Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भजन - महागाई

व — वेल्लाभट, Mon, 03/17/2014 - 17:46
सिनेमाच्या, अल्बम च्या गाण्यांच्या मीटरवर बसवलेली भजनं हा संगीताचा एक विशिष्ट प्रकार म्हणावा लागेल. त्यात फूल न फुलाची पाकळी म्हणून ही माझी एक प्रामाणिक भर. महागाई कमी करण्यासाठी देवाकडे मागितलेलं हे मागणं. भजन - महागाई मीटर: तुझी घागर नळाला लाव नाही वजन नाण्याला नोट केविलवाणी आणलं डोळ्यात सगळ्यांच्या महागाईनं पाणी ॥धृ॥ नाही परवडत, आता दुधाचा घोट गॅसच्या किमतीचा, बघ झालाय स्फोट कुणी जेवी हॉटेलात, राही उपाशी कुणी ॥१॥ मेहनतवाल्यांच्या, बघ पोटात खड्डे वडापाव पोचला, आता दहाच्या पुढे मुलाबाळांचे हट्ट कसे पुरवावे कुणी ॥ २॥ टीव्ही मोबाईल, अन गाड्या, न घोडे मोबाईलच्या मागे, झाले सगळेच वेडे पैशापुढे आता नाही, कुणाचं कुणी ॥ ३॥ कोटी-कोटीचे, उभे राहती महाल सामान्यांचे हे, बघ झालेत हाल ग्राहकांच्या टाळूचं खाती बिल्डर लोणी ॥ ४॥ ज्याची लक्ष्मी तो, पुढे शर्यतीत बुद्धी खाते धूळ, इथे अडगळीत देवा जाहीर कर इथे तूच आणीबाणी ॥ ५॥ सगळे भासती, इथं झपाटलेले पैशासाठी हे, सारे हपापलेले ये रे धावून ताराया, ऐक माझी विनवणी ॥ ६॥ (C) काव्याचे सर्व हक्क बाधित.

प्रतिक्रिया द्या
1544 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/19/2014 - 15:19 नवीन
अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 03/20/2014 - 13:54 नवीन
:) जरूर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आयुर्हित Wed, 03/19/2014 - 19:42 नवीन
आणलं डोळ्यात सगळ्यांच्या महागाईनं पाणी ॥धृ॥ अगदी खरे आहे! महागाई तर काही कमी होणार नाही. आपल्यालाच काही तरी शक्कल लढवायला हवी. आपली विनवणी देवाने ऐकली आहे.पण देवाची काही इच्छा बाकी आहे काय आहे ती, हे पाहण्यासाठी वाचा भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 03/20/2014 - 13:56 नवीन
आभार ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा