भटकंती

सकुरा अर्थात जपानचा चेरी ब्लॉसम

Primary tabs

जपान मधले एक मुख्य आकर्षण म्हणजे हनामी. हना म्हणजे फूल आणि हनामी म्हणजे शब्दश: फूल पाहणे. साधरणपणे वसंत ॠतु (स्प्रिंग) च्या सुरुवातीला जेव्हा बर्फ पडायचा बंद होतो आणि चेरीची झाडे नव्याने बहरायला सज्ज होतात, या झाडांना असंख्य फुले येतात. हि फुले फक्त १० ते १५ दिवसच राहतात त्यामुळे याला आणखीनच महत्व प्राप्त होते. यांनाच ईकडे सकुरा म्हणतात. जपान मधे मुळातच बागकाम आणि आकर्षक झाडे यांना महत्व दिले जाते. त्यामुळे फार पुर्वीपासुनच हि झाडे विहंगम दिसावीत अशी मुद्दाम लावण्यात आली आहेत.
हनामी च्या काळात जपानी लोक सकाळीच अशा ठिकाणी खाण्यापिण्याचे सामान घेऊन एकत्र जमतात (चटया टाकून जागा पण पकडतात :) ) आणि दिवसभर हि झाडे पहात खाणे-पिणे गप्पा चालू असतात. फार आधिच्या काळी फक्त उच्च वर्गाला याची परवानगी होती परंतु नंतर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याची परवानगी मिळाली.
सध्या जपान मधे याचा काळ चालू आहे जो आणखिन काही दिवस चालेल. २-४ दिवस पाऊस असून सुद्धा आम्ही हनामी साठी युएनो उद्यानात जाण्याचे ठरवले जी यासाठी बरीच प्रसिद्ध जागा आहे. युएनो हा टोक्यो मधला फार जुना व मोठा भाग आहे जिथे सध्या उद्यान, प्रचंड प्राणिसंग्रहालय आणि टोक्यो राष्ट्रीय संग्रहालय आहे. तर आम्ही युएनो मेट्रो स्टेशन वर पोहोचून बाहेर आलो. युएनो उद्यान स्टेशनच्या समोरच होते परंतु आज नेहमीपेक्षा फारच जास्त गर्दि होती सकुरा पाहण्यासाठी.

१. युएनो स्टेशनच्या बाहेर सकुरा साठी झालेली गर्दि
station

२. इकडे एक जुनी शिंटो श्राईन पण आहे
shrine

३. श्राईन चा मागचा भाग
shrine

४. श्राईन बाहेरची थोडीशी वेगळ्या पद्धतीने वाजवायची घंटा
shrine

५. हनामी साठी जमलेले जपानी लोक
japani people

६. फिकट गुलाबी रंगाचे चेरी ब्लॉसम
cherry

७. चेरी ब्लॉसम
blossom

८. जपानमधे दारू पिण्यावर फार बंधन नसल्यामुळे पेताड्यांची सुद्धा गर्दि असते
petade

९. चेरी ब्लॉसम
cherry

१०. पांढरी फुले :)
white flower

११. सकुरा डोरी अर्थात सकुरा चा रस्ता
sakura dori

१२. असाच एक काढलेला फोटो
another one

१३. असाच काढलेला आणखिन एक फोटो :)
another one

दिपक.कुवेत

अप्रतिम आलेत. हा मौसम अनुभवायसाठि एकदा जपानला जायला निश्चितच आवडेल. फोटो अजुन असल्यास नक्कि टाका.

मितान

७वा ९वा नि १२वा फोटो खूप सुंदर !
बाकी लेख जरा थोडक्यातच आटपलाय असं वाटतंय. लिहा की ऐसपैस !

जातवेद

हा आणखिन भर घालता आली असती. पण १ फोटो = १००० शब्द या हिशेबाने १३००० चं लिहिलय *wink*

sanjivanik१

निसर्गाने खरच खूप सुंदर किमया या सकुरा च्या माध्यमातून दाखवली आहे. तुमची माहिती आणि छायाचित्रण पण अप्रतिम ….

पिशी अबोली

खूप छान. फुले पाहणे साजरे करायचे ही संकल्पनाच खूप सुंदर आहे. :)

इरसाल

फुले पाहणे साजरे करायचे ही संकल्पनाच खूप सुंदर आहे.
पण आम्हाला नाही ना साजरी करता येत. दरवेळेस बायको असते ना बरोबर ;)

प्यारे१

मग फुलपाखरं बघा किंवा सौंना वेगवेगळी अशी का ब्वा ही फुलं असे प्रश्न विचारावेत.
संदर्भासाठी पेठकर काकांचे युरोपांश घ्या. ;)

इरसाल

अहो वयाचा काही फायदा घेवु द्याल की नाही.
(याचा अर्थ पेठकर काका वयोवृद्ध झाले असा होत नाही, उलट त्यांची तडफ तरुणांना लाजवेल अशी आहे.)

बॅटमॅन

लेख अन फटू दोन्ही मस्त. 'पेताड' हा शब्द बाकी हळवा करून गेला.

(पेताड ग्यांगांच्या संपर्कात आलेला) बॅटमॅन.

जातवेद

खास सांगली-मिरजेकडचा शब्द आहे हा :)

साकुरा आणि साके... वा वा एकदा तरी हा सोहळा अनुभवायला पाहिजेच !

लेख आणि फोटो एक लंबर !

पिंगू

वाह. सोत्रींच्या सकुराच्या लेखाची आठवण झाली..

रामदास

"या नव नवल नयनोत्सवा " अशी आहेत.
अवांतर : सकुरा फिल्म कंपनीचे नाव कोनीका झाले तेव्हा एक जाहीरात यायची त्याची आठवण झाली.

पांथस्थ

अरेरे भेट टळली!

आदल्याच दिवशी जाउन आलो युएनो मित्राबरोबर. काय ती तोबा गर्दी!!

बाकी अनुभव मस्तच!

Pain

सकुरा नाही हो, साकुरा.
आणि हनामी नव्हे, हानामी.
हाना - फूल

लेख आणी फोटो दोन्ही उत्तम
आता फुले माळ्लेलि कोणी दिसली कि "हिच्या ट्कुर्यात हाना " असे म्हणायला हरकत नाही.