आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा आणि मराठी विकिपीडिया संपादनेथॉन
नमस्कार ,
८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमीत्त हार्दीक शुभेच्छा. ज्ञानक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा असे विकिपीडिया ज्ञानकोशाचा कणा असलेल्या विकिमीडिया फाऊंडेशनचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे.
ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यांना ह्या उपक्रमात मराठी विकिपीडियातील लेखांच्या लेखनात संपादनात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!
आपण आपल्या कोणत्याही लेखात लेखन करू शकता तरी पण आपल्या सोई साठी काही दुवे :
* विकिपीडिया:महिला
* विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प
* विकिपीडिया आणि ज्ञानकोश या संकल्पने बाबत मिपावर या पुर्वी फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते
या धाग्यावर माहिती दिलेली आहे.
*वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने या मिपा धाग्यावरही मराठी विकिपीडियातील काही लेखांचे दुवे उदाहरणार्थ उपलब्ध आहेत.
मागच्या वर्षी बेंगलोर येथे महिला दिवसाच्या निमीत्ताने झालेल्या विकिपीडिया कार्यशाळेचे एक छायाचित्र (सौजन्य:विकिमिडीया कॉमन्स)
पुन्हा एकदा शुभेच्छा आणि उपक्रमातील सहभागाबद्द्ल धन्यवाद.
पुन्हा एकदा शुभेच्छा आणि उपक्रमातील सहभागाबद्द्ल धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(11)
म
माहितगार
Fri, 03/07/2014 - 11:39
नवीन
महिला संपादनेथॉन- २०१४
पहिल संपादन या चित्राने आल आहे

- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 03/07/2014 - 12:00
नवीन
संपादनेथॉन?!
संपादनसत्र किंवा संपादनयज्ञ वगैरे बरा शब्द घ्या की
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 03/07/2014 - 12:12
नवीन
संपादनसत्र किंवा संपादनयज्ञ दोन्ही शब्द आवडले. संपादनसत्र मॅरेथॉन मधील अर्थछटेस जवळचा वाटतो. प्रतिसादाकरिता धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 03/07/2014 - 13:11
नवीन
शुभेच्छा
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 03/07/2014 - 17:38
नवीन
महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! आजच विकि वर खाते तयार केलंय. बघते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 03/08/2014 - 03:48
नवीन
मराठी विकिपीडियावर अवश्य लिहा. तुमच्या रूचीच्या कोणत्याही विषयावर लिहू शकता. मी मागे महिला बचत गटांच्या स्वयंरोजगार उपक्रम (तीन एक) कार्यशाळांना मार्गदर्शन केले आहे; त्यामुळे बँकींग आणि खेळते भांडवल (वर्कींग कॅपीटल) या विषयावरही माहितीत आपल्या सवडीनुसार काही भर टाकता आल्यास पाहावे महिला व्यावसायिक आणि उद्योजकांना उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.
खरेतर गोवा आणि दक्षीण भारतातील काही शहरातून आज महिला विकि कार्यशाळा सुद्धा आयोजीत केल्या गेल्या आहेत. (मुंबई पुण्यात पुर्वी झाल्या आहेत).
इंग्रजी विकिपीडियावर भारतीय विकिपीडिया महिला गटांनी भारतीय स्त्री खासदार आणि स्त्री संशोधक असे विषय निवडले आहेत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 03/08/2014 - 03:58
नवीन
मराठी विकिपीडियावरील विकिपीडिया:महिला प्रकल्पाचा परिघ/उद्देश सध्या खालील प्रमाणे लिहिला आहे. यात काही सुधारणा सुचवाव्यात असे आवाहन आहे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 03/08/2014 - 04:18
नवीन
आमच्या आयुष्यामधे माता, भगिनी, बेष्ट मैत्रिण, खास मैत्रिण आदी भुमिका निभावुन आमच्या सुख**-दु़खा:त* सहभागी होणार्या महिलांना महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्चा.
*दु़ख्ख:=सुट्टीच्या दिवशी पहाटे नऊ वाजता उठवुन ५-६ तास शॉपिंगच्या नावाखाली उभे करणे, मॅच चालु असताना कोपर्यावरच्या भाजीवाल्याकडुन कोथिंबीर आणायला लावणे ईत्यादी :)....<३
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 03/08/2014 - 13:48
नवीन
यात ख़ास मैत्रिण प्रकार मैत्रिण विद बेनिफिट या अर्थानचे घ्यायचा का ?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 03/08/2014 - 14:08
नवीन
बेष्ट मैत्रिण आणि खास मैत्रिण फरक अस्तोय भौ!!!! अर्थात मैत्रिण विथ बेनिफिट ह्या अर्थानी नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 03/08/2014 - 11:15
नवीन
मराठी विकिपीडियावरील अलीकडील बदल बघीतले तर आज दुपार पासून मराठी विकिपीडियावर केवळ महिलांच राज्य असल्या सारखे वाटते आहे केवळ महिलांचीच संपादने दिसताहेत !
- Log in or register to post comments