Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती

म
माहितगार यांनी
Fri, 03/21/2014 - 12:12  ·  लेख
लेख
टिव्हीपुर्व काळातील महाराष्ट्रात जेव्हा रेडिओ केवळ जिवंत नव्हते, तर आकाशवाणीही भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाच प्रतीक होती; त्या काळात भक्तीसंगीताच्या सूरांच्या रोज सकाळी आकाशवाणीवरून होणार्‍या भावपूर्ण मैफिलीत, गीतरामायणातल एखाद पद अचानक कानावर पडल की सकाळच नाही आख्खा दिवस रम्य होऊन जात असे. मराठी विकिपीडियावर मागच्या वर्षाभरात (२०१३) जे काही लेखन मी केल त्यात गीतरामायण लेखाच ज्ञानकोशीय लेखन करण्यात समाधान मिळालं. (तो लेख मी येथे देत नाही, मिपाकरांनी लेख वाचनाचा आनंद मराठी विकिपीडियावरच घ्यावा असे वाटते. त्यात जरासा माझा स्वार्थ आहे :) ) ह्या धाग्याचा खरा हेतू नेहमी प्रमाणे मराठी विकिपीडियातील लेखासाठी अधिकची माहिती गोळा करणे हाच होय. खालील विषयासंबंधाने माहिती हवी आहे. १) गीतरामायणातील रचनांमध्ये कोणकोणते छंद, वृत्त आणि अलंकार आहेत ? २) गीतरामायणाची आतापर्यंत न चर्चिली गेलेली अथवा कमी चर्चेली गेलेल्या काही भाषिक वैशिष्ट्यांकडे तुम्हाला लक्ष नोंदवावेसे वाटते का ? ३अ) अलिकडे मिपावर सानेगुरुजींचे शामची आई कालबाह्य झाल्याची चर्चा वाचण्यात आली होती. गीतरामायणाचा सध्याच्या नवीन पिढ्यांच्या कितपत ऐकण्यात आहे ? ते त्यांना कितपत रुचते आहे ? गीतरामायण नवीन पिढीत टिकून आहे का कालबाह्य होते आहे, तुम्हाला काय वाटते ? ( हा प्रश्न जनरल चर्चेकरता आहे, विकिपीडियाशी संबंध नाही) ३ ब) आपण (भारतातील अथवा परदेशातील) इंग्रजी माध्यमातील पाल्यांचे पालक असाल तर आपण आपल्या पाल्यांना गीतरामायण ऐकवले आहे का ? गीतरामायण समजून घेण्यात आपल्या पाल्यांना काही भाषिक अडच्णी जाणवतात का ? कोणत्या आणि त्यावर मात कशी केलीत ( हा प्रश्न जनरल चर्चेकरता आहे, विकिपीडियाशी संबंध नाही) ३क) गीतरामायण अर्वाचीन कृती असल्यामुळे याचा समावेश पौराणिक साहित्य वर्गात करू नये. अस एक मत मराठी विकिपीडियावरील चर्चेत मांडल गेल आहे. या बाबत तुम्हाला काय वाटतं ? ४) डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर, ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर आणि गीत रामायणाची गीते गायलेल्या गायक गायिकांची अधिक माहिती हवी आहे. (विशेषतः ज्या गायकांबद्दल इंटरनेटवरील स्रोतात माहिती नाही पण तुम्हाला स्वतःला माहिती असल्यास त्यास प्राधान्य द्यावे.) ५) गीत रामायणच्या १०व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायक चंद्रकांत गोखले आणि अभिनेते चंद्रकांत गोखले या दोन व्यक्ती एकच आहेत का वेगव्गेळ्या ? ६) त्यातल्या मिश्र काफी , मिश्र जोगिया , भैरवी , भीमपलास, मिश्र मोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग, भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुध्द सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी ,तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुध्द कल्याण व मिश्र पहाडी या रागांबद्दल अधिक माहिती हवी आहे. ७) इच्छुक शुद्धलेखन प्रेमींनी मराठी विकिपीडियावरील गीतरामायण लेखात जाऊन शुद्धलेखन सुधारणा संपादने केल्यास स्वागत असेल. शेवटी जाता जाता गीतरामायणाचे कॉपीराईट प्रताधिकार हक्क गदिमांच्या पुढील पिढ्या जपतात तरीही सुमित्र माडगूळकर यांनी मराठी विकिपीडियास यथाशक्ती साहाय्यपूर्ण भूमिका ठेवली याचा आदरपूर्ण उल्लेख केलाच पाहिजे. या निमीत्ताने गीतरामायन विषयक इतर चर्चा करू शकताच सोबतच मराठी संकेतस्थळे ह्या संबंधाने वेगळी चर्चा करण्याचा प्रयास आहेच तर http://www.gadima.com/ संकेतस्थळ आपण पाहीले आहे का ? असेल तर आपल्याला ते कसे वाटले ? (माझा स्वतःचा gadima.comश कोणताही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यक्तीगत संबंध नाही.) * मराठी विकिपीडियावरील गीतरामायण लेखाचा दुवा *धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद

प्रतिक्रिया द्या
44319 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

प
प्यारे१ गुरुवार, 04/03/2014 - 13:03 नवीन
डिक्लेरेशन द्यायला हवं होतं खरं रामानं. किमान काहीतरी प्रेस रीलिज तरी. मे बी नेष्ट टैम! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 13:08 नवीन
रामावर घाऊक टीका करण्याची इच्छा (अन गरजही) नाही, मात्र मोदीभक्तांसारखं प्रत्येक कृतीला ओरिजिनल पुरावा नजरेआड करूनही समर्थन देणं पाहून करमणूक झाली खरी. बोला प्रभु रामचंद्रकी जै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 04/03/2014 - 13:15 नवीन
आपली इच्छा! बाकी त्याकाळची समाजरचना कशी होती हे ठाऊक आहे? अधिकार कोण ठरवणार एखाद्या माणसाचा? ज्याच्याकडं अधिकार आहे तोच ना? अधिकारापासून वंचित ठेवलं वगैरे मानवाधिकाराचा विषय तेव्हा नव्हताच ना. तसं नंतर मोर्चे वगैरे निघाले का? त्यांचा काही उल्लेख आहे का? शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं? सरसकट कत्तल स्टाईल... बळंच निष्कर्ष काढायचे असतील तर काढायला स्वतंत्र आहोतच की आपण सगळे. आम्ही आमच्या सोयीचा निष्कर्ष काढला. तुम्ही तुमच्या सोयीचा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 13:22 नवीन
शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं?
शंबूक अनधिकारी शूद्र होता हे नक्की आहे का? अन अधिकार ठरवला तो तरी कशाच्या आधारावर? हे स्पष्ट होऊदे. हे नसेल स्पष्ट तर जन्माधारित व्यवस्था मोडल्याचे धाडस केले म्हणून मारले असेच म्हणणार. वाल्मिकीरामायणात जे लिहिलंय ते समोर ठेवून बोलतो. फुका मखलाशी करणे आवडत नाही. समाजरचना वेगळी होती म्हणून प्रत्येक गोष्ट नजरेआड कशाला करावी? ती एक गोष्ट सांगितल्याने तुमच्या रामाचं महत्त्व कमी होणार अशी भीती आहे काय? शंबूकाला तो शूद्र असूनही तप करतो म्हणून मारले हे वाल्मिकीरामायणात लिहिलेले वरिजिनल श्लोक तुमच्या समोर आहेत. यातलं संस्कृत कळायला व्यास असायची गरज नाही. तुमचा सोर्स सांगा अन मग पाहू बळंच निष्कर्ष कोण काढतंय ते. आमचा सोर्स स्वयं रामायण आहे. तुमचा सोर्स काय आहे? सेकंडरी की टर्शरी की अजून प्रायमरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 04/03/2014 - 13:31 नवीन
>>>जन्माधारित व्यवस्था मोडल्याचे धाडस केले म्हणून मारले असेच म्हणणार. ओके. ठीक. आमची माघार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस गुरुवार, 04/03/2014 - 12:42 नवीन
रामायणात शिशाचा कसलाही उल्लेख नाही. रामाने खङगाने शिर उडवले. शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः|| न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ भाषतस्तस्य शूद्रस्य खड्गं सुरुचिरप्रभम् । निष्कृष्य कोशाद् विमलं शिरश्चिच्छेद राघवः ॥ बाकी समस्त उत्तरकाण्डच प्रक्षिप्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 12:48 नवीन
वरिजिनल उल्लेखाबद्दल धन्स रे. प्रक्षिप्त इ. असला तर नंतरच्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 04/03/2014 - 14:21 नवीन
समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नै
सहमत आहे. पुष्यमित्र शुंगापासून अशी मानसिकता जास्त गडद व्हायला लागली असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विकास गुरुवार, 04/03/2014 - 15:41 नवीन
वल्लींमुळे पहील्यांदाच वाचले, धन्यवाद! नंतर हा दुवा मिळाला... फार फाफटपसारा न करता ही कथा प्रक्षिप्त रामायणात दिलेली दिसते. त्यात नेहमीचा इंद्राचा पॉवर स्ट्रगल दिसतोय आणि त्याला रामाने केलेली मदत दिसते. पण स्पष्टपणे काहीच दिलेले नाही. समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान नक्कीच करते. पण आज (म्हणजे किमान काही शतके अथवा नेहमीच) रामायण जेंव्हा राहीले, वाचले आणि गायले गेले तेंव्हा त्यातील राम हा नक्की कोणत्या गुणांमुळे लक्षात ठेवला गेला? शंबुकामुळे? विंदांचे शब्द आठवतात:
रामायण वाचूनिया नंतर बोध कोणता घ्यावा आपण? रामासारखा मिळता नायक, वानर सुद्धा मारीती रावण!
म्हणूनच, संपूर्ण रामायण झाले अथवा अगदी उद्या कोणी लिंकनायन लिहीले तर ते झाले, त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्यारे१ गुरुवार, 04/03/2014 - 15:48 नवीन
दुव्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 17:33 नवीन
त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.
त्यापेक्षाही, एका प्रक्षिप्त कथेचेही समर्थन करावयास किती अन कशाला धावायचे हा प्रश्न आहे. अंधभक्ती करावी कशाला? शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. हे वैयक्तिक तुम्हांला उद्देशून नाही. धार्मिक साहित्यात दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. जुन्या काळातील समाजाचं गुडी गुडी अन अवास्तव चित्र लोकांसमोर ठेवून कोणाचं हित होणारे ते कळत नाही. लोकांच्या सारासारविवेकावर इतका अविश्वास दाखवल्याने काय होणार? गुडी गुडी चित्र सुरुवातीला ठीके, त्या अवस्थेतून बाहेर आलो की जरा नुआन्स्ड चित्र दाखवले तर तेवढ्याने झाला तर फायदाच होईल. अन शेवटी अंधभक्तांपुढे कितीही गीता वाचली तरी "न कश्चिच्छृणोति माम्" असे होणारे हे ठौकच आहे. पण असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 04/03/2014 - 17:52 नवीन
माझा प्रतिसाद देखील (खरेच) तुम्हाला उद्देशून नव्हता... गैरसमज नसावा. शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. रामाचा कमीपणा सांगितल्याबद्दल भिती वाटण्यापेक्षा रामाचे नाव जरी आले तरी अनेकांना उगाच (स्युडो)सेक्यूलर भिती वाटते हे यातून जास्त मला जाणवले. म्हणून फक्त अधिक लिहीत गेलो. गीतरामायणाच्या धाग्यात या अवांतराची सुरवात येथे झाली होती... ती देखील काही कारण नसताना. विषय काय आहे? गदीमांचे गीतरामायण. त्यात देखील आधी कुठेही रामाबद्दल देव/मर्यादापुरूषोत्तम म्हणून चर्चा झालेली नाही अथवा कोणी काही रामस्तुती आळवलेली नाही. केवळ रामाला कोणकोणत्या नावाने संबोधले जाते यात पतितपावन हा शब्द आला पण तेव्हढ्यापुरताच. मग त्यावर लगेच प्रक्षिप्त रामायणात देखील जे नाही असे शिसे ओतण्यापर्यंत लिहीण्याची आणि अवांतराची काय गरज होती? हे असे जेंव्हा होते तेंव्हा त्या विरुद्ध बोलणारे हे (या संदर्भात) रामाला कव्हर अप करण्यासाठी धडपडत असतात असे मला खरेच वाटत नाही. असो. गैरसमज झाला असेल तर तो दूर झाला असेल असे समजून अवांतर संपवतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 17:58 नवीन
ठीक. :) बाकी सूडोसेकूलर इ. शब्दांची तुम्हांला जितकी अ‍ॅलर्जी आहे तितकीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त मला आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
माहितगार Fri, 04/04/2014 - 04:58 नवीन
शंबूक नाम उपचर्चा धाग्याच्या दृष्टीने अंशतः विषयांतर होते, विजुभाऊंकडून तपशिलात चूक होती; तरी एकुण तपशिलातल्या चूका दर्शवून संदर्भासहीत बर्‍यापैकी समतोल मनमोकळी चर्चा या निमीत्ताने झाली. मधेच मलाही माझे दोन शब्द लिहिण्याची इच्छा झाली होती पण खाली पै तैंचा छंद वृत्त बद्दल धाग्यातील मुख्य उद्देशास धरून प्रतिसाद देण्या बद्दल वाचले आणि माझा उपचर्चेतील सहभागाच्या मोहास तात्पुरता तरी आवर घातला. विजुभाऊ, अत्रन्गि पाउस, llपुण्याचे पेशवेll, बॅटमॅन, प्रशांत आवले, वल्ली, विकास आपणा सर्वांना या उपचर्चेतील मनमोकळ्या सहभागा बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पोटे Mon, 03/24/2014 - 08:26 नवीन
तरुनी जो जाईल सिंधु महान असा हा एकच श्रीहनुमाब राग मुलतानी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/24/2014 - 08:34 नवीन
माहितीपूर्ण धागा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 04/01/2014 - 22:31 नवीन
१ एप्रिल पासून (म्हणजे या प्रतिसादाच्या तारखेपासूनचे) वर्ष हे गीतरामायण निर्मितीचे हिरक महोत्सवी वर्ष आहे! .. तोंवरि नूतन गीतरामायण!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/03/2014 - 06:25 नवीन
अजून यातल्या छंदांबद्दल चर्चा झालेली दिसत नाही. जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 04/04/2014 - 05:01 नवीन
जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.
कृपया सवडीनुसार नक्की प्रयत्न करावा, आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा असेल. चर्चेतील सहभागाकरीता आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चौकटराजा गुरुवार, 04/03/2014 - 12:18 नवीन
रामजन्माचे गीत काही केल्या गदिमाना सुचत नव्हते. रात्रीचे दोन वाजत आले तरी मुखडा काही मनासारखा होत नव्हता. विद्याताई माडगूळकर त्याना म्हणाल्या " अहो आता पुरे ! झोपा आता ! काही जमतेय की नाही ? " अगं मंदे, प्रभु श्रीराम जन्मायचेयत ते काय आण्णा माडगूळकर जन्माला यायचाय का ? चालू आहेत प्रसुतिवेदना !" " अहो पण आता दोन वाजले रात्रीचे......" झाले. गदिमांच्या रुसलेल्या प्रतिभेला मिळाली उभारी... मिळाला शब्द दोन ...दोन....दोन प्रहरी का ग सखी सूर्य थांबला.....राम जन्मला गं सखी राम जन्मला ...मुखड्याने पहिला वहिला हुंकार घेतला .
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री गुरुवार, 04/03/2014 - 14:04 नवीन
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण धागा . धागाकर्त्याचे आणि प्रतिसाद देणार्यांचे खूप आभार . :) 'आठवणीतली गाणी' येथील गीतरामायण मी नेहमी ऐकत असते .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 04/04/2014 - 05:08 नवीन
चर्चा पुढे चालू राहीलच,तरीही चौकटराजा, दिव्यश्री, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, पोटे, प्रमोद देर्देकर, पाषाणभेद, आदूबाळ, अत्रन्गि पाउस, विकास चर्चेतील सहभागा बद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा