Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ट-२० विश्वचषक स्पर्धा

श
श्रीगुरुजी यांनी
Fri, 03/21/2014 - 17:58  ·  लेख
लेख
ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात सुरू झाली आहे. स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. गट १ - श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलँड, नेदरलँड्स गट २ - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश पहिला सामना भारत व पाक यांच्यात २१ मार्च रोजी आहे. ३ व ४ एप्रिलला उपांत्य फेरीचे सामने असून एप्रिलला अंतिम सामना आहे.

प्रतिक्रिया द्या
101194 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

ग
गणपा Sun, 04/06/2014 - 08:14 नवीन
गत सामन्यांतल्या आकडेवारीला फारसा अर्थ नाही. हे सगळे शक्यतो आपल्या मनाला सुखावण्यासाठी असतं. :) जुन्या सामन्यांतले खेळाडू बदलले असतात, काही तेच खेळाडु असले तरी पुला खालून / वरुन बरच पाणी गेलेलं असू शकतं. शेवटी ज्या दिवशी सामना आहे त्या दिवशी सांघीक खेळ कसा होतो, हवामान कसं असेल यावर सगळं आवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुहासदवन Sat, 04/05/2014 - 09:21 नवीन
ते कितीही चांगले खेळले तरी एक अतिशय समतोल संघ असुन देखील गेल्या कित्येक मालिकांमध्ये उपांत्य फेरीच्या पुढे जाउ शकले नाहीत.....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/05/2014 - 09:27 नवीन
द. आफ्रिकेचं काही कळतच नाही. काल त्यांनी १७२ अशी चांगली धावसंख्या उभारली होती. तरी ते हारले. १५ षटकांत त्यांनी ३ बाद १२७ धावा केल्या होत्या. शेवटच्या ५ षटकात फक्त ४५ धावा केल्या. इतर कोणत्याही संघाने शेवटच्या ५ षटकात किमान ६०-६५ धावा केल्या असत्या. त्यांना किमान १९० धावा करणे सहज शक्य होते. पण तिथेच कच खाल्ली.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 04/05/2014 - 14:53 नवीन
दक्षिण आफ्रिकेचं नाव खरं तर बदलून के एल पी डी असं ठेवलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 04/07/2014 - 00:12 नवीन
के एल पी डी म्हंजे काय वो ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 04/07/2014 - 09:23 नवीन
खास लम्हे पे धोका ओ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
श्रीगुरुजी Sun, 04/06/2014 - 07:26 नवीन
आज भारत बहुतेक जिंकेल. अर्थात आयत्यावेळी काहीही होउ शकते. तरीसुद्धा भारत जिंकण्याची जास्त शक्यता आहे. आज मोहित शर्माऐवजी शमी एवढा एकच बदल अपेक्षित आहे. खरं तर प्रग्यान ओझा संघात हवा होता. पण त्याला १६ जणात नेलेलेच नाही. तो जास्त उपयुक्त ठरला असता. भुवनेश्वरला शेवटची देऊ नयेत. त्यात तो खूप मार खातो. पहिल्या १६ षटकातच त्याची षटके संपवून टाकावीत. धोनीने मागील सामन्यात रैनाला ४ षटके दिली होती तर जडेजाला फक्त २. आज तसे होऊ नये. गो इंडिया गो!
  • Log in or register to post comments
स
सुहासदवन Sun, 04/06/2014 - 07:56 नवीन
म्हणून भारताने सामना त्यांना बहाल केला नाही म्हणजे मिळवले..... नाही म्हणजे सचिन निवृत्त होण्याच्या काळात नाही का आपण वर्ल्ड कप आणि आइ.पी.एल. सुद्धा जिंकलो.... अगदी अनपेक्षित रित्या.....
  • Log in or register to post comments
स
सुहासदवन Sun, 04/06/2014 - 15:47 नवीन
आणि पहिली बी बॅटिंग घ्यावी लागली..... गेम पालटणार बहुतेक...... लवकर विकेट गेली नाही म्हणजे मिळवली....
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/06/2014 - 16:46 नवीन
१६ ओव्हर्स-१११-२ विकेट्स. कै खरं नै.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Sun, 04/06/2014 - 16:53 नवीन
धोनीचा युवराजला रैनाच्या आधी पाठवायचा निर्णय अनाकलनीय आणि निव्वळ मुर्खपणाचा. विकेट हातात असून मनासारखा स्कोर होत नाहीये... युवराजला हिटविकेट करायला सांगा कोणीतरी..
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Sun, 04/06/2014 - 17:16 नवीन
रैना फलंदाजीला आलाच नाही, कोहली शेवटपर्यंत खेळला, धोनी नाबाद आणि तरीही आपला स्कोअर फक्त १३० ... हार्ड टू बिलीव्ह .. जसे आपण वेस्टैईंडिज आणि पाकिस्तानला हरवले तसे इथे श्रीलंका आपल्याला हरवतील असे सध्यातरी वाटतेय.. आणि तसे झाले तर आज वॉस्सअपवर युवराजच्या नावाचे मेसेज फिरणार असे दिसते.. ज्याचा जबाबदार खरे तर धोनीपण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/06/2014 - 18:19 नवीन
? श्रीलंकेला 28/28 चला शुभ रात्री :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/06/2014 - 18:20 नवीन
लंकेला ६ षटकात फक्त ४७ धावा हव्यात. आपण सामना हरल्यातच जमा आहे. युवराज व धोनी पराभवाचे शिल्पकार ठरतील. युवराजला कायमचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आज तब्बल २१ चेंडू म्हणजे साडेतीन षटके खेळून त्याने फक्त ११ धावा केल्या व त्या सर्व धावा एकेरी धावा होत्या. त्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. २१ चेंडूत किमान ३० धावा करायला हव्या होत्या. एका बाजूने कोहली चौकार, षटकार मारत १३० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा करत असताना दुसर्‍या बाजूने त्याच वेळी, त्याच खेळपट्टीवर, त्याच गोलंदाजांसमोर युवराज झगडत जेमतेम ५० च्या स्ट्राइक रेटने धावा करत चेंडू वाया घालवत होता. २०११ चा युवराज आता राहिलेला नाही. दुसरीकडे धोनीने देखील ७ चेंडू खेळून ४ धावा केल्या. रैनाच्या आधी युवराजला पाठविण्याचा त्याचा निर्णय अनाकलनीय होता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/06/2014 - 18:26 नवीन
धन्यवाद :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/06/2014 - 18:40 नवीन
हरलो एकदाचे. शेवट वाईट झाला. इतकी वाईट हार होईल असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 20:44 नवीन
हरलो ते हरलो, डेस्परेट लोकांची अक्कल पहा. काय तर म्हणे १९९६ ला लंका वन डे वर्ल्ड कप जिंकली तेव्हा भाजपा सरकार आले होते, याहीवेळी तसेच होणार =)) अरे पण हेही लक्षात घ्या मूर्खांनो, तो ५० ओव्हरच्या खेळाचा वर्ल्ड कप होता. २०-२० चा वर्ल्ड कप जिंकला तर सरकार अल्पजीवी ठरेल की काय =))
  • Log in or register to post comments
स
सुहासदवन Sun, 04/06/2014 - 21:21 नवीन
आले भाजपा सरकार तर काय हरकत आहे....वर्ल्ड कप काय नंतर पण जिंकता येइल.... क्या हुआ जो वर्ल्ड कप हार गये यार.. पर अबकी बार मोदी सरकार...
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 04/07/2014 - 07:52 नवीन
भे..... देश हरल्याचे काय नाही,पण मॅच हरलो म्हणून भाजपा येणार असा संबध जर कोणी लावत असेल तर त्याला येड झवे पणा सोडुन दुसरा शब्द नाही.....
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 04/07/2014 - 07:54 नवीन
धोनीने त्याला बॅटींगला पाठवुन अक्कलशुन्य निर्णय घेतला होता. साला बॅटींग करत होता की झ्झिमा खेळत होता हेच समजत नव्हत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा