Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक काहीतरी……

च — चिनार, गुरुवार, 04/03/2014 - 10:07
मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ? एक काहीतरी नक्कीच हरवलंय ! कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ? एक काहीतरी नक्कीच थांबलय ! पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ? एक काहीतरी नक्कीच राहिलंय ! मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ? एक काहीतरी नक्कीच करपलय ! संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ? एक काहीतरी नक्कीच झालंय आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ? एक काहीतरी नक्कीच वाढलंय शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ? एक काहीतरी नक्कीच विसरलोय ! रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ? एक काहीतरी नक्कीच संपलय !!

प्रतिक्रिया द्या
1857 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चिनार Wed, 04/23/2014 - 11:50 नवीन
ही कविता "उत्तमकथा " मासिकाच्या एप्रिल अंकात प्रकाशित झाली आहे
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 04/23/2014 - 11:53 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
श
शुचि Wed, 04/23/2014 - 18:36 नवीन
इथे घासकडवींची आठवण येते. निराशाजनक चित्र कोणी रेखाटले की ते आवर्जून नवीन अन सकारात्मक डेव्हलपमेन्ट कडे लक्ष वेधतात. अन्य काही लेखातही हटके पण प्रगल्भ दृष्टीकोन मांडलेले खरे तर त्यांचे प्रतिसाद आजकाल मिस करते आहे. :( हा प्रतिसाद मनापासून व प्रंजळपणे लिहीलेला आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/23/2014 - 19:30 नवीन
इथे अशाच आणखी नव्या कविता पण लिहीत चला! कविता आवडली. पण तुम्ही म्हणताय ते सगळंच हरवलं नाही अजून. बर्‍याच ठिकाणी शिल्लक आहे. फक्त तुम्हाला कॉम्प्युटरसमोरून उठून निसर्गाकडे जावं लागेल!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा