Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस म्हणाला

म — मालविका, Tue, 04/22/2014 - 13:36
पाऊस म्हणाला, मी येतो नि धरतीला आनंद मी येतो नि शेतकरी सुखावतो मी येतो नि झाडं फुलं तरारतात मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात पाऊस म्हणाला, मी आलो कि मोर नाचू लागतात मी आलो कि नद्या वाहू लागतात मी आलो कि सागराला उधान येत मी आलो कि मन दाटून येत पाऊस म्हणाला, मी आलो कि मुंबईकर धास्तावतात नि लोकल बंद होईल म्हणून घाबरतात मी आलो कि हे काळजी करत बसतात आणि २६ जुलै होईल क काय विचारात बसतात पाऊस म्हणाला, मी आलो कि पुढारी खडबडून जागे होतात कुठे आणि किती खड्डे आहेत ते मोजत बसतात मी आलो कि विरोधी पक्ष सोकावतो सत्तेवार्लेल्याला धारेवर धर्याची संधी तो मिळवतो पाऊस म्हणाला, खर सांगू आता,मी राजकारण करत नाही इकडे बरसायचं तिकडे नाही असं माझ्या मनात नाही ओला दुष्काळ सुका दुष्काळ माझ्यामुळे घडत नाही प्रदूषण करता तुम्ही,दोष मात्र घेत नाही पाऊस म्हणाला, मी आहे म्हणून तुम्ही आहात हे विसरू नका दोष तुमचा असून नाव मला ठेवू नका झाडे लावाच्या नुसत्या घोषणा देऊ नका कृती करा पण प्रदूषण मात्र करू नका -मालविका

प्रतिक्रिया द्या
1345 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/23/2014 - 07:36 नवीन
आकाशवाणीवरच्या त्या श्रुतिका आठवल्या..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/23/2014 - 14:50 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा