Welcome to misalpav.com
लेखक: सुज्ञ | प्रसिद्ध:
खूप प्रकाश आहे … अनेक दिवे झगमगत आहेत …. अशातच एखादी दीपमाळ लक्ष वेधून घेते कारण नसत …. पण काहीतरी सुंदर वाटतं … एखादी सामायोसुचीत हालचाल … कुठलातरी रंग … जेंव्हा सगळंच चवदार वाटायला लागतं तेंव्हा एकच पदार्थ असा असतो कि जो आवडून जातो बेगम अख्तरी बाई अशाच … मी त्यांना प्रत्यक्ष बघितलाय किंवा ऐकलंय असं घडणच शक्य नाही … माझं तेवढं नशिबही बलवत्तर नाही … पण जगजीत सिंग , गुलाम अली साहेब , मेहेंदी हसन खान साहेब या अनेक लोकांच्या प्रकाशमालेतुन हा दिवा चटकन खुलून येतो …. काही गोष्टींची करणे सांगायची नसतात तर प्रत्यक्ष अनुभव घ्यावा । उंच टोकावरून ढकल्यावर पायाला दोरी बांधलेली असूनही जो मरणाचा अनुभव मिळतो तो वर्णनातीत … हाही अनुभव असाच ….
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया