Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्यामची आई..

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Sun, 03/09/2014 - 06:05  ·  लेख
लेख
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले... ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत... माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते. अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण कदाचित तात्कालिक कोकणातील वातावरण तसे असेलही..पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल. कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे इत्यलम

प्रतिक्रिया द्या
41476 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

ब
बॅटमॅन Mon, 03/10/2014 - 07:08 नवीन
अंमळ जास्तच भावनाबंबाळ वैग्रे आहे. एकदा वाचलं अन नंतर तेवढा ओव्हरडोस कै झेपला नै. सानेगुर्जींबद्दल आदर असला म्हणून त्यांचं सगळंच्या सगळं पटलं पाहिजे असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/10/2014 - 09:28 नवीन
पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.
हे सानेगुरुजींनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम" आणि सानेगुरुजींचं चरित्र अवश्य वाचून काढा. या पुस्तकाकडे त्या काळच्या कोकणातील एका ब्राह्मण घराण्याचं चित्र असं म्हणून तुम्ही बघू शकत नाही का? दलित साहित्य तुम्हाला आवडतं ना? मग हेही तशाच एका माणसाचे अनुभव आहेत. त्या काळाचं वास्तववादी चित्रण आहे. या पुस्तकाकडे एका काळाचं चित्र म्हणून तटस्थपणे पाहता येतंच की! १९३३ सालचं हे पुस्तक आहे. या पुस्तकानंतर आतापर्यंत ३ पिढ्या उलटून गेल्या आहेत. आताचे निकष त्या काळच्या लोकांच्या वागण्याला लावणं बरोबर नाही. तेव्हाची एक पिढी अशा आदर्शवादी विचारांनी भारलेली होती. तसे तर भगतसिंग इ. क्रांतिकारकांचे मार्ग कोणाला चुकीचे वाटत असतील, पण म्हणून त्यांच्या हेतूबद्दल, देशभक्तीबद्दल संशय घेता येणार नाही. त्यातूनही एखाद्या लिखाणाबद्दल प्रत्येकाला काय वाटेल हे सांगणं अवघड आहे. आवड ज्याची त्याची. व.पु.काळे आवडणारा एक वर्ग आहेच. तसा चेतन भगत आवडणारा पण आहे. आणि टिळक-आगरकर लेखक म्हणून आवडणारा पण आहे. दुसर्‍याच्या आवडीच्या विषयाला सरसकट लेबलं लावून कचर्‍यात टाकणं योग्य नव्हे. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 03/10/2014 - 11:02 नवीन
या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम"
हा भाग जास्त वास्तवपूर्ण (आणि कमी आदर्शवादी) आहे. यातला श्याम घरातून पळून जातो, पारव्यांवर दगड मारतो वगैरे प्रसंग आहेत. कापदापोलीच्या शाळेचं वगैरे तर वर्णन खासच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
योगी९०० Mon, 03/10/2014 - 11:16 नवीन
ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते. +१ सहमत.. असेच म्हणतो.. मला ही हे पुस्तक तितके आवडले नाही पण मी यावर असे भडक कधीच लिहीणार नाही.. पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन Mon, 03/10/2014 - 11:18 नवीन
पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....
काय तो कडवा पाठिंबा, वाह! जप हो शाम =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
अ
अत्रन्गि पाउस Mon, 03/10/2014 - 11:36 नवीन
ती हसून गडबडा लोळणारी स्मायली काशी टाकतात हो ? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 03/10/2014 - 11:45 नवीन
आधी = मग ) मग ) असे विथौट स्पेस टाकायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
य
योगी९०० Mon, 03/10/2014 - 12:45 नवीन
जप हो शाम हा हा ...हे मात्र आवडले.... जप हो याचा फार राग यायचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मनिम्याऊ गुरुवार, 04/10/2014 - 09:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य
यसवायजी Mon, 03/10/2014 - 12:55 नवीन
यावर असे भडक कधीच लिहीणार नाही.. +१ अवांतर- हा लेख वाचताना कुणाला माननिय अनिता पाटील आठवल्या का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
त
तुषार काळभोर Mon, 03/10/2014 - 13:20 नवीन
प्लीज नोटः पैसा ताई, मला तुमच्याबद्दल एक अनुभवी, अभ्यासू आणि अतिशय संयत सभासद आणि संपादक म्हणून अतीव आदर आहे. कृपया हा प्रतिसाद पर्सनली घेऊ नये. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत ......... त्यातील किती जणांना ते पुस्तक खरेच आवडते? किती जणांना त्यातील अती-बाळबोधपणा पटतो? किती जण स्वतः त्यातील साधी तत्वे (उदा. स्वयंपाकाबद्दल कौतुक करणे/टीका न करणे) अंगिकारतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा Mon, 03/10/2014 - 13:26 नवीन
खरोखर आवडते. पैसाताई, तुझा प्रतिसाद +१ त्यातला भाबडेपणा अनमोल आहे. आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान. :) अतिशय वेगळ्या, साध्या सुध्या जगात घेऊन जाणारे असे हे पुस्तक आहे.. माझ्या संग्रही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ब
बॅटमॅन Mon, 03/10/2014 - 13:27 नवीन
आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान.
सहमत पण लार्जलि असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सखी Mon, 03/10/2014 - 17:08 नवीन
छान प्रतिसाद पैसाताई. यानिमित्ताने हे क़ळले की मी 'श्याम' हे पुस्तक वाचलेले आठवत नाही आता शोधते कोणाकडे मिळतयं का. यशो - त्यातला भाबडेपणा अनमोल आहे.+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पैसा Mon, 03/10/2014 - 13:39 नवीन
पर्सनली अजिबात घेत नाही. पण इथे वर आलेले सगळे प्रतिसाद वाचा भौ! किमान २ जणांनी तरी जेवताना जेवणावर टीका करत नाही असं लिहिलं आहेच. पुस्तक एक कलाकृती म्हणून मला निश्चितच आवडतं. त्यात त्या काळाचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं. आणि माझं मत विचाराल तर कोणत्याही कलाकृतीचा आयुष्यावर परिणाम वगैरे फार कमी वेळा आणि कमी प्रमाणात होतो. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट आपल्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे, पण संपूर्ण आयुष्य बदलणे वगैरे आजच्या काळात शक्य नाही. भगवद्गीता आणि इतर तत्त्वज्ञानावरील पुस्तकं सोडून इतर सर्व पुस्तकं/कलाकृतीचा आस्वाद कलाकृती म्हणूनच घ्यावा. (ती पुस्तकंसुद्धा एखाद्याला मनोरंजक वाटू शकतील. पण मी सर्वसामान्य वाचकांबद्दल बोलत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ज
जयंत कुलकर्णी Tue, 04/08/2014 - 17:44 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी Mon, 03/10/2014 - 13:20 नवीन
@ यसवाजी मला आटवल्या , मनुन आतापतुर गप होतो . तुमाला नाय ना आवडल तर तुमच्या पाशी ठेवा . कशाला बोंबलत फिरताव .
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 03/10/2014 - 16:25 नवीन
माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
हे फारसं खरं नाही असं वाटतं. आणि गरीबीचं उदात्तीकरण वगैरे काही नाही... तर आहे त्या परिस्थितीत, माना-सन्मानाने जगावे आणि जास्तं काही मिळविण्यासाठी वाम मार्गाने जाऊ नये, हाच संदेश यात आहे. ही कथा काल्पनिक असल्याने, त्यातील उच्च मूल्ये आणि आदर्शवाद आजच्या काळाच्या कसोटीवर खरे ठरणार नाहीत कदाचित, पण म्ह्णून ती टाकाऊ नाहीत. आणि "माझी आई विशेष होती" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला तुम्ही बेगडी ठरवू शकत नाही. श्रीराम कथा आपण वाचतो ... त्यातील उच्च्कोटीचे गुण असणार्‍या व्यक्तींसारखी कुणी आपल्या आजूबाजूला कधीच नसते. पण तरीही ती कथा आपण आदर्श मानतो. आणि त्यातील काही गुण तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. शामची आई हे पुस्तक याच दृष्टीकोनातून वाचावे.. मग तो इमोशनल अत्याचार वाटणार नाही. परंतु शाळकरी वयातील मुलाला.. ,ज्याचा पुस्तक वाचण्याचा हेतु 'शुद्धं मनोरंजन' हाच आहे, हे पुस्तक रटाळ वाटण्याची शक्यता नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 03/10/2014 - 16:43 नवीन
काय काल्पनिक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मंदार कात्रे Mon, 03/10/2014 - 17:31 नवीन
बाळ जातो दूर देशा - गोपीनाथ बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून आज सकाळपासून हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे ना खळे पाणी आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान काही राहिले मागून नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया किती शिणवीसी काया वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी! गाडी थांबेल दाराशी पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास नाही मायेचे माणूस ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल स्वप्नी तुलाच पाहील बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा लावी पदर डोळ्याला
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sat, 03/22/2014 - 06:01 नवीन
एकूणच संस्कारांसाठी चांगले पुस्तक. मात्र आधीच भावनाशील मुले जास्त हळवी होऊ शकतात. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी शामची आई वाचले आहे ,एका विशिष्ट काळापुरताच कोणत्याही पुस्तकाचा प्रभाव टिकतो.
  • Log in or register to post comments
K
kurlekaar Sat, 03/22/2014 - 16:00 नवीन
"परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते." "भावनांची फोडणी" पर्यन्त ठीक पण त्यालाहि "विलक्षण तीव्र" हे विशेषण लावणे ही तर फक्त शब्दान्ची फोडणी वाटते. आणि या वर बालमनाशी "अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक"----हे तर खुपच unfair व उगाचच भडक.
  • Log in or register to post comments
K
kurlekaar Sun, 03/23/2014 - 08:46 नवीन
माझ्या लहानपणी हे पुस्तक मी वान्चलय पण या 'अक्षम्य आणि भडक खेळ करणार्या' पुस्तकाचा माझ्यावर काही दुष्परिणाम झालाय अस मला अजिबात वाटत नाही. मी एक वर्ष (१९५६) बोर्डीच्या (डहाणुजवळ) शारादाश्रमात होतो, तिथ साने गुरुन्जीचे धाकटे बन्धु--मला वाटत पुरुषोत्तम--होते. त्या "अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण" असलेल्या वातावरणात सम्पूर्ण वाढलेला हा माणुस असामान्य अजिबात नव्हता, चारचौघान्सारखा सर्वसाधारण होता पण त्याचे कुठल्याही प्रकारचे खच्चीकरणझाल्याचे दिसत नव्हत. श्यामची आई हे पुस्तक 'कालबाह्य' आहे अस म्हणण्याला माझा काही आक्षेप नाही पण या वर दिलेल्या विशेषणाना आहे.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 03/23/2014 - 09:37 नवीन
तुमची विचार करण्याची पद्धत थर्ड ग्रेड आहे इतकेच नोंदवू इच्छितो. बाकी जिलब्या पाडून प्रसिद्धी मिळवायची असेल तर शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 03/23/2014 - 16:28 नवीन
माझी विचार करण्याची पद्धत ह्यावर तुमचे मत कुणाला हवंय ? आणि जिलब्या पाडून प्रसिद्धी? ... जाऊदे तुमचे मुद्दे संपलेले दिसतात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Sun, 03/23/2014 - 17:48 नवीन
शामची आई याबद्दल तुमचे मत कोणी विचारले होते काय? आणि हो, सदर धागा चर्चेच्या पात्रतेचा नाही. कळावे. रजा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस Sun, 03/23/2014 - 19:09 नवीन
इथे विषय मांडायला कुणी विचारात नसतो... आणि विषय मांडून जुना झाल्यावर चर्चेत आपण आला आहात..चर्चेत स्वागत सर्वांचेच असते...आणि धागा चर्चेच्या पात्रतेचा नही म्हणजे चर्चेत पूर्वी आलेल्यांवरहि आपण अप्रत्यक्ष रोख धरला आहे.. व्यक्तिगत टीका तुम्ही केलीत.. असो ..रजा घेताय ..जरूर..तुमचे मुद्दे संपलेत हे मी आधीच म्हटलंय...आपल्यापुरती चर्चा मी हि थांबवली आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
त
तुषार काळभोर Mon, 03/24/2014 - 05:28 नवीन
तुम्हाला आवडणारे, भावणारे, प्रभावित करणारे एखादे विशिष्ट पुस्तक न वाचणारे किंवा ते न आवडणारे लोक (त्यांचे विचार) थर्ड ग्रेड असतात? मग फर्स्ट ग्रेड कोण असतात, तालिबानी वॄत्तीचे लोक? तुम्हाला हा धर्मग्रंथ आवडत नसेल तर तुम्ही धर्मद्रोही आहात, आणि तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 03/24/2014 - 07:34 नवीन
मिपावर असेही असते मला कालच कळले ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रसाद गोडबोले Mon, 03/24/2014 - 10:03 नवीन
बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ? म्हणजे ह्या पुस्तकात ह्याबद्दल काही माहीती आहे का ? आपले काम असंपले की आत्महत्या करावी असे श्यामच्या आईने शिकवले असे काही आहे का हो ह्या पुस्तकात ?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 03/24/2014 - 14:37 नवीन
डिप्रेशनमुळे - असं माझ्या आजोबांकडून ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 03/24/2014 - 14:49 नवीन
डिप्रेशनमुळे
>>> ह्म्म , माझ्याही माहीतीत असेच आहे , साने हे "गांधीवादी टेररिस्ट"* होते , सत्याग्रहाची बंदुक कानपटीवर ठेवुन पंढरपुर मंदिर प्रवेश आंदोलन करु पहात होते (जे की कायद्याने काही महिन्यात होणार होतेच) ह्याबद्दल दस्तुरखुद्द गांधींनीच त्यांना झाडले ...(पुढे मंदीर प्रवेश नक्की कशामुळे झाला हे माहीत नाहे , ह्यांच्या दहशतवादामुळे की कायद्यामुळे ?) एकुणच ह्या प्रकाराने निराश होवुन त्यांनी आत्महत्या केली . तेव्हा त्यांना श्यामच्या आईची शिकवण आठवली नसावी बहुधा !!! (* "माझं ऐका , नाहीतर सत्याग्रह करेन " ह्याला गांधीवादी टेररिझम असे म्हणतात )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अत्रन्गि पाउस Mon, 03/24/2014 - 14:54 नवीन
अहो ... साधा गांधी'गिरी' शब्द आला तर झोड उठली होती... काय खरं नाय राव आता !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आत्मशून्य Tue, 03/25/2014 - 17:53 नवीन
बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ?
लोक सुधारत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी आता करण्यासारखे काहीही विशेष ध्येय उरलेले नाही या मानसिकतेतुन आत्महत्या केली असे ऐकले... अधि़कृत कारण माहित नाही. अवांतरः- शामची आइ डोक्यात जाते पण त्यांच्या अनेक बालकथा सानेगुरुजिंच्या गोड गोश्टी या कथा मालिकेतुन विवीध पुस्तकातुन प्रकाशीत झाल्या आहेत त्या माझ्या अतिशय आवडत्या कथा आहेत, जसे सोहराब नी रुस्तुम, शेवटी नदी समुद्राला मिळेल, फुलाचा प्रयोग आणी इतरही अनेक. मला वाचनाची आवड लहानपणीच लागली या मधे सानेगुरुजिंच्या गोड गोष्टी या सिरीजचा फार मोठा हात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
श
शिद Mon, 03/24/2014 - 14:41 नवीन
आम्ही आमच्या शाळेचा दिवसांत वर्गातल्या अतिलाजाळू मुलाला "श्यामळू" म्हणायचो... बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 03/24/2014 - 15:36 नवीन
म्हणजे 'शामळु' ह्या शब्दाचा उगम ह्या पुस्तकातून झाला की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ब
बॅटमॅन Mon, 03/24/2014 - 15:40 नवीन
अशीच शंका यायला लागलीय राव....असे असेल तर मग शाम म्ह. फेल्युअरच खंप्लीट =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
अ
अत्रन्गि पाउस Mon, 03/24/2014 - 16:26 नवीन
+१ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
निनाद मुक्काम … Mon, 03/24/2014 - 15:14 नवीन
श्याम ची आई आजच्या काळातील कालबाह्य पुस्तक सुखवस्तू घरातील श्याम च्या वडिलांची व चुलत्यांची भाऊ बंदकी झाल्याने कोर्ट वार्या करून आयती गरिबी स्वतःवर ओढवून घेतली. हे पुस्तक वाचून कितीजणांनी बोध घेतला , आजही भाऊ बंदकी संपली आहे का हे पुस्तक टाकाऊ नाही आहे एखाद्या पिढीच्या जीवन शैलीचे वर्णन ,तत्कालीन काळ उभा करण्यात ते यशस्वी होते त्यातून प्रेरणा , आदर्श घेणे म्हणजे अती आहे , पूर्वी च्या काळी मुंजीत आहेर म्हणून काय द्यायचे हा प्रश्न ह्या पुस्तकाने जरी सोडवला असला तरी साडे तीन टक्क्या पलीकडे आपल्या समाजात हे पुस्तक ............ बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत, पण श्यामची आई व त्यात आईची भूमिका करणारी वनमाला आणि तिचा तो छापील डोक्यात तिडीक जाणारा स्वर डोक्यात जातो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 03/24/2014 - 16:32 नवीन
मह्याला ३र्या यत्ते मंदी टाकले नं भौ धाग्या बद्दल... आणि मग मंग तुमची ह्यो प्रतीर्कीया ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
आ
आत्मशून्य Tue, 03/25/2014 - 17:57 नवीन
आजही भाऊ बंदकी संपली आहे का
भाऊ बंदकीचा शाप महाराश्ट्रा इतका कोणत्याही राज्याला ना याआधी झाला ना पुढे होइल. तिकडे नॉर्थला फिरलो तर मोठ्या भावाच्या आज्ञेत आख्खे कुटुंब जगते हे लगेच लक्षात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/25/2014 - 16:37 नवीन
Image removed. गजू तायडेंचं कॉमिक्सचं पान
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 03/25/2014 - 17:55 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनुप ढेरे Wed, 03/26/2014 - 06:58 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रमोद देर्देकर Wed, 03/26/2014 - 07:12 नवीन
३_१४ विक्षिप्त अदिती आणि खटपट्या यांची युती झालेली दिसतेय. ख.फ. वर खटपट्या ने हेच चित्र चढवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अत्रन्गि पाउस Tue, 03/25/2014 - 17:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 03/25/2014 - 18:00 नवीन
कम्युनिस्ट रशियात कमालिचे लोकप्रिय झाले असते. आजही होउ शकते. कम्युनिजम म्हणजे सर्वानाच शिळी भाकरी, व तिचेच उदात्तीकरण.... सर्वांना पनीर बटर मसाला न्हवे.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 03/26/2014 - 04:20 नवीन
हे चित्र इथे योग्य आहे का इथे ? Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 03/26/2014 - 05:26 नवीन
चित्र दिसत नाही. माझा अपलोडिंगचा प्रयोग फसला की काय? चित्र इथे आहे. http://postimg.org/image/rlcjl9z3j/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
व
विटेकर Wed, 03/26/2014 - 12:43 नवीन
भारतीय संस्कृती नावाचे एक गुरुजींचे पुस्तक आहे .. तसे पुस्तक बरे आहे पण काही काही वाक्ये इअतकी बालीश आहेत की जाम हसायला येते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा