Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी

D — drsunilahirrao, Tue, 04/15/2014 - 08:19
तुझ्या न्यायालयी आता पुन्हा मी हारलो दावा पुरेसा धूर्त मी नाही, कुठे जमला मला कावा राज्ये ,तुझी सत्ता, तुझे हे कायदे सारे अता माझ्याविरोधी तू हवा तो फैसला द्यावा तुझ्या नावात रे दडला किती संहार हा देवा अता सारे मवाली हे तुझा बघ बोलती धावा ! जणू की उंट हे सगळे पटावर खेळती युद्धे कुणी येथे सरळ नाही, कुणी उजवा कुणी डावा ! विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी.. फुलांचा जन्म हा अवघा अता तू वेचुनी न्यावा प्रतीक्षेतुन या सार्या युगे आली युगे गेली तुझी वचने, तुझ्या शपथा : भरवसा काय सांगावा डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
1281 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
स्पंदना Wed, 04/16/2014 - 03:09 नवीन
र्‍या साठी शिफ्ट आर आणि मग य लावुन पाहा. मला तुमच्या कविता अतिशय आवडतात.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 04/16/2014 - 03:16 नवीन
विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी.. फुलांचा जन्म हा अवघा अता तू वेचुनी न्यावा
क्या बात है !!! हेच आर्जव देवाकडे करावसं वाटतं.
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 04/16/2014 - 18:37 नवीन
अपर्णा अक्षय खूप खूप आभारी आहे आपला. मी सध्या मोबाईलवरुनच पोस्ट करत असतो. त्यामुळे अजूनतरी 'र्या' हा असाच येतो.
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 04/16/2014 - 18:45 नवीन
शुचि धन्यवाद. अगदी हाच विचार शेर लिहतेवेळी मनात होता. आर्जव: हेच की हा मनुष्यजन्माचा पसारा त्याने आता आवरुन घ्यावा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा