Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिला समुद्र आवडतो...

म — माधुरी विनायक, Sat, 04/19/2014 - 14:11
तिला समुद्र आवडतो... तिला पाऊसही आवडतो... आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे तिचा रूसवा कळतो त्याला तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं... पाठीवर स्पर्श जाणवला की सुसाट सुटतो तो काही बोलत नाही, विचारतही नाही ती तिच्याच रूसव्यात दंग एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली... समुद्राच्या दिशेने धावलेली... वळून त्याच्याकडे बघताना भरून आलेलं आभाळ अवचित आलेला पाऊस आणि वाहून गेलेला रूसवा...

प्रतिक्रिया द्या
2124 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पैसा Sat, 04/19/2014 - 16:47 नवीन
एकदम रोमँटिक!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 04/19/2014 - 17:02 नवीन
??? !!!! ......
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 04/20/2014 - 05:29 नवीन
टु व्हिलर हाय जणु?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 04/20/2014 - 15:53 नवीन
अवचित आलेला पाऊस आणि वाहून गेलेला रूसवा...मस्तच विरहाग्नीत जळणाऱ्या धरतीची
  • Log in or register to post comments
म
माधुरी विनायक Fri, 06/06/2014 - 09:55 नवीन
धन्यवाद... सर्वांचे धन्यवाद... अगदी बरोबर अपर्णा-अक्षय.. टू व्हीलरच... आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर.
  • Log in or register to post comments
भ
भाते Fri, 06/06/2014 - 16:43 नवीन
तुमच्या ब्लॉगवर ही कविता वाचली होती. कविता खरंच आवडली. अगदी 'गारवा' ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा