Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकत्र कुटुंब - काळाची गरज?

म
मंदार दिलीप जोशी यांनी
Wed, 03/26/2014 - 06:23  ·  लेख
लेख
सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा. तीन गोष्टींवर चर्चा व्हावी (१) नीतीमूल्ये व संस्कार. (२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती. (३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.

प्रतिक्रिया द्या
54167 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

द
दिव्यश्री Fri, 03/28/2014 - 12:30 नवीन
माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>>तेच ना पोटाच्या मुलांकडून हि रिटर्न्सची अपेक्षा . मग निरपेक्ष प्रेम हे फक्त काही दिवसांनी शिरेली , शिनेमे , नाटकं आणि कथा कादंबर्यातच सापडेल . त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>> काहीच नाही . फक्त आई वडील जे कर्तव्य म्हणून करतात त्याची टिमकी वाजवणे चूकच आहे .तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच कर्तव्य केल आहे . तो त्याच कर्तव्य करेल .संपला विषय . कष्टात आणि त्यागातही स्वार्थच असतो बरेच वेळा . कष्ट आणि त्याग करून मुलांना वाढवायचं कारणच हे आहे कि म्हातारपणी ते सांभाळतील . किती आजीआजोबा नातवंडाना प्रेमाने , न कटकट करता सांभाळतात . कधी न कधी ते सुनेला ऐकवतातच कि तुमच्या मुलांसाठी आम्ही काय काय केल . गंमत म्हणजे सुनेला नातवंडासाठी टोमणे मारणारे , छळणारे लोक नंतर त्याच नातवंडला वैतागतात . पुन्हा अपवाद असतातच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/28/2014 - 12:44 नवीन
तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच कर्तव्य केल आहे . तो त्याच कर्तव्य करेल .संपला विषय
अगं पण मग मुलाचं कर्तव्य काय? म्हणजे तुझी आई वडीलांकडुन जे काही मुलासाठी होतं ते निरपेक्ष असावं अशी अपेक्षा आहे.. त्यांनी जे मुलासाठी केलं ते नुसतं कर्तव्य आहे.. पण मुलाचं काहीच कर्तव्य नाही का? मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. मुलं जर हक्कानी प्रॉपर्टीसाठी भांडणार असतील तर तेवढयाच हक्कानी आईवडीलांना सांभाळण्यासाठी पण भांडावं..
मग निरपेक्ष प्रेम हे फक्त काही दिवसांनी शिरेली , शिनेमे , नाटकं आणि कथा कादंबर्यातच सापडेल .
ते कथा कादंबर्‍यातच असतं.. माणुस स्वतःवरच सर्वात जास्त प्रेम करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Fri, 03/28/2014 - 14:22 नवीन
मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. >>> तेच कि ओ ताई सगळी कर्तव्य पार पडण्याची आणि निरपेक्ष प्रेमाची अपेक्षा हि फक्त मुलाकडूनच . मुलाच कर्तव्य म्हणजे आईवडिलांना सांभाळणे तेही व्यवस्थित( यात आर्थिक , मानसिक आणि शाररीक आणि अजून तुम्हाला जे अपेक्षित असेल ते घाला ) जर वेगळ राहून हि तो ते करत असेल तर का बाकीच्यांचा विरोध का ? प्रॉपर्टी जर असेल तर आधीच व्यवस्थित हिस्से / भागीदार्या करण तेही भेदभाव ण करता , तसं मृत्युपत्र वेळच्या वेळीच करण हे हि आई वडिलांचं आद्य कर्तव्य मानल जावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/28/2014 - 14:34 नवीन
वेगळं रहाण्याबद्दल आपलं दुमत नाहीच्चे ताई.. मुद्दा इतकाच की आई वडीलांची मुलांकडुन अपेक्षा अजिबात चुकीची नाही.. एवढंच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
च
चिगो Tue, 04/01/2014 - 09:25 नवीन
भारीबाई, तुमच्या मुद्द्यांशी सहमत, पण..
मला खर्च काळात नाही
हे कळायला बर्‍यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Tue, 04/01/2014 - 11:42 नवीन
खरच चा ऐवजी खर्च अस आल . :( मला खरच कळत नाही . हे कळायला बर्‍यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. Wink>>> :D बघा मिपावर मणोरंजण होते हो कि नै... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
स
स्मिता चौगुले Fri, 03/28/2014 - 12:01 नवीन
""बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे?"" विचार आवडले आपले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 07:10 नवीन
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे?
वेगळे रहावे आणि काय हवे ते करावे. आई वडिलांना मदतीची गरज असेल तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्या सोबत कायम रहायची गरज नाही.
२. बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे?
३. त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे व बायकोचे म्हणणे ऐकुन वेगळी चुल मांडावी?
स्वतःला पटल्याशिवाय स्वतःपुरता कोणताही निर्णय घेऊ नये. बायको सांगते म्हणूनही नाही नी आईवडिल सांगतात म्हणूनही नाही. असे करणे स्वतःच्या निर्णयांच्या परिणामांचे खापर दुसर्‍यावर फोडणे झाले.
४. एकुलत्या एका नातु/नाती बरोबर खेळण्या-बागडण्यापासून आजी-आजोबांना वंचित ठेवावे?
नाही कळले? एकत्र राहत नसले म्हणजे काही एकमेकांच्या घरी संचारबंदी नसते. वेगळे राहिनही आजी-आजोबा आणि नातवंडे रोज खेळु शकतातच. उलट त्यांना खेळायचे नसेल तेव्हा नातवंडांची ब्याद त्यांच्या जन्मदात्यांच्या घरी पिटाळून मस्त झोपा काढू शकतात.
५. मग ह्यात आपला स्वःत चा स्वार्थ नाही का?
स्वार्थ हा स्वतःचाच असतो. माणूस हा स्वार्थी प्राणी आहे म्हणून टिकाव धरून आहे, तसेच असावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ज
जेपी गुरुवार, 03/27/2014 - 15:51 नवीन
सद्या , एकत्रीत आणी वेगळे कुटुंब अश्या दोन केस बगतोय . सगळ लियाच मनलतर दोन लेख पाडावे लागतीत . मनुन 50-50सहमत . (एक लेख पेंडीग असलेला )जेपी
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 03/27/2014 - 16:08 नवीन
सर्वांच्या मताचा आदर आहेच पण... हा प्रश्न कोणासाठी आहे? म्हणजे इतरांच्या मतावरून स्वत:साठी हा निर्णय घ्यायच्या आहे की कसे? कारण हा मुद्दा सरसकटीकरण करण्याएवढा सोपा नाहीयेय. प्रत्येकाच्या समस्या, एकत्र राहयाचे किंवा विभक्त, ह्या त्या त्या व्यक्तीच्या आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या सापेक्ष असणार. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने त्या जनरलाइज करणे अवघड आहे. बहुतांशाने सगळ्यांचा ह्या विषयाकडे भावनिक भुमिकेतुन बघण्याचा कल दिसून येतो. पण 'प्रॅक्टिकल' असणे ही काळाची गरज आहे. (परत, हे माझे वैयक्तिक मत). नाण्याला कशा दोन बाजू असतात तशा ह्या विषयालाही आहेतच. पण त्या व्यक्तिसापेक्ष असणार. त्यामुळे ही काळाची गरज आहे का असा प्रश्न विचारून सरसकटीकरण करण्यापेक्षा ती वैयक्तिक गरज आहे मानण्यास प्रत्यवाय नसावा. - (काळाच्या पुढे चालणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 03/28/2014 - 07:43 नवीन
सगळे भाऊ अर्थिकदृष्ट्या सशक्त आणि समान ताकदीचे असतील. तसेच आई-वडीलही ब-यापैकी पैसा वा स्थावर मालमत्ता राखून असतील तर बहूधा कुणाचाही स्वाभिमान न दुखावता , समंजसपणे एकत्र राहणे शक्य होवू शकते (होईलच असे नाही, बाकी समंजसपणा, व्याहवारिक जाण महत्वाची). बाकी "घरात सगळ्या प्रोढ व्यक्ती सारख्याच आहेत, वैयक्तिक निर्णय घेण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे व कौटुंबिक निर्णयात प्रत्येकाचे मत गणले जाते" असा विश्वास सर्व सदस्यांत असेल तर एकत्र राहणे सुखकारक होवू शकते. लहान-मोठे पणाचा फरक फक्त बोलण्यात आदर देण्यापुरता (अहो-जाहो, दादा , ताई ई) वा सणासुदीला नमस्कार करण्यापुरता मर्यादित असावा. प्रत्येकवेळी "मी मोठा/मोठी, म्हणून मला जास्त कळते व सगळे निर्णय मीच घेणार वा मला नेहमीच जास्त मान-स्न्मान देण्यात यावा" असा हट्ट एकत्र कुटूंबस बाधा आणतो.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 03/28/2014 - 14:46 नवीन
सर्व बाजू मांडून झाल्या आहेत. नवीन काही लिहावं असं शिल्लक नसावं. पण एक वाक्य आठवलं.
प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात एक माझी..एक तुमची आणि एक सत्याची...
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 03/28/2014 - 16:31 नवीन
रोचक प्रतिसाद आहेत. या निमित्ताने लोकसत्तातला हा लेख आठवला. आई-वडिलांनी म्हातारपणी मुलांकडून काही अपेक्षा करु नये हे ठीक. मग मुलांनीही अठराव्या वर्षानंतर घराबाहेर पडलं पाहिजे; पण तसं आपल्याकडे होतं का? सगळं शिक्षण, लग्न वगैरेचा खर्च खुशाल आईवडिलांकडून घ्यायचा आणि नंतरही स्वतःच्या अडीअडचणींमध्ये जाऊन त्यांना त्रास द्यायचा हा ़कसला न्याय? स्वतः तिशी-पस्तिशीच्या झाल्यातरी आईकडून घरगुती हळद-तिखट-मसाल्यांची नियमित रसद मिळवणार्‍या, पोरांचा सांभाळ करण्यासाठी आई-बापांचा हक्काने वापर करुन घेणार्‍या जोड्या कमी नाहीत. वर आईवडलांनी काही अपेक्षा ठेवू नयेत असं तत्वज्ञान सांगायला तयार. अठराव्या वर्षीच हे तत्वज्ञान सुचून घराबाहेर का नाही पडत कोण जाणे?
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 03/28/2014 - 17:18 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
म
मनीषा Fri, 03/28/2014 - 17:12 नवीन
हल्लीचे जे सासू सासरे आहेत (बहुतांशी) ते तरी कुठे एकत्रं/संयुक्तं कुटुंबात राहिले असतात? सुनेचे मत विचारात घेऊन निर्णय घेणारा मुलगा..'बायकोच्या ताटाखालचे मांजर' , आणि लेकीची मर्जी राखणारा 'जावई माझा भला' असही असतं बर्‍याचवेळा. अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. निरपेक्ष वृत्तीने रहाणे कुणाला जमणे अवघडच. पण अपेक्षा बाळगताना व्यावहारीक दृष्टीकोन ठेवायला पाहिजे... म्हणजे अपेक्षाभंग होणार नाहीत. तसेच दूसर्‍याची वर्तणुक तपासताना स्वतःच्या वागणूकीचे ऑडीट पण जरूर करावे, त्यामुळे बरेचसे प्रश्नं उद्भवणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातल्या व्यक्तीबद्दल बाहेर तक्रारी, चौकशा करू नये. त्या ऐवजी एकमेकांशी संवाद ठेवावा. जितक्या बाहेरच्या (नातेवाईक. मित्रंमंडळी वगैरे) व्यक्ती आपल्या घरात लक्षं घालतील, तितके आपल्या घरातील प्रश्नं चिघळत जातील हे नक्की. एकमेकांशी संवाद असेल, परस्पर आदर (म्युचल रिस्पेक्ट) असेल, आणि महत्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास असेल तरच एकत्रं रहाण्यात अर्थ आहे, आणि हे सारं नसेल, तर घर म्हणजे नरक होईल.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 03/28/2014 - 20:30 नवीन
इथे चर्चा केल्यावर कोणी आपल्या आयुष्यातले निर्णय बदलणार आहे का. हा फारच वैयक्तिक पातळीवरचा निर्णय आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 03/28/2014 - 20:37 नवीन
:) फक्त कुकरची शिट्टी होणार आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
इ
इरसाल गुरुवार, 04/03/2014 - 10:33 नवीन
झाली शिट्टी, घ्या मग ताटं वाढायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्यारे१ गुरुवार, 04/03/2014 - 10:48 नवीन
हम्म! तुम्ही घरातले जास्तकमावते/थोरले/बाब्या/शेंडेफळ्/लाडोबा/आजारी वाट्टं. तरीच्च! जळ्ळा मेला आमचा जन्म. आमचे हे थोडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
प
प्यारे१ गुरुवार, 04/03/2014 - 10:49 नवीन
बघा बै असं होतं... लिहीता लिहीता उठावं लागलं. जळ्ळा मेला आमचा जन्म....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
फ
फुंटी Tue, 04/01/2014 - 09:46 नवीन
एकत्र कुटुंबपद्धती हा एकंदर मानवी समाजव्यवस्थेचा एक कालखंड (टप्पा)आहे.सध्या तो लयास जाताना दिसतो त्याची अनेक कारणे असतील.विभक्त कुटुंबपद्धतीची ३०-४० वर्षापूर्वी झालेली सुरुवात आणि तिची आजची आणि येणाऱ्या भविष्यात होणारी अवस्था या बदलांचे निरीक्षण करण गरजेच आहे.भावनिक बांधिलकीवर एकत्र कुटुंब टिकू शकली नाही त्यामुळे ती लयास गेली.परंतु सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव लक्षात घेता विभक्त कुटुंब सुद्धा भावनिक दृष्ट्या बांधलेली आहेत असे म्हणता येणार नाही .किंवा गेल्या काही वर्षात मजबूत असलेली विभक्त कुटुंबपद्धती भावनिक निकषांवर डळमळीत झालेली दिसून येते.भावनिक बांधिलकी आणि कुटुंब व्यवस्था आणि आर्थिक /सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबव्यवस्था या दोहोंचा विचार करता येणाऱ्या काळात या दोन्ही कुटुंबव्यवस्था मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.एकंदर मानवी समाजव्यवस्थेच एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 04/01/2014 - 11:15 नवीन
काय ठरलं शेवटी?????????? का अजून शेवट यायचाय सीरियल सारखाच्च! ;)
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Wed, 04/02/2014 - 08:08 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा नाईक Wed, 04/02/2014 - 08:51 नवीन
पिलियन ताई, प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 04/03/2014 - 12:48 नवीन
अवांतर : ज्या ज्या स्त्रीयांना आई-वडीलांना सोडून सासरी जाण्याची क्रूर प्रथा नकोय, त्यांनी पुढचा जन्म गारो किंवा खासी जमातीत जन्म होण्यासाठी देवाला वशिला लावावा.. ;-)
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 04/03/2014 - 17:18 नवीन
+१ ..!! आमच्या एका खासी मित्राला त्याच्या वडिलांनी सांगितलेय आधीच, 'बाबा आपल्या जमातीतली सोडून बघ रे' :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा