क्षितिज
मन विलाप जाणते
धरतीचा सागरतिरी
सूर्याचे ओझरणे
प्रतिसाद लाटांवरुनी ll १ ll
विहंग एकला प्रवासी
समांतर अवकाशी
धरतीस व्याकुळलेल्या
साथ क्षणापुरती ll २ ll
संध्येस का छळतो
उनाड अल्लड वारा
मावळत्या कातरवेळी
जीव एकल्या विहारा ll ३ ll
क्षितिजाचे रूप विलोभी
उतरे गगनावरुनी
डोळ्यादेखत माझ्या
मिसळे पाण्यामधुनी ll ४ ll
- सार्थबोध
💬 प्रतिसाद