Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही

D — drsunilahirrao, Sun, 03/16/2014 - 13:25
अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे, छलकपटाचा तुला पुरेसा सराव नाही किती दयाळू, महान आहेस तू खरोखर तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही! तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी मला उमगले कुठेच माझा पडाव नाही अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
2253 वाचन

💬 प्रतिसाद (10)
K
kurlekaar Mon, 03/17/2014 - 06:01 नवीन
तुमची ही कविता जास्त मोकळी वाटते, तिने “बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” च्या जाडजूड बांगड्या घातल्या असल्या तरीदेखील. मला वाटतं यमक हा तुमचा ट्रेडमार्क आहे व तुम्हांला तो बदलायला सांगणं चुकीचं होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/19/2014 - 14:58 नवीन
मला गझलेचा एकेक सुटा शेर आवडतो मराठी असू दे की उर्दू असू दे... ''बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” हे सर्व गझलेत यमक उर्फ काफिया आवश्यक आहेत. बशीर बद्रच्या ओळी बघा- सुनसान रास्तों को सवारी न आयेगी अब धूल से अटी हुई लारी न आयेगी छप्पर के चाय खाने भी अब उंघने लगे पैदल चलो के कोयी सवारी न आयेगी तहरीर-ओ गुप्तगू में किसे ढुंढते है लोग तस्वीर में भी शक्ल हमारी न आयेगी सर पर जमीन ले के हवाओं के साथ जा आहिस्ता चलने वाले की बारी न आयेगी पहचान अपनी हम ने मिटाई है इस तरह बच्चो में कोई बात हमारी न आयेगी वरच्या प्रत्येक शेरात लारी, सवारी,हमारी,बारी, हे शब्द आलेत पण त्या ओळींतील त्या शब्दांच्या अर्थाने गझलेला एका उंचीवर नेलं आहे. मराठी आंतरजालावर बेफिकीर नावाचे एक ''थोर''मराठी गझलकार आहेत त्यांच्या मृत्युचा निरमा नावाची ही गझल पाहा. चळत, पळत, वळत, हिंदकळत, शब्द कसे नोकरीला नऊच्या ठोक्याला हजर झाल्यासारखे आले आहेत. :) असो. गझलेचे जाणकार बोलतीलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kurlekaar
D
drsunilahirrao Mon, 03/17/2014 - 07:38 नवीन
Kurlekar sir, खूप खूप आभार !
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Wed, 03/19/2014 - 05:42 नवीन
सुनिलराव, मस्त..... थोडीफार गझलेच्या वाटेने जाणारी....अगदी ह्रद्यातून उतरलेली. एक गझल आठवली...... अब क्या बताऊ तुझे तेरे मिलनेसे क्या मिला इर्फाने गम हुआ दिलका पता मिला......... आता काय सांगू तुला... तु भेटल्याने काय झाले. दु:खाचे ज्ञान झाले व जेथे होते ते सापडले....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/19/2014 - 14:32 नवीन
आवडली गझल. अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही खासच. डॉक्टर साहेब. अजून लिहा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao गुरुवार, 03/20/2014 - 13:32 नवीन
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर, जयंत कुलकर्णी सर, बेफिकीर यांच्या गजला खासच आहेत आपण म्हणालात त्याप्रमाणे पळत वळत चळत या शब्दांचा नाद मोहून टाकतो. आणि बशीर बद्र यांची वरील गजल निव्वळ ग्रेट !
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao गुरुवार, 03/20/2014 - 13:43 नवीन
बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते आणि बदल स्वीकारल्याची खुण असावी कदाचित !
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao गुरुवार, 03/20/2014 - 13:53 नवीन
कॉमेंट एडिट करायची सोय नसतॅ का इथे मोबाईलवरुन अंदाज येत नाही थोडा बदल करुन तीच कॉमेँट पोस्ट करत आहे बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते किँवा बदल स्वीकारल्याची खुणही कदाचित ! कुर्लेकर, जयंत कुलकर्णी, दिलीप बिरुटे सर आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 03/22/2014 - 12:20 नवीन
काळीज खल्लास करणारी सुंदर गझल!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sat, 03/22/2014 - 16:59 नवीन
सुधीर कुळये , धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा