Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग २: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी) माहिती साठ्याची कमतरता

म
माहितगार
Mon, 03/10/2014 - 07:00
🗣 0 प्रतिसाद
वस्तुतः चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी ह्या विषयाच्या सांगोपांग चर्चेस अजूनही वाव आहे. माझ्या निरीक्षणांनुसार मराठी आणि महाराष्ट्र संबंधी कोणत्याही विषयावर हिट्सचा अभ्यास केला तर मराठी माणसाचा मराठी आणि महाराष्ट्र विषयीचा जिव्हाळा कायम आहे पण अजूनही ९०-९५ टक्के शक्य श्रोता अथवा वाचकवर्ग इंग्रजीतूनच शोध घेतो मराठीत शोधत अथवा वाचतच नाही लेखन दूरची गोष्ट आहे; याच एक कारण मराठी भाषेतील ऑनलाईन मराठीत ज्ञान आणि माहिती साठ्याची कमतरता आहे. जे काही लेखन होत त्यात लेखकाच लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पना केंद्रीत आणि स्मरण शक्तीवर अधिक अवलंबून आहे. परिणामी अनेक संदर्भ चुकीचे, सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असतेच; शिवाय मराठी भाषेत जे काही प्रिंट मिडियात पुस्तके असतील अथवा वृत्तपत्रे असतील यातील जुन लेखन (अगदी कॉपीराईट फ्री झालेल सुद्धा) जसच्या तस पुरेशा प्रमाणात संदर्भांकरता ऑनलाईन उपलब्ध नाही. तसेच वर्तमानकालीन विषयातील तज्ञ (प्राध्यापक मंडळी वगैरे) सुद्धा अभावानीच लिहितात अथवा अभावानीच सहभागी होतात त्यामुळे मराठी संकेतस्थळांवरील उपलब्ध माहिती पुरेशी सखोल, तर्कसुसंगत, सकस दर्जेदार नाही बर्‍याचदा एकांगीपणाचाही मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. मराठी माहिती साठा कमी आहे म्हणून मराठी लोकांची मोठी अनुपस्थिती आहे आणि मराठी माणसांची अनुपस्थिती आहे म्हणून मराठी माहिती साठ्यात कमतरता आहेत हे एक दुष्ट चक्र आहे. या विषयाबद्दल मिपा सदस्यांना काय वाटत ? आपल्या सर्वांची मत जाणून घेण्यास आवडतील. प्रतिसादांकरता धन्यवाद

प्रतिक्रिया द्या
3049 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा