Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था

ए
एकुलता एक डॉन यांनी
Sat, 04/05/2014 - 23:25  ·  लेख
लेख
नमस्कार अनॆकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील पण जे २००६ पासून मराठी संकेत स्थळे बघात आलेली लोक आहेत त्यांनाच नक्की पटेल १) मराठी ब्लोगरस कमी झाले २) मराठी ब्लोगरास मिट शेवटची २०११ झाली नंतर बंद ३) बरेच मराठी संकेत स्थळॆ बंद झालीत www.laibhaari.com सर्वात धक्का दायक

प्रतिक्रिया द्या
58623 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

श
शशिकांत ओक गुरुवार, 04/10/2014 - 18:45 नवीन
मराठी ईबुक व अन्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एकुलता एक डॉन Tue, 04/08/2014 - 06:33 नवीन
एक सेनिओर काका आप्ल्य ब्लोग चे दर्रोज चे खोटे विझिट्स दाखव्त्तात असे पन लक्शात आले आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/08/2014 - 08:45 नवीन
सहाव्या क्रमांकावर मायबोली डॉट कॉम येत. मराठी संस्थळांमधला दुसर्‍या मुख्य व्यासपिठाचा मान नक्कीच मिसळपाव डॉट कॉम कडे जातो पण एकुण मराठी संस्थळांच्या रँकींग मध्ये मिसळपाव आहे चक्क १५ व्या क्रमांकावर या दोन मधील फरकाच विश्लेषण करण्यापुर्वी ७ ते १४ क्रमांकावरील संस्थळांबाबत माहिती घेणे उद्बोधक होईल. अलेक्सा डॉटकॉमची आकडेवारी मागच्या तीन महिन्यांच्या अ‍ॅव्हरेजवर आधारीत सतत बदलती असते मराठी विकिपीडियाला कधी ७ कधी ६ कधी ५ तर या वेळी तो ८ व्या क्रमांकावर मागे गेला आहे. विकिपीडियाची आकडेवारी अभ्यासताना गेल्या वर्षातील गूगल सर्चच्या एका सुविधेने मोठा फरक केला गूगल सर्च अधिक इंटेलिजन्ट झाला आहे सर्च दिल्यावर केवळ विकिपीडीया किंवा इतर संकेतस्थळांचा दुवाच देत नाही तर त्यातील नेमकी मुद्देसूद माहिती तुम्हाला देतो त्यामुळे माहिती विकिपीडियामधली जरी असली तरी ती घेण्यासाठी प्रत्यक्ष विकिपीडियावर जावेच लागेल असे होत नाही त्रोटक माहिती पुरेशी असेल तर लोक गूगलवरच वाचून तिथेच थांबतात किंवा इतरत्र जातात म्हणजे माहिती तर विकिपीडियातली पण अद्ययावत करण्याकरता पुरेसे लोक पोहोचत नाहीत याचा नाही म्हटले तरी विकिपीडियांना फटका बसला. मराठी लोक शोध कामात बर्‍यापैकी इंग्रजी वापरतात. त्या मानाने हिंदी लोकांचा इंग्रजीचा वापर कमी असून हिंदीचा अधिक आहे आणि त्यांची सापेक्ष आंतरजाल साक्षरता पुर्वी मराठी पेक्षा कमी होती पण गेल्या एक-दोनवर्षात वेगाने वाढली त्यामुळे हिंदी विकिपीडियाची स्थिती मात्र वेगाने सुधारते आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/08/2014 - 09:22 नवीन
६व्या क्रमांकावरील मायबोली पाठोपाठ ७ व्या क्रमांकावर येत पुढारी डॉटकॉम या पश्चिममहाराष्ट्र पट्ट्यातील वृत्तपत्रीय संकेतस्थळाने अनपेक्षीत प्रगती साधलेली दिसते याचे कारण की संकेतस्थळ वृत्तपत्राची इआवृत्ती उपलब्ध करते पण युनिकोडात नाही त्यामुळे इतर मराठी शब्दावरील गूगल सर्च चा इसकाळ आणि लोकसत्ता लोकमत यांना जसा फायदा होतो तसा पुढारी ऑनलाईन आवृत्तीस होत नाही (शिवाय इतर संकेतस्थळांवरून विशीष्ट लेखाला दुवा दिला जाणे कमी संभवते) म्हणजे केवळ Pudhari शब्दाचे सर्चवर ७वा क्रमांक पटकावणे पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेली आंतरजाल साक्षरता आणि Pudhari कस्टमर लॉयल्टी दाखवते. Pudhari युनिकोडात असते तर किमान लोकमतच्या ऑनलाईन आवृत्ती बरोबरचा नंबर मिळाला असता. १३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाही (जाणकारांनी प्रकाश टाकावा पण एकुण मराठी संस्थळांची दैन्यावस्था हा या धाग्याच्या विषयाला अनुसरून स्थिती आहे असे दिसते १२ व्या क्रमांकावरील marathi.webdunia.com आणि १० व्याक्रमांकावरील मराठी बातम्या हुशारीने मराठी कंटेंट भरून हिट्स मिळवतात असे वाटते. तरी सुद्धा महत्वाचे त्या खालील रँकींग असलेल्यांना या विशेष कंटेंट नसलेल्या संस्थळांना मात देता येत नाही म्हणजे मधला गॅप खूप मोठा आहे हे दर्शवते का? सामना वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीचा कंटेंट मर्यादीतच असतो तरीपण ९वा क्रमांक मिळवणे वाचकांची लॉयल्टी सोबतच ११ क्रमांकावर असलेले प्रहार वृत्तपत्र आणि ३ र्‍या क्रमांकावरील लोकसत्ता वाचकांना रोख ठोक लिहिलेले वाचावयास आवडते हे दर्शवते का ? यात इसकाळचा वाचक नॉन रेसिडेंट मराठी शहरी निमशहरी ते ग्रामीण असा वाटलेला असावा. लोकसत्ता आणि प्रहारचा वाचक मुख्यत्वे शहरी, लोकमत नीमशहरी, तर पुढारीचा ग्रामीण साक्षर असेल का ? या बद्दल इतरांची मते जाणून घेण्यास आवडतील. मायबोली मुख्यत्वे अभिजन सुशिक्षीत एन आर एम आणि शहरी वाचकांवर चालत असावे. वर ऋषिकेष म्हणतात तसे लिहिणार्‍याचे शुद्ध लेखन तपासत बसले आणि अजून एक दोन क्रायटेरीआ लावले की इतर वर्ग आपोआपच गळत असेल का ? अशी शंका येण्याचे कारण मिसळपाव हे संकेतस्थळाचा वाचकवर्ग मोठा असल्या मुळे चर्चा संकेतस्थाळत मायबोली पाठोपाठ क्रमांक असूनही १५ क्रमांका पर्यंत मागे आहे कारण वाचक एकदाच येतो वाचतो आणि लेखक बनत नसल्याने पुन्हा पुन्हा येण्याचे प्रमाण कमी होते याचे कारण ऋषिकेष यांच्या विश्लेषणात असण्याची शक्यता आहे का ? की इतर काही कारणे असू शकतील ?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 04/08/2014 - 10:43 नवीन
१३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाही
आपलीमराठी हे मराठी सिनेमा-नाटकांच्या लिंका गोळा करायचे स्थळ आहे. तिथे एक मराठी इंटरनेट रेडिओ सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित भरपूर हिट्स असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पैसा Tue, 04/08/2014 - 10:46 नवीन
ब्लँक पेज येतंय माझ्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ए
एकुलता एक डॉन Tue, 04/08/2014 - 10:48 नवीन
आम्हि मराठी नावाच ब्लोग पन बन्द आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/08/2014 - 15:36 नवीन
इसकाळ, मायबोली आणि मिसळपाव यांचे अलेक्सा विश्लेषण जर आणखी थोडे बारकाईने पाहीले तर मायबोलीचे सिंगल पेज व्ह्यूची टक्केवारी अवघी १२ टक्के इसकाळची २२ टक्के मिसळपावची ३३ टक्के आहे म्हणजे एवढे वाचक एका पेज व्ह्यू नंतर निघून जातात याचाच अर्थ मायबोलीचे वाचक रिटेंशन सरासरी चांगले आहे एवढेच नाही तर मायबोलीचे पर व्हिजीटर एकुण पेजव्ह्यूजचे परसेंटेज बाकी दोघा पेक्षा चांगले आहेच, शिवाय मायबोलीवर व्हीजीटर ने घालवलेला वेळ सुद्धा इतर दोघांपेक्षा अधिक म्हणजे अ‍ॅव्हरेज ३० मिनीटे आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 04/08/2014 - 16:59 नवीन
अलेक्सा विश्लेषणातून मायबोलीच्या आणि मिसळपावच्या वाचकांच्या कंट्री प्रोफाईल मधील फरकही ढळढळीत पणे समोर येतो. मायबोलीचे ५५% वाचक भारतातून तर ४० टक्के युएसए मधूनच आहेत एवढेच नाही तर मिसळपावच संपुर्ण भारतातील वाचन संख्या लक्षात घेता कंट्री रँकींग ४२७४८ आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ हे रँकींग आहे मायबोलीच पुर्न भारतातल रँकींग आहे ११४६६ आणि मायबोलीची jahirati.maayboli.com मराठी विभागात १६व्या क्रमांकावर स्वतंत्र रँकींग दाखवते, मायबोलीने संपादीत केलेल एक चांगल यश, नाही का ! United Arab Emirates च्या वाचकात मात्र मायबोली पेक्षा मिसळपावचा शेअर चांगला वधारलेला आहे. मिसळपावचे ६४ टक्के वाचक भारतातन तर १५ टक्क्याच्या आसपास युएईतन येतात एवढच नाही तर युएईतील वाचकांच्या कंट्री रँकींग मध्ये मिसळपाव 6,546 रँक मिळवते मायबोली 7,440 वा रँक मिळवते. तसा मी दोन्ही साइटचा नियमीत वाचक नाही त्यामुळे या फरकाच गुपित मिपाकरच उत्तमपणे सांगू शकतील आणि ते समजून घेणे निश्चित आवडेल. इसकाळचा युएसए मधला कंट्री रँक 105,957 एवढा आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ रँक आहे म्हणजे युएसएतल एन आर एम (नॉन रेसिडन्ट मराठी) माणसांचा शेअर मुख्यत्वे मायबोलीकडे आहे. या अर्थाने मायबोली अभिजनांना रिप्रेझेंट करत असण्याची शक्यता अधिक आहे त्यांचा वाचक हा आर्थीक आणि (मराठी/इंग्रजी दोन्ही) वाचनस्रोतांनी अधिक समृद्ध असल्यामुळे अधिक लिहिता आहे. अधिक लिहितो म्हणून लेखन आणि वाचन कालावधी सुद्धा अधिक नोंदवतो. उलटपक्षी मिसळपावचा अभिजन लेखक वाचक सुद्धा साधारणतः अधिक स्वांतत्र्य हव असलेला अभिजनेतरांशी कंपॅरेटीव्हली अधिक बरे जुळवून घेणारा असल्यामुळे आंतरजालावरील नीमशहरी वाचक मिसळपावकडे येतो पण पुस्तकवाचनात खासकरून इंग्रजी वाचनात आणि स्रोतातील उअपलब्धतेते मागे असल्यामुळे तो लिहितो कमी 'पैसांनी' मिपावरील लेखक आणि वाचक या संख्येतील तफावतीची शक्यता वर्तवली त्याचे गमक यात असेल का ? मिपाचा वाचक मुख्यत्वे मराठी भाषेतून वाचत असल्यामुळे या दृष्टीने मराठीतील माहिती साठा वाढवण्यासाठी मिपाकरांनी अधिक पुढाकार घ्यावा असे मला वाटते पण या बाबतीतील धाग्या बाबत मिपाकरांकडून पुरेसा उत्साही प्रतिसाद का मिळाला नव्हता अथवा टायपिंग कॉंपीटीशन वगैरे गोष्टींची चर्चा मुद्दाम मिपावर येऊन केली पण मिपाकर यात मागे का, या बाबत अद्यापतरी मी अनभिज्ञ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पैसा Tue, 04/08/2014 - 17:25 नवीन
चांगलं विश्लेषण केलंत. मी मायबोलीवर सुद्धा सदस्य आहे. अगदी रेग्युलर नसले तरी अधून मधून वाचते. आणि लिहितेसुद्धा. सर्वात आधी सुरू झालेली असल्याने मायबोलीला जास्त वाचक बेस मिळतो हे एक कारण असावं. शिवाय तिथे सक्रीय भाग घेणारे बरेचजण अमेरिकेतले आहेत हे ऐकलं आहे. तेव्हा तुम्ही म्हणता तसे अभिजन जास्त प्रमाणात तिकडे वळले असावेत हे शक्य आहेच. मिसळपाव सदस्य नसताना केवळ वाचणारे अनेकजण आहेत. भेटले की हमखास सांगतात. मात्र त्या तुलनेत लिहिणारे नेमके किती प्रमाणात आहेत हे नीलकांतच सांगू शकेल. कदाचित जरा लहान शहरातील वाचकवर्ग मिसळपावकडे जास्त प्रमाणात वळत असावा. काहीजणांना लिहायचा संकोच वाटतो, थट्टा होईल याचे भीती वाटते त्यामुळेही लोक जरा भितात हे खरं आहे. तेही अनेकदा अनेकजणांकडून ऐकले आहे. मराठीत माहिती साठा वाढवण्यासाठी मिसळपाववरून जास्त लोक जास्त काम करू शकतील, मात्र बरेचजण यासाठी वेळ नाही हे कारण देतात. शिवाय अनेकजणांच्या ऑफिसातून मिसळपाव ब्लॉक आहे असेही ऐकले आहे. ते मग मोबाईलवरून जमेल तेवढे वाचतात. जास्त लिहू शकत नाहीत. या साईट ब्लॉक असण्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. नेमके काय कारण असावे हे कोणी तज्ञ सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
जव्हेरगंज Fri, 05/20/2016 - 20:42 नवीन
सकस चर्चा होणारे असे चांगले धागे वारंवार येवोत !!!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 05/21/2016 - 07:25 नवीन
माझे म्हणाल तर मी ब्लॉग वर, मिसळपाव, ऐसी अक्षरे कधी कधी ग्लोबल मराठी आणि मराठी सृष्टीवर. एकाहून अधिक संकेतस्थळांवर लेख टाकल्याने चोरी होण्याची शक्यता कमी. सुरवातीचं सन १३-१४ पर्यंत १०-१५ लेख दुसर्यांनी स्वत:च्या नावाने खपविले होते. त्याचा मला मानसिक त्रास हि झाला होता. पण मी सर्वाना जाब विचारला. अर्थात त्या बाबतीत आमच्या चिरंजीवानी नेट सर्वांची ईमेल शोधली आणि त्यांना जाब विचारला. त्यात मराठी अड्डात लिहिणारा एक लेखक होता. बहुतेक उचाल्गिरी करणार्यांनी लिहिणे सोडून दिले. तरीही मराठीत हिंदी पेक्षा तरी जास्त लोक वाचतात. त्यात अमेरिकेत राहणारे मराठी लोक जास्त मराठी वाचतात. माझा अनुभव आता ब्लॉग वरून आंकडे पहिले १५७००० पैकी वाचणारे बहुतेक विदेशांत राहणारे मराठी भाषिक आहेत. आहे. EntryPagvbiews United States 58925 India 49196 Ukraine 11293 Spain 7501 Russia 7278 Taiwan 7120 Germany 3920 France 2132 Netherlands 688 United Kingdom 478. गेल्या वर्षापासून एक निश्चित आकड्याच्या वर वाचणार्यांची संख्या जात नाही आहे. अर्थात मी काही चांगली मराठी लिहित नाही. पण चांगल्या लिहिणार्यांची वाचक संख्या निश्चित जास्त असेल.
  • Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी Sun, 05/22/2016 - 11:04 नवीन
कंपुबाजीने भल्या भल्या अन चांगल्या साईट बर्बाद केल्या , दुर्दैवाने इथे सुद्धा ते (कंपुबाजी वगैरे) प्रकर्षाने जाणवले.असो
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 05/22/2016 - 12:50 नवीन
इकडे असेल कंपूबाजी पण बरबादी होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
न
नाईकांचा बहिर्जी Sun, 05/22/2016 - 13:36 नवीन
न होवो हीच आमचीही सदिच्छा! पण कंपुगिरी अन त्यातले छपरी कंपु मेंबर कायम डोक्यात जातात, नवे सदस्य आले की अंगात हिव भरल्यागत काहिबाही करून त्यांची रेवड़ी उडवणे, खरड़फळा टाइप पब्लिक ब्रॉडकास्ट सिस्टम स्वतःच्या वैयक्तिक पेज थ्री सारखे वापरणे ह्याने नव्या मेंबर्स चा ओघ आटु शकतो असे वाटते. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
म
मित्रहो Sun, 05/22/2016 - 12:54 नवीन
क्रमांक आता मायबोली पेक्षा वर आहे. आंतरजाळावर मराठी लिहीआणि वाचवाचनारे वाढत आहेत आणि वाढतच जातील. मोबाइलचा वापर हे पण एक कारण आहे. मराठी ब्लॉगला मात्र मर्यादित यश मिळेल असेच वाटते. तुमच्या लेखांचा संग्रह. मी तरी तसाच बघतो.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Fri, 03/03/2017 - 14:19 नवीन
इंटरनेट वाढले पण मराठी संकेतस्थळे नाही वाढलेत
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 03/03/2017 - 14:44 नवीन
का बात कर रहे हो आन्ना... मराठीपिझ्झा, पहावे मनाचे, बोभाटा अशा अनेक सायटी उदयाला आल्यात की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Fri, 03/03/2017 - 14:46 नवीन
पिझ्झा बघतली ,पण ते बहुतेक कॉपी पेस्ट आहे बाकी साईट्स ची लिंक प्ल्झ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ए
एकुलता एक डॉन Wed, 06/05/2019 - 11:45 नवीन
जुना धागा
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 06/12/2019 - 07:39 नवीन
मिपा ची पण तशीच अवस्था होइल.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 06/12/2019 - 10:54 नवीन
अकु कोण ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 06/14/2019 - 11:02 नवीन
भारतीय माणूस खूप संकुचित आहे . कोणत्या हि भारतीय भाषेतील स्थळा वर असणारे सर्व सभासद स्वतः ल वेगळे समजतात . कोणत्या हि विषयाकडे तथस्त पने ते बघत नाहीत तर चष्म्यातून बघतात चष्मा धर्माचा असतो ,जातीचा असतो,शहरी पणाच असतो ,शिक्षणाचा असतो , भाषेचा असतो . त्या मुळे चर्चा होवून त्यात मत मांडणाऱ्या सर्व लोकांनाच मान राखला जात नाही . तेच युरोपियन भाषेत आणि यरोपियन लोकात खूप मस्त चर्चा होते . भारतीय लोकांनी ब्रॉड minded झाले पाहिजे . फक्त कपडे वापरून आणि पिझ्झा खावून शहाणपण येत नाही
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 06/16/2019 - 08:01 नवीन
लोकांमधे मुक्त संवाद असावा, थोडी गंम्मत, थोडे विवाद.... आणि अजून बरेच काही इथं असावे असे वाटते. नवं लेखकांनी जुने लिखाण वाचावे त्यामुळे मिपावर आपल्या आधीपासून लोकं का नांदत आहेत हे समजायला मदत होईलच पण सोबतीला संस्थळ(सभासद न्हवे) तुमच्याकडून काय अपेक्षेने पहात आहे हे समजायला सुद्धा मदत होईल. सर्व्हयवल ऑफ फिटेस्ट हा निसर्ग नियम आहे, त्यानुसार नवीन सभासदांकडून अजून चांगल्या लिखाणाची अपेक्षा असणे व अपेक्षाभंगाने नियमीत सदस्यांचा हिरमोड होणे नक्कीच गैरवाजवी नाही. म्हणून अशा सभासदांनी जुन्या लोकांकडून होणाऱ्या टीकेला अथवा दर्जा खालावतो आहे वगैरे भडिमाराला अतिशय सकारात्मकच घेणे आवश्यक आहे.... पण सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट हा थोडा भ्रामक नियम आहे व निसर्ग सांगतो की जे बलवान असतात ते टिकतात असे न्हवे, तर जे बदलाशी जुळवून घेतात तेच टिकतात म्हणून जुन्या सदस्यांनी सुद्धा मिपाशी जुळण्याचा यत्न करणाऱ्या नव्या टग्यानां थोडे सांभाळून समज देणे अपेक्षित आहे. अर्थात ते सुद्धा मिसळीचा तडका राखूनच :) कारण हे मिपा आहे.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 05/23/2023 - 07:41 नवीन
आज. आठवण. झाली
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/23/2023 - 10:32 नवीन
मनोगतवर अलीकडील लेखन हे दोन आठवडे एक दिवसापूर्वी इतके जुने आहे.( हे सर्वात नवीन लेखन होते) त्याखालोखाल दोन आठवडे चार दिवस आणि तिसर्‍या क्रमांकाचे नवे लेखन एक महिना तीन आठवड्यांपूर्वी चे आहे. तेथे कोण लिहीते हे माहीत नाही
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/23/2023 - 15:16 नवीन
पाच दहा लेखक लिहितात. प्रतिसाद असे नसतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विवेकपटाईत Tue, 05/23/2023 - 11:08 नवीन
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही, रस्त्यावर मिळणारे काही English पुस्तक सोडले तर. दिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तके दिसत नाही. साहित्य विकत घेणारे फारच कमी असतात. प्रेमचंद कालिदास ही नावे ही पुस्तक मेळाव्यात आलेल्या लोकांना माहीत नव्हती.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/23/2023 - 14:57 नवीन
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही,
अगदी सहमत. ही पिढी व्हिडिओज आणि रील्स वाली आहे, इन्स्टा वाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
च
चित्रगुप्त Fri, 06/02/2023 - 23:06 नवीन
३० वर्षांखालीलच काय, वरिष्ठ पिढीचे लोकही वाचत नाहीसे झालेले असण्याची खूप शक्यता आहे. मी स्वतःचेच उदाहरण देतो. सध्या माझे वय ७१ आहे. अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. पुढे तारुण्यात अगदी बस-ट्रेन प्रवासातच काय, सायकल चालवताना सुद्धा एका हातात पुस्तक धरून वाचायचो. ऑफिसात बराच वेळ मोकळा असायचा, तो सगळा वाचन-लेखन यात घालवायचो. पुढे पन्नाशी-साठीत रोज रात्री अडीच-तीनला जाग यायची, तेंव्हा तास-दोन तास वाचन करायचो. दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा तर असायचेच. पुढे यूट्यूब, मिपा वगैरे सुरु झाल्यवर प्रत्यक्ष पुस्तके वाचणे कमी होऊ लागले ( मी पूर्ण जन्मात वर्तमानपत्र अगदी क्वचितच वाचले असेल, फार तर एक-दोन वर्षे ) लॅपटॉप, मोबाईल वापरामुळे डोळे बिघडू लागले, वाचायला त्रास होऊ लागला, आणि खरेतर लॅपटॉप, मोबाईलचा उपयोग कमी करायला हवा हे माहित असूनही पुस्तके वाचणेच जवळजवळ बंद झालेले आहे. आता बोला. मनोंचे पानिपतवरील पुस्तक वाचायचेच, असे ठरवले आहे. इतर काही अलिकडे वाचलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विजुभाऊ Tue, 05/23/2023 - 20:17 नवीन
३० वर्षाखालील पिढी जरा जास्तच फोकस्ड आहे. त्यांना त्यांच्या विषयातील बहुतेक माहिती असते. यू ट्यूब आणि विकी मुळे बराच फरक पडला आहे. बाकी ललीत लेखन वाचन मात्र फारच कमी झाले आहे हे नक्की
  • Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार Fri, 05/26/2023 - 06:54 नवीन
मी सहमत आहे, स्पेशालिस्ट पिढी आहे ही. अगदी मिलेनियल पिढी पर्यंत तीच जनरलिस्ट असे. हा सूक्ष्म फरक आता मोठा झालाय इतके नोंदवून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा