Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"चिडकी चिऊताई -" (बालकविता)

व — विदेश, गुरुवार, 03/20/2014 - 09:42
खिडकीत दिसली चिऊताई बाळाची बोलावण्याची घाई "ये ये" म्हणाला हात दाखवून "खाऊ घे" म्हणाला खिडकीतून - चिऊताई होती फारच चिडकी समोर दिसली बंद खिडकी चोच आपटली खिडकीवर टकटक केली काचेवर - बाळाने उघडली हळूच खिडकी पटकन शिरली चिऊताई चिडकी बाळाने दाखवला लाडूचा खाऊ चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ - बाळाने मुठीत लाडू लपवला बाळ हळूच खुदकन हसला - चिडकी चिऊताई खूप चिडली खिडकीत "चिव चिव " ओरडली . . .

प्रतिक्रिया द्या
1849 वाचन

💬 प्रतिसाद (3)
आ
आयुर्हित गुरुवार, 03/20/2014 - 10:18 नवीन
खूप छान आहे हि कविता. याही क्षेत्रात नवीन करण्यासारखे खूप सारे आहे. लगे रहो.....!
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 12/15/2014 - 06:07 नवीन
निष्पाप चिऊताईही लाडू नाही मिळाला तर चिडते, मग आमच्या खादाड मंत्र्यांना काही मिळाले नाही तर ते थयथयाट करणारच की सत्ताधार्यांविरुद्ध
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/16/2014 - 09:33 नवीन
आवडली... :) मध्यंतरी या काळातल्या चिऊ काऊ चा संवाद वाचला होत :- काऊ :- ए चिऊ ए चिऊ चिऊ :- काय रे काऊ ? काऊ :- येउ का घरात ? चिऊ :- नको... हे घरात आहेत आज. :D

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks rise
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा