Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निवडणुकीचा बिगुल . . .

स — संचित प्रमोद कुलकर्णी, Fri, 04/04/2014 - 12:36
निवडणुकीचा बिगुल देशभर वाजला कालचा तो 'आम आदमी', आज एकदम खास झाला कॉलर पकडणारे हात, नमन करू लागले ओळख विसरलेल्या चेहेऱ्यावरती, भुलवणारे हसू खुलू लागले झोपड्यातलं ते फाटक पातळ, नव्या साडीत बदलून गेलं व्हरांड्यातल्या गांजलेल्या नळांना, ५ वर्षांनी परत पाणी आलं रस्त्यामधले काल परवाचे खड्डे, अचानकच हरवून गेले पल्याड गावच्या दुष्काळग्रस्तांना, एका रात्रीत अनुदान मिळाले शेकडो पोकळ आश्वासनांचा, रोजचा रतीब चालू झाला सफेद सदरेवाल्यांचा घोळका, दारोदारी फिरू लागला चार महिन्यांचा सारा खेळ, पुन्हा सगळं तसंच घडणार पुन्हा पदरी तीच निराशा, आमचा शेतकरी पुन्हा रडणार रस्त्यांवरती तसेच खड्डे, पुन्हा रस्ते जाम होणार चार दिवसांचा हा खास आदमी, पुन्हा एकदा 'आम' होणार . . .

प्रतिक्रिया द्या
890 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा