Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डु आयडी !

इ
इरसाल यांनी
Sat, 04/05/2014 - 13:05  ·  लेख
लेख
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा. तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते. त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा, १. खोडसाळपणा २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे. ३. उगाच दंगा करणे ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. ६. संपादकांना त्रास देणे. असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो. तर लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !

प्रतिक्रिया द्या
31432 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 14:11 नवीन
बर्राच फरक आहे. सोशल एटिकेट पाळायचे तर एकतर्फी नकोत-त्याचं एक किळसवाणं उदा. मिपावर अलीकडंच पाहिलंय, ते एक असोच. बाकी साम्य काय आहे? इथे लोक कशाला येतात, काय करतात, याची मुख्य पर्पज काय, इ.इ. पाहिले तर सहज लक्षात यावे. कुणीतरी सटीसहामाशी केलेले ट्रोलिंग कंट्रोल करण्यासाठी अन्य वेळेस इतकी बंधने घालण्याचे समर्थन अतिशय हास्यास्पद आहे. बाकी काही नाही झालं तरी लोकांचा ओढाच कमी होईल. तसंही एका संस्थळात दुसर्‍यापेक्षा लै युनिक काही नसतं. अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते. तिथे व्हेरिफिकेशन गरजेचे आहे हे एकवेळ मान्य करू शकतो - कारण पर्पज वेगळी आहे. अर्थात तिथेही मतभेद आहेत, पण अनाहितावर एक पुरुष मत व्यक्त करणारा कोण नै का? म्हणून गप्प बसतो झालं. पण तोच न्याय सर्वत्र लावणे हे बालिश आहे. मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत. लोक आंजावर येतात ते प्रत्यक्ष आयुष्यापासून ब्रेक म्हणून. तिथेही असले नियम लावत बसला तर कोण येईल कशाला तुमच्याकडे? (किंवा अजून कुणीकडे) ही साधी गोष्ट लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. मिपावर असलं काही सुरू झालं तर मी तरी इथे थांबणार नाही. मी किंवा अजून कोणी गेल्याने मिपाला शष्प फरक तसाही पडणार नाही, पण मत व्यक्त केलं इतकंच. आता मत व्यक्त करणारा मी कोण टिकोजीराव? तर ज्या अ‍ॅथॉरिटीने राजकारण ते बालसंगोपनादि विषयांवर लोक बोलतात त्याच अ‍ॅथॉरिटीने मी बोलतोय. असो.
↩ प्रतिसाद: कवितानागेश
आ
आत्मशून्य Sun, 04/06/2014 - 14:26 नवीन
अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते.
मला ह्या विभागाची संकल्पना अतिशय आवडली. त्या विभागाबाबत/ अनेक सदस्यांबाबत मला अतिशय आदर व ममत्वही आहे, व उत्तरोत्तर वाढतच जाइल. पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.(कोणीत्याही त्रयस्थ व्यक्तीने ज्याचा मिपासोबत चुकुनही व दुरान्वयेही संबंध नाही त्याने ते अद्रुश्य केलेले संभाषण जरुर वाचावे आणी त्याचे मत घ्यावे) आणी हे सुधा त्यांच्या व्हेरीफाइड सदस्यांकडुन घडले. म्हणजे व्हेरीफिकेशन ही मुळात कसलीच एटीकेट्सची गॅरंटी देत नाही, उलट हुच्चभ्रुपणाचा पांघरलेल्या बुरख्या खाली जोपसलेल्या उबदार चाळीतल्या नळावरच्या भांडणाच्या एटीकेट्स मात्र सुरेख उघड्या पडल्या. आता बोला. खरे तर कारभाराची पारदर्शकता पुरेशी असते जसे १) कोणता प्रतिसाद का संपादीत/ अद्रुष्य केला गेला याची कारणमिमांसा. (ति चुकली असल्यास चुक दामटायचा हेकेखोरपणा टाळुन, खुल्या मनाने चुक सुधरायची इच्छा शक्ती). २) मिपा खुल्या विभागाच्या सदस्यांना ते स्त्रीलिंगी आहेत की पुल्लींगी हे नमुद करणे सपशेल रद्द( अनाहीतासाठी स्वतंत्र आयडीची व्यवस्था). ३) आपण संस्थळावर आहोत पिताश्रींच्या प्रॉपर्टीवर न्हवे याचे सदस्यांनी राखावयाचे भान. ४) वादविवाद असेल तर दंगा होणार हे मान्य करावे. अगदी संसदही त्यास अपवाद नसते. (आशा आहे संसद हे इथे सोशल ठिकाणच गणले जातेय)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 19:26 नवीन
पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.
तो तर नेहमीच सुरू असतो. पण त्याबद्दल काही बोलणे म्ह. पाप आहे. बाकी सहमत आहेच!
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आनंदी गोपाळ Mon, 04/07/2014 - 04:42 नवीन
मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत.
नेमक्या शब्दांत "मनोगत" लिहिले आहे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/06/2014 - 11:30 नवीन
>>>>मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. मिपाचं भविष्यातली वाटचाल माहिती नाही पण मराठी संकेतस्थळावर लिहिणा-या-वाचणा-यांचा वावर जेव्हा खुप वाढेल आणि जी काही मोजकी मराठी संकेतस्थळं असतील की जिथे लिहिण्या-वाचण्याचं वेड लागेल अशा ठिकाणी तुम्हाला 'व्यवस्थित' वावरायचं आहे तिथे भ्रमनध्वनी व्हेरीफिकेशनचा पर्याय उत्तम ठरणारच आहे. आज इनमिन साडेतीन मराठी संकेतस्थळावर तीच माणसं इकडे आणि तीच माणसं तिकडे. आपण खूप हुशार आहोत असे समजणारे शे-पाचशे लोक एकाच ठिकाणी रमू शकत नाही. संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणून लिहितो की जसे मिपावर काही कोणाशी पटलं नाही की, ती 'हुशार माणसं' कशाला लिहायचं मिपावर. फेसबूकवर लिहू. फेसबूकवर लिहून लाईक्स कमी पडायला लागले की मग ब्लॉगवर लिहायचं. तिकडे झाले की पुन्हा मनोगतावर सॉरी नमोगतावर लिहायचं. तिथे नै पटलं की पुन्हा मिपावर डु आयडीने लिहायला यायचं किंवा असलेल्या आयडीने नुसती मस्ती करायला यायचं. सतत उंटासारखे तिरपे तिरपे लिहायचं. काढलं की पुन्हा बोंबलत बसायचं असं होत असतं. मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात. जालावर मराठी संकेतस्थळाच्या बाबतीत असा व्हेरीफिकेशनचा प्रयोग वेगळ्या पद्धतीने राबवलेला अनाहिताच्या निमित्ताने दिसला यश अपयश येता काळ ठरवेल पण मला व्यक्तिगत ती एक मराठी संकेतस्थळासाठी एक उत्तम सुरुवात वाटली. भविष्यात अजून काय दडलेले असेल आज तरी मला माहिती नाही. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ध
धन्या Sun, 04/06/2014 - 11:57 नवीन
आपण खूप हुशार आहोत असे समजणारे शे-पाचशे लोक एकाच ठिकाणी रमू शकत नाही.
यू सेड ईट सर :)
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पैसा Sun, 04/06/2014 - 12:32 नवीन
मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात.
याच्याशीही भयानक सहमत आहे. एखाद्याने मेहनत घेऊन कितीही चांगलं लिहिलेलं असो, तो आमच्या कंपूत नाही ना, मग पाडा त्याचं लिखाण, प्रतिक्रिया देऊ नका असा विचार करणारी खेकड्याची मनोवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालायचं. संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. काही जण तर फक्त एखाद्याला टार्गेट करायला डु. आयडी घेऊन येतात अशीही उदाहरणं पाहिली आहेत. ही विकृती झाली. या नगांना आपली ओळख लपवायची असते कारण आपण करतोय ते बरोबर नाही हे कुठेतरी कळत असतंच ना! मग घ्या डु. आयडी!
↩ प्रतिसाद: धन्या
स
सुहास.. Sun, 04/06/2014 - 15:32 नवीन
संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. >>> लय आशावादी व्बा तुम्ही ;) फरक व्हेरियेशन चा आहे च ...पण मग म्हणुनच हल्ली प्रत्येकाला इतिहासरंजणाचा वा स्मरणरंजणाचा संसर्ग होत असावा :)
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 04/06/2014 - 17:10 नवीन
+१
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 04/06/2014 - 05:02 नवीन
इरसाल भाउ तुम्ही कोना डुप्लिकेट आय डी सेतस,
इ
इरसाल Sun, 04/06/2014 - 18:28 नवीन
आत्ते काय करो ?
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
व
विवेकपटाईत Sun, 04/06/2014 - 05:44 नवीन
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही. (पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. (कुणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नाही आहे. फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) २. दुसरे हेतू - वर उल्लेख झालेलाच आहे.
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/07/2014 - 11:52 नवीन
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही... ...आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. असा विचारच कधी केला नव्हता ! *unknw* आता ते खरं आहे का ते अंतर्मनात खोल्खोल / खोल्वर (यापैकी एका किंवा दोन्ही पद्धतीने) डोकावून पाहिले पाहिजे. ;) :) (...फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) हे पटलं. हे खरं असण्याची जास्त शक्यता वाटते. :) ...(पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) यात माझापण नंबर असावा अशी कल्पना करून उगाचच गार्गार वाटवून घेतलं... ही ही ही... ;) आता माझं म्हणणं किंवा शंका (ज्याला जे वाटेल ते, आम्ही लान्हपनापासून लोक्शाहीवादी हौत हो !)... "जालावरच्या सर्वच आयड्या ह्या, अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज, डू आयड्या असतात." असा आमचा सिद्धांत आहे. कारण १. "इस्पीकचा एक्का" हा मुखवटा कारण ते शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीचे नाव म्हणून वापरण्याची सामान्यपणे प्रथा नाही. ठीक आहे. २. पण जर मी "अरविंद देशमाने" या (खर्‍या वाटणार्‍या पण कल्पीत नावाने) नावाने लिहायला सुरुवात केली तर ते माझेच खरे नाव आहे हे सिद्ध होते का ??? नाही ! ३. आयडी हे खरं नाव आहे हे सिद्ध करायला प्रत्येक सभासदाला "फोटो आयडीचा" दाखला देवून मगच नाव नोंदवावे लागेल. हे होत नाही तोपर्यंत, सर्व आयडीज व्हर्चुअलच असणार. मग ते त्या आयडीच्या धारकाचे खरे नाव असो वा नसो. एवढेच नाही तर... {लै खत्री 'बाल की खाल' मोड} अगदी कट्ट्याला प्रत्यक्ष भेट झालेल्या सभासदांचे सो कॉल्ड खरे नावही आपण फोटो आयडीचा पुरावा मागून खात्री करून घेत नाही. त्यामुळे तेथे ऐकलेले माझे वरचे "अरविंद देशमाने" हे नावही खोटे असू शकते, नाही का? खी...खी...खी... ;) {/लै खत्री 'बाल की खाल' मोड} एकंदरीत, "ब्रम्ह सत्यं, (जाल)जगत् मिथ्या" असे आपले पूर्वसूरी सांगून गेले ते काय उगाचच ! ;) आता आमचे ब्रम्हज्ञान (बरेच लोक मिपावर डोस देत असतात, आम्हीच काय घोडं मारलय? हमाराभी हक बनता हय भाया)... आयडीचा (लेखनाचा गुण)धर्म* पहा, शेवटी नावात काय आहे??? * धर्म : एखाद्या जीवाची/वस्तूची वागण्याची पद्धती (यात लेखनही आलेच). याला मराठीत कॅरॅक्टरिस्टिक्स असे म्हटले जाते. *** विवेकपटाईत साहेब (आता आम्हाला तुमची आय्डीच म्हाय्ती हाय म्हणून आय्डी कडेच गार्‍हाणं कर्तोय) ह घ्या. हा तुमच्या प्रतिसादावर कमी आणि जालावरच्या सर्वसाधारण समजूतींवर जास्त असा प्रतिप्रतिसाद आहे. विनोदी अंगानं लिहायचा क्शीण प्रयत्न असला तरी लॉजीकमध्ये कमी राहू नये याची खबरदारी घेतली आहे.***
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
प
प्रकाश घाटपांडे Sun, 04/06/2014 - 08:02 नवीन
आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्‍या किंदम ऋषी त्यांची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले.काही डूआयडींचे बाबतीत तसेच काहीसे असावे.
आ
आनंदी गोपाळ Mon, 04/07/2014 - 15:44 नवीन
घाटपांडेजी, तुम्हाला कुणी मृगनयनी भेटली नसावी अजून. त्यामुळे मृगरूप घेण्याची इच्छा झाली नसावी ;)
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मनीषा Sun, 04/06/2014 - 08:53 नवीन
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे.
स
सुहास.. Sun, 04/06/2014 - 15:34 नवीन
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे. >> +१०००० काही लोक्स हे करतात आणि काही स्वताच्या कंपुतलेच वापरतात .........
↩ प्रतिसाद: मनीषा
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 10:34 नवीन
फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. अँटी डुआयडी लोकांचे डेस्परेशन पाहून मजा वाटते खरीच. एखादा डु आयडी ट्रोलिंग करत असेल तर सरळ उडवण्याचा पर्याय आहेच की. पण नियमात बसण्याइतपत ट्रोलिंग असेल तर इतका कपाळशूळ का उठावा कै कळ्ळं नाही. अंमळ बालिश प्रकार आहे हा सगळा.
स
स्वप्नांची राणी Sun, 04/06/2014 - 13:22 नवीन
>>>> फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. >>> पुर्ण सहमत..!! >>> अगदी सहमत. शिवाय एखाद्या शब्दाचा भलता अर्थ स्वतःवरच ओढवून घेऊन कंपूने तुटून पडणारे अन वर स्वतःच्या नैतिकतेची/बुद्धीची टिमकी वाजवणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही... >>>> असहमत..!! आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. अर्थात योग्य वातावरण हा परत सापेक्ष शब्द आहे. प्रत्येक जिवाचे योग्य वातावरणाचे निकष वेगळे असतात. त्यामुळे फोन नंबर घेणे, आधारकार्ड घेणे, ओटिपी ई.ई. त्यावरचे उपाय नाहियेत. वातावरण कसेही असले तरी योग्य वेळी थोडिफार झाडझूड करुन बहुतेक वेळा काम भागतेच. नाही भागले की व्हॅक्युम क्लिनर असतोच राखिव.!!
ध
धर्मराजमुटके Sun, 04/06/2014 - 13:28 नवीन
डुआयडी वगैरे काय नसतयं. हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जैसा मनी भाव तैसा दिसे देव ! हा मातरं येका माणसाचे येकापेक्षा ज्यादा आयडी असू शकतात. त्याला डुआयडी का बरं म्हणता ?
म
मनीषा Sun, 04/06/2014 - 14:03 नवीन
बरोबर पण सर्वांचं मन इतकं निर्मळ नस्तं ना
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 13:51 नवीन
आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही.
पर्सनल उल्लेख केलेला नसतानाही एखाद्याची आई काढणारे सदस्य पाहिले आहेत. एरवी मारे संभावित असल्याच्या थाटात जगाला उपदेश करत फिरतात - पण पातळी सोडून बोलूनही वर स्वतः ढोंगीपणे उच्च नैतिक भूमिका घेणारे सदस्य. यांना तर काहीच बोलायचा हक्क नाही. यांचे खरे रंग स्वतःच दाखवून दिल्याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानले पाहिजेत. असो. (स्वप्नांची राणी यांना हा प्रतिसाद वैयक्तिकरीत्या उद्देशून नाही. ज्याला आहे त्याला कळालं तर ठीक- यद्यपि अपेक्षा नाहीच. रडीचा डाव खेळणारी पोरं माझी स्टंप आहे म्हणून मला दोनदा खेळू द्या नैतर मी स्टंपा घेऊन जातो इ.इ. थयथयाट करतात त्याप्रमाणेच एखादी गोष्ट नै पटली की झाडू घेणार्‍यांची वागणूक आहे. अन याबद्दल मी ठाम आहे. खरं बोलण्याबद्दल कुणाच्या नाकदुर्‍या काढायची गरज नाही- वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच.)
स
स्वप्नांची राणी Sun, 04/06/2014 - 14:20 नवीन
>>>> वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच >>>> ईतक मिपाफोबिक व्हायची काय गरज आहे म्हणते मी..? झालं यार, होउन गेलं... होता है!! मूव ऑन... मिपा मस्ट गो ऑन!!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 14:26 नवीन
मिपाफोबिक नै ओ. मिपा विल गो ऑन नो म्याटर व्हॉट. असो.
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
आ
आत्मशून्य Sun, 04/06/2014 - 14:36 नवीन
मिपाफोबिक
अन बॅट्म्यान ? डबल ब्यारलचा ठोठो....! फोबिदायक बॉडीलँग्वेज प्रत्यक्ष कोणाची झालीय हे पण दुर्लक्षीत झालेले दिसतयं.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्पंदना Mon, 04/07/2014 - 02:21 नवीन
उत्तर द्यावं लागतय म्हणुन देते आहे. आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे. नुसता वितंडवाद घालणार्‍या लोकांना मग ती स्त्री असो वा पुरुष कोणताच पायबंद नसतो, कारण तोंड उघडल की आपलीच जीत झाली पाहिजे असा एक समज त्यांच्या मनात भरौन गेलेला असतो. माझी मुलगी, माझा मुलगा, माझे आई वडिल हे सार्‍यांना असतात. त्यांच्याकडे जस आपण एक स्त्री वा पुरुष म्हणुन न पाहता एक नातेवाईक म्हणुन पाहतो तसच बाहेरच्या जगात वावरताना एक स्त्री वं पुरुष म्हणुन न पाहतां एक पुर्ण व्यक्ती म्हणुन पहायला शिकाल तो सुदिन!! आणि हो उगा फालतु शब्दाला शब्द वाढवायची तसदी घेउ नये. काही विचार करुन बोलावस वाटल तर बोलावे. नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं. इति लेखन सीमा.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पिशी अबोली Mon, 04/07/2014 - 08:14 नवीन
आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे.
प्रचंड सहमत.
↩ प्रतिसाद: स्पंदना
ब
बॅटमॅन Mon, 04/07/2014 - 09:16 नवीन
नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
हेच स्वतः पाळलं असतं तर काय पाहिजे होतं? पण नियम एका साईडनेच पाळायचे असतात ना, त्याला इलाज नाही. चालूद्या!
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सुनील Mon, 04/07/2014 - 09:53 नवीन
नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
... आणि त्या उंचावलेल्या मानेची उंची ही अपमान केला गेलेल्या वाक्यातील शब्दांच्या व्यस्त प्रमाणात असते, हादेखिल गैरसमज हटेल तर बरं!! ;)
↩ प्रतिसाद: स्पंदना
म
मनीषा Sun, 04/06/2014 - 13:58 नवीन
संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. हा शोध लागणे अवघड नाही थोडेफार लेखन आणि प्रतिसाद वाचले कि बर्‍यापैकी कळते . मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. प्रचंड सहमत
स
सुहास.. Sun, 04/06/2014 - 15:47 नवीन
चला आता मॅच सुरू झाली ... इर्‍या तुला लैच प्रश्न पडायला लागलेत हल्ली , ...असो एक अनुभव सांगतो ...मिपावर पाच वर्षे झालीत आता ... एक असाच आयडी आला होता तात्याच्या काळात, लय चालल होते, रामायण महाभारत, उठ-सुट तेच सकाळी दुपारी तेच ...तेव्हा खरं नाव घेवुन आला होता ....मी एका वेगळ्या कंपुत होतो तेव्हा, त्यातले बरेच जण मिपावर नाहीत आता ...असा झोडला होता त्याला की त्याने आयडी बंद केला ..मग तात्याला मेल पाठवुन घेतला दुसरा आयडी ... बरेच दिवस गप्प पडुन होता ..मग हळुहळू जसा कंपु पांगत गेला..तसतसा तो लिहायला लागला ...सध्या संपादकाच्या गुडबुकात असुन सगळीकडे वावरतो ....आता बोल ....सुधारित डु आयडी की सर्वसामान्य आयडी ........... दुसर उदाहरण आहे एका माजोरी आयडी च ....हे जेव्हा आलंत तेव्हा पार ईग्रंजीमध्ये च मराठी टायपाला सुरुवात केली , कविता तर त्याच्या कवितापेक्षा ऑर्कुट च्या जरा बर्‍या वाटतील अश्या ...तेव्हा त्यान ते ईग्रंजीमधलं मराठीत टाईपकरून देण्यापर्यंत मदत केली मी, आज जिथे तिथे दात दाखवत असतो आणि तोंड तर अस करतो कट्ट्याला की तो लिहुन मिपावरच काय अख्ख्या मराठी आंजावर उपकारच करतो आहे ... अशी उदाहरणे बरीच आहे , पण तु कसा यात पडला आज ... आपल्याकडं काय म्हणतात माहीत आहे ना ! ज्यांच्यामुळे अडत नाही त्याच्या फंदात पडत नाही ;)
इ
इरसाल Sun, 04/06/2014 - 18:36 नवीन
सुहासभौ, सध्या काही धाग्यावर काही प्रतिसादामधे कोणी कोणी डु आयडीचे सरळ सरळ वाभाडे काढलेले दिसले तसेच काही खोडसाळ धागे काढणारे अचानक मिपा सोडुन गायबलेत आणी नवे अवतरलेत. बर्‍याच दिवसापासुन मला विचारायचे होते काही लोक हे कस शोधतात की अमुक अमुक डुआयडी आहे. म्हटले गरमागरमीचा माहोल आहे घ्या काथ्या कुटुन. बरेच दिवस पडावसं वाटल नाही पण उगाच कुठले संदर्भ कुठे लावले जातात म्हणुन रहावले गेले नाही. असो. तुम्हनाकडे गैर्‍हा किस्सा व्हतीन तेन्हामासला दोन तर वरथे मालुंग पडी ग्यात. कोन त्या कोन त्या सोंगे ? वरला उदाहरण मासला ?
↩ प्रतिसाद: सुहास..
च
चिन्मय खंडागळे Sun, 04/06/2014 - 16:41 नवीन
चालायचेच. अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?
प
प्यारे१ Sun, 04/06/2014 - 16:50 नवीन
यदा यदा हि... च्या चालीवर बॅटमॅन किंवा इतर कुणी दोन श्लोक लिहू शकेल. ल्ह्या रे कुणीतरी!
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
श
शुचि Sun, 04/06/2014 - 17:04 नवीन
ठ्ठो!!! =))
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/06/2014 - 17:21 नवीन
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा? लै भारी... आवडलं. पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/06/2014 - 17:35 नवीन
आवडले Good one....!!!! :) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
त
तुमचा अभिषेक Sun, 04/06/2014 - 18:02 नवीन
एकच नंबर डायलॉग !
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
ब
बॅटमॅन Sun, 04/06/2014 - 19:27 नवीन
अगागागागागागागा =)) =)) =)) धन्य =)) _/\_
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
स
सुहास.. Sun, 04/06/2014 - 20:39 नवीन
बॅड जोक !! ( हे म्हणजे 'डिफाईन फाईन' सारखे झाले, आणि त्यावर त्याला गुड वन ई. म्हणणारे संपादक आहेत याची नोंद घेतली, उगा ड्यु आयडी गोंधळ घालतात म्हणायचे आणि स्वतः मात्र , जिथे जरा गोंधळ दिसला तिथे हॅ हॅ हॅ करायला मोकळे, माझे स्पष्ट मत असे आहे की किमान तुम्हाला कारवाई/कंट्रोल करता येत नसेल तर टाळ्या तरी वाजवु नयेत आणि ते ही नसेल येत तर सर्वसामान्य सदस्य असल्याची टिमकी वाजवु नये )
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
प
पैसा Mon, 04/07/2014 - 08:55 नवीन
ते आयडी विधायक कार्यासाठी काढलेले होते. विध्वंसक नव्हे!
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
य
यशोधरा Sun, 04/06/2014 - 19:35 नवीन
इरसालभौ, मला अहिराणी वाचायला मजा येते आहे. सगळीच नाही समजत पण ऐकायला गोड वाटेल बहुतेक. मिपावर अहिराणी शिकवायचा धागा काढा बघू आणि शिकवा :)
इ
इरसाल Mon, 04/07/2014 - 07:50 नवीन
मागे एक अहिराणीवर धागा काढला होता.पण तो मीमराठीवर होता की मिपावर हे आटवत नाय पघा ! दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो.
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सूड Mon, 04/07/2014 - 10:13 नवीन
>>दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो. काढा काढा. कोकणीच्या लेखांसाठी आम्ही आग्रह करुन करुन गप्प बसलो. तुम्ही निदान अहिराणीवरचे तरी लेख टाका.
↩ प्रतिसाद: इरसाल
प
पिशी अबोली Mon, 04/07/2014 - 09:31 नवीन
+१ खरंच गोड वाटतेय.
↩ प्रतिसाद: यशोधरा
द
दिनेश सायगल Mon, 04/07/2014 - 01:13 नवीन
नुकतेच एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/07/2014 - 08:10 नवीन
एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.
हेच म्हणायला आलो होतो ...
↩ प्रतिसाद: दिनेश सायगल
स
सुहास.. Mon, 04/07/2014 - 08:19 नवीन
हायकोर्टाची भाषा करणारे सभ्य आणि बाकी सगळे असभ्य ?? आणि भाषा सभ्य असली तरी अंतरंग मात्र नादावलेला !! ....तसे असते तर झाडामागं गुलुगुलु बोलणारं जोडप सर्वात सभ्य म्हणावे लागेल.. .... फालतुच्या संकल्पनांना जबरदस्तीने संस्थळावर थोपणवार्‍याना तिच भाषा समजते अस अनुभव आहे ..... आणि दरवेळी असे करणार्‍यांची मस्ती उतरविण्यात येईल याची नोंद घ्यावी .. भाषेबाबत कुणाच्या बापाला भीक न घालणारा
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/07/2014 - 10:28 नवीन
भगवान श्री गौतम बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गात सर्वप्रथम येते ती "अहिंसा" ! वरील प्रतिसादात आपण केलेली वाचिक हिंसा आणि कायिक हिंसा करण्याची दिलेली धमकी पाहुन आपल्या आध्यात्मिक अधःपतना बद्दल खेद वाटला ! भगवान बुध्द आपल्याला सत्यधर्माचा मार्ग दाखवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना :)
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Mon, 04/07/2014 - 15:15 नवीन
बाळ प्रसाद, कुठे अष्टांग मार्ग आणि कुठे अहिंसा .?? .गल्लत झाली की काय ." अहिंसो परमोधर्म " हे जैन धर्मात .... १.सम्यक दृष्टी : आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. किंबहुना गृहस्थी जीवनातील दुःखाचे अस्तित्व आणि ते निवारण करणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांना परम सत्य मानुन त्यावर श्रद्धा ठेवणे यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे या विश्वातील अनंत प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन. वैचारिक अधिष्ठान, अविद्येचा नाश करणे, व्रत वैफल्य यातील फोलपणा समजणे. ईश्वर व आत्मा न मानणे, कोणत्याही चमत्कारांवर विश्वास न ठेवणे, ग्रंथ प्रामाण्य न मानता व्यक्तीचे मन व विचार याचे स्वातंत्र्य राखणे इत्यादी सम्यकदृष्टीची उदाहरणे सांगता येतील... सम्यक दृष्टीचे महत्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात कि, हे विश्व एक अंधारकोठडी आहे व मनुष्य हा तिच्यातील कैदी आहे, ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, अंधार इतका आहे जी, कैद्याला क्वचीतच काही दिसु शकते. कैद्याला आपण कैदी आहे हेही कळत नाही. खुप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असु शकते याबद्दल शंका वाटते. मन हे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळु शकतो, तथापि या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही कि, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतु निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल व शेवटी तो बंधमुक्त होईल. मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्वाला बंधमुक्त करु शकते. सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे..? अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे. अद्भुत कल्पनांचा त्याग करणे, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत. स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. २.सम्यक संकल्प : कोणतीही कृती करण्यापुर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे, ते शुद्ध असावे, ते वाईट विचारांपासुन मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे. उच्चस्तरांवरुन विचार केल्यास आपले मन संवेदनापासुन, विकृत इच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता आळस या सर्वांपासुन मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्तने साध्य होईल. त्याचबरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर मात कर शकतो. प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. व्यक्तीने आपली इच्छा, महत्वकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे. ज्यामुळे आपले तसेच इतरांचेच कल्याण होईल. तसेच शुद्ध ध्येय असावे. आपली महत्वकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी. शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावुनच महत्वकांक्षा बाळगावी यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही. त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते. त्यामुळे कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते. स्वार्थी किंवा दुष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते. मुर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते, जगातील कितीतरी व्यक्तींना स्वःताच्या किंवा इतरांच्या क्रुर महत्वकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात. ३.सम्यक वाचा : सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि, १. माणसाने सत्य तेच बोलावे. २. असत्य बोलु नये ३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये. ४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे. ५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये. ६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत.. ४.सम्यक कर्मांत : सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय. आपली वागणुक सदाचारी असावी. लोभाला बळी पडुन बळजबरी, चोरी किंवा व्यभिचार करु नये. सतत कार्य करावे. कार्य चिकाटीने पुर्णत्वास न्यावे. निरुपयोगी किंवा आळशी नसावे. सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय तो पुर्ण होणार नाही. कोणत्याही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करु नये. आळस किंवा घाई गडबड टाळुन आपल्या प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा किंवा अपयश येणार नाही, हि सम्यक कर्मांताची लक्षणे आहेत. कामवासनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे. त्याने कामांध होऊ नये किंवा व्यभिचार करु नये. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे. ५ सम्यक आजीविका/आहार : प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा. आपल्या धंद्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. वाईट मार्गाने जसे चोऱ्या करुन, युद्ध करुन, दारु किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करुन अनीतीला पोषक होतील अशी साधने बनवुन असा एखादा वाईट धंदा करुन त्यावर उपजीविका करु नये. तसेच आळशी राहु नये, परक्याच्या कष्टावर जगु नये. एकुण सम्यक आजीवीका म्हणजे समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्याद्वारा आपले जीवन जगणे होय. ६.सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे या प्रयत्नांनाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. सतत योग्य प्रयत केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता आहे. ७.सम्यक स्मृती : सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागरुकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय. मनाची शक्ती फार मोठी आहे, आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊ न जाते म्हणुन आपल्या मनात राग, लोभ, द्व्ष, तृष्णा, मत्सर, इ. विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे. ८.सम्यक समाधी : सम्यक समाधी म्हणजे योग्य चिंतन. आर्य अष्टांगिक मार्गातील वरील सात गोष्टींचे आपण अचुक पालन करतो कि नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सम्यक समाधी सांगितली आहे. दुःक, दुःखाचे कारण, दुःखातुन मुक्तता आणि त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी सम्यक समाधी उपयुक्त आहे. अशा एकात्म विचाराने अनेक गुंतागुंतीच्या समस्यांच्या उलगडा होतो. जीवनातील अनेक रहस्य व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद होतो. एकाग्र मनाने केलेले चिंतन म्हणजे सम्यक समाधी होय. (संपादित)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा