खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा
खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत. त्यात सुधारणा सुचवून हव्या आहेत पण मुख्य म्हणजे मराठी व्याकरणाच्या अंगाने विश्लेषण करून हवे आहे.
१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहेत ।
२) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होता.
३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होता.
४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारा होते.
५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय आहे.
६) त्याची सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते
७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) प्रारंभिक एकोणिसाव्या शतकाच्या इंग्रजी कवी होता.
८) कविता लेखन करण्यासह, तो एक उत्कृष्ट स्पीकर होते
९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897), इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो, एक बॅंकर ची मुलगी होती.
विशीष्ट कारणाने सध्या केवळ वरील वाक्ये तेवढीच देत आहे. बाकी बॅकग्राऊंड पुढचा धागा काढताना देईन. येथील प्रतिसादातील माहिती मराठी विकिप्रकल्पात वापरली जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त होत आहेत असे गृहीत धरले जाईल. चर्चा सहभागा करीता धन्यवाद.
खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवावाक्यांतील व्याकरणविषयक किंवा व्याकरणाच्या एक अवांतरः खूप धागे विकीवर निर्माण करणे याला 'सध्या असलेले धागे अधिक चांगले करणे' असाही एक पर्याय आहे. अन्यथा विकीची वाचनीयता मर्यादित आहे ती तशीच राहील असं वाटतं. संख्या आणि गुणवत्ता हे नेहमीचं द्वन्द्व ... आंग्ल विकीवर माहिती ब-यापैकी तटस्थ आणि चांगली असते म्हणून ते वाचले जाते (याला भरपूर अपवाद आहेत याची जाणीव मला आहे). मराठीतली बरीच 'विकी पेजेस' फक्त शीर्षक घालून पानं राखून ठेवल्यासारखी वाटतात. असो. माझे मत चुकीचे असल्यास ते सुधारून घेण्याची (!) तयारी आहे.