पाककृती
द्राक्षांचा मुरांबा (मुर द्राक्षं)
Primary tabs
साहित्यः दोन वाट्या आंबट द्राक्षं, दोन वाट्या साखर, दोन लिंबांचा रस, दोन-तीन लवंगा, वेलची दाणे, पाणी.
कृती: द्राक्षं स्वच्छ धुवावीत. दोन वाट्या साखरेत साखर बुडेल एवढे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकल्यावर पसरणार नाही, इतपत पाक घट्ट झाला की त्यात धुतलेली द्राक्षं, लवंगा, वेलची दाणे घालावेत.

पाक परत शिजत ठेवावा. द्राक्षांच्या रसामुळे पाक थोडा पातळ होतो. तो पुन्हा डीशमध्ये पसरणार नाही, इतपत घट्ट करावा. पुरेसा घट्ट झाल्यावर गॅस बंद करून दोन लिंबांचा रस त्यात मिसळावा.

गार झाल्यावर तयार मुरांबा काचेच्या बरणीत भरावा.

करून बघायला पायजेल. काळ्या द्राक्षांचाही छान लागेल असे वाटते.
द्राक्षांचा मुरांबा नविनच प्रकार कळला..फोटोतले द्राक्ष आणी मुरांबा दोन्हीही छान!
सहमत
वेगळाच प्रकार समजला. पहिल्या फोटोत सगळे रंग मस्त आलेत की लगेच हात लावावासा वाट्टोय. एक शंका आहे. जर द्राक्षे आंबट घ्यायची आहेत तर पाकात पुन्हा लिंबू कशाला पिळायचे?
लिंबामुळे पाकाला चांगली चव येते. द्राक्षांच्या आंबट्पणावर लिंबाचे प्रमाण बदलायचे.
अच्छा!
द्राक्षांचा मुरांबा आवडतोच :)
पाकृ व फोटो छान आहेत...तोंपासू
आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली द्राक्षांचा सीझन आहे पण आता आंबट द्राक्षे शोधणे आले.
कोल्ह्याला विचारा.. ;-)
सांगून टाका की मग! :D
=)) =))
.
इंडिया स्टोअर्स मधे बघ ना यशो. नक्की मिळतील तिथे.
मला गेल्या वेळेस ऑर्डर करावी लागली होती. पण्या वेळेस नक्की मिळतील
विजूभौ, पाहते.
पहिला फोटो कसला सुरेख दिसतोय.
द्राक्षाचा मुरंबा हा प्रकारही पहिल्यांदाच पाहीला/ऐकला.
अनन्या, अजून एक सुचलेय की पाकात घालण्याअगोदर द्राक्षांना काट्याने टोचे मारावेत का? म्हणजे त्यांचा रस पाकात मिसळायला मदत होईलं?
एक प्रश्न आहे.. हा मुरांबा किती दिवस टिकेल? द्राक्षांचा मुरांबा जास्त दिवस टिकत नाही म्हणून विचारतोय..
@यशोधरा, अगं टोचे मारायला नाही लागत, अक्षरशः बेदाणे होतात त्या द्राक्षांचे, देठाकडून पाक शिरतो त्यात.
@ पिंगू, मी तयार मुरंब्याचा फोटो टाकलाय तसा रंग आला की मुरांबा चांगला टिकतो, कमी कढला तर मात्र नाही टिकत!
द्राक्षं गोड मिळाली तर मात्र लिंबाच्या रसाच्रे प्रमाण वाढवा, पाकाला आंबटपणाची चव चांगली वाटते.
ओके.
बरोबर आहे. कधी कधी कमी कढवले जाते आणि मग काही दिवसांनी मुरांब्याला बुरशी येते.
थोडा जास्त दिवस टिकवला तर वाईन होईल!
कॉलिंग सोत्रीबाबा! :D
नवीनच प्रकार कळला. आवडला.
पैला फोटु देख के दिल द्राक्ष द्राक्ष हो गया!
बाकि ही मुरंद्राक्ष लै भारी लागत असणार.
तों.पा.सु!
पहिल्यांदा ऐकला हा प्रकार... पण अफलातून दिसतोय.
विशेष म्हणजे पहिला फोटो अल्टीमेट आलाय. त्यातली रंगसंगती आणि रिफ्लेक्शन मस्तच.... :)
सुरेख फोटो आलेत, नविनच प्रकार कळला.
कसली सुरेख दिसताहेत द्राक्ष पहिल्या फोटोत. व्वा!
आजवर कधीही न ऐकलेली,न चाखलेली, न पाह्यलेली पाकृ.
धन्यवाद अनन्न्या.
@आदूबाळ, प्रयोग करून पहा. आणि इथे शेअर करा.
आयला, मागच्या वेळचा पायनॅपलाम्बा होता ना? आता द्राक्षांबा?
मस्तच!
द्राक्षं आवडत नाहीत त्यामुळे पास. बाकी पाकृ हटके आहे.
आंबट लागतात की कॉय? :P
>>आंबट लागतात की कॉय?
शी बै!! हे काय विचारणं झालं. ;)
काळी द्राक्षे वापरून केला तरी चालेल ना?
पण करून पाहायला हरकत नाही!
पहिला फोटो जब्राड आवडलाय.
डिट्टेल पाकृ आणि सुरेख फोटो! चव तर छान असणारच!
आयला ! पहिल्यांदाच असा मोरांबा पाहिला !
(छुंदा प्रेमी) :)
पहिला फोटु कसला जबराट आहे.
पहिला फोटु कसला जबराट आहे.
पहिल्यांदा ऐकला हा प्रकार... पण छान दिसतोय.
मुर्द्राक्षास...
मुरवि मनोहर द्राक्षालागी
सुधा मधुर अन् गंध केशरी
मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी
अशी चालली मधुरा-मधुरी
द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम्
पाकामधले केशर मधुरम्
द्राक्षरसासह मधुमद मधुरम्
द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम्
- कौस्तुभ आजगांवकर
प्रकार पहिल्यांदाच वाचला, फोटौज् दिसत नाहीत एकही.