Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाट्सअ‍ॅप एक डोकेदुखी ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 03/31/2014 - 16:04  ·  लेख
लेख
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल. एका मोठ्या माणसाने असं म्हटलं होतं की ''How You manage your information determines whether you win or lose'' आपण आपल्याकडील माहितीचं व्यवस्थापन कसे करतो त्यावरच आपलं यश अपयश अवलंबून असते. माहिती विचारांची देवाण-घेवाण हा सर्व प्रकारच्या विकासाचा आधार असतो. आणि म्हणून आपल्याला सतत माहितीच्या-संवादाच्या क्षेत्राशी सतत जोडलेलो असले पाहिजे असे वाटायला लागते. मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. वाट्सॅप हे स्मार्टफोनवरचं Android वरील लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन. (नै सर आता टेलीग्राम जोरात चालतंय असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. वाट्सअ‍ॅपवर एकदा आपल्याला संदेश यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही वाट्सॅपवर यायला लागल्या. विविध गृप निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे. उदाहरण म्हणुन सांगतो. आमचा एक गृप होता विविध राजकारणी, नगरसेवक, व्यापारी,शिक्षक, जिल्हापरिषद सदस्य,आमदार, असा गच्च थोरामोठ्यांनी भरलेला गृप होता. सुरुवाती सुरुवातील गुड मॉनिंग पासून 'गोड गोड' असा संवाद व्हायचा. टोन वाजला की काय लिहिलं त्याची प्रचंड उत्सुकता. वाचने लिहिणे सुरु झाले. मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या. एक दिवस अ‍ॅडमिनने हा गृप बंद करत आहे असे सांगितले. आणि सुटलो. पण एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार. वाट्सअ‍ॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ संदेश म्युट करा, कोणी म्हणेल सरळ अ‍ॅप्लीकेशन भ्रमनध्वनीतून काढून टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना ब्लॉक करा, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच. विनंती : आमच्याकडे वाट्सअ‍ॅप नाही, हलके भारीतले मोबाईल नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे. :) ''अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। श्री संत ज्ञानेश्वर.

प्रतिक्रिया द्या
33385 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

ख
खटपट्या Tue, 04/01/2014 - 07:50 नवीन
मी कोणत्याच ग्रुप मध्ये नाही आहे. पम्या ग्रुप काढलास तर कळव रे !!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/01/2014 - 09:39 नवीन
वॉटसप फोन नंबरवर अवलंबुन आहे .फेसबुक ओळखीच्या लोकांचे संपर्काचे साधन आहे फोन नंबरशी काही देणेघेणे नाही .मिपा समविचारी जगातल्या कुणाशीही उघड संपर्काचे साधन आहे .फोन नंबर आणि ओळखीशी काही संबंध नाही .लेखन हीच प्रत्येकाची ओळख . याव्यतिरिक्त यांचा उपयोग त्रासदायक होणारच . परदेशातल्या नातेवाईकांशी संपर्कासाठी वॉटसप उत्तम आहे हे खरं आहे .
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 04/01/2014 - 10:51 नवीन
हे खूप भारी.. सदर व्यक्ती जगतेय की खपली की कुठे गायबली हे समजते .. ;)
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Tue, 04/01/2014 - 11:51 नवीन
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत प्रा डॉ !!!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 04/01/2014 - 12:34 नवीन
आणि सरांची सारखी काळजी करायची तुमची सवय एक जाता जाणार नाही! कसे अगदी सारख्याला वारखे आहात, की नै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
क
किसन शिंदे Tue, 04/01/2014 - 13:40 नवीन
:D बिपिनदा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मारकुटे Wed, 04/02/2014 - 07:53 नवीन
दोन मोठी माणसं बोलत असतांना मधे बोलायची सवय काही जाणार नाही तुमची !!! मोठे व्हा (आतातरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
किसन शिंदे Wed, 04/02/2014 - 09:05 नवीन
सतरा वेळा डूआयडी घेऊन परत परत येणार्यांनी शहाणपणाचे बोल ऎकवणे हे कल्पनेपलीकडचे आहे अवलिया उर्फ नाना उर्फ मारकुटेसाहेब. तुम्हीच शहाणे व्हा(आतातरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
म
मारकुटे Wed, 04/02/2014 - 10:49 नवीन
सहमत आहे. नवीन आयडी करण्याचे धोरण काय आहे? असे करणे चुकीचे असेल तर अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी. काय म्हणता? बर पण तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलत आहात? हल्लीकायनवनवे शोध लावत आहात. शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही ;) लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Wed, 04/02/2014 - 13:19 नवीन
शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.
धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
न
नगरीनिरंजन Tue, 04/01/2014 - 15:28 नवीन
I fear the day that technology will surpass our human interaction. The world will have a generation of idiots. - Albert Einstein
  • Log in or register to post comments
क
कल्पक Wed, 04/02/2014 - 01:24 नवीन
वाट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर अशा अ‍ॅपस डिजाईन करताना मानवी भावनांचा (राग, लोभ, द्वेष, इर्षा, मत्सर, प्रेम, दिखाऊ वृत्ती, कौतुक, अहंकार) विचार आणि वापर केला जातो. Design for emotions 'मानवी भावनेसाठी रचना' असा खास विषय जगातल्या बऱ्याच डिजाईन संस्थात शिकवला जातो. सुरुवातीला छान वाटणारं वाट्सअ‍ॅप फोरवर्ड होणाऱ्या मेसेजेसमुळे, उगाच गुडमोर्निंग-गुडनाईट लिहिणाऱ्या लोकांमुळे, त्रासदायक वाटतं हे खरंच आहे. पण त्यावर आपण चांगलं, सकारात्मक, माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण शेअर करणं आणि इतरांना अशीच सवय/गोडी लावणं असा उपाय होऊ शकतो. आम्ही सातत्याने चांगले लेख, चांगल्या बातम्या, गाणी, मुलाखती, नवीन शोध अशी माहिती वाट्सअ‍ॅपवरून शेअर करत असतो. असाच प्रयोग फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचा (पूर्वी एकाच कंपनीत काम केलेल्या) डिजाईनर लोकांचा एक ग्रुप आहे त्यावर आम्ही डिजाईनमधील नवीन ट्रेंड, चांगले दुवे शेअर करत असतो. एखादा आठवडा एका डिजाईनविषयक संकल्पनेला (उदा: निसर्गाभिमुख आणि सामान्य लोकांसाठी होणारे प्रोडक्ट डिजाईनमधील प्रयोग) वाहिलेला असतो, त्या आठवड्यात सगळेजण त्या संकल्पनेवर आपले अनुभव, विचार, संदर्भ शेअर करतात. निर्बुद्धपणे फोरवर्ड होणारे मेसेजेस किवा द्वेष-इर्षा यांनी भरलेले मेसेजेस अशा गोष्टी टाळून रोज काहीतरी नवीन, सकारात्मक, माहितीपूर्ण, सर्जनशील, प्रगतीशील शेअर करता आलं तर हि माध्यमं खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच उपयोगी आणि रंजक वाटतील.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/02/2014 - 08:44 नवीन
योग्य वापर केल्यास त्रास नाही, नविन माहिती,बातम्या मिळायला आणि शेअर करायला उत्तम साधन. सध्या चेपु ने विकत घेतल्यावर याचा वापर फारच कमी केला असुन टेलिग्रामला पसंती दिली आहे. फालतुच्या ग्रुप मधे पडिक राहिल्यास टाळक्याला ताप होणार नाही तर काय ? योग्य वेळीच अश्या ग्रुप पासुन तोबा करावी. काही दिवसांनी सोशन नेटवर्क रोबर्ट आले तरी नवल वाटावयाचे नाही.कुठल्ह्याही गोष्टींच्या आहारी जाउ नये अशी काळजी घेतल्यास त्रास होणार नाही.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 04/02/2014 - 10:25 नवीन
'सामना'मधली अनेक सदरं अलीकडे अभावितपणे विनोदी होत चालली आहेत. (उदा. मुजफ्फर हुसैन यांनी क्रिमियावर लिहिलेला लेख). पण साप्ताहिक भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपचा उल्लेख पाहून गंमत वाटली :) मेष : सावध रहा, आज दिवसभर ‘एप्रिल फूल’ व्हाल. वृषभ : पाडव्याचा गोडवा कायम ठेवा. मिथुन : उन्हाळा कडक आहे, उगाच भटकंती करू नका. कर्क : उगाच टाईमपास नको, अभ्यास करा. सिंह : सोनं स्वस्त झालंय. आता वाजवा रे वाजवा. कन्या : व्हॉटस् अप बंद करून बघा, शांत झोप लागेल. तूळ : कुठं कुठं जायचं पिकनिकला, आजच बेत आखा. वृश्‍चिक : निवडणुकीचे वारे आहे, ‘मत’ विकू नका. धनु : जिभेवर साखर ठेवा, कामे होतील. मकर : गाफील राहू नका, धोका होईल. कुंभ : आज गाल्यावरची खळी खुलेल. मीन : टेन्शन नको, हेही क्षण जातील.
  • Log in or register to post comments
प
पुण्यात्मा Wed, 04/02/2014 - 11:40 नवीन
मलहि अगदि असाच अनुभव आला आहे. शेवटि वअतागुन काहि ग्रुप्स मधुन बाहेर गेलो.
  • Log in or register to post comments
ख
खबो जाप Sat, 04/05/2014 - 11:58 नवीन
चला व्हॉट्स अप न आवडणाऱ्याचा एक ग्रूप बनवू आपण (व्हॉट्स अप वर);-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/05/2014 - 12:14 नवीन
@ एक ग्रूप बनवू आपण (व्हॉट्स अप वर) >>> =)) ये लो...कल्लो बात! रोग,औषधाच्याही वरचा उतारा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप
स
साधा मुलगा Mon, 04/07/2014 - 16:06 नवीन
सर्वात मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही चुकिच्या ग्रुप वर मेसेज टाकता, आणि त्यातून होणारे गैरसमज. आमच्या कौलेजच्या वर्गाचा एक ग्रुप आणि आम्हा मित्रांचा एक ग्रुप आहे. तेव्हा काही मेसेज करण्यापूर्वी खात्री करावी लागते की आपण बरोबर ग्रुप वर टाकत आहोत ना !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/19/2015 - 16:17 नवीन
मंडळी माझ्या वाट्सॅप एक डोकेदुखीच्या धाग्याला आता पुढील काही दिवसात वर्ष होईल मिपाकरांचा काय नवीन अनुभव, काही गोष्टी यावर चर्चा व्हावी म्हणुन हा प्रपंच. आज मटावर व्हाट्सअ‍ॅप ग्रूप थंडावलेतका या लेखावरुन काय नवं जुनं घडतंय. खर्र्च ग्रूप थंडावलेत का ? की मजा येतेय त्यासाठी हा उकरप्रपंच. सध्या लातुरच्या तरुण प्रेमीयुगलचा व्हिडियो सर्वत्र फिरतोय. सुधारकाच्या नावाखाली त्या तरुणीला ज्या पद्धतीने मारहाण झाली तो व्हिडियो आपण पाहु शकत नाही. तसेच, काही गोपनिय क्यामेर्‍याने आलेले 'अश्लिल' व्हिडियो हाही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होत आहे. वाट्सपवर एखादी गोष्ट टाकायची इतकी घाई होते की विचारु नका. चुक की बरोबर त्याचे भान राहात नाही. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत, प्रोफाईल चित्र टाकावेत की टाकू नये, अशी अवस्था झाली आहे. आम्ही वाट्सप अ‍ॅक्टीव्ह करत नाही, आम्ही वाचत नाही, आम्ही ग्रुप सोडलेत. आम्ही केवळ कुटुंबासाठीच वाट्सअ‍ॅप वापरतो. आमचा ग्रूप केव्ळ ग्रेट आहे, एकाच सदस्याला दहा ठिकाणाहुन दहा ग्रूपमधे एकच मेसेज येतो. कंटाळा आलाय ? अशा विविध गोष्टी कळाव्यात म्हणुन हा अट्टाहास ? काही ग्रूप अ‍ॅडमिन जेलात गेलेत ? काही मेंबर्सला वैतागले आहेत ? काही नवीन उपाय ? असं काही सूचलं तर मिपाकरहो जरुर कळवा. वाचायला आवडेल. माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 16:19 नवीन
. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत,
आम्ही काय करतो ते सांगतो पण आधी महिला स्त्रीया म्हणजे नक्की कोण ते सांगा? इतर दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या स्त्रीया असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/19/2015 - 16:22 नवीन
महिला सदस्य असे म्हणायचे होते. बाकी, कर्णा तुमचा काय अनुभव वाट्सअ‍ॅपचा ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 16:25 नवीन
चहा टाक, ऑफिसातून निघालोय. चपात्या वातड लागताहेत. भाजीत मीठ नाही. वगैरे संदेशाची देवाणघेवाण बायकोबरोबर करण्यासाठी व्हॉट्सॅपचा चांगला उपयोग होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/19/2015 - 16:28 नवीन
छ्या, हे लै खासगी झालं. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आखाडे आणि उघडे-पाघडे चित्र याबद्दल विचारतोय. एकच चित्र ते गुडमॉर्निंग आणि गुडनाईट. आपण लै हुशार आहोत या थाटातले ग्रूपवरचे विचार. आणि दिवस रात्र मेसेजे जे टॉ टॉ वाजत असतात. असे मेसेजे पाहावं तरी ताप आणि पाहु नये तरी ताप ? बाकी, रावसाहेब आणि तुमचं हाय हॅलो चालू आहे की बंद आहे ? ;) (ह.घ्या) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
थ
थॉर माणूस Fri, 01/23/2015 - 08:26 नवीन
रात्री उठून पहावे लागावेत इतके महत्वाचे काहीही व्हॉटसअ‍ॅपवर येत नसते. महत्वाचे असेलच तर फोन करु शकतात माणसे. रात्रीचे सरळ बंद ठेवतो नेट. डोक्याला तापच नको. :) दिवसा नको तेव्हा म्युट करा ग्रुप्स. काही ग्रुपचे याक्टीव येडंमीन तुमची इनअ‍ॅक्टीवीटी पाहून स्वतःच काढतील तुम्हाला, चिंता नसावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध
धर्मराजमुटके Mon, 01/19/2015 - 16:26 नवीन
असतात ! असतात !! आमच्याकडे लेडीज बायका असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
संदीप डांगे Mon, 01/19/2015 - 17:05 नवीन
मी आधीपासूनच कोणत्या ग्रुप मध्ये सामील झालो नाही. कुणी रिक्वेस्ट केली तर नम्रपणे टाळली. त्यामुळे योग्य तोच वापर होता. पुढे व्यवसायासंबंधी वापर सुरु झाला. मग त्यातला धोका लक्षात आला. क्लायंट लोक बेधडक whatsapp वापरून कम्युनिकेशन करत होते. अर्थात जे ओफिशियल ठरत नव्हते. उदा. एखादे डिझाईन whatsapp वर मागवणे क्लायंटसाठी सोपे असले तरी माझ्यासाठी वेळखाऊ होते. तसेच whatsapp वरुन दिलेल्या निर्णयांची जबाबदारी कुणीही कधीही टाळू शकत होते. शिवाय मोबाईलवर असल्याने २४ तास उपलब्ध असा काहीसा समज होत होता. त्यामुळे अनेक संभाव्य धोक्यांना टाळण्यासाठी whatsapp बंद केले. फ्री एसेमेस आहेत त्यात भागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
के.पी. Mon, 01/19/2015 - 16:53 नवीन
माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा
मीसुद्धा या सगळ्याला कंटाळून शेवटी व्हाट्सएप लैपटॉप वर वापरायला लागले आहे. वेळ मिळेल तेव्हा आनंदाने ऑनलाइन जाते. ;) जास्त कटकट नाही ,डोक शांत रहातं :) हल्ली घरच्यांसाठी म्हणून नवीन नंबर घेउन मोबाइल वर वापरते (अर्थात सक्त ताकीद देऊन की १७ जणाकडून फिरत आलेले विडियो/फोटो पाठवू नयेत)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/23/2015 - 08:17 नवीन
व्हॉट्सअ‍ॅप आता डेस्कटॉपसाठी उपलब्ध झाले आहे ! https://web.whatsapp.com/ { हे फक्त क्रोमवर चालते, अजुन मी वापरुन पाहिले नाहीये. } बाकी ग्रूप मुळे फार घोळ होतात... बर्‍याचदा नको ते मेसेज नको त्या मंडळींना / ग्रुपला चुकुन पाठवले जातात... माझ्या कंपनीतल्या मंडळींच्या ३ ग्रूप मधे आहे, यातले एक सिनियर मॅनेजर्स मंडळीवाले आहेत... त्यांनी इतके ग्रूप बनवले की मी मोजायचे सोडुन दिले ! प्रत्येक ग्रुप मधे मला अ‍ॅड केल्यामुळे कोण मला कशासाठी अ‍ॅड करतो तेच कळेनासे झाले आहे, बर अनेक ग्रुपची नावे पण सारखी ठेवली ! परवा मीच शेवटी मेसेज केला... " माझा गझनी झाला आहे ! इतना सन्नाटा क्यों है भाई ? " एक ग्रुप चमत्कारी झाला आहे, कारण त्यातला प्रत्येक अ‍ॅडमिन दिसतो ! व्हॉट्सअ‍ॅप मधला हा बग आहे की असेही करता येते जे मला ठावूक नसावे ! नातेवाईक मंडळींचे ग्रुप आहेत... तिकडेही मी अधुन मधुन बागडुन येतो... {व्हर्चूअली तिळगुळ वाटले गेले,आणि पाखरं मंडळींनी देखील व्हर्चूअली लुटालुट { वाण } केली. } व्हॉट्अ‍ॅपवर वेगवेगळे ट्रेंड येत असतात... मग कधी रजनीकांत... कधी आलोकनाथ, कधी सनी लिऑनी...कधी आलिया भट, होउ दे खर्च तर व्हॉट्सअ‍ॅप मधे वळवळणार्‍या किड्याचा { हा अधुन मधुन जागॄत होत असतो.} ट्रेंड. सध्या जग प्रसिद्ध आठवले जाणारे कवी यांचा ट्रेंड जोरात आहे ! ;) तर वायफाय सुरु केल्यावर आणि व्हॉट्सअ‍ॅप ऑन केल्यावर मी १५-२० मिनीट फोनकडे पाहत नाही... तितका वेळ मेसेजचा पुर येत राहतो... मग काही वेळाने मोबल्याचा स्कीन पाहतो... प्रत्येक ग्रुपचे, व्यक्तींचे आकडे दिसतात...{म्हणजे किती मेसेज रिसीव्ह झाले त्याचे} वेळ मिळेल तसे वाचतो... कोण फोटो पाठवतो.कोण गाणी कोण तर कोण व्हिडीयो... हे सगळं झाल्यावर मग याचा माल त्याला आणि त्याचा माल याला... हे शक्योतो १५ मिनीटात आवरते घेतो... व्हॉट्सॅपवर कमीत कमी वेळ देण्याचा प्रयत्न करण्याचा नविन वर्षाचा संकल्प राहुनच गेला बघा... पण प्रयत्न करतो. ;) जाता जाता:- हल्लीच प्यारेला आमच्या ग्रुप मधे अ‍ॅडवला ! त्याने अ‍ॅड होण्याच्या आधी मला विचारले अ‍ॅडमिन कोण आहे ? मी उत्तर दिले :- मला नाही ठावूक ! { माझा गझनी झाला आहे हे त्याला कसे समजणार म्हणा ! } प्यारे :- अरे ज्या ग्रुप मधे आहेस त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन कोण हे माहित नाही तुला ? मी :- नाही, विसरलो. पण सगळी चांगली मंडळी आहेत. डॉक पण आहेत { डॉकला माझा गझनी घाबरुन आहे, त्यामुळे ते बरोबर लक्षात ठेवतो. ;) } बिनधास्त ये आणि रहा... प्यारे :- पण... मी:- अ‍ॅडमिनला सांगितले अ‍ॅडवला तुला... आता बघ. प्यारे :- ठीक. ता.क :- प्यारे अजुन ग्रुपमधे आहे... हा प्रतिसाद देण्याच्या आधी मॄत्युंजयचा व्यनी आला आहे अ‍ॅडकरण्यासाठी आणि खटपट्या साहेबांनी अजुन त्यांना का अ‍ॅडवले गेले नाही याची विचारणा केली आहे... गझनी मोड "ऑन" :- कैसे मुझे तुम मिल गयी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा