जनातलं, मनातलं

गुरूपुष्यामृत योग

Primary tabs

लोकहो,

गुरूपुष्यामृत योग दिनांक ३१ जुलै रोजी येत आहे. यालाच गुरू पुष्य अमृतसिद्धीयोग असेही म्हणतात.

हा योग सायंकाळी ०७ वाजून २६ मिनिटांपासून ते शुक्रवारी सकाळी ०६ वाजून १९ मिनिटांपर्यंत आहे.

आपला,
(पंचांगी) धोंडोपंत

पंत,
गुरूपुष्यामृत याचं महत्त्व सांगा ना !!!
अमृतसिद्धीयोगाचे फायदे-तोटे कळले असते तर अधिक उत्सुकता निर्माण झाली असती, आणि आपण दिलेल्या वेळेत काय करायचं तेही सांगा ना !!! ( मला वाटलं काथ्याकुट करायचा आहे ;) )

-दिलीप बिरुटे
(अज्ञानी नागरिक आणि
पंताचा मित्र.)

रामदास

मला पण असंच वाटलं.या निमीत्तानी काहीतरी नविन भर पडेल.
अवांतरः बायकोला हा दिवस आधीच कसा कळतो.त्या दिवशी सकाळीच मराठे सोनाराच्या दुकानात हजर असते.या निमीत्तानी काहीतरी नविन भर पडेल असेच म्हणते.

विसोबा खेचर

गुरुपुष्यामृत योग जवळ आला आहे म्हणजे आता आम्हाला खर्च आला! :)

"अरे आज गुरूपुष्य आहे रे, थोडं तरी सोनं विकत घेऊन ये रे!" असं आमची म्हातारी आम्हाला हमखास सांगणार. नेहमीचा अनुभव आहे हा! :)

आपला,
(मातृभक्त) तात्या.