Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चला, असाही एक वाढदिवस...

अ — अजय जोशी, Tue, 03/11/2014 - 14:57
रोजचे उठणे रोजचे आवरणे रोजचे तेच तेच करणे आजही तसेच....? चला..., असाही एक वाढदिवस... सकाळपासून जुंपलेला.... उन्हातान्हात राबलेला... ठिकठिकाणी रापलेला... ओथंबून वाहिला आजही.... चला.., असाही एक वाढदिवस... जमेल तितकं करायचं.. जमेल तितकं जगायचं... उरामध्ये दु:ख लपवून जमेल तितकं हसायचं... आपलं मन आपल्यापाशी... दुसर्‍याचं मात्र सांभाळायचं नेहमी... आजही सांभाळतोच आहे ना.... चला.., असाही एक वाढदिवस.... नेहमी इतरांचा विचार करताना आपल्यासाठी नसलेला.... कधी कधी तर आपल्यातही नसलेला... आला कधी... गेला कधी... कळत नाही कधी अगदी आजही...? चला.., असाही एक वाढदिवस... प्रत्येक वाढदिवशी माणसे येतात... आनंदाचं उधाण आणतात... शुभेच्छांच्या पंगती वातावरण भारावून टाकतात... काळ पुढे सरकत असतो... गोची होते इथेच... मनातल्या काही भावना राहतात जिथल्या तिथेच... मनातील काही दारे बंद करून.. आज हसलो मनसोक्त.... चला, असाही एक वाढदिवस... चला.., असाही एक वाढदिवस....

प्रतिक्रिया द्या
1297 वाचन

💬 प्रतिसाद (1)
स
स्पंदना Wed, 03/12/2014 - 00:48 नवीन
अतिशय आवडली कविता. मनापासून.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा