Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डु आयडी !

इ
इरसाल
Sat, 04/05/2014 - 13:05
🗣 120 प्रतिसाद
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा. तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते. त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा, १. खोडसाळपणा २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे. ३. उगाच दंगा करणे ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. ६. संपादकांना त्रास देणे. असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो. तर लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !

प्रतिक्रिया द्या
31432 वाचन

💬 प्रतिसाद (120)
आ
आत्मशून्य Sat, 04/05/2014 - 13:12 नवीन
नेमक्या कारणावर कधीच एकमत होणार नाही १. खोडसाळपणा = १००% २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे = ५०% - ५०% ३. उगाच दंगा करणे = ५०% - ५०% ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. = ५०% - ५०% ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. = ५०% - ५०% ६. संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%
म
मदनबाण Sat, 04/05/2014 - 13:40 नवीन
हेच म्हणतो की वो मी. ;)
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
त
तुमचा अभिषेक Sun, 04/06/2014 - 12:34 नवीन
संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१% मी स्वता एकेकाळी ऑर्कुटवर केलेय. युवा जोशमध्ये असताना. काय कुठे अन कसे ते पुन्हा कधीतरी. पण मुद्दा हा की एखाद्याला वाटले की त्याच्याशी काहीतरी अन्याय वा पक्षपात झाला आहे तर बंडखोरी घडू शकते. संचालकांकडे अधिकार असतो की एखाद्याच्या पोस्ट उडवा वा बॅन करा तर मग याला उत्तर म्हणून फेक प्रोफाईल वा ड्यू आयडीचे हत्यार वापरले जाऊ शकते.
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Sun, 04/06/2014 - 13:34 नवीन
मिपावर बहुतांश सध्याचे संपादक हे तसे एकतर सदस्यांच्या उपद्व्यापाने वैतागलेले अथवा पद प्रिय असल्याने विवादात जाणीवपुर्वक तठस्थ भुमीका राखणारे असतात. त्यामुळे ते उघड अन्याय करायच्या फंदात पडत नाहीत व प्रथम जमाव तुमच्या विरोधात जाण्याची वाट पहायचा मार्ग पत्करतात व मग (पडद्यामागुनच) कृती करणे पसंत करतात. सामान्य सदस्य तंत्रज्ञानाने इतका प्रगत नाही की तो कोणी काटा काढला याचे इनवेस्टीगेशन स्वबळावर करु शकेल. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे खापर संपादकांवर फोडने एव्हडे सोडले तर कोणीही सामान्य सदस्य संपादकांना त्रास देण्याचा द्रवीडी प्राणायाम करायला समर्थ नाहीच. त्यात ज्या गोश्टींचा निर्णय संपादकांना घेता येत नसेल असे वाटते, तेथे डायरेक्ट थर्ड अंपायर उर्र्फ साक्षात मालकच निवाडा करतात. एक घाव दोन तुकडे, नो अपील. म्हणून वरील सर्वकरणांमुळे संपादकांना त्रास देणे हा हेतु मनात धरुन डु आयडी काढणे ही अतिशय दुर्मीळातील दुर्मीळ घटना ठरते, असे करायची कोणाची किती तिव्र इछ्चा असते-नसते हा वेगळा विषय आहे पण सध्या आपण फक्त प्रत्य्क्ष किती लोक हे करु जातील याचा विचार केला तर संपादकांना त्रास देण्याच्या हेतुने डू-आयडी काढत राहणे ही दुर्मीळातील दुर्मीळ घटनाच मानावी लागेल... नॉट टु मेंन्शन त्यासाठी पॉलीटीकली करेक्ट राहण्याचे गट्स किती मोठे लागतील :)
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक Mon, 04/07/2014 - 08:33 नवीन
कारण माझे अनुभव ऑर्कुट समूहांवरचे आहेत. माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. आणि ते विविध हेतूने बनवले होते. तसेच इतर लोक्स सुद्धा ज्या हेतूंनी फेक प्रोफाईल बनवायचे त्यांचे हेतूही लक्षात घेतले तर त्याची हेतूनुसार टक्केवारी वेगळी निघेल. असो, मराठी संकेतस्थळांचा फारसा अनुभव नसल्याने किंवा इथे अजून खोलवर रुळलो नसल्याने सध्या आपण बोलत आहात तेच प्रमाण मानून चालतो. :)
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
म
मदनबाण Mon, 04/07/2014 - 08:39 नवीन
माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. नारायण ! नारायण ! इथे नक्कीच एकच आयडी आहे ना ? ;) @पैसाताय तू ज्यांच्या बद्धल म्हणतेस ना... ते म्हणजे कंपु नंबर १ बरं का. ;)
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक Mon, 04/07/2014 - 09:16 नवीन
तो फक्त लिखाण करायला. थोडे वेगळ्या शैलीत लिहिले की त्या आयडीतून टाकतो एवढेच. बाकी तो काही लपवलाय असेही नाही. पुढे मागे येथील सक्रियता वाढली की कदाचित आणखी एखाद्याची गरज भासेलही आणि विश्वास ठेवा तो मी काढेलही. मुळात ड्यू आय डी हे प्रकरण सर्रसकट वाईट नसते हो, जर तुम्ही अभिमानाने वा किमान संकोच न बाळगता आपल्या एखाद्या आयडीची जबाबदारी घेऊ शकत असाल तर त्या आयडी बनवण्यामागचा तुमचा हेतू काहीही वाईट नव्हता हे माझे लॉजिक झाले.
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बॅटमॅन Mon, 04/07/2014 - 09:14 नवीन
८० प्रोफाईल्स :O अगायायो _/\_ एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल नै?
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक Mon, 04/07/2014 - 09:19 नवीन
एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल नै? >>>>>> मान गये उस्ताद.. ग्रेट मॅन थिंक्स अलाईक असे काहीसे बोलतात ना, तसे झाले हे.. खरेच एक्सेल शीटच बनवली होती, पैकी जे प्रोफाईल करंट वापरात असायचे त्यांच्यासाठी एक सामाईक मास्टर पासवर्ड होता, म्हणजे इथून तिथे उडी मारताना पासवर्ड आठवायचा त्रास नाही डोक्याला ;)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 04/07/2014 - 09:22 नवीन
हा हा हा, जबरीच ;)
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
प
पैसा Sat, 04/05/2014 - 13:36 नवीन
तुम्ही लिहिलीत ती सगळी कारणं कमी अधिक प्रमाणात असणारच. ज्या कारणांसाठी हे मिपावर येत नाहीत ती म्हणजे १. चांगले काही लिहिणे-वाचणे २. लोकांबरोबर विचाराचे आदान-प्रदान ३. आपली ओळख देणे किंबहुना आपण काहीतरी चुकीचं करत आहोत हे त्यांना चांगलंच माहित असतं आणि ते करत असताना आपल्याला कोणी पकडू नये, म्हणजे आपला संभावितपणाचा मुखवटा कायम रहावा अशी त्यांची इच्छा असते. थोडक्यात म्हणजे शिवराळ भाषा तर वापरायची आहे पण त्याचे परिणाम नकोत अशी काहीतरी मानसिकता असते. याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी. कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात. आणि आम्हा संपादकांना शंका आली की आम्ही त्यांना विचारून घेतो पण प्रॉब्लेम असा की एका ऑफिसातून/घरातून लॉग इन करणार्‍या दोन तीन लोकांचे आयपी अ‍ॅड्रेस कधी कधी एकच येतात. त्यामुळे डु आयडी कोण आहे हे साधारण कळलं तरी थेट अ‍ॅक्शन घेता येत नाही. फक्त ज्या अवतारात खोडसाळपणा केला असेल तो बॅन करणे हा एकच उपाय रहातो. पण यात एखादा माणूस चांगला अवतार जिवंत ठेवून इतर अनेक खोडसाळ अवतार घेत रहातो. याला काही औषध नाही. सगळेच लोक चांगल्या कारणाने मिपावर येतात असंही नाही. काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे. पण असे लोक माहित असले तरी ते नियमांच्या चौकटीत राहून गोंधळ घालत असल्याने तावडीत सापडत नाहीत. तुम्ही खान्देशी बोलीत लिहिलं आहे ना? बर्‍यापैकी कळलं. अधून मधून लिहीत जा. नव्या बोलीशी ओळख होईल.
आ
आत्मशून्य Sat, 04/05/2014 - 15:05 नवीन
कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात
नाही. आयपी हा विश्वसनीय प्रकार ठरत नाही. एक तर आयपी लपवायची इछ्चा राखणारा हे चुकवु शकतो. आणी दुसरे म्हणजे एकाच (अगदी स्टॅटीक असला तरी) आयपी वरुन दोन वेगवेगळे आयडी (अगदी एकाच वेळी) कार्यरत राहणे हीसुधा संपुर्ण निकोप गोष्ट आहे, व ते डू आयडी असण्याची शाश्वतीही नाही.
याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी.
आपल्या हेतुबद्दल शंका नाही परंतु असे सरसकटीकरण करणे टाळावेच. विशेषतः त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला चक्क डु-आयडी काढणारे विषेश दुट्प्पी आणी विषेश हरामखोर समजावेत. आपण पातळी सोडू शकतो हे जगापासुण लपवणे हा तर खरा नालायकपणा होय, न्हवे अशां महाभागाचे मुळ आयडीच डू आयडी ठरवले पाहिजेत.. पण असो, ही तात्वीक बाब आहे, व फक्त माहिती पुरेशी आहे. जालीय आचरणाच्या पातळीवर ही लागु केलीच पाहिजे असे नाही. आणी हो, राहता राहीले माझे वैयक्तीक मत. म्हणजे व्यक्ती तशा प्रवृत्ती, पण उद्या समजा मला डु आयडी काढावा वाटला तर माझ्यापुरते त्याचे नेमके काय कारण असेल.... १) खोडसाळपणा (अर्थात हा मुळ आयडीचाही भाग आहेच) २) माताय, सगळी दुनीया डुआयडी काढुन दंगा करुन गेली राव आणी आपलं मात्र हे कधीच करायचं राहीले ही चुटपुट नको. बघुया तरी डु-आयडी प्रकरणातुन किती धमाल उडवता येते ते.... :)
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 04/05/2014 - 19:34 नवीन
डु.आयडी प्रकाराबद्दल बद्दल तुम्हाला इतकी माहिती आणि कळकळ आहे हे पाहून छान वाटले! यापुढे एखादा डु. आयडी असल्याची शंका आली तर ओळखण्यासाठी तुमची मदत नक्कीच मागेन!
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 04/05/2014 - 18:42 नवीन
काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे.
असे का होत असावे बरे? तुमचा काय अंदाज आहे ?
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 04/05/2014 - 19:28 नवीन
त्या वाक्यातच याचं उत्तर आहे! हा प्रश्नच पडू नये!
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 04/05/2014 - 19:58 नवीन
आयच्यान सांगतो तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. कुठल्या वाक्यात नक्की? आणि हो, एकदम खरे उत्तर हवे आहे. उत्तर म्हणजे, तुमचे मत.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 04/05/2014 - 20:03 नवीन
मिपावर गोंधळ घालायला येतात. दुसरीकडे गोंधळ घालत नाहीत. तेच कारण आहे आणि परिणाम पण. आता मला गोंधळात सापडायची इच्छा नाही. त्यामुळे इति लेखनसीमा.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
म
मदनबाण Mon, 04/07/2014 - 08:31 नवीन
मिपावर गोंधळ घालायला येतात. दुसरीकडे गोंधळ घालत नाहीत. तेच कारण आहे आणि परिणाम पण. हॅ.हॅ.हॅ... ;)
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रीरंग_जोशी Sun, 04/06/2014 - 06:09 नवीन
या विषयावर चिंतन बैठकीमध्ये चर्चा करणे उपयुक्त ठरू शकते. अन अशा बैठकींसाठी गोवा हे गाजलेले स्थळ आहे ;-).
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेम्स बॉन्ड ००७ Sun, 04/06/2014 - 06:44 नवीन
असेच म्हणतो..
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
क
कवितानागेश Sat, 04/05/2014 - 14:13 नवीन
डु आयडी शिवायही या सर्व गोष्टी करता येतातच की.
ज
जेम्स बॉन्ड ००७ Sun, 04/06/2014 - 06:49 नवीन
असं म्हणणार्‍यांचाच डु आयडी असण्याची शक्यता जास्त असते *biggrin*
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कंजूस Sat, 04/05/2014 - 14:25 नवीन
भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून आवडलं . मला अजून बावनकशींची ओळख झाली नाही खरी पेढीवर पण मी त्यांना लेखनातून ओळखतो .डुआइडीने (?)चांगलं लिखाण केलं तरी मी वाचतो .ठिगळ सुरेख लावलं तरी बघतो . आता काही जणांकडे वेळ भरपूर आहे . "काई करु काई करु नवीन लुगडं धांडे करु ". "होळीतला नारळ पेटून ठूसफुसायचाच ,वेळीच काढला तर खोबरं गोड नाहीतर कोळसा ". या भाषेत काहीपण लिहून राहा .
इ
इरसाल Sun, 04/06/2014 - 18:11 नवीन
कंजुसभौ, आवडनं बरं आपले हाइ. अहिराणीमा गैर्‍ह्या चांगल्या गोट भरेल शेतस. एक म्हण मनी भी. काम नही काय करु लुगडं फाडी दांडे करु.
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जेपी Sat, 04/05/2014 - 14:25 नवीन
विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे किमान 14 डुआयडी सांगु शकतो , यातील एक संपादकाचा आहे . नुकताच आं ची या मागील खरा आयडी कोण आहे हे सांगु शकतो . आशु च्या 4थ्या मुद्याशी सहमत-विश्रांती मोड ऑन
श
शिद Mon, 04/07/2014 - 11:46 नवीन
मी मिपावरचे किमान 14 डुआयडी सांगु शकतो
फ्लेक्स बनवा आणि लावा मिपावर... हाकानाका.
↩ प्रतिसाद: जेपी
ब
बॅटमॅन Sat, 04/05/2014 - 14:40 नवीन
काकूच्या विषयाशी सहमत आहे. बाकी खाली जे लिहिलंय ते कळालं आणि आवडलंही. अहिराणीत शे काय???
इ
इरसाल Sun, 04/06/2014 - 18:08 नवीन
र लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं ! ते असे आहे, तर लोकहो, मिपावर काही लोकं मनात कुठली कुठली घाण भरुन येतात आणी इथे जी काही हातावर मोजण्याइतकी चांगली लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचं सुरु करतात. मला एक समजत नाही असं करुन ह्या भ*** काय भेटत असेल आणी अश्यांमुळेच मिपाच नाव खराब होत आहे. जेव्हा बघावे तेव्हा नवा डु आयडी घेवुन इथ्थेच्च. ह्या माणसाला त्रास देवु त्या बाइला त्रास देवु. पण हा डु आयडी काढायला काय करावं लागतं ?म्हणजे समजा अस बघा मी दोन तीन इमेल आयडी काढले आणी ते वापरुन इथे लॉगीन केले पण दरवेळेस मी माझा कॉम्पुटरतर नाही ना बदलु शकत.मग असे लोक पकडले कसे जात नाहीत ?आणी ज्या लोकांना हे माहित पडते की हा डु आयडी आहे तर मग ते बोंब ठोकत नाहीत.(हे लाक्षणिक अर्थाने बर कां !)अस न करण्या त मिपावरील लोकांचा काय फायदा आहे ? तर हे माहित करण्यासाठी मी हा काथ्याकुट टाकत आहे, जसं जमेल तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 19:25 नवीन
हम्म. :) ओके.
↩ प्रतिसाद: इरसाल
आ
आनंदी गोपाळ Sun, 04/06/2014 - 18:08 नवीन
अहिरानीमाच शे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 19:24 नवीन
धन्यवाद भौ. मले अहिरानी म्हंजे मराठी विश्वकोशमा दिलेला लहानसा प्यारेग्राफच आठवतो शे. "यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याच्या शेपले मुडना काटा. नाइभौ, नाइभौ, काड तं खरी काटा, म्हने. नाइ म्हने, याना काटा काडु दे." इ.इ.इ. पूर्ण आठवत नै, पण लै मजा आली होती हे वाचून. :)
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ज
जेनी... Sat, 04/05/2014 - 15:09 नवीन
वा वा इरसाल काका ... पण मला तर कायम तुम्हिपण डुयाडीच वाटत आलेले आहात
ब
बॅटमॅन Sat, 04/05/2014 - 15:13 नवीन
जेनीकाकूंबद्दलही हेच मत कैकांचे आहे असे ऐकून आहे.
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Sat, 04/05/2014 - 15:21 नवीन
असेनाका ... आपलं काय जातय ! लोकांची काय ...काय काय मतं असतात , एवढा विचार कराय्ला कस्काय वेळ मिळतो बॉ कोण जाणे !!!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 04/05/2014 - 19:25 नवीन
http://www.misalpav.com/comment/569495#comment-569495 हे पाहता तुमच्याशी सहमत होण्यावाचून पर्यायच दिसत नाही.
↩ प्रतिसाद: जेनी...
इ
इरसाल Sun, 04/06/2014 - 18:26 नवीन
वा वा इरसाल काका ... आता कोणाचा हे पण सांगुन टाका.
↩ प्रतिसाद: जेनी...
भ
भाते Sat, 04/05/2014 - 17:24 नवीन
आंचीला तुम्ही डु आयडी आहात असे खडसावल्यावर त्यानेच उलट माझ्या नावाने बोंब मारली होती. आंचीच्या __चा घो.
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 04/05/2014 - 18:39 नवीन
आंची कोण ?
↩ प्रतिसाद: भाते
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/05/2014 - 18:01 नवीन
DO Image removed. आयडी !
ए
एकुलता एक डॉन Sat, 04/05/2014 - 21:20 नवीन
नशिब माझे तरि नाव खरे आहे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/06/2014 - 04:21 नवीन
मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. (सगळ्यांना थोडा त्रास होईल मान्य पण मिपाच्या प्रेमासाठी तेवढं नक्कीच सहन करता येइल). जेणे करुन काय होईल की मिपा वर खातं नोंदविताना एक क्रमांक दुसर्‍यांदा संपादकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. नुसतं मिपावर डु-आयडी काढायचा म्हणुन जास्तीचे नंबर घेणारे लोकं नक्कीच कमी असतील. (जे तेवढ्यासाठी नवा नंबर घेतील त्यांच्या चिकाटीच कौतुक आणि उद्देशाचा णिशेध) डु-आयडींचे प्रमाण नक्कीच कमी करता येईल. अर्थात त्याआधी खालच्या गोष्टींचा विचार करायला लागेल. १. वन टाईम पिन अ‍ॅक्सेस मुळे मिपाच्या सर्व्हर वर किती अतिरिक्त ताण पडेल? २. जो संदेश पाठवला जाईल त्यासाठी काही खर्च येईल का? ३. आय-पी आणि भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची सांगड घालता येईल का? म्हणजे घरच्या किंवा ऑफिसच्या दुसर्‍या नंबरवरुन डु-आयडी मिळवता येणार नाही. (ऑफिसातुन एकाच आय.पी. वरुन २-४ मिपाकर वाचन किंवा लेखन करत असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल?) ४. पिन क्रमांक प्रवेश केल्यापासुन जास्तीत जास्त ३० सेकंदाच्या आत मिळेल का? बाकी असं करता येईल का ह्याबद्द्ल आपले आयटी तज्ञ लोक्स सल्ला देतीलचं. -- (हाऊ मेनी नंबर्स डज अ मॅन नीड?) जिओ मिपास्टॉय.
ए
एकुलता एक डॉन Sun, 04/06/2014 - 04:37 नवीन
शादी डोट कोम सारख आधार कार्ड उप्लोड केल्यावरच मान्यद्ता द्यावि
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/06/2014 - 04:42 नवीन
आधार कार्डाएवढी निराधार योजना आजपर्यंत पाहाण्यात आलेली नाही.
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
प
पैसा Sun, 04/06/2014 - 05:02 नवीन
व्यक्तिशः मला (एक सदस्य म्हणून) असा एखादा फोन नंबर घेतला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे सर्व्हरवर ताण वगैरे काही येऊ नये कारण तो खाते उघडताना एकदाच वापरला जाईल. पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. म्हणजे काही असे सदस्यही आहेत की ज्यांना आपली कोणतीही खाजगी माहिती इथे द्यायला नको आहे पण ते दंगेखोर नाहीत. गंभीर सदस्य आहेत.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/06/2014 - 11:45 नवीन
>>>>> पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. सध्या आपण मेल आयडी देतो. मेल आयडीचा वापर संकेतस्थळ वापरकर्त्याने केवळ खाते उघडण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. असेच भ्रमनध्वनीच्या बाबतीत आपण कितीतरी ठिकाणी फोन रजिष्टर केलेला असतो. कामाच्या ठिकाणी, ब्यांक, अमुक-धमुक, तिथे तुमची प्रायव्हसी भंग होत नाही ? सुरक्षित असेल तिथे आपण अशी रिस्क घेतोच की मग मराठी संकेतस्थळांनी असं केलं तर काय बिघडेल ? ज्याला खाज असेल तो लिहिल नै तर राहीलं ? अशी अनेक माणसं आहेत जी उत्तम लिहितात मराठी संकेतस्थळे वाचतात पण ती मराठी संकेतस्थळावर लिहित नाही म्हणून काय संकेतस्थळं बंद पडली नाहीत. काही कच्च-बच्च लेखन येतच असतं. आज लेखनाचा दर्जा खुप उच्च नसेल पण लेखन येतच आहे की नै... तेव्हा पै भविष्यात अनेक मराठी संकेतस्थळ असं करतील. किंवा सरकार असा काही कायदा करेल की लिहिणा-या सदस्याची माहिती आवश्यक आहे, संकेतस्थळ मालक-चालक यांची माहिती हवी आहे. एक दस्तऐवज तुम्हाला दरवर्षी सरकारला द्यावा लागेल तेव्हा हा पर्याय तुम्हाला वापरावाच लागणार आहे, आज आपल्याला हे पटत नसलं तरी भविष्यात होऊ शकते असे वाटते.... लावता का शर्यत पाच-पाचशे रुपयाची ? :) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 04/06/2014 - 12:24 नवीन
पैज अजिबात लावणार नै! भविष्यात असं होणं अगदी सहज शक्य आहे. आपले सायबर क्राईमचे कायदे आणि पोलीस अजून प्राथमिक अवस्थेत आहेत. पण पुढे कधीतरी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला लागेल. कॉपीराईट पाहिजे तर जबाबदारीही घ्यायला पाहिजे. तुमच्या बाकी बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहेच.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 12:42 नवीन
कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यांत काहीच फरक नाही काय? इथे लोक टाईमपास करायला येतात. फुकट बिग ब्रदरगिरी करण्याला तुमचे समर्थन असेल असे वाटले नव्हते.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कवितानागेश Sun, 04/06/2014 - 14:00 नवीन
एखाद्याचा करमणूकीसाठी केला गेलेला 'टाईमपास' इतर ५०(/५००/५०००...इ.) जणांसाठी कधीतरी त्रासदायकही होउ शकतो. त्यासाठी 'फुकट बिग ब्रदरगिरी' काहीवेळेस करावी लागते. शिवाय कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यात फक्त 'फरक'च आहे का? 'साम्य' बिलकुल नाही का? 'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आत्मशून्य Sun, 04/06/2014 - 14:04 नवीन
'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.
मग सगळीकडे फिरा. इथे याच अशी सक्ती आहे काय ? का जे सगळीकडे तुम्ही करता तेच इथेही करायला भेटले पाहिजे हा अट्टहास त्यामागे आहे ?
↩ प्रतिसाद: कवितानागेश
आ
आत्मशून्य Sun, 04/06/2014 - 14:13 नवीन
वि़कृत स्त्रिमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात आहेत सोशली त्या ती नेटाने फॉलो करते तिने इथे तेच करावे काय ? माझा एक मित्र आहे बायकोच्या ताटाखालचं मांजर. विवाहीत स्त्रियांचा जबर धसका त्याने घेतला आहे हे त्याचे सोशल एटीकेट्स पुन्हा पुन्हा हेच सिध्द करतात, त्याने इथेही तसेच वागावे काय ?
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा