माहिती हवी आहे-.........सहकारी सोसायटी.
खालील विषयांवर निश्चित अशी माहिती कुणाकडे असल्यास हवी आहे.
सहसा बिल्डर गाळा धारकाना पार्किंग वाटून देतो. यात स्टिल्ट खाली पार्किंग हवे असेल तर काही पैसे आपल्या करारात न दाखवता रोखीने घेतो. नंतर काही काळाने इमारतीचे खरेदी खत करून सहकारी गृहरचना संस्था स्थापन केली जाते. काही कालाने दुचाक्यांची संस्ख्या वाढते .अशी वेळ आल्यास चारचाकी बाहेर हकलण्याचे दडपण जनरल बॉडीचा ठराव करून किंवा अनधिकृत्त पणे धमकी वगैरे देऊन आणण्यात येते. अशा स्थितीत बिल्डरने केलेले वाटप वा जनरल बॉडीने केलेला ठराव यात
कायदेशीरित्या महत्ता कोणाची.(who supercedes whom ? )
एखाद्या सहकारी संस्थेत गाळा मूल मालकाने वापरावा असा नियम आहे. अपरिहार्य कारणासाठी हा गाळा दुसर्यास भाड्याने देण्याची परवानगी सचिवाकडून मिळाल्याखेरीज गाळा भाड्याने देता येत नाही. आता प्रश्न असा आहे की सचिव जनरल बॉडीच्या एखाद्या ठरावाचा आधार घेऊन अशी परवानगी नाकारू शकतो का ? समजा जनरल बॉडीने असा ठराव केला की जागा भाड्याने देताना भाडेकरू विशीष्ट धर्माचा, कुटुंब असलेला, शाकाहारी असा असला पाहिजे तर असा ठराव राज्यघटनेच्या कोणत्यातरी मूलभूत अधिकारावर गदा आणणारा म्हणून बहुमताने संमत झालेला असेल तरीही बेकायदेशीर ठरवता येईल काय ?
प्रश्नः- आमच्या कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील एका फ्लॅटमालकाने स्वतःचा फ्लॅट व कार पार्किंगची जागा सोसायटीची परवानगी न घेता परस्पर भाड्याने(लिव्ह लायसन्स)दिली आहे.सोसायटीच्या इतर सदस्यांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहत असताना लिव्ह लायसन्सधारक हा फ्लॅटमालकाच्या गाडीच्या जागी स्वतःची गाडी उभी करू शकतो काय? याबाबत कायदा काय आहे? सोसायटी याबाबत सदर फ्लॅटमालकावर काय कारवाई करू शकते? उत्तरः- उत्तरः तुमच्या प्रश्नाचे दोन भाग होतात, त्याअनुसार उत्तर देऊ . सोसायटीच्या ज्या सभासदाला आपला फ्लॅट आणि वाहन ठेवण्याची जागा(पार्किंग स्पेस) ही लीव्ह अॅण्ड लायसन्स तत्त्वावर भाड्याने द्यावयाची असेल त्याने सोसायटीकडे ठराविक नमुन्यात(प्रिस्क्राइब्ड फॉर्म)अर्ज सादर करून प्रस्तावित भाडेकरूला सोसायटीचा नाममात्र सदस्य(नॉमिनल मेंबर)बनवावे लागते. त्याला (फ्लॅटमालकाला) सोसायटीचे मासिक देखभाल शुल्क(मेन्टेनन्स चार्जेस)तर भरावे लागतेच, शिवाय कायद्याने वेळोवेळी ठरतील त्यानुसार फ्लॅटमध्ये स्वतः राहत नसल्याबद्दलचे शुल्क म्हणजे 'नॉन ऑक्युपेशन चार्जेस' सोसायटीला द्यावे लागतात. उपलब्ध असलेले 'पार्किंग स्पेसेस' सोसायटीने सहकार कायद्यातील बाय लॉज अनुसार सभासदांना वितरित करावयाचे असतात. तुम्ही ज्या सदस्याचा उल्लेख केला आहे त्याला पार्किंग स्पेस मिळालेली(अॅलॉट झालेली) असेल तर तो आपला फ्लॅट आणि पार्किंग स्पेसही भाड्याने देऊ शकतो. सोसायटीच्या काही सभासदांकडे पार्किंग स्पेस नाही याचा इथे काही संबंध नाही. मुंबईसारख्या शहरात हाउसिंग सोसायट्यांमध्ये उपलब्ध पार्किंग स्लॉट्सपेक्षा मोटारींची संख्या अधिक असणे ही काही असाधारण गोष्ट नाही .