Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(केजरीवाल जगातील प्रभावी व्यक्तीमत्व ठरल्याने...)

व
विकास
गुरुवार, 04/24/2014 - 01:56
🗣 100 प्रतिसाद
टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत. तेंव्हा आवडोत अथवा नावडोत केजरीवालांचे देशबांधव (आणि भगिनी) म्हणून, आता केजरीवाल यांनी आता आपल्या या तडफदार प्रभावी व्यक्तीमत्वाचा वापर करत या जगाच्या रहाटगाडग्याला परत योग्य पदावर आणण्यासाठी त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल. मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही)
  1. जागतीक स्तरावर "common men of the world unite" अर्थात "जगातल्या आम आदमींनो एक व्हा" असा नारा देतील
  2. टाईम साप्ताहीक अमेरीकन असल्याने सुरवात अमेरीकन व्हाईट हाउस समोर आंदोलन आणि पेनसिल्व्हेनिया अ‍ॅव्हेन्यू अथवा कॉन्स्टीट्यूशन अ‍ॅव्हेन्यूवर झोपून.
  3. युनायटेड नेशन्समधे जाऊन, "मै तो आम आदमी हूं" चे भाषण देऊन.
  4. चीन मधे तिआनमेन चौकात (चिनी सत्ता लाल डगल्यांच्या हातात असल्याने) लालपाल विधेयकाची मागणी करत आणि तशी करत असताना एखाद्या चिन्याकडून काँग्रेसची निशाणी स्वतच्या गालावर उठवून.
  5. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन भांडवलशहांच्या हातात कसे गेले आहेत हे माध्यमांमधे आक्रस्ताळ्या आवाजात सांगून
  6. जर्मनीच्या अँजेला मर्कलयांच्या विरोधात (असली तर) निवडणुकीस उभे राहून
  7. रशिया क्रायमिआला मदत करत असल्याने विरोध करणार्‍या भांडवलशाही राष्ट्रांच्या विरोधात जागतिक आंदोलन उभारून.
  8. नक्षलवादी विचारवंतांना फोर्ड आणि तत्सम फाउंडेशनकडून अनुदान मिळवण्यासाठी स्वत:चे प्रभावी वजन खर्च करून
  9. अजून काही... (स्पष्ट करा)
यातील कोणती तीन कार्ये केजरीवालांनी हाती घ्यावीत असे वाटते? का? त्यांच्यात देखील प्राधान्यक्रम असेल तर तो कसा असेल? केजरीवाल हे जगातले सर्वोच्च प्रभावी नेते टाईम साप्ताहीकात ठरले आहेत. हे लक्षात ठेवा आणि त्याला अनुषंगून आपले विचार सांगा. उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण) Person of the year झाले होते, त्यामुळे असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर नको!

प्रतिक्रिया द्या
27044 वाचन

💬 प्रतिसाद (100)
आ
आत्मशून्य गुरुवार, 04/24/2014 - 02:25 नवीन
उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण) Person of the year झाले होते, त्यामुळे असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर नको!
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 04/24/2014 - 03:09 नवीन
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. केजरीराज्यात पाणी फुकट असल्यामुळे असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
ग
गणपा गुरुवार, 04/24/2014 - 17:49 नवीन
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.
थोडी दुरुस्ती करुन असे म्हणतो एक अनिवाशी भारतीय दुसऱ्या निवाशी भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे. ए भाग्गो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 04/24/2014 - 04:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 04/24/2014 - 04:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 04/24/2014 - 04:58 नवीन
आनीबाणीवाल्या इंदिरा गांधी चे भारतरत्न अजून कायम आहे ना ?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 04/24/2014 - 06:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 04/24/2014 - 06:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/24/2014 - 06:13 नवीन
तियानमेन चौकात जावे हे लै आवडले. याच धर्तीवर आणखी काही अपेक्षा आहेत. १. पाकिस्तानात जाऊन दाऊद इब्राहिमजी यांची भेट घ्यावी आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानातल्या तालिबान्याना शांतीचा संदेश द्यावा. (म्हणजे त्याना शांतता पाळायला लावावी.) २. नायजेरियावर दबाव आणून नायजेरियन्संनी अवैधरीत्या गोव्यात राहून ड्रज्ग व्यापार करणे थांबवावे ३. इस्लामी देशांत महिलांची गळचेपी थांबवण्याचे प्रयत्न करावेत. भारतातल्या मुस्लिम महिलांना निदान उन्हाळ्यात बुरखे वापरायची सक्ती करू नये अशी मागणी उलैमांकडे करावी. आणखीन खूप अपेक्षा आहेत. पण सध्या त्यातल्या त्यात सोपी कामे पुढे ठेवली आहेत. ती झाली की मग पुढची यादी देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 07:18 नवीन
आधी दिल्लीतल्या रिक्षावाल्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ द्या की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 07:22 नवीन
तुमचं राममंदिर होईल, तुम्ही काळजी करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 18:17 नवीन
राममंदिर झाल्यावर आपल्याहातूनच उद्घाटन होईल त्याचे, निश्चिंत रहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 20:28 नवीन
तसं झालं तर सगळ्या मूर्ती हालवून, तिथे मी शाळेचे वर्ग बांधायला लावीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 20:43 नवीन
बमियानला केले तसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गब्रिएल Fri, 04/25/2014 - 06:39 नवीन
वा वा. १४०० वर्सापूर्वीपन कोनीतरी आसच क्येलं व्हतं; त्येचाच आवतार म्हनावा का काय हा ? "मी" सोडून जगात कोनीबी अक्कलवान न्हाय आसा आग्रेपाहायेच म्ह्ना आपला. येकदम जंक्शन. होउन जावंद्या. नायतर लय बकाल झालिया जग. होउन जाउद्या इस्कोट. अवतार बाबाकी जय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 06:14 नवीन
बाकी ही यादी कशी बनवतात, त्यात कोणाकोणाचे योगदान असते, यावर पण जरा प्रकाश टाका ना भौ.. आणि "दरवर्षी ही यादी याच वेळेस प्रकाशित होते की यावेळेस अंमळ लवकरच प्रकाशित झालेय" असा नसता प्रश्न उगीच डोक्यात येउन गेला.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 06:17 नवीन
जाता जाता, ही बातमी तर "April 10, 2014" ची आहे? आज अचानक बाहेर कशी आली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 06:20 नवीन
आणि, पहिले दोनही नेते भारतातले? भारत सोडून जगात नेते उरलेच नाहीत की काय? काय हे? आता जगाचे कसे होणार? थोडक्यात, ही यादी म्हणजे मला केजरी आणि मोदी समर्थकांचे युद्ध वाटते, ज्यात केजरीसमर्थक जिंकलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
व
विकास गुरुवार, 04/24/2014 - 06:23 नवीन
बातमी एप्रिल १० ची नसावी. त्या दिवशी ऑनलाईन पोल चालू झाले असावे. २३ एप्रिल (काल) पोल बंद झाले आणि निकाल जाहीर झाले. आज टाईममधे त्यासंदर्भात व्यवस्थित वृत्त येईल. राहूल गांधींचे नाव नसल्यास ते निवृत्त समजावेत. ;) मला वाटते जगभरच्या बातम्यांच्या ट्रेंडवरून ही यादी तयार केली जात असावी असे वाटते. नक्की माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
पैसा गुरुवार, 04/24/2014 - 06:28 नवीन
तिथल्या प्रतिक्रिया वाचल्या. लोकांनी व्होटिंग केलंय आणि काहीतरी वेटेज फॅक्टर लावला आहे. नेमकी पद्धत काय बघावं लागेल. त्यातल्या सुरुवातीच्या काही प्रतिक्रियांवरून बॉट्सनी मतदान केल्याचे निष्कर्ष लोकांनी काढले आहेत. ३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 07:11 नवीन
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आनन्दा गुरुवार, 04/24/2014 - 09:45 नवीन
अजून एक गोष्ट लक्षात आली, १८ अप्रिल ला "Laverne Cox" (मला तो का ती हे माहीत नाही :) ) या यादीत प्रथम क्रमांकावर होता. त्याआधी वेगवेगळे युरोपियन. अमेरिकन लोक या यादीत स्पर्धा करत होते. अचानक १९/२० अप्रिल ला एके सर्वांना मागे टाकून या यादीत प्रथम क्रमांकवर विराजमान झाले. ही पहा १७ अप्रिल ची बातमी - Despite a rocky year for Justin Bieber, the Canadian pop star surged to the top of the TIME 100 reader poll, edging out Egyptian Presidential candidate Abdul Fattah al-Sisi. Though the final TIME 100 list of the most influential people of the year worldwide is always ultimately chosen by the editors, TIME seeks the input of readers in an online poll. Music stars Rihanna and Lady Gaga take third and fourth place in the current poll, though Gaga has a clear lead. असो. सत्य स्पष्ट, आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. बाकी माहीतगार/ ऋषिकेश आणि क्लिंटन यांना या धाग्यावर खेचायचा मोह आवरत नाही, पैकी माहीतगार आहेतच. माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 04/24/2014 - 10:59 नवीन
....आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. ........माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?
(:) हा स्मायली केजरींच्यावरीने, ह.घ्या) माझा हा स्मायलीवाला विनोदाचा भाग सोडला तर आकडेवारीत प्रथमदर्शनी काहीतरी गफलत आहे असे वाटते, (माझ जिथपर्यंत निरीक्षण आहे) भारतीय लोकांचा आंतरजालावर एकुण (टक्केवारी) सहभाग सहसा (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा नसतो आणि परदेशी लोकांना भारतीय राजकारणात (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा रस नसतो. तरी सुद्धा हि कॉमेंट कुणी टाईमवर जाऊन टाकावी असे वाटत नाही कारण त्यांनी चुका सुधारल्या तर त्यातील गफलती शोधणे आपल्याला कठीण जाईल. काही मॅन्यूपुलेशन झालच असेलतर (मी संशयवाद जेवण्यातलया चिमूटभर मीठा एवढाच ठेवण्याबद्दल दक्ष असतो तरीही मला शंका वाटते आहेच) केजरीवाल आणि मोदींनाच सरळ जबाबदार धरल पाहीजे अस नाही त्यांच्या समर्थाकांपैकी एखादा उत्साही प्राणी असू शकतो किंवा अशा सॉफ्टवेअरना कस गंडवल हे करून पाहणारे हौसेही या जगात कमी नाहीत. अर्थात या शक्यतांच्या पलिकडे जाऊन परकीय व्यक्ती देश आणि संस्था यांचे इतर हितसंबंधही व्यस्त असू शकतात या संदर्भाने मी वेगळा धागा काढला आहेच त्याचा येथे विस्तार करत नाही. भारत थोडेसे स्रोत असलेला देश आहे त्या पेक्षा तो एक व्यावसायिक संधींकरीता विकसीत होत असलेला देश आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अण्वस्त्र सज्ज देश या नात्याने सामरीक दृष्ट्या खूप सशक्त नसला तरी महत्वाचा देश आहे. जर भारतीय पाकिस्तानी चिनी रशीयन लोकांना आमेरीकेतील तेथील ओपीनीयन इन्फ्ल्यूअन्स करण्याची इच्छा असू शकते (सध्या भारतीय वंशाच्या हॉटेल व्यावसायीकावर क्लिंटनबाईंच कँपेन प्रमाणाबाहेर फायनान्स केल्याबद्दल आमेरीकेत केस चालू आहे) तर आमेरीकेतील अथवा इतर देशातील लोक भारतीय राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप शक्य नसला तरी अप्रत्यक्षपणे ओपीनीयन्स इन्फ्लूएन्स करण्याचा प्रयत्न न करता राहतील का ? आमेरीकेला भारत आणि पाकीस्तान (कडे अणवस्त्रे आहेत म्हणून ती खूपतात असे नव्हे तर इतरही देशांकडे अण्वस्त्रे असण्याच लॉजीकल समर्थन होऊ शकत त्यांच्या स्वतःच्या सामरीक सामर्थ्याला महत्व कमी होऊ शकत वगैरे किंवा खरोखरही भारतीय उपमहाद्वीपातील संघर्ष टोकाला गेलेतर काय या भिती मुळे जे किंवा जे काही कारण असेल ते) मध्ये काश्मिर प्रश्नावर चर्चा होऊन हवी असणे स्वाभाविक आहे आणि भारत इतर तीसर्‍या देशास या चर्चेत घेणार नाही हेही निश्चित आहे. भारत आणि पाकीस्तानच्या उजव्या नसलेल्या गटांकडून कितीही चर्चा झाल्या तरी जनतेची मान्यता मिळणार नाही; शॉक होऊ नका, मी आमेरीकन राजकारण्याच्या बुटात पाय ठेवले तर मी दोन्ही देशातील उजव्यांना पुढे येण्यास प्रोत्साहन देईन आणि चर्चेस बसवेन त्या करता दोन्ही कडे उजवे निवडून येतील या करता बरेच काही पडद्या मागून करण्यास जमलेतर करेन पण निश्चितपणे पडद्या मागून कारण माझा आमेरीकन राजकारणी म्हणून असा प्रत्यक्ष हस्तक्षेप भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही नागरीकांना खपणार नाही. हा भाग एक झाला. आपण इकॉनॉमीक टाईम्सचे आणि भारत आमेरीका व्यापारी संबधांच्या वृत्तांचे अभ्यासक असाल तर दुसर्‍या बाजूला आमेरीकन व्यावसायिकांना हव्या असलेल्या आणि भारत सरकार देत नसलेल्या सवलतींमुळे आम्रेरीकन व्यापार्‍यांची नाराजीमुळे आमेरीक प्रशासनावरील त्यांचे दबाव मननीय आहेत. मी लंडन ऑलीपीक्सच्यावेळेस एक युरोमेरीकन स्त्रीचे नाव भोपाळ गॅसवाल्यांची बाजू घेऊन आमेरीकन कंपनीला विरोध वगैरेकरताना वाचल्याचे आठवते त्यानंतर तीच स्त्री भारतातील एका चळवळीची (आर्थीक) बाजू घेताना दिसली . भोपाल गॅसवर कधी काळी लिहू म्हणून जे दुवे जपले होते ते उघडून पाहताना आंतरजालावरून तीचे नाव हळू हळू गायब होते आहे असे हलकेसे जाणवत होते अशात दोन एक महिन्यापुर्वी ती त्या सर्व संदर्भ दुव्यातून हरवली होती. कदाचीत दुवे नैसर्गिक पणे बंद पडले असतील कदाचित माझा संशयवाद पुर्ण चुकीचाही असू शकतो. अशातील काही लोकांच्या भूमिका इराणशी संबंध सुधारण्यास साहाय्यभूत असणार्‍या असू शकतात असे वाटले सर्व संशय चुकीचे असू शकतात. उद्देश कोणत्याही भारतीय व्यक्ती अथवा पक्षाकडे बोट दाखवण्याचाही नाही. भारतातील निवडणूका परकीय लोकांना पुर्णपणे प्रभावीत करता येणे निश्चीतपणे अशक्य आहे. सध्याचेच भारत सरकार खूप आमेरीकाभिमूख होते तरीही दुरावा येण्याचे थांबले नाही. पाहिजे ते प्रशासन आणून हवे ते सगळे साध्य करता येईल एवढाही कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी भारत कच्चा नक्कीच नाही त्यामुळे अशा शक्यतांची खूप चिंता करावी असे वाटत नाही. माझ्या सागंण्याचा मतितार्थ परकीयवृत्तसंस्थाच्या वृत्तांना प्रमाणा बाहेर महत्व देणे आपण टाळले पाहिजे. किमान पक्षी त्यांच्या वृत्तांनी भारतीय हुरळून जातात त्यांच्या वृत्तात अभिप्रेत असे अर्थ काढून प्रभावित होतात असे त्यांना कळता कामा नये. माझी व्यक्तीगत मते आहेत कोणताही विदा आकडेवारी संदर्भ देणे कदाचित शक्य असणार नाही. कोणत्याही वादात पडण्याचे टाळावे म्हणून मी मिपावर हे लिहिणे टाळले होतो. हा प्रतिसाद न पटल्यास ह.घ्या नाहीतर माझा आणि आनन्दा यांच्यातील व्यक्तीगत मतांचा संवाद म्हणून सोडून द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 13:41 नवीन
यादी मॅनिप्युलेट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला आहे पण तो Time कडूनच. नाहीतर ५ दिवसात, १७ एप्रिलच्या बातम्यांत मोदी आणि AK४९ चे पहिल्या पाचात नाव असले पाहिजे होते. Time चा हेतू चुकीची माहिती देवून भारतीय(अति हुशार /अति भावनिक)लोकांना गुमराह करायचा दिसतोय, हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
व
विकास गुरुवार, 04/24/2014 - 14:25 नवीन
३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं! व्हॉट्सअ‍ॅप वर टेक्स्टींग करायचे सोडून टाईम साप्ताहीकाकडे जायला कुणाला वेळ तरी आहे का? उगाच आपले काहीतरी... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 06:36 नवीन
मोदी पंतप्रधान झाले तर तीन गोष्टी प्राधान्यक्रमानं करतील : १) स्वतःचं लग्न! कारण ते स्वतःला मोस्ट इलिजिबल बॅचलर समजतात. आपकी अदालतमधे पूर्वी झालेल्या इंटर्व्यूमधे ते (लाजत लाजत) म्हणाले होते : "हमको सरकारने जमीन (प्लॉट) तो दे दी है, अब मकान कब बनेगा देखना है". (जसोदाबेन बघा वाट) २) अंबानी, अडानी आणि डिएलफनं प्रचारात केलेल्या उपकाराची भरघोस परतफेड बिजेपीच्या खास `कॉर्पोरेट किक बॅक स्टाईलनं' करणार. (काँग्रेसी अवाक, त्यांचे एकामागून एक घोटाळे उघड होतात आणि हे डोळ्यादेखत लुटतायंत पण काही करता येत नाही) ३) ज्या एकमेव मुद्यावर संघानं (आणि वरुन दाखवायला बिजेपीनं) त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार बनवलं त्याची परिपूर्ती करणार, राममंदिर बांधून! (असंख्य भारतीय खूष! आणि देशासाठी कायमची डोकेदुखी!)
  • Log in or register to post comments
स
सुहासदवन गुरुवार, 04/24/2014 - 06:56 नवीन
माणसानं किती किती म्हणून आशावादी असावं ह्यासाठी आजच्या पिढीने तुमच्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 07:09 नवीन
आता टाईम्सच्या ओपिनियन पोलनं व्यापक स्तरावर लोक काय विचार करतात हे दाखवून दिलंय त्यामुळे बिजेपीप्रेमींची जळजळ होतेयं इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन
व
विकास गुरुवार, 04/24/2014 - 14:27 नवीन
लेखात प्रश्न केजरीवालांच्या संदर्भात विचारले होते पण आपण त्या ठिकाणी चुकून मोदी वाचलेले दिसतेयं! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 07:11 नवीन
खरोखरच Time चे मनापासून कौतुक करावेसे वाटते. Time सारख्यांनी आपला धंधा(हो धंधाच!) कसा वाढवावा, याचा हा पाठ इतर माध्यमांनी घेण्यासारखा आहे. जो माणूस दिल्लीमध्ये ५०० रुपये दान दिलेल्या एका रिक्षावाल्या वर प्रभाव पाडू शकला नाही,तो जगातील एक नंबरचा प्रभावी नेता कसा असू शकेल? भारताच्या गृहमंत्र्यावर/पोलीस आयुक्तांवर/LGवर काय प्रभाव पाडला होता तेही सर्वांना माहिती आहेच. ज्याने "येडा मुख्यमंत्री" हे शिंदेंनी दिलेलं बिरूद, राजीनामा देऊन सार्थ ठरविले. माझ्या मते जगातला तर सोडाच, भारतातला एक नंबरचा विनोदी माणूस/जोकर म्हणून Time ने नाव घ्यावे. Time ने जी लिस्ट दिली आहे त्यात १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत २०१४ मध्ये "अण्णा हजारे" का नाहीत? माझ्यामते भारतातील रिकामटेकडी जनता जी facebook वर like करते, त्याच्या संख्येवरून ही लिस्ट बनविली आहे, जी पूर्ण पणे बरोबर आहे फक्त "Most liked/disliked people" या नावाने छापली गेली पाहिजे होती. Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे व आपली ही अक्षम्य चूक कशी सुधारता येईल हे पाहावे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 07:18 नवीन
बिजेपी सरकार आलं तर देशाची काय परिस्थिती होते पाहा मग कळेल कुणी कुणाला वेडं बनवलं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
व
विवेकपटाईत गुरुवार, 04/24/2014 - 18:02 नवीन
संजयजी पूर्वग्रसित होऊन मते बनवू नका. किमान योजना आयोगचे अहवाल तरी वाचत जा. ११व्या योजनेत भा ज प शासित राज्यांची कामगिरी अन्य राज्यांपेक्षा जास्त चांगली होती. हे सत्य आहे. बाकी मोदी आल्याने देशात मूलभूत -अर्थात रस्ते, रेल्वे, सिंचन, वीज इत्यादींना महत्व दिले जाईल ज्याने भारतीय उद्योगांचा विकास होईल. अमेरिकेला हे नको आहे म्हणून अमेरिका मोदी विरोधात आहे. ज्या पक्षाच्या १५० अधिक केजरीवाल समेत असे उम्मेद्वार आहेत ज्यांच्या NGO ला कुठून मदत मिळते सांगायची गरज नाही. खाल्लेला मिठाला जगावे लागेतेच. दिल्लीत वीज दर कमी करण्या एवजी सबसिडी वाढवली. सबसिडीचा पैसा कंपनीला बिन विल वसूल करताच मिळतो दिल्लीत वीज बिल वसूल करणे काही सौपे काम नाही. जेवढी जास्त सबसिडी तेवढा जास्त अंबानीचा फायदा (कुणाच्या खिशात आहे, कोण आहे लवकरच कळेल, घोर निराशा होईल) म्हण आहे न चोर मचाये शोर. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 20:46 नवीन
मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं आहे ही गोष्ट उघड दिसत असतांना, उगीच एखाद्या बथ्थड राजकीय नेत्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत `परकीय हस्तक्षेप आहे' असा कल्पनाविलास करणं हा भलताच ग्रह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
सुहासदवन Fri, 04/25/2014 - 09:38 नवीन
मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं
ह्या अश्या प्याद्यांचा उपयोग करूनच जवळ जवळ प्रत्येक मोठा उद्योजक आपली पो़ळी भाजून घेत असतो, त्यात गैर काय आहे? प्रत्येक राज्यात तिथला मोठा उद्योगपती किंवा तेथील उद्योजक हे त्या राज्याच्या शासनावर थोडाफार प्रभाव ठेवून असतातच. शेवटी पैशाची आणि उद्योगांची मोठी उलाढाल तेच करतात. शासकीय तिजोरीत महत्वाची भर तेच घालत असतात. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा साखर आणि सहकाराच्या पैशाच्या माध्यमातून (पण फक्त) महाराष्ट्राच्या शासनावर प्रभाव ठेवून असतातच की. आता समजा मोदीनी अंबानी-अडानी किंवा गुजरात मधील उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत किंवा भारतातील इतर उद्योगांना गुजरातमध्ये एक महत्वाचे स्थान मिळ्वून दिले आहे, तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला कोणी रोखले होते, असे काही करण्यापासून? अंबानी-अडानी च्या लेवलला जाऊ द्या पण महाराष्ट्राच्या मातीतील किती उद्योगांना किंवा उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत स्वत:चे असे स्थान आहे? टाटा नॅनो सारखे किती उद्योग दुसर्‍या राज्यातून खेचून आणून महाराष्ट्रात उभारले गेले? उद्योगांचं जाऊ द्या, महाराष्ट्राच्या नेत्यांचे तरी काय स्थान आणि प्रभाव आहे भारतीय बाजारपेठेत (दिल्लीत)? चांगल किंवा वाईट जाऊ द्या. पण निदान राष्ट्रीय लेवलला अंबानी-अडानी ह्यांच्या सारख्या उद्योजकांचे मोदींशी नाव तरी जो़डले जाते, गुजरातला ते निदान रिप्रेजेंट तरी करतात, पॄथ्वीराज चव्हांणाचे नाव, निदान आडनाव घेतल्यावर तरी कोणता (आदर्श) उद्योग किंवा उद्योजक आठवतो? महाराष्ट्राच्या शासनाने खरंच काही चांगलं केलं असेल तर मग करा ना मार्केटिंग ह्या सार्‍याची. वाट कसली बघताय...मोदी सरकारची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 04/25/2014 - 10:57 नवीन
त्यानं मोनॉपॉली वाढते आणि त्यात जनतेला पर्याय न राहिल्यानं ती लुटली जाते. मोदी काय किंवा काँग्रेस काय मला सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवणं गैर वाटतं. इंडस्ट्री जनहितासाठी चालली पाहिजे आणि इंडस्टियालिस्टलाही फायदा व्ह्यायला हवा पण संपत्तीच बेतहाशा केंद्रिकरण गैर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन
म
माहितगार Fri, 04/25/2014 - 11:26 नवीन
सं.क्षी. लेखापरिक्षण आणि अर्थशास्त्र या बाबत आम्हाला आपल्या एवढ प्रगाढ ज्ञान नाही. आमच्या मते दोन गोष्टी आहेत व्यक्ती/संस्था आपल्या भोवतालच्या समाज, संस्कृती आणि व्यवस्थेचीच निर्मिती असतात. घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे. मला आपल्या व्यवसायाला लक्ष्य करायच नाही. पण भारतात लेखापालांची लेखापरिक्षकांची एकुण संख्या किती ? त्यां सर्वांचा सर्व कारभार शुद्ध आदर्श नितीमुल्यांनी चालू आहे असे सर्टीफीकेट आपण द्याल काय ? एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ? संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची. आता महाराष्ट्रातली मतदान संपली आहेत आपापले राजकीय अंगरखे उतरवून समतोल विचारकरणे आत्मपरिक्षणही करणे या बद्दल सर्वांनीच सवडीने विचार करावा, (आणि मी हा निघालो बोलल्याप्रमाणे करण्यासाठी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आयुर्हित Fri, 04/25/2014 - 11:27 नवीन
संजय क्षीरसागरजी, आधी माणसं ओळखायला शिका! बाकी आपोआप चांगले होईल हो.त्यासाठी आआपजी गरज नाही. आणि हो एक अजून, आम्हाला बोलवा हो थेठरात,सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवतांना बघायला आवडेल! कोण पवार की सोनिया की पप्पू नाचणार आहे तेही कळवा आधी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 04/25/2014 - 18:03 नवीन
घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे.
चुक नाही फ्रॉड हा शब्द लक्षात घ्या. फ्रॉड म्हणजे संगनमतानं केलेला अपहार. तो व्यवस्थापनातल्या पद्धती डावलून होतो आणि पैशाचा हव्यास हे त्याचं एकमेव कारण असतं.
एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ?
दादाश्री, कोणतीही इमानदार व्यक्ती बेईमान माणसाचं काम करत नाही असा माझा व्यावसायिक अनुभव आहे. You can't bend honesty with money. त्यामुळे बेईमान उद्योजकाची मेहेरबानी प्रामाणिक माणूस स्विकारतच नाही! मोदी; अडानी, अंबानी आणि डिएलएफच्या विमानातनं फिरतायंत आणि या कंपन्यांची कार्यप्रणाली उद्योग जगतात मशहूर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही झाकले तरी मोदी उघडे पडणा. पण डोळेझाकच करायचीये म्हटल्यावर विवेकाचा प्रश्नच मिटला.
संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची
संशय कसला? उघड दिसतंय. आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. असो, आता संधी गेलीये त्यामुळे बोलून उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
व
विकास Fri, 04/25/2014 - 18:41 नवीन
आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. मोदी निवडणूक आणि बहुमतवाल्या पक्षाचे नेते म्हणून निर्वाचीत प्रतिनिधीअंतर्गत निवडणूक जिंकले की मोदीविरोधकांनी मोदी लाट नाही पण मोदीविरोधाची ओहटी मान्य केली ? :) मात्र एक प्रश्न नक्कीच पडतो. जर चुकून मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी कुठलेही वादग्रस्त निर्णय न घेता जनतेच्या भल्यासाठी राज्य केले तर तुम्ही ते तसे वागले हे मान्य कराल का तरी देखील मोदी वाईटच असतील? माझ्या पुरते बोलायचे तर केजरीवालांनी चांगले मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले असते तर आणि अगदी उद्या तेच काय पण पप्पू गांधी जरी पंप्र झाला आणि चांगले निर्णय घेतले तर मी स्वागतच करेन. पण मला मोदी विरोधकांची याबाबतीत खात्री नाही म्हणून विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 04/25/2014 - 18:55 नवीन
इतकंच वाटतं. देशातला भ्रष्टाचार रोखला गेला आणि महागाई आवाक्यात आली की लोक सुखी होतील. मग ते मोदी की आणखी कुणी केलं यानं फरक पडत नाही. अर्थात मोदी जे बोललेत तसे वागले तर त्यांचं मनापासून कौतुक करीन यात वाद नाही. केजरीवालांच्या दिल्लीतल्या राजकीय कारकिर्दी विषयी मतभेद आहेत. मला त्यांच्या सचोटी विषयी तिळमात्र शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आनन्दा Sat, 04/26/2014 - 07:37 नवीन
मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा
मला वाटते संधी सर्वांना समानच मिळते. काही लोक त्यचा अधिक फायदा घेतात इतकेच. बाकी मी कोणत्याच माणसाला त्याच्या तात्कालिक कृत्यांवरून मापत नाही, अनेक गोष्टींचे दीर्घकालीन परिणाम समजण्यास आपण कमी पडतो, ते बर्‍याच वेळेस राजकारणी लोक दूरदॄष्टीने पाहत असतात, तेव्हा मोदींनी गेली २ वर्ष अदानींवर कृपा केली, डीएलएफचे विमान वापरले म्हणजे नंतर देखील असेच करतील असे नाही. त्या व्यक्तीचे दीर्घकालीन उद्दिष्ट, त्यांचे चरित्र्य वगैरे गोष्टी देखील बघणे आवश्यक आहे. आणि मोदी त्य कसोटीवर उतरतात म्हणूनच माझ त्यांना पाठिम्बा आहे. बाकी चारित्र्य वगैरे गोष्टींवर मोदींची तुलना मनमोहनसिंगांशी करयला माझी ना नाही. आणि मुख्य म्हणजे, माझा क्रांती पेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, आणि हेच मला मोदींपेक्षा केजरीवाल जास्त आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
माहितगार Fri, 04/25/2014 - 20:26 नवीन
सं.क्षी. राजकारण बाजूला ठेवल तरी तुम्ही प्रश्नांचा फारच एकांगी विचार करता असं वाटत. मी व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्हीही टाळतो. मी मोदी समर्थक नसताना (मी कोणत्याही एका पक्षाचा कधीच समर्थक नव्हतो) सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो हे अनुभवताना गंमत दुसरीकडे काळजी वाटते काँग्रेसची जागा घेण्याची चांगली संधी असलेला एक पक्ष मतदारांनाच दोषी ठरवत मोठा होऊ पहातो आहे. लोकांना कन्व्हीन्स करण्याच्या मोठे होण्याच्या अशा पद्धती यशस्वी होत असतील तर माहीत नाही सामान्य माणूस म्हणून बघताना प्रांजळपणे सांगायचे झाले तर जुनेच औषध (पद्धतीचे) नव्या बाटली (नव्या नावाने) माझा देश एक चांगल्या बदलाची संधी दवडत नाही ना अशी साशंकता येते हे एक. अशा साशंकता व्यक्त करणार्‍यांना विश्वासात घेण्या एवजी नकारात्मक मार्केटींगचा आधार हे दोन. आणि असे दाखवून देणार्‍यांची लगेच विरोधक म्हणून बोळवण हे तीन, असे सांगणार्‍यांचे ऐकण्याची एक पैसाही तयारी नसणे हे चार, म्हणजे जो तुमचा विरोधक नाही तो पण विरोधक कसा होईल हे स्वतःहून पहाणे. आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही ? उत्साह उपयोगाला येतो पण मर्यादा असतात, महाराष्ट्रात निवडणूका संपल्यात जमा आहेत अंगरखे आणि चष्मे बाजूस ठेऊन आत्मपरीक्षणही केल्यास पुढच्या वेळी आपल्यालाच प्रचारात सुधारणा करण्यास आपल्या चाहत्याची बाजू अधीक समर्पक पणे मांडण्यास उपयोग होईल. माझ्या खालील धाग्याचे सावकाशीने वाचन करावे घाई नाही. नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 04/26/2014 - 06:48 नवीन
हो ना, कारण तुम्ही फक्त माहिती जमवतायं,जस्ट अ कॉपी-पेस्ट जॉब ! माहितगाराला स्वतःचं मत नसतं. आणि मजा अशीये की तरी सुद्धा तुमची मतं लपत नाहीत! ही दोलायमान स्थिती आहे आणि त्यामुळे निरुपयोगी ठरते. न घरका न घाटका. तुम्ही म्हटलंय `आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही? ' हे तुम्ही स्वतःचं मत स्वतःवरच लादतायं कारण मी असं कुठेही म्हटलं नाही. उलट तुमच्या प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर दिलं होतं. नुसती माहिती जमवणारा, मोदी हा कॉर्पोरेट फ्रॉड आहे याचा प्रतिवाद करु शकत नाही. तुम्ही तुमच्या धाग्यांची लिस्ट दिली आहे. मी तुमचे धागे वाचत नाही कारण मला ते निरर्थक वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 04/26/2014 - 07:43 नवीन
मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 09:08 नवीन
विकासजी, आपणास धन्यवाद! आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. हा प्रतिसाद वाचून Time ने चक्क Heading बदलले! नवे heading असे आहे : Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll आधीचे heading असे होते: The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 09:39 नवीन
>>>आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे. >>>संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे. मिपावर श्रेणी देण्याचा प्रकार सुरु होणार आहे का? 'अतिविनोदी' अशी श्रेणी द्यावी-शी वाटत आहे. माणसानं स्वतःबद्दल किती अवास्तव कल्पना कराव्यात ह्याला काही मर्यादा???????????? अवास्तव कल्पना करण्यासाठी ठेवलाय ना एक माणूस मिपावर? कोटा वाढवलाय काय?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 04/24/2014 - 10:14 नवीन
Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
हे शीर्षक आधीच्या या शीर्षकापेक्षा
The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll
निश्चित जास्त प्रभावी आणि स्पष्ट आहे. (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 09:47 नवीन
हा विनोद ही नाही, सत्य घटना आहे. पाहिजे तर माझ्याकडे Time चा मूळ लेख, नवा लेख व लेखावरील सर्व कॉमेंट्स copy करून ठेवल्यात. Mail id द्या, mail करतो आपणास!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 10:14 नवीन
इथेच टाका की. तुम्च्या प्रतिसादानं टाईमचं हेडींग बदललं असेल तर कौतुकच आहे. टाका इथं. लिंक दिलीत तरी चालेल. तुम्हाला जमत नसेल तर संपादकांना सांगा. मिपाचा एक प्रकारचा विजय असल्यानं संपादक अथवा मालक सुद्धा मदत करतीलच ही खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 04/24/2014 - 10:50 नवीन
प्रशांतजी व admin आपल्याला mail पाठवला आहे. व लिंक्स जोडल्या आहेत. यात पहिल्या file मध्ये ४८८ comments होत्या, ज्या नवीन धाग्यात फक्त ९५ दिसत आहेत, ज्यात माझी comment मला सापडली नाही (बहुतेक उडवलेली दिसते!) आधीचे Heading असलेली file The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll आत्ताचे Heading असलेली file Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा