Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी

आ — आयुर्हित, Wed, 03/19/2014 - 19:36
आलो रे धावून खास तुझ्यासाठी भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी करेल इच्छा पुरी चंद्रभागा काठी कर कटेवर ठेवुनी उभा हा जगजेठी ॥१॥ देईल सारे तुला जे सर्वांनाच हवे रोज रोज खाशील नवनविन मेवे सर्वांच्या आनंदाला उधाण यावे दही दुध तूप लोणी सर्वांनी खावे ॥ २॥ घेत असतो मी अधेमध्ये परीक्षा नापास झाल्यास देतो मोठी शिक्षा वेळ आली तर मागावी लागते भिक्षा अडल्याला करावी मदत ही खरी दीक्षा ॥ ३॥ ज्ञानाची धरा कास, अज्ञानालाच खोडा व्यर्थ दु:खी न होता, वृथा अभिमान सोडा भगीरथ प्रयत्न करुनी पै अन पै जोडा दूरदृष्टी ठेवुनी सोन्याचा पिंजरा तोडा ॥ ४॥ चाणाक्ष होऊनी सारे बुद्धीचे बळ वाढवा तेल काढण्या प्रयत्ने वाळूलाही रडवा एकजूट दाखवुनी द्यावा प्रेमाचा गोडवा विन्ध्य फोडुनी गंगा कावेरीला भिडवा ॥ ५॥ काही झाले तरी विवेकबुद्धी सोडू नका देश, देव, धर्मासाठी नीतीमुल्ये तोडू नका दुरितांचे तिमिर घालवा पण देश हा फोडू नका आयुर्हित दावील दिशा, पिच्छा मात्र सोडू नका ॥ ६॥

प्रतिक्रिया द्या
2884 वाचन

💬 प्रतिसाद (5)
आ
आत्मशून्य Wed, 03/19/2014 - 22:41 नवीन
जरा विस्क्टुन सांगा की.. .
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित गुरुवार, 03/20/2014 - 07:28 नवीन
महागाई असो कि इतर काहीही/कितीही अडचणी असतील, जर त्यातून बाहेर पडायची मनापासून इच्छा असेल तर आपल्याया नक्कीच दिशा मिळेल.अर्थात हि दिशा विवेकबुद्धी व नीतीमुल्ये यांना धरूनच असेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/20/2014 - 10:15 नवीन
लोलकविता =))))
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 03/20/2014 - 13:54 नवीन
जड जड आहे पण :) तरी... मस्तच..!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 03/20/2014 - 15:28 नवीन
काही झाले तरी विवेकबुद्धी सोडू नका देश, देव, धर्मासाठी नीतीमुल्ये तोडू नका दुरितांचे तिमिर घालवा पण देश हा फोडू नका आयुर्हित दावील दिशा, पिच्छा मात्र सोडू नका मस्त, आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा