो आणि पोट भरलेलं असलं तरी काय झालं, मेनु कार्ड तर बघु शकतो ना." जळ्लं मेलं लक्षण ते.
बरं आता रस्त्याने चालताना कधी नव्हे ती चांगली साडी दिसली, म्हणुन दुकानात शिरले तर कपाळावर कोळ्याचं जाळं.
दुकानात गेल्यावर आटप लवकरची भुणभुण, साडीचा पदर अंगावर लेवुन "कशी दिसते" सल्ला मागितला तर "जातीच्या सौंदर्याला.. म्हणत हीच साडी सुंदर आहे असा निर्णयच देतात, आणि चल आटपलं ना म्हणत पाकिटाला हात घालतात. किती घाई ही.
बरं यांना कामावरुन आल्यावर दिवसभरातलं काय घडलं म्हणुन सांगाव तर ती पण सोय नाही. शेजारच्यांचा भारी पुळका. त्या वागळ्यांच्या मीना विषयी सांगीतलं, तर काय म्हणे "बसेस वेळेवर मिळत नाहीत म्हणुन एखादे वेळेस आली असेल कोणाच्या ना कोणाच्या तरी बाईक वरुन घरी त्यात काय एवढं". हंम्म कथा कोणाची व्यथा कोणाला! अरे काय अलिबागवरुन आले काय मी? दिसत नाही मला
बेस्टच्या गाड्या दर दोन मीनटाला धावत असतात रस्त्यावर ते. नट मोगरी मेली , नुसतं मिरवायला पाहिजे दुसरं काय?
ती जाडी नमिता लग्न जमत नाही म्हणुन जीमला जाते असं सांगितलं तर मलाही तिच्याबरोबर जीमला जायला सांगतात. मी जाडी वाटते तर मग होकार कसा दिलात हो ?. आणि लग्नाआधी काय मी चवळीची शेंग होते?. पहिल्यापासुन मिडीयम तर आहे माझी पर्सनालीटी.
दुसरं म्हणजे लग्ना आधी बरं लाडं लाडं वागत होतात रिक्षामध्ये चिकटून बसत होता आणि आता मी या टोकाला तुम्ही त्या टोकाला. बागेत माझ्याकडेच बघत बोलायचात; भान नसायचं आता बागेत गेलं की पक्षी, फुलं, बागकाम हे विषयावर गाडी घसरते. त्याहुन कहर म्हणजे मी राहते बाकड्यावर बसुन हे त्या माळ्याशी हे फुलझाड कोणते ते कोणते, ते कधी फुलतं अशा गप्प मारता.
घरात मी काही केलं की कधी कौतुकाचे चार शब्द कानावर पडतील तर शपथ. आज काय पोळीच्या कडा जाड झाल्यात , उद्या काय तर भाजी अळणी झाली, परवा काय तर शिजली नव्हती. मग त्या पोंक्षीणीची, काटेवहिनींची एखादी डीश आली की तीची कशीही चव असो, मग कशी यांची रसवंती पाझरयला लागते.
घरी हातात रिमोट असला तरी चुळबुळ चालू, एक धड चॅनल नीटपणे पाहतील तर शपथ, सारखं इकडे काही पहायला मिळतंय का? तिकडे काही पहायला मिळतंय का? असं करत "एम. टी.व्ही", "व्ही टी.व्ही", "एफ. टी.व्ही", "रॉक संगीत" असं सर्फिंग करायचं. खरं तर या नट्यांनी "तुम्हाला हवं ते(अंगाच्या बाबतीत) का दाखवावं, त्यांना येतय ते (अभिनयाच्या बाबतीत) का दाखवु नये म्हणते मी" बरं काहीच नाही मिळालं म्हणजे मग निराशेने गाडी इंग्रजी सिनेमाच्या चॅनेलवर येवुन थांबते. आता ते " वS गाS वS", "णॉ S ओS ओ Sव", "यॉ S व S" हे असले हेल काढत बोललेली भाषा काय ऐकायची? काय कळतंय का नुसताच
चौफेर उधळलेला.
बरं केलं तर खाणार कितीसं हे एवढंस. मग शेजारच्यांची भांडी परत रिकामी देवु नयेत म्हणून तिकडे थोडं पाठवायचं.
जावु दे किती म्हणुन, अन काय काय सांगाव, फुकटचा डोक्याला चाप, मेली ती टी.व्ही ची मालिका संपुन जायची.
आता दिवसभर निदान हे येईपर्यंत तरी शांतता राहुदे रे बाबा.
>>त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आत्मुगुर्जींचं आम्ही नाव तरी घेतलंय का?*biggrin* :-D :D +D =D :biggrin: