Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ही अता विद्रोह करते कातडी

D — drsunilahirrao, Fri, 03/21/2014 - 10:36
दावती नुसता उमाळा बेगडी माणसे आतून सारी कोरडी पाय मातीचेच सार्यांचे इथे चाल उंटाचीच होती वाकडी पोट छोटे भूक मोठी फार ही ही पहा कुरकूर करते आतडी थोर समतेचा तुझा दावा खरा मारती ही हात आता मापडी तू जरी आजन्म करशी भिक्षुकी रे तुझी झोळीच राहे तोकडी छान तू हा न्याय सार्यांना दिला वाजतो हा दंड नुसता लाकडी जी मघा मिरवीत गेली पालखी त्यात होती जातधर्माची मढी हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले ही अता विद्रोह करते कातडी पापपुण्ये मोज सारी तु पुन्हा थरथरु दे ही जीवाची पालडी वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू ने भरोनी देह अमुचे कापडी डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
1561 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/22/2014 - 03:29 नवीन
आवडली रचना -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sat, 03/22/2014 - 05:27 नवीन
प्रा.डॉ दिलीप बिरुटे, खूप खूप आभार सर !
  • Log in or register to post comments
K
kurlekaar Sun, 03/23/2014 - 08:20 नवीन
दावती नुसता उमाळा बेगडी माणसे आतून सारी कोरडी व जी मघा मिरवीत गेली पालखी त्यात होती जातधर्माची मढी व वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू ने भरोनी देह अमुचे कापडी य ओळी छान आहेत. यान्त तुमचा यमकी ट्रेड्मार्क व काव्यगुण यान्चा चान्गला सन्गम झालाय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा