Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था

ए
एकुलता एक डॉन
Sat, 04/05/2014 - 23:25
🗣 82 प्रतिसाद
नमस्कार अनॆकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील पण जे २००६ पासून मराठी संकेत स्थळे बघात आलेली लोक आहेत त्यांनाच नक्की पटेल १) मराठी ब्लोगरस कमी झाले २) मराठी ब्लोगरास मिट शेवटची २०११ झाली नंतर बंद ३) बरेच मराठी संकेत स्थळॆ बंद झालीत www.laibhaari.com सर्वात धक्का दायक

प्रतिक्रिया द्या
58623 वाचन

💬 प्रतिसाद (82)
क
कंजूस Sun, 04/06/2014 - 01:07 नवीन
१साठी :स्पष्ट आणि ठाम मते असणारे कमी झाले .इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आणि नातवंडे यांचे कौतुक (=appreciation हो !) वाढले . २ आणि ३ साठी :वरील स्थित्यंतर होत असतानाच २०००साली इंटरनेट स्वस्त होऊ लागले आणि मराठी संकेत स्थळांचा उदय झाला . आणखी काय सांगणार .चित्र स्पष्ट आहे .कागद कोरा होत चालला आहे .
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 04/06/2014 - 01:52 नवीन
फुगा फुटला असे म्हनुया का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
विवेकपटाईत Sun, 04/06/2014 - 05:22 नवीन
मराठी संकेतस्थळ वाचून, मी मराठी लिहायला शिकलो. स्वत:चा मराठी ब्लोग ही बनविला. सुरवातीला ब्लोग वाचणार्यांची संख्या फारच कमी होती. पण गेल्या वर्षी अर्थात २०१३ पासून वाचणार्यांची संख्या वाढली. आज सकाळीच ब्लोगचा इतिहास बघितला.(सकाळची संख्या २०८०० वर होती यात अर्ध्यापेक्षा जास्त गेल्या वर्षातील आहे) तब्बल ५४००च्या जवळपास लोकांनी एक पेक्षा जास्त वेळा ब्लोग बघितला आहे. ३६ देशातील अर्थातच मराठी माणसांनी ब्लोग वाचला आहे त्यात १८% अमेरिकेत राहणारे आहे. असा अनुभव अधिकांश ब्लोग लेखांचा असेल. मी काही चांगला लेखक नाही. मराठी सुद्धा अशुद्ध असते. मराठी वाचकांची संख्या वाढली कि कमी झाली, आपण स्वत: ठरवू शकता. वाचणार्या आणि लिहिणार्यांना अधिक वाचायला मिळत आहे. हे सत्य. बाकी नवी पिढीचे म्हणाल तर त्यात बहुसंख्यक काहीच वाचत नाही. आमच्या कार्यालयात निवृत्त होणार्या शिपायाला ही शेक्स्पेअर माहित होता पण नव्या कर्मचार्यांना माहित नाही. वाचण्याची आणि लिहिण्याची सवय आजची पिढी विसरत चालली आहे. हे जागतिक सत्य आहे.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 04/08/2014 - 07:39 नवीन
हा अनुभव आहे खरा, मी तर नुकताच दोन तीन महिन्यांपूर्वी ब्लॉग बनवला आहे, हेतू एवढाच की माझे लिखाण एका जागी सुरक्षित जमा राहावे, कोणी तिथे येऊन वाचेल असा विचारही केला नव्हता वा अजूनही नाहीच करत. कारण मिसळपाव आणि मायबोली या संकेतस्थळांवर प्रकाशित करतोच, तसेच काही लिखाण फेसबूकवरही टाकतो. मी स्वता माझ्या ब्लॉगला विजिट एखाद्या विकांताला वा एखादा लेख अपडेट करायचा असेल तरच देतो. पण स्टॅट्स रेकॉर्ड पाहिले तर मात्र रोजचा काही आकडा दिसतोच. माझ्यापुरता तरी तो समाधानकारक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ज
जेम्स वांड Sun, 06/16/2019 - 06:07 नवीन
तरण्या पोरांवर बिले फाडणे कधी बंद होईल!? निवृत्तीला आलेल्या चपराश्याला शेक्सपियर माहिती होता, मग?? किती एक्स्ट्रा पगारवाढी मिळाल्या, किंग लियर अन ओथेलो माहिती आहेत म्हणून? नवीन चपराश्याला माहिती नाहीत, किती पगार कपात झाली म्हणायची त्याची ?? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट का साधली जावी? भलते सोस अन अपेक्षा फक्त अपेक्षाभंगच देऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
सुहास.. Sun, 04/06/2014 - 08:02 नवीन
ब्लॉगर्स चा ही कंपु आहे ......मला आश्चर्य वाटते ...शिवाय ही मंडळी अगदी चेपुवर पण त्यांच्या त्यांच्यामध्येच असतात , तु माझी पाठ खाजव , मी तुझी खाजवतो ...मी २००३ पासुन जवळपास ८० % ब्लॉगच वाचायचो, पण बर्‍याच ब्लॉगर्स चा इगो पाहुन थांबविले , इतकेच काय स्वता: चा पण कधी केला नाही ..एक ट्राय केला होता , पण मला तो निव्वळ मुर्खपणा वाटत राहिला .....एक उदाहरण मात्र मला हसवुन गेले , एक सिनीयर काका होते , रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु वर ..हात होडले शेवटी ..........
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Mon, 04/07/2014 - 00:51 नवीन
रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु वर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
त
तुमचा अभिषेक Tue, 04/08/2014 - 07:27 नवीन
म्हणजे रोज किती जणांनी ब्लॉगला विजिट दिली याचा आकडा फेसबुकवर टाकायचे ते कौतुकाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Mon, 04/14/2014 - 13:10 नवीन
खरा कि खोटा ???????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
म
मारकुटे Sun, 04/06/2014 - 09:19 नवीन
मराठी संकेतस्थळांना उर्जितावस्था होतीच केव्हा की आता दैन्यावस्था आली म्हणुन खंत करायची? मुळात मराठी संकेतस्थळांचे सदस्य भले १०-२०-३० हजार असुदे.. सक्रिय सदस्य ३००-४०० च्या वर नाहीत. तीच ती मंडळी. सुरवातील म्हणजे साधारणतः २००० ते २००८ पर्यंत सगळं कसं छान होतं मह्णजे बघा अमेरीकेत नाहीतर पुण्याबंगळूरात नोकरी, छोकरी राजाराणी संसार किंवा यंदा कर्तव्य आहे टैप. २००८ नंतर अनेकांचे संसार कुरबुरी सुरुझाल्या, अनेक घटस्फोत झाले, अनेकांना मुल होत नाही म्हणुन कुरबुरी सुरु झाल्या. एकंदर जीवन बदललं. तेच प्रतिबिंब इथे दिसतं. नवे सदस्य तितक्या प्रमाणात येत नाहीत. नवीन पिढिला मराठी येतच नाही. संकेतस्थळांमधील चर्चा त्याच त्या होत आहेत. एकंदर दैन्यावस्था आहेच.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 04/06/2014 - 09:21 नवीन
>>मराठी ब्लोगरस कमी झाले ब्लोगरस हा कुठला रस?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 04/06/2014 - 10:13 नवीन
  1. आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
  2. मराठी संस्थळे वापरणारे भागिले आंतरजाल वापरणारे मराठी
  3. मराठी संस्थळे वापरणारे यांच्यामध्ये वाचनमात्र : (प्रतिसाद + वाचन) : (लेखन + प्रतिसाद + वाचन) हे गुणोत्तर
माझ्या निरीक्षणाप्रमाणे वरील तिन्ही गोष्टी वाढत आहेत. आज आंजावर मराठीमध्ये ज्या विषयांचं वैविध्य वाचायला मिळतं तसं सुमारे १० वर्षांपूर्वी वाचायला मिळत नसे. एक दोन उदाहरणं घेऊन थेट "दैन्यावस्था" वगैरे टाहो फोडण्यात काहीच अर्थ नाही. "The plural of anecdote is not data"
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/06/2014 - 11:33 नवीन
हातात अगदीच फिल्ड सर्वेक्षणाचे आकडे नसताना बोलणे माझ्याकरता धारीष्ट्याचे होऊ शकते. सध्याच्या अवस्थेच वर्णन करण्यासाठी दैन्यावस्था विशेषण वापरण किती सयूक्तीक याबाबत चर्चा होऊ शकते पण स्थिती खरेच आपण म्हणता तशी आदर्श आहे का या बद्दल मी साशंकीत आहे.
आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
हे गुणोत्तर वाढलं तरी मराठी संकेतस्थळांना त्याचा खरेच किती फायदा पोहोचतो आहे (सहभाग वाढतो आहे) या बद्दल मी साशंकीत आहे. साधारणतः दहावी इयत्तेनंतर इंटरनेट वापरण्याच स्वातंत्र्य अधिक मिळत अस मी गृहीत धरतो वर्षाकाठी १४लाख महाराष्ट्रीय मुल मॅट्रीक करतात त्यातली नव्वदटक्के सोडून देतो दहा टक्के म्हणजे १,४०,००० गेल्या दहावर्षात महाराष्ट्रात इंटरनेटला उर्जीतावस्था आली अस धरल तर १,४०,००० गुणीले १० वर्षे बरोबर १४,००,००० उपयोगकर्त्यांच किमान पोटेंशिअल असू शकल असत दहा मराठी संकेतस्थळांची सदस्य संख्या ४०-४० हजार धरा (ती २०-२५च्या पुढे नसावी) तरी ४लाखाच्या पुढे आकडा जाणार नाही (बहुधा हेही दहापट ओव्हर एस्टीमेशन आहे) तरी सुद्धा किमान दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मराठी संकेतस्थळे कमी पडली. मराठी संकेतस्थळांकडे शक्य असलेला सुशिक्षीत अभिजन वर्ग २००३ मध्येच आला त्यात थोडीफार वाढ झाली असेल नाही असे नाही पण तेही मोठ्या शहरातील मोजकाच. सर्वाधिक ग्रामिण वाचकवर्ग मराठी विकिपीडियावर येतो तेथे घेतलेल्या सर्वे मध्ये तुम्हाला माहित असलेली अथवा वापरलेली ५ मराठी संकेतस्थळे सांगा असा प्रश्न असतो ९८ टक्के लोकांना कोणतेही मराठी संकेतस्थळ ठाऊक नसते एखाद टक्का लोकांना मराठी वृत्तपत्रांची संकेतस्थळे ठाऊक असतात. केवळ मराठी लोकांच्याच अस्थेच्या असलेल्या इंग्रजी विकिपीडियावरील आणि मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळणार्‍या हिट्सची मी बर्‍याचदा तुलना करत असतो. मराठी विषया बद्दल लोकांना आस्था असते म्हणून ते वाचत असतात पण केवळ इंग्रजी मधून . इंग्रजी विकिपीडियाच्या केवळ दहाटक्के हिट्स मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळतात त्याच्या एक टक्का कसा बसा मराठी संकेतस्थळांपर्यंत पोहोचला तरी डोक्यावरून पाणि गेले. मी अशाच लेखांची तुलना सांगतो आहे जे मराठी विकिपीडियावरही बर्‍यापैकी लिहिले आहेत आणि गूगल मधून इंग्रजी अथवा मराठीतून दोन्हीतूनही सर्च दिल्यास टॉप पहिल्या क्रमांकात येतात. मिसळपाव संकेतस्थळाने यावर्षी दिवाळी अंक काढला तरी किमान दोन जुन्या मराठी संकेतस्थळांना दिवाळी अंकांना मिस द्यावालागला असे आठवते. मराठी संकेतस्थळांचा सदस्य संख्या वाढवण्याबाबत केलेले ठळक प्रयत्न म्हणून फारसे काही पुढे उभे टाकते काय ? की मराठी संकेतस्थळे अल्पसंतुष्ट आणि सध्याचा सदस्यवर्ग सदस्य जोडण्याबात प्रयत्न पोटेंषियलच्या दृष्टीने पुरेसे आहेत काय ? माझ्या या प्रतिसादातिल मांडणीला कुणी आकडेवारी सहीत खोडून दिले तर पहिला आनंद मलाच असेल. असो. मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे येथील मराठी संकेतस्थळांची यादी जूनी झाली असून त्यावरून आता बंद पडलेल्या मराठी संकेतस्थळांची आणि नवीन सुरू झालेल्या संकेतस्थळांची माहिती या धागा चर्चेच्या निमीत्ताने मिपाकरांकडून मिळाल्यास आनंद वाटेल. धन्यवाद आणि शुभेच्छा. एनी वे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/06/2014 - 11:59 नवीन
इंटरनेटचा वापर आता ब-यापैकी घरात पोहचला आहे. आता इंटरनेट मराठी माणसाच्या घरात पोहोचलं म्हणजे तो लगेच मराठी संकेतस्थळावर लिहायला तयार झाला असे होत नाही. इंटरनेटचा वापर कशासाठी ? माहितीसाठी, मेल वापरण्यासाठी, ऑफीस कामाचा डाटा इकडून तिकडे देण्यासाठी देवाण-घेवाण,गप्पा किंवा अजून काही असेल ते पण मराठी संकेतस्थळावर नियमित लिहिण्यासाठी-वाचण्यासाठी उपयोग करतात असं नाही. एक तर मराठी लिहिण्याची प्रचंड भीती. कोणतं सॉफ्टवेअर असतं ? कुठे मिळतं ? या आणि नसत्या प्रश्नापेक्षा नको ती झंजट हा निवडलेला सोपा मार्ग. 'रोमन मराठी' लिहायला सांगा किंवा असे एखादे संकेतस्थळ सुरु करा नै संख्या वाढली तर मग बोलू नका. फेस्बूकवर लिहिणा-याचा पाहा कसा आत्मविश्वास वाढलेला दिसतो (तिथे बरा लिहायला-वाचायला वेळ मिळतो) तसं मराठी संकेतस्थळावर लिहिण्याच्या बाबतीत दिसत नाही. ही उदासिनता म्हणा की आळस हा एक भाग दैन्यावस्थेचा वाटतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पैसा Sun, 04/06/2014 - 12:53 नवीन
संस्थळांची दैन्यावस्था की काय ते माहित नाही, पण आणखी एक प्रकार पाहिला आहे. नवीन संस्थळ निघाले की नव्या सदस्यांपर्यंत पोचायचे प्रयत्न फार कमी असतात तर आधीच जे कोणत्या ना कोणत्या संस्थळाचे सदस्य आहेत त्यांच्याशीच संपर्क साधण्याची प्रवृत्ती असते. काही संस्थळे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार नसतात. त्यांना आपल्या हस्तिदंती हुच्चभ्रू मनोर्‍यात रहाणे आवडते. मग भले संस्थळ बंद पडायची वेळ आली तरी चालेल. काळ बदलत आहे. वाचक, त्यांच्या आवडी बदलत आहेत याचा विचार केला आणि वाचकांना आवडेल ते द्यायचा प्रयत्न केला तर संस्थळ वाढू शकते. मिपाला किती हिट्स असतात याचा अंदाज घ्यायचा तर रोज सुमारे ५०/६० जण लॉग इन करत असतील तर त्याच्या १०० पटींनी लॉग इन न करता वाचणारे असावेत. हा माझा अंदाज आहे. तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्यारे१ Sun, 04/06/2014 - 13:21 नवीन
माहितगार ओळखीचे आहेत काय तुमच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 04/06/2014 - 14:33 नवीन
इथे मिपावरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 04/06/2014 - 16:45 नवीन
हम्म्म्म!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
माहितगार Mon, 04/07/2014 - 10:04 नवीन
तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्ययावत होण्याची गरज आहेच, कारण लेखाचे मुख्यत्वे लेखन २०१०च्या आसपास झाले असावे. नरेन्द्र गोळे यांचा "महाजालावरील मराठीचा इतिहास" , मिसळपाव वरील प्रमोद देव आणि विनायक पाचलग यांच्या लेखनाचे संदर्भ मुख्यत्वे त्यासाठी वापरले होते. मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारे लेखन २०१० नंतर झाले असण्याची शक्यता असू शकते असे ज्ञानकोशीय दखल घेण्या जोग्या लेखनाचे या विषयावरील लेखांचे दुवे उपलब्ध झाल्यास लेख पुढे अद्ययावत करणे सोपे जाईल म्हणून असे दुवे उपलब्ध करून साहाय्य करावे असे सर्व मिपा लेखक वाचकांना आवाहन आहे. सोबतच मराठी संकेतस्थळांच्या विकासात (अथवा काही संकेतस्थळे मागे पडण्यात) मराठी संकेतस्थळांवरील वाद विवादांचा कसा प्रभाव पडतो या बद्दल मागे प्रमोद देव यांनी मिसळपाववरच २००७ च्या आसपास लेखन केले होते (त्याची दखल मराठी विकिपीडियातील लेखात घेतली गेली) या विषयावर असेच अजून गेल्या चार-पाच वर्षातील अद्ययावत लेखन झाले असल्यास त्याचेही दुवे दिल्यास ससंदर्भ लेखन करणे सोपे जाईल. (पै तैंनी लक्ष वेधलेल्या मिपा वादविवाद संबंधीत टिका प्रमोद देव यांच्या मिपावरील लेखातून ससंदर्भ आलेली आहे; मी मराठी विकिपीडियातील वाक्यरचनेत अल्पसा बदल आणि वर्तमान काळातील वाक्यरचनेस भूतकाळात बदलले आहे.) मराठी संस्थळांच्या आशय व्यवस्थापन सॉफ्टवेरची तांत्रिक प्रगती या बाबत सुद्धा काही लेखन झाले असल्यास माहिती हवी आहे. बंदपडलेली मराठी संकेतस्थळे असा माहिती पूर्ण परिच्छेद आणि (जमल्यास चालू-बंद या कालानुक्रमे ससंदर्भ उपलब्ध असेल तेथे कारणांसहीत) यादीही प्राधान्याने हवी आहे. संबंधीत इतरही बर्‍याच विषयांवर माहिती हवी आहे. पण त्या बद्दलच्या चर्चांकरता येत्या काळात वेगवेगळे धागे काढेन. पैतैंनी मराठी संकेतस्थळे लेख अद्ययावत करण्या बद्दल यापुर्वीही विनंती केलेली होती आणि ती लक्षात घेऊनच मराठी संकेतस्थळे या विषयावर विवीध धागे काढतो आहे. प्रतिसादातून पाठ पुरावा करण्याबद्दल पैतैंना खूप खूप धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एकुलता एक डॉन Tue, 04/08/2014 - 06:34 नवीन
साहित्य चोरि बद्दल काय मत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Tue, 04/08/2014 - 06:46 नवीन
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे या लेखात ज्ञानकोशीय सुधारणा आवश्यक असल्याचे मी पै तैम्शी मागेच अ‍ॅग्री केले म्हणूनच संदर्भाकरता अधिक दुव्यांची विनंती केली वेगळी धागा मालिका चालू केली. संदर्भ नमुद केला म्हणजे क्रेडीट दिले असे होते आणि प्लॅगरीझम किंवा साहित्य चोरी हा आरोप पुर्णपणे लागू होत नाही. विकिपीडियातील मजकुर लेखनात विशेषणे अलंकारीकता आणि वर्णनात्मकता वगळताना स्वतःच्या शब्दात पुर्नलेखन होतच असते त्यामुळे मजकुराबाबत तो जसाच्या तसा दीर्घकाळ टिकुन रहात नाही. छायाचित्रे अधिक कालजीचा मुद्दा असतो. जनरलायझेशनपेक्षा आपला रोख कोणत्या विशीष्ट मजकुराकडे आहे ते कळवल्यास तपासणे सोपे जाईल. मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Tue, 04/08/2014 - 06:56 नवीन
तसे नाही सहित्य चोरि मुळे तर सन्केत स्थळ बन्द होत नाहिये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 04/09/2014 - 05:43 नवीन
जेव्हा संकेतस्थळे प्रथमच बनत होती तेव्हा कोर्‍या पाटीपासून काम चालू झाले असणे समजण्या सारखे आहे. आजही नवीन विषयाबद्दलचे संस्थळ असेल तर कोर्‍या पाटी पासून काम सुरू करू शकेल. पण एक नवे रेग्युलर संस्थळ, स्पर्धेत येऊन चालू करावयाचे झाल्यास तुमच्या कडे रेडीमेड मजकुरच असून चालणार नाही लेखक वाचकांचा किमान स्वरूपाचा कम्पू जो नवागतांना आकर्षितही करेल आणि सहभागी करून घेऊ शकेल याची गरज पडेल असे वाटते. नवीन संस्थळाने मजकुराचा भाग साहित्यचोरी करुन भरल्यास प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष कारणाने संकेतस्थळ लगेच कोमेजू शकेल असे वाटते. त्याचे कारण म्हणजे गूगल शोध प्रक्रीयेचा अभ्यास केला तर डाटा मिररिंग करणार्‍या/कॉपी करणार्‍या संस्थळांना गूगल शोध पिछाडीला टाकते. त्यामुळे असा प्रयोग कुणी करत असेल तर नुकसानच अधिक होण्याचा संभव असे वाटते. त्यापेक्षा स्वतःचा ओरीजनल मजकुर असलेली स्वतःचा छोटाका होईना जुना कम्पू असलेली संस्थळे विकत घेऊन पुर्नजिवीत करणे हे व्यावसायिक दृष्ट्या अधिक शहाण पणाचे होऊ शकेल किंवा खाली विश्लेषण केली तशी पुढारी सारख्या वृत्तपत्राशी संधान बांधून त्यांचा कंटेट आणि लेखक वाचक मिळवणे किंवा अशी बंद पडणार्‍या संस्थळांना वृत्तपत्र आणि मासिकांनी भांडवली भागिदारी करणे अशा व्यावसायिक पर्यायांचा विचार करावयास हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Wed, 04/09/2014 - 06:34 नवीन
मस्त कल्पना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पैसा Tue, 04/08/2014 - 10:51 नवीन
http://upakram.org/ हे मला वाटतं जुलै २०१३ पासून वाचनमात्र उपलब्ध आहे. तिथे नव्या पोस्टस नाहीत. http://mimarathi.net/ हे मध्यंतरी काही काळ बंद पडले होते. नंतर काही दिवस मराठी फेसबुकप्रमाणे चालू होते. आणि हल्लीच परत द्रुपल आधारित जुन्या स्वरूपात फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
आ
आदूबाळ Mon, 04/07/2014 - 10:37 नवीन
आंजा वापरणारे मराठी लोक ज्या गतीने वाढताहेत त्या गतीने मराठी संस्थळे वापरणारे वाढत नाहीयेत. हा तुमचा मुद्दा पटण्याजोगा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एकुलता एक डॉन Mon, 04/07/2014 - 20:57 नवीन
पण कशामुळे असे होतेय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आशु जोग Sun, 04/06/2014 - 11:36 नवीन
आणि आणि आमच्या मिपाबद्दल काय म्हनने आहे
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 04/07/2014 - 00:47 नवीन
I am writing in English as I anable to write today in Marathi. If I type in Marathi something else is being typed....Anyways the poor state of Marathi sites is just because of those who use these sites as chat room...... Sorry to say that but it is true.....
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 05/22/2016 - 13:57 नवीन
who use these sites as chat room......
या वाक्यात बरेच काही आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
न
नाईकांचा बहिर्जी Sun, 05/22/2016 - 14:05 नवीन
सहमत आहे सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कंजूस Mon, 04/07/2014 - 04:36 नवीन
आता जी काही दोन तीन मराठी संस्थ० चालू आहेत ती पुरेशी आहेत .काही जण तिथे आपल्या लेखाची तोंडओळख देऊन अधिक माझ्या या ब्लॉगवर वाचा असे लिहितात ते मला आवडले .प्रत्येक आवडत्या व्यक्तीचे ब्लॉगवर लक्ष ठेवून वाचणे केवळ अशक्य आहे आणि त्यांच्या लेखनात सातत्य राहात नाही .
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Mon, 04/07/2014 - 04:38 नवीन
आता जी काही दोन तीन मराठी संस्थ० ???????????? माफ करा पण ह्याला कुप मडुक अवस्था असे नाही म्हणता येणार का
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 04/07/2014 - 07:44 नवीन
मराठी संस्थळे ही बरी चाल्लीयेत की. काही नवी येणार, काही जुनी मागे पडणार -बंद होणार हे चक्रनिक्रमेण चालुच राहणार! सदस्य संख्या वाढणे कठीण आहे कारण म्राठी संस्थळांवर प्रमाणभाषेतच लेखन करावे लागते. आणि अश्या भाषेत लेखन करू इच्छिणारी/शकणारी काही मंडळी जालावर फुकट लेखन करायला तयार नाही व उर्वरीत मंडळी मराठीतच लेखनाला तयार नाही ;) नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसते :P
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 04/07/2014 - 10:27 नवीन
नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसते
आँ?? सरसकटियस, दाऊ टू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
बॅटमॅन Mon, 04/07/2014 - 11:01 नवीन
पण आचारविचारात फरक असला तरी चालेल आणि त्याला इतरांनी कै बोलायचं नै अशी इतकी खुल्लमखुल्ला मोकळीक अगोदरच दिलेली असताना वरील वाक्याचे प्रयोजन खरंच कळ्ळे नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अनुप ढेरे Mon, 04/07/2014 - 11:18 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पगला गजोधर Mon, 04/07/2014 - 14:16 नवीन
जसे जगातील अवघड भाषांपैकी ऐक अशी, म्यानड्रीन (चायनीज) भाषा, त्यांनी सिम्पलीफाइड -चायनीज म्हणून आणली, तशीच, आपण सिम्पलीफाइड मराठी, वापरायची ठरवली तर ? कि जिच्यात व्याकरण, ऱ्हस्व, दीर्घ, पहिली / दुसरी वेलांटी वैगरे चा बाऊ नको व ती qwerty वर पटकन टाईप करता येण्याजोगी …. वैगरे वैगरे, ३ री ४ थी ची मुलेही पटकन शिकतील अशी !!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 04/07/2014 - 15:24 नवीन
तुमची ती मुलांसाठी सोप्पी मराठी वगैरे पटत नाही .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/08/2014 - 05:11 नवीन
पेज व्ह्यूज आणि व्हिजीट्स चा अभ्यास करून वेबसाईट्सच रँकींगकरणार्‍यात अलेक्सा डॉट कॉमच रँकींग्स विचार करण्याजोगे असते. रँकींग करण्या करीता त्यांचा स्वतःचा अल्गोरीदम आहे. एखाद्या वेबसाइटच्या एखाद्याच पानाला हिट्स जास्त बाकी साइटला कमी किंवा नाही असे काहीसे होऊ शकते आणि एका पानाच्याही हिट्समुळे रँकींगवर जाऊ शकते तसे होऊ नये याची अलेक्सा डॉट कॉमच अल्गोरीदम काळजी घेत असा त्यांचा दावा असतो. कोणती मराठी संकेतस्थळे पुढे आहेत हे पाहण्यासाठी मी alexa.com/topsites/category/Top/World/Marathi ला अधून मधून (वर्षा दोनवर्षातन) भेट देतो. मागची बरीच वर्षे महाराष्ट्र शासनाच maharashtra.gov.in हे संकेतस्थळ प्रथम क्रमांक राखून होत; याच एक कारण आपण Maharashtra/महाराष्ट्र Marathi/मराठी या दोन शब्दांची गूगल ट्रेंण्ड्स अभ्यासली तर लक्षात येत Maharashtra/महाराष्ट्र आणि Marathi/मराठी रोमन असो वा देवनागरी लिपी Maharashtra/महाराष्ट्र शब्द Marathi/मराठी शब्दा पेक्षा अधिक शोधला जातो. दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासनाचेही कर्मचारीवर्ग यंत्रणा मोठी आहे तेही लोक मोठ्याप्रमाणावर लॉग इन होत असणार; पण महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचारी वर्ग आंतरजालावर असूनही मराठी संस्थळांवर न दिसण्याची कारण शासकीय कार्यालयातील मोठ्या प्रमाणावर नॉन-युनिकोड फॉण्ट्सचा वापर; हि परिस्थिती त्यातील नवीन पिढीकरता बदललेली असणार आहे परंतु त्यांचा ओढा फेसबुक सारख्या वेबसाईट कडे अधिक आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे. पण प्रतिसाद देण्याकरता म्हणून अलेक्सा रँकींग अभ्यासल तेव्हा मराठी संस्थळांमध्ये www.esakal.com ने महाराष्ट्र शासनाच्या संस्थळाला मागे टाकून प्रथम क्रमांक घेतला आहे असे लक्षात आले. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट्चे रँकीग वरून तुलना करणे कठीण असे कारण गूगलवर अमराठी लोक सुद्धा Maharashtra शब्द सर्च करू शकत असतात. पण 'सकाळ'चे तसे नाही sakal/सकाळ हा शब्द मराठी लोकच शोधणार मी चार एक वर्षापुर्वी माहिती घेतली तेव्हा esakalची रोजची हिट्स ५-६लाख रोजच्या घरात होती. मराठी वृत्तपत्रीय संकेतस्थळा मध्ये सुरवाती पासून नवीन तम आंतरजालीय तंत्रज्ञान वापराचा प्रयत्न चालू ठेऊन काळासोबत पाऊल टाकण्याचा इसकाळचा प्रयत्न स्तुत्य म्हणण्या सारखाच होता. विंडॉ ९८च्या युनिकोड उपलब्ध नसलेल्या काळात डायनॅमीक फॉण्ट मध्ये साइट उपलब्ध करणे ते युनिकोड उपलब्ध होताच त्यात बदलणे ते परदेशी स्थित मराठी लोकांकरता पैलतीर सारखी सदरे उपलब्ध करून देणे ते पुणे पश्चिम महाराष्ट्रात सकाळ वृत्तपत्राचा असलेला प्रसार आणि पुढारी सारख पश्चिममहाराष्ट्रातील महत्वाच ऑनलाईन वृत्तपत्र युनिकोडात नसल्यामुळे तो वाचकही इसकाळने सुरवातीच्या काळातच मिळवला असण्याची बर्‍यापैकी शक्यता वर्तवता येते. ऑनलाईन मराठी वाचकांनी महाराष्ट्र टाइम्स च्या ऑनलाईन संकेतस्थळाचा क्रमांक मराठी वृत्तपत्रामंध्ये भलताच घसरवून त्यांना केवळ ऑनलाईन मराठी वृत्तपत्रीय यादीत (topsites/category/Top/World/Marathi/बातम्या) चक्क १५व्या क्रमांकावर नेऊन बसवल्याचे पाहून आश्चर्यच वाटले; म्हणजे अगदी मराठी वेबदुनीया, देशदूत, तरुणभारत, देशोन्नती, केसरी, ऐक्य, मी प्रथमच ऐकतोय(वाचतोय) नांदेडचे सत्यप्रभा डॉट कॉम आणि त्या नंतर महाराष्ट्र टाइम्स म्हणजे एकुण मराठी संस्थळात चक्क ४७व्या क्रमांकावर !! (??) हे असं का ? याच नीटस उत्तर मला माहित नाही कुणी विश्लेषण केल्यास समजून घेणे आवडेल. लोक्सत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीने एकुण मराठी संस्थळांच्या क्रमांकानात तीसरा क्रमांक ( म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट नंतरचा लगेचचा ) पटकवला आहे, म्हणजे मटाच्या गच्छंतीस लोकसत्ताची वाढलेली तौलनीक लोकप्रीयता कारणीभूत असू शकेल ? मराठी ओव्हर ऑल लीस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर लोकमत येत आहे हे समजण्या सारख आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातली या वृत्तपत्राच्या प्रींट आवृत्तीच्या उपलब्धते मुळे एका अर्थाने ते मोठे मराठी वृत्तपत्र आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील पब्लिक मध्ये बर्‍या पैकी वाचकप्रियही आहे. पाचव्या क्रमांकावर google.com/inputtools/try/ मराठीमध्ये लेखन करण्याची सोय येतय आणि हे आजिबात आश्चर्य कारक नाही माझ्या स्वतंत्र ऑनलाईन पहाणीतही गूगलची मराठी टायपींग सुविधा सध्या सर्वात लोकप्रीय आहे आणि त्याला अलेक्साच्या रँकींगची पुस्ती पाहून दुजोराच मिळाला.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/08/2014 - 07:01 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद. इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात. खरे तर गमभन सुद्धा खूप सोपे आहे. पण नेमका काय प्रॉब्लेम होत असावा काय माहित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एकुलता एक डॉन Tue, 04/08/2014 - 07:05 नवीन
मला पन त्रास होतोय तुम्हि ब्रोव्सेर कोन्त वपरत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 04/08/2014 - 07:19 नवीन
आणखी बर्‍याच जणांना येतो आहे. मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Tue, 04/08/2014 - 07:32 नवीन
बॅकस्पेस ,मला पन तोच त्रास होतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 04/08/2014 - 07:42 नवीन
मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे. हा नक्कीच त्रासदायक प्रकार आहे. इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस / डिलीट ने हा प्रकार होताना दिसत नाही. अजून एक म्हणजे "ऑटो स्पेलचेक" अंतर्भूत (इनबिल्ट) असले तर शुद्ध मराठी लिहायला बरेच सुलभ होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
ब़जरबट्टू Tue, 04/08/2014 - 07:37 नवीन
अहो, कसे सोपे आहे ? काही तांत्रीक चुका होतात, जसे चुकिचे लिहिल्यास मिट्वायला गेले, तर सर्व वाक्य खराब होते, म्हणजे अक्षरे एक दुस-यात घुसतात.. आता तुम्ही म्हणता एकदा क्लिक करा, पण त्याने लिंक तुटते, त्याचे काय.. गुगल सर्वात मस्त.. :)) माफ करा.. मराठी प्रेमी.. बजरु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एकुलता एक डॉन Tue, 04/08/2014 - 07:49 नवीन
त्यावर मि उपाय शोध्लाय स्पेस बर्याच वेळा दाबाय्चे वाक्य तुटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
त
तुमचा अभिषेक Tue, 04/08/2014 - 08:21 नवीन
बॅकस्पेस दाबायच्या आधी एकदा स्पेस दाबून मग दोनदा बॅकस्पेसने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
म
माहितगार Tue, 04/08/2014 - 08:17 नवीन
इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात.
माझ्याकडील (सर्वेक्षण) आकडेवारीत संस्थळानुसार फरक पडतो पण तरी सुद्धा ४० % ते ६० % लोक ज्या संकेतस्थळावर जी प्रणाली आहे त्या प्रणालीशी जुळवून घेतात तर उर्वरीत २४ ते ४४ टक्के लोक कॉपीपेस्टींगचा मार्ग वापरत असावेत असा अंदाज आहे. (मराठी विकिपीडियावर rry टाईप केल्यास र्‍य येतो मिसळपाववर Ry टाईप केल्यावर र्‍य येतो अशा छोट्या छोट्या फरकांबद्दल ही मंडळी अल्प ते बर्‍या पैकी फसी असू शकतात. उर्वरीत मधील ६ टक्के लोक विंडोज आयएमइ अथवा इनस्क्रीप्ट वापरतात त्यांना कोणत्याही संस्थळावर सहज वावरता येते. साधारणतः किमान १० टक्के लोक या पैकी कोणतीही पद्धत वापरण्यात हमखास अयश्स्वी होतात कारण जेव्हा मराठी टायपींग येणारा माणूस उपलब्ध असतो तेव्हा रस दाखवत नाहीत गरज पडते तेव्हा स्वतःचे स्वतः शिकताही येत नाही. आणि मराठी टायपींग येणारा माणूस पुन्हा उपलब्धही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
ब़जरबट्टू Tue, 04/08/2014 - 08:52 नवीन
अगदी असाच त्रास होतो.. काही नेहमी वापरणा-या शब्दाबद्दल घोळ होतो... याबद्द्ल मिपावर गमभन वापरायची बाराखडी दिली आहे का ? नसल्यास नक्की द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा