Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही प्रश्र्न......

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 03/12/2014 - 15:38  ·  लेख
लेख
गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत. १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? ८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात? ९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड. १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का? मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.

प्रतिक्रिया द्या
20408 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2014 - 07:34 नवीन
+१ हे बियर कट्टा करण्याला :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
च
चिरोटा गुरुवार, 03/13/2014 - 07:31 नवीन
बादशाहीत कोण येणार जेवायला?
जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
अचानक? मला नाही वाटत. ३० वर्षापूर्वीही जागा घेणे,फ्लॅट घेणे महागच होते.स्वतःच्या आर्थिक बळावर फ्लॅट घ्यायचा तर त्यावेळीही तीशी सहज उलटायची.आता दर जरा जास्त वेगाने वाढत आहेत कारण स्थानिक धंदे,व्यवसाय बरेच वाढले आहेत व काळ्या पैशाचे प्रमाणही बरेच वाढले आहे. त्यामुळे गरज नसताना फ्लॅट घेणे हा प्र्कार व्यवसाय्,धंदे करणार्‍या लोकांमध्ये दिसून येतो.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 03/13/2014 - 10:06 नवीन
१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?
कल्पना नाही. झालीही असती किंवा नसतीही. जर द्वेष असेल तर हे किंवा ते कोणतेही तत्कालिन कारण पुरते! १८५७चा उठाव काडतुसांना डुकराची चरबी लावली नसती तरी झालाच असता असे वाटते कारण सैनिकांत असंतोष होता. तसेच इथे आहे. दोन समाजात द्वेष असला की कारणाची वाट बघत दोन्ही समाजातील कंटक टपून बसलेले असतात.
३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?
तसे काही वाटत नाही. तितकेच असावे.
४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घटनेची निंदा केली होती. (बातमी)
५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?
काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात?
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला, कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले.
७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
कोणत्या दृष्टीकोनातून अस्थिर आहेत? तिथे एवढ्यात इमारती कोसळल्या त्याबद्दल बोलताय का? ते कच्च्या बांधकामामुळे झाले असे म्हणतात.
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?
फाळणीमुळे तेथील हिंदूंचे प्रमाण कमी झाले. क्रिकेट संघात तेथील हिंदूच्या प्रमाणात क्वचित हिंदु खेळाडू दिसले आहेत. शिवाय ते भारतासारखे धर्मनिरपेक्ष देश नसल्याने त्यांच्याकडे अल्पसंख्यांवर अन्यायही होतो व त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बरेच मर्यादित असते.
९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.
कशावरून म्हणताय? काही विदा आहे काय? बघायला आवडेल
१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
बरेच विस्ताराने उत्तर द्यावे लागेल! माझ्यापेक्षा इतर काही तज्ज्ञ मिपाकर या बाबतीत उत्तम उत्तर देऊ शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 03/13/2014 - 16:53 नवीन
काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात? कदाचीत मूळ प्रश्न वाचताना वेगळेच विश्लेषण केलेले दिसतयं. :) मूळ प्रश्न "काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?" असा आहे. अर्थात काश्मीरमधे हिंदू अल्पसंख्य आहेत/होते/झाले असा त्यात मुद्दा नसून जी काही संख्या होती ती का घटली हा मुद्दा आहे. मला वाटते त्याचा संदर्भ १९९० च्या सुमारापासून जे दहशतवादी वाढले आणि काश्मिरी पंडीतांना स्थलांतरीत व्हावे लागले त्या आकडेवारीशी असावा. नाहीतर असाच मुद्दा कोणत्याही अल्पसंख्य समाजावर काश्मिरीपंडीतांसारखेच अथवा हिटलरने ज्यूंवर केले तसे अत्याचार करून स्थलांतरीत करून त्या संदर्भातील आकडेवारीशी करता येईल. तेंव्हा तुमचे विश्लेषण हे दुधारी शस्त्र ठरू शकते, म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मुक्त विहारि Fri, 03/14/2014 - 18:54 नवीन
"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला." कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती? माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
नितिन थत्ते Sat, 03/15/2014 - 06:40 नवीन
>>माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? मी १९९७ मध्ये जागा घेतली तेव्हा १० लाखाला घेतला आज त्याची (म्हणजे आमच्या एरियात सिमिलर फ़्लॅटची- पण बेसिक अ‍ॅमेनिटीज पेक्षा बर्‍याच जास्त अ‍ॅमेनिटीज असलेल्या फ्लॅटची) किंमत सुमारे ५० लाख आहे. या हिशेबाने दरवाढीचा दर दरवर्षी १०.५४% होतो जो चलनवाढीच्या दरापेक्षा फार जास्त नाही. साधारणतः जागांचे दर स्पर्टसमध्ये वाढतात. काहीपिरियडमध्ये भसाभस वाढतात तर काही पिरियडमध्ये स्थिरसुद्धा राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 03/14/2014 - 18:58 नवीन
"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला." कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती? माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/13/2014 - 18:54 नवीन
>>> १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? गोध्रा येथील काही स्थानिक मुस्लिमांनी अयोध्येहून परतणार्‍या कारसेवकांचा डबा पेटवून दिला. त्यात ५९ जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे दंगल पेटली. डबा पेटवलाच नसता तर दंगल झालीच नसती. >>> २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? जाट मुलीची छेड काढली नसती तर तिचे भाऊ छेड काढणार्‍यांना जाब विचारायला गेलेच नसते. त्यामुळे त्यांचे खून झालेच नसते व पुढील सर्व घटना टळल्या असत्या. >>> ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? हिंदू नायकांचे प्रमाण कमी झालेले नाही. >>> ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? भारताने अधिकृत निषेध नोंदविला होता. >>> ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले? काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते. श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली. >>> ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? जागेचे भाव कायम वाढतच असतात. >>> ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? सामाजिक शांततेच्या दृष्टीने अस्थिर असे तुम्हाला म्हणायचे असावे. भिवंडीला दंगलींचा जुना इतिहास आहे. दोन्हीकडे मुस्लिमांची संख्या खूप जास्त आहे. मुम्ब्र्यात तर अनेक बेकायदेशीर बांगलादेशी आहेत (म्हणे). सर्वसाधारणपणे मुस्लिम जिथे जास्त आहेत तिथे जास्त दंगे होतात. >>> ८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात? पाकिस्तान व बांगलातील दडपशाहीमुळे अनेक हिंदू भारतात आले. काही जणांनी गळचेपीमुळे नाईलाजाने धर्म बदलला तर काही जणांवर धर्मबदलाची सक्ती झाली. त्यामुळे हिंदूंची संख्या कमी झाली. मुख्य कारण देश सोडणे हे आहे. पाकिस्तान व बांगलामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हिंदू खेळाडू नसतात कारण तिथल्या बहुसंख्य क्षेत्रात फक्त मुस्लिमांनाच संधी मिळते. तस्लिमा नसरीन च्या "लज्जा" पुस्तकाच याचा सविस्तर उल्लेख आहे. निव्वळ क्रीडाक्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रात धर्म आडवा येतो. श्रीलंकेमध्ये सुद्धा १५ टक्के तामिळ आहेत. परंतु आजतगायत मुरलीधरन हा एकमेव तामिळ त्या संघात होता. बाकी सर्व सिंहली होते. >>> ९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड. सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 03/14/2014 - 06:25 नवीन
काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते.
काश्मिर म्हणजे काश्मिर खोरे म्हणताय की जम्मी आणु काश्मिर राज्य? नुसत्या काश्मिर खोर्‍यात ~९७% मुस्लिम होते - आहेत. अख्खे राज्य म्हणत असाल तर माहिती ढोबळ मानाने योग्य आहे.
श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली.
आकडेवारीत घोळ आहे. जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/14/2014 - 08:53 नवीन
>>> जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा. ४ लाख हा आकडा बरोबर आहे, पण ४ लाख म्हणजे १० टक्के हा आकडा चुकलेला दिसतोय. खरं तर २५ टक्क्यांहून अधिक हिंदूंनी काश्मिर राज्यातून स्थलांतर केलेलं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
पोटे Sun, 03/16/2014 - 08:20 नवीन
सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. अडाणी लोक खून , मारामार्‍या, बलात्कार असे सामान्य गुन्हे करतात. उच्चशिक्षित लोक शेअर बाजार बुडवणे, ब्यान्क बुडवणे, बोगस विक्री करुन एकच फ्लॅट चार लोकाना विकणे, लैंगिक शोषण करणे , असे असामान्य गुन्हे करतात. अशिक्षित लोकाना वकिल करणे परवडत नाही, त्यामुळे ते सापडले की अडकतातच. शिक्षित लोकांना वकील करणे परवडते, त्यामुळे निर्दोष सुटू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कल्पक Fri, 03/14/2014 - 05:51 नवीन
प्रश्न क्र. ५ साठी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल श्री. जगमोहन यांचे 'धुमसते बर्फ' हे पुस्तक नक्की वाचा. प्रश्न क्र. ८ साठी तस्लिमा नसरीन यांचे 'लज्जा' हे पुस्तक तसेच ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा हा लेख (http://www.esakal.com/esakal/20120822/4791804341115950977.htm) वाचा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/14/2014 - 06:28 नवीन
बद्दल धन्यवाद.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कल्पक
क
कल्पक Fri, 03/14/2014 - 06:14 नवीन
प्रश्न क्र. १०: मध्यंतरी असं वाचलं होतं कि चिदम्बरम यांनी भारतीय लोकांना सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं. कारण आपण जे सोनं खरेदी करतो ते पूर्णतः परदेशातून आयात केलं जातं, म्हणजेच परकीय चलनातून हा व्यवहार होतो आणि म्हणून रुपया कमजोर होतो. आणि जे सोनं भारतात आहे ते सरकार विक्रीसाठी उपलब्ध होऊ देत नाही नाही. मध्यंतरी असंही वाचलं होतं की भारत सरकारने देशाच्या तिजोरीतील ४६% (साधारणतः २६५ टन) सोनं प्रसिद्धीमाध्यमांपासून लपवून परदेशातील बँकेत कर्जासाठी तारण म्हणून ठेवलं जे भारतीय कायद्याच्या (८५% सोनं देशात ठेवावं असं सांगणाऱ्या) विरोधात आहे. याविषयी खटले सुद्धा चालू आहेत. सरकारच्या अशा धोरणाचा सुद्धा रुपयावर परिणाम होतो. मलेशियात असताना मला असं कळलं होतं कि जगातल्या कोणत्याही दोन देशातील चलन रुपांतर हे डॉलर द्वारेच होतं. म्हणजे भारतीय रुपया > डॉलर > मलेशिअन रिंगीट्स. या गोष्टीमुळे सुद्धा अमेरीकेतर चलनांवर परिणाम होतो.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 03/14/2014 - 09:04 नवीन
च्यायला मुवि चालले मुसलमानांच्या सौदीत आणि इथे हिंदु मुसलमान पर्श्नांच्या काड्या टाकुन राह्यले. थांबा सौदीतल्या उंटांनाच सांगतो तुम्हाला पाठीवरुन वाळुत पाडायला. ;)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 03/14/2014 - 15:17 नवीन
अविनाशकुलकर्णींनी आयडी बदलला वाट्टां
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 03/14/2014 - 15:25 नवीन
आत्ताच सगळी उत्तरे तपासली... श्री. नितिन थत्ते यांना १००/१०० गूण मिळालेले आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रमेश आठवले Fri, 03/14/2014 - 15:35 नवीन
आपल्या सगळ्या प्रश्नामधेच त्यांचे उत्तर ही आहे. अश्या प्रश्नाना उपरोधिक किंवा इंग्लिश भाषेत rhetoric प्रश्न असे म्हणता येईल. प्रश्नांची निवड करण्यात आपण दाखविलेली मार्मिकता स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा