Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का?

त
तुमचा अभिषेक यांनी
गुरुवार, 04/24/2014 - 18:39  ·  लेख
लेख
आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या. त्यामुळे त्यांना हे मतदान आणखी कमी वाटले. असो, तर आता या कमी मतदानाची कारणे कोणी मतदारांमधील उदासीनता देत आहे तर कोणी वोटींग लिस्टमधील नावांची गडबड. तर कोणी निसर्गाला दोष देत प्रचंड गरमीचे कारण पुढे करत आहे. कारण काहीही असले तरी सर्वत्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये. (यातही काही जणांचा सूर असा की सरकार पलटायचे आहे आणि तुम्ही मतदान न करता घरात बसून आहात. म्हणजे यातही अमुकतमुक पक्षालाच वोट द्या किंवा अमुकतमुक पक्षाला वोट देऊ नका असे आपले मत लादणे) अर्थात हे ही चालायचेच, चूक की बरोबर ते नंतर बघू, पण मला प्रश्न पडला आहे की मतदान न करणे हा एखादा प्रचंड गुन्हा किंवा सामाजिक अपराध आहे का? किंबहुना एवढे मोठाले शब्द न वापरताही ते चुकीचे वर्तन आहे का? कोणालाही मत न देणे हे देखील एक मतच नाही झाले का? किंबहुना ‘मला कोणीही चालेल, इथून तिथून सारेच सारखे’ असे एखाद्याचे मत असू शकत नाही का? आणि लोकशाहीत आपण प्रत्येकाच्या मताचा आदर करायला हवा ना. कुठलेही सरकार आले तरी माझी परिस्थिती काही बदलत नाही असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने मतदानाच्या बाबत उदासीनता दाखवण्यात गैर ते काय? तसेच याउपर असते ती एक प्रायोरीटी. एखाद्याला ऑफिसला सुट्टी मिळतेय म्हणून तो आरामात मत देऊ शकतो, पण तेच ऑफिसमध्ये एखादे महत्वाचे काम असेल वा किंवा एखादे काम आजच केले नाही तर धंद्यामध्ये आर्थिका फटका बसू शकतो तर मी ते आधी बघणार नाही का. माझ्या एका मताने काय तो फरक पडणार आहे असा विचार करणे, थोडक्यात आपली प्रायोरिटी काय आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला नसावा का? हे त्याचे मतच झाले नाही का? माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले. फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले. तसेच आजवर एक वेळ सोडून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावला आहेच. पण ती एक वेळ जेव्हा मी मतदान बजावले नाही तेव्हा मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते. असो, इतरांची मते जाणून घेण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया द्या
17031 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 18:56 नवीन
एकदा लोकशाही मान्य केल्यावर, मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे.
मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.
तरीही ती चूकच होती. पण लहान वयात अज्ञानापोटी अशा चुका होतात, तेंव्हा ते जाऊदे...
माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले.
व्हेरी गुड!
फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले.
ह्ये तिच्यायला जास्त महत्वाचं!! आणखी व्हेरी गुड!!! :)
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 19:16 नवीन
नैतिक गुन्हा येस्स, नैतिक गुन्हा बोलू शकतो. तुलनेत सौम्य शब्द वाटतो. पण मग नीतीमत्ताही व्यक्तीसापेक्ष नाही का, वा नैतिकतेचे निकष कोणी ठरवले, तसेच ते निकष लाऊन इतरांना यावरून दुसर्‍याची नैतिकता ठरवायचा अधिकार काय हे प्रश्न येतातच. लोकशाही येस्स ती मान्य आहेच, त्यालाच अनुसरून हा प्रश्न विचारला आहे की एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 19:52 नवीन
मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे. लोकशाहीत जगणारा, एरवी लोकशाहीने प्रदान केलेली सगळी स्वातंत्र्य, अधिकार उपभोगणारा माणूस जर एक कर्तव्य म्हणून स्वखुशीने मतदान करत नसेल तर माझ्या मते तो उच्च नीतीमत्तेचा नागरीक नाही.
एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का?
लोकशाही ही व्यवस्था इतर कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे परिपूर्ण नाही, तिच्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे तो तसा तटस्थ राहू शकत नाही. आता नोटा वगैरेची सोय केलीये म्हणतात, तेंव्हा तो ऑप्शन वापरता येईल कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 21:34 नवीन
नोटा हा पर्याय माझ्या ऐकण्यानुसार काही फायद्याचा नाहीये. (माझी माहिती चुकत असेल तर करेक्ट करा) नोटाला बहुमत मिळाले तरी सर्व उमेदवार बाद असे नसून त्यातूनही ज्याला जास्त मते आहेत तोच विजयी. मग असे असल्यास काय फायदा त्या नोटाचा? मग मतदान न करून नोटा वापरल्यासारखेच झाले, फक्त त्याची रेकॉर्डला नोंद झाली नाही इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शुचि गुरुवार, 04/24/2014 - 19:13 नवीन
जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
हो ना मतदान हे ऐच्छिक असते. असं इमोशनल ब्लॅकमेलींग करायचं असेल तर "ऐच्छिक" या शब्दाला अर्थ काय राहीला? अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 19:56 नवीन
अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?
माझ्या मते अशी इमोशनल, पॅसिव्ह असो वा अग्रेसिव्ह, बळजबरी करायची वेळ येणं हा लोकशाहीचा एका प्रकारे पराभव असू शकेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ब
बालगंधर्व Sat, 04/26/2014 - 09:52 नवीन
मझ नव एथ्लया मददार यदित नहे. महनुन मे वोत नहे केलए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शुचि गुरुवार, 04/24/2014 - 19:50 नवीन
प्रचंड गरमीचे कारण पुढे करत आहे.
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 04/25/2014 - 17:50 नवीन
>>आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या पुण्यात ही बाहेरुन लोकं आली आणि शिंची भाषा ती कशी बदल्लीच गो!! आता ह्या निवडणुकांत पुण्यात यायला व्हिसा वैगरे लागू करा असा वटहुकूमच काढायला लावणार आहे. ;) -(शृगालनयन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 04/26/2014 - 18:57 नवीन
(शृगालनयन) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
त
तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 19:33 नवीन
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात आमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
य
यसवायजी Fri, 04/25/2014 - 20:02 नवीन
उकाड्याला उकाडाच बोलतात आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक Sat, 04/26/2014 - 08:52 नवीन
आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ब
बॅटमॅन Sat, 04/26/2014 - 10:14 नवीन
बोलणे, म्हणणे, सांगणे ही तीनही क्रियापदे कधी वापरावीत याचे शास्त्र आहे. हे न सांगतादेखील बोलता येते असेच म्हणेन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
च
चित्रगुप्त Sat, 04/26/2014 - 09:37 नवीन
पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात, पण सदाशिवपेठेत 'उष्मा' म्हणतात, असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
आ
आतिवास गुरुवार, 04/24/2014 - 19:56 नवीन
उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात पिडां यांनी म्हटल्याप्रमाणे 'नैतिक' गुन्हा आहे. पुढचा प्रश्न असा आहे: हा नैतिक गुन्हा माणसं स्वेच्छेने करतात का?(तुम्ही एकदा केला होता तसा!) मतदान 'ऐच्छिक' असल्याने काय करणर या परिस्थितीत? फक्त जागरूकता कार्यक्रम करू शकतो, आवाहन करू शकतो. पण नेहमी ऐच्छिक असतो हा 'गुन्हा' की परिस्थिती त्यांना हा गुन्हा करायला भाग पाडते? मग ही परिस्थिती जे निर्माण करतात ( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 20:03 नवीन
( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?
नाही. मतदान करायची इच्छा आहे पण वरील काही, मतदाराचा कंट्रोल नसलेल्या, कारणांमुळे जर मतदान करता आलं नाही तर मी त्यांना नैतिक गुन्हेगार मानणार नाही. अशा वेळेस ही परिस्थीती निर्माण होऊ देणार्‍यांच्या पार्श्वभागावर चार बांबू ओढायची गरज आहे असंही माझं मत आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 20:02 नवीन
नक्कीच नैतिक गुन्हा आहे. त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 20:32 नवीन
त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे. हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्‍यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 04/24/2014 - 20:44 नवीन
चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल तो आपला त्रास मतपेटीतूनदेखील व्यक्त करु शकत नसेल तो तक्रार करणे, त्या तक्रारीचा पाठपुरावा करेल किंवा कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वाटत नाही. इसके लिए ज्यादा मेहनत लगेगी. ("त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.") अशा प्रव्रुत्तीला आम्ही शेटे शेटे आंबे पाडणे असे म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 21:02 नवीन
मतपेटीतून मत देऊन तो त्रास दूर करणे हा खूप गैरसोयीचा आणि वेळखाऊ प्रकार नाही का? आणि एकाला काढून दुसर्‍याला आणने म्हणजे त्या त्रासातून मुक्तता याची शाश्वतीही असते का? राहीले तक्रारीच्या त्रासाचे तर जर होणारा गलथान कारभाराचा त्रास कोणाला व्यक्तीगत पातळीवर होत असेल तर ती व्यक्ती तक्रार करणारच आणि होणार्‍या त्रासापेक्षा पाठपुराव्याचा त्रास जर कमी असेल तर तक्रारीचा पाठपुरावाही करणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 21:03 नवीन
असो, आता मला सांगा, याआधी निवडून येणारे सरकारही बहुमतातूनच निवडून आलेले ना, म्हणजे बहुमताची पसंती त्याच पक्षाला होती ना, मग तरीही त्यांनी गलथान कारभार केला, घोटाळे केले, देश बुडवला याचा अर्थ लोकांनी चुकीच्या लोकांना निवडून दिले. म्हणजेच याचा एक अर्थ असाही झाला की या निवडणूक प्रक्रियेतूनही चांगले वा आहे त्या पर्यायातून सर्वोत्तम सरकार मिळेल याची शाश्वती नसतेच. निदान या देशात तरी तसे घडत नाहीये असे बोलू शकतो. आता हे चुकीचे सरकार निवडणारे कोण? ज्यांनी याआधी मतदान केले ते ही जबाबदारी घेतील का? घ्यायला हवी ना, जर मतदान केल्याचा अभिमान आहे तर चुकीचे मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 04/24/2014 - 21:09 नवीन
घेतो ना साहेब. आता बिपाशा बासू ला घेऊन पिक्चर काढला. नाही चाललां. मंग दुसर्‍या डावात सनी लिओनीला घेतलं. कंच बिगडलं ? सबको एक चानस तो बनता है ना ? आता पिक्चर चालत नाही म्हणून आपण डायरेक्ट साबण तर नाय ना विकू शकत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 21:30 नवीन
काही लोकांच्या मते बिपाशा जाऊन सनीच येणार आहे तर तोच चित्रपट बघायला मिळणार काही फरक पडत नाही. तर कित्येक लोकांपर्यंत तर हा चित्रपट पोहोचतही नाही वा कधी बघायला मिळत नाही त्यांनाही मग सनी असो वा बॉबी काही फरक पडत नाही. जर कोणाला हा चित्रपट बघणे त्रासदायक वाटले तर तो आवाज उठवणार पण पुढच्या सिनेमातही आपल्याकडे माधुरी दिक्षितचा पर्याय नसल्याने तो या कास्टींग काऊचच्या भानगडीत पडणारच नाही. तळटीप - आपण बिपाशा आणि सनी नाव वापरलीत म्हणून ती तशी माझ्या पोस्टमध्ये आली, अन्यथा कोणाची कोणाशी तुलना करायचा हेतू नाही. नाही सनीबाई पॉर्नस्टार आहेत म्हणून हा खुलासा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 08:15 नवीन
असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो.
सरकार कीती का वाईट असे ना, सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्‍यांनी च करावे. बाकी च्यांचा काय संबंध? त्यांना जे फुकटात मिळते आहे त्याबद्दल कसली तक्रार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
च
चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 08:31 नवीन
टॅक्स बद्दल फारशी माहिती नाही म्हणून विचारतो, प्रत्यक्ष आयकर भरण्याखेरीज आपण जी खरेदी करतो, त्यामुळेसुद्धा आपण अप्रत्यक्षपणे सरकारला टॅक्स हा देत असूच ना? हे टॅक्स कोणकोणते असतात, वगैरे माहिती जाणकारांनी द्यावी. ज्यात अगदी अजिबात टॅक्स दिला जात नाही अशी खरेदी असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
शुचि गुरुवार, 04/24/2014 - 20:11 नवीन
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का? तर मी एका प्रचंड जनशक्तीचा घटक आहे आणि या जनशक्तीच्या निर्णयप्रक्रियेत माझा खारीचा वाटा आहे. पण मी त्या जनशक्तीचा हिस्सा आहे हे ठरविणे माझ्या हातात नाहीच आहे. मग त्या न्यायाने जेव्हा स्वातंत्र्यलढा चालू होता त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात भाग नघेणारे सर्व गुन्हेगार होते?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 20:24 नवीन
मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का?
होय, होणार आहे!! देशाचे नव्हे, तुमचेच!! तुमचे नैतिक अधःपतन होणारच आहे. तुम्ही इतरांना काही दाखवू नका, पण एक सुशिक्षित माणूस असून तुम्ही तुमचं कर्तव्य करण्यात चुकला आहांत हे तुमचं मन तर तुम्हाला सांगणारच आहे!! आता अभिजीतवर रट्टे ओढायचं म्हणून सांगत नाही पण टीनएजर असतांना एकदा त्याने मतदान न करता इतरत्र गेला हे त्याच्या लक्षात आणि मनात अजूनही आहे!! अभिजीत, हे मी टीका म्हणून लिहित नाहीये कारण मन संवेदनाशील असल्याचं ते एक उदाहरण आहे. कीप इट अप!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 04/24/2014 - 20:29 नवीन
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे. मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 20:36 नवीन
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे.
असं कुठे नमूद केलेलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 04/24/2014 - 20:39 नवीन
:D .... आता हाय म्हनलं म्हण्जी हाय!!!! बाकीची चर्चा खवत करु =)) हाहाहा नाही हो पिडां, असं मला आपलं वाटलं की "कृतीविहीनता" माझा हक्कच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 20:44 नवीन
ओके :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/25/2014 - 08:27 नवीन
मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?
नोटा चा पर्याय आहे ना आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 08:51 नवीन
नोटा च्या पर्याय चा काही तरी उपयोग आहे का? असला बिन कामाचा पर्याय वापरण्यासाठी लोकांनी कशाला मतदान वापरावे. खरे तर जितके मतदान होत नाही, ते सर्व नोटा म्हणुन च धरले जावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/24/2014 - 20:50 नवीन
टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी ;) मला तर या अभिजीत नावाची एवढी चीड आहे ना की आजवर मला हजारो जणांनी मी त्यांना लाखोवेळा सांगूनही मला करोडोवेळा अभिजीत अशीच हाक मारली आहे. आणि इथे तर "तुमचा अभिषेक" असे ठसठशीत लिहूनही. :( आता वरच्या मुद्द्यावर, माझे ते केवळ एक उदाहरण झाले, ते केवळ एक कारण झाले. त्या उदाहरणात जे कारण होते ते टाळण्यासारखे होते हे मला आज वाटतेय त्यामुळे येस आपण म्हणता तसे वाटतेय. पण तेव्हा त्या वयात ते मतदानापेक्षा जास्त महत्वाचे वाटले हे हे तितकेच खरेय. पण या वयाला अनुसरून वेगळे कारण घेतले म्हणजे जसे की नोकरीधंद्यासाठी मला दूरदेशी अगदी परदेशी जावे लागले तर मी कोणता पर्याय स्विकारेल? अर्थातच मतदान वगैरे करायचेय असा विचार न करता स्वताच्या करीअरसाठी निघून जाईलच. यातही आपण चुटपूट लागतेय म्हणजे मन संवेदनशील आहे असा मुद्दा काढालच पण त्याचा फायदा काय. निर्णय तर बहुतांशी जण वैयक्तिक प्रायोरटीनुसारच घेतात ना. मी गर्लफ्रेंडबरोबर फिरायला गेलो तर मी चुकलो आणि जे जास्तीचे पैसे कमवायला कुठे गेले तर त्यांचा तो नाईलाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2014 - 22:34 नवीन
च्यायला, म्हातारपण आलं!!! अभिजीत नव्हे. अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक!! आमचा!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/25/2014 - 08:54 नवीन
>>टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी<< मानवी मेंदु व त्याचे वर्तन यावर भाष्य करणारे मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचले तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. बुकगंगावर विकार मनाचे हे डॉ. हिमानी चाफेकरांचे पुस्तक आहे. त्या विषयी थोडकयत माहिती लिहिताना त्यांचा उल्लेख चक्क हिमानी सावरकर असा झाला आहे. पहा इथे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5035230528732846862?BookName=Vikar%20Manache%20by%20Himani%20Chaphekar एका नाटकात ( बहुतेक चि.वि.जोशींच्या) द्वारकानाथ नावाचे पात्र असते. त्याचा उल्लेख नाटकातील दुसरे पात्र हे द्वाराकाधीश असा करत असते. ते द्वारकानाथ वैतागून दुरुस्ती सुचवतात. पुढच्या वेळी या दुरुस्तीस मान देउन त्यांचा उल्लेख द्वारकापती असा व्हायला लागतो. ते चिडून परत दुरुस्ती चे भान देतात. पुढच्या वेळी त्यांचा उल्लेख चक्क द्वारपाल असा होतो. :) एकदा इंटॅलिजंट प्रभात अशा एका इंग्रजी नियतकालिकात माझ्या आख्या ब्लॉगवर एक लेख आला. तो परवानगीसाठी मला पाठवला त्यात माझा उल्लेख प्रत्येक ठिकाणी महेश घाटपांडे असा झाला. मी त्यांना दुकीची दुरुस्ती करायला सुचवली. ओके. दुरुस्त करतो असे त्या पत्रकाराने उत्तर दिले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकाशित झाला तेव्हा परत महेश घाटपांडे. म्हणजे एवढे करुन रामाची आई सीता! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
ख
खटपट्या गुरुवार, 04/24/2014 - 20:15 नवीन
मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्याचा गुन्हा केलेल्या निवडणूक आयोगाला कोण शिक्षा करणार हे आधी क्लिअर व्हायला पायजेलाय !!!
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री गुरुवार, 04/24/2014 - 22:26 नवीन
Image removed. मतदान हक्कही आहेच कि . केवळ कर्तव्य नाही . उगीचच निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर दोषारोप करण्यात काहीच अर्थ नाही . ज्यावेळी आपल्याला संधी मिळाली तेंव्हा आपण काय केले ? ५ वर्षांनी येणाऱ्या संधीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे . कोणी काय कराव हा वैयक्तिक / खाजगी प्रश्न आहे . पण मग अशा लोकांनी निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर बोलण्यात काय अर्थ राहील ? त्यातल्या त्यात कमी नालायक/कमी वाईट पक्ष/उमेदवार आपण नक्कीच निवडू शकतो , आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी . :) मतदान मुळात ऐच्छिक असल्यामुळे कोणाला अपराधी किंवा अगदी गुन्हेगार खरच वाटेल का ?
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 05:48 नवीन
म्हणजे बघा हं, जे मतदानाबद्दल उदासीन आहेत किंवा त्याला जास्त प्राथमिकता देत नाहीत जर त्यांनी मतदान केले तर ते चांगले नेते निवडून देऊ शकतात. आणि याउलट ज्यांना मतदानाचे महत्व समजते, जे आवर्जून मतदान करतात ते मात्र चुकीचे नेते निवडून देतात. हे लॉजिक गंडल्यासारखे नाही वाटत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
थ
थॉर माणूस Fri, 04/25/2014 - 05:57 नवीन
हॅ हॅ हॅ... हे बाकी आवडलं आपल्याला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
ह
हुप्प्या Fri, 04/25/2014 - 07:01 नवीन
आज जे लोक मत देतात वा आवर्जून मत देतात ते मतदानाचे महत्त्व जाणून मत देतात हे गृहितक चुकीचे आहे. कित्येक लोक दारूची बाटली, ५०० ची नोट असल्या मोबदल्याच्या बदल्यात मत देतात. गरीब वस्तीत अशा प्रकारे मत देणार लोक खूप असतात. अर्थात ज्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते अशा लोकांनी लोकशाहीच्या भविष्याऐवजी दोन वेळच्या जेवणाला जास्त महत्त्व दिले तर त्यांना चूक कसे ठरवता येईल? कित्येक समाजकंटक लोक (श्यान्या गुर्जींच्या सल्ल्याप्रमाणे शाई पुसून) अनेकदा मत देतात. गैरहजर लोकांच्या जागी उभे राहून मत देतात. जर सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात मत देऊ लागले तर अशा विकत घेतलेल्या मतांचे तौलनिक प्रमाण थोडे कमी होऊन जरा जास्त योग्य उमेदवार निवडून येऊ शकतो असा एक विचारप्रवाह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
त
तुमचा अभिषेक Fri, 04/25/2014 - 07:33 नवीन
खरे तर वरची पोस्ट लिहिताना हे माझ्याही डोक्यात आलेलेच. मात्र सुशिक्षित लोक जास्त योग्य उमेदवार निवडून देतात या गृहीतकावरही शंका घेण्यास वाव आहे पण तौलनिक दृष्ट्या नक्कीच येस . अवांतर - गरीबांना गरीब आणि अशिक्षितांना अशिक्षित ठेवण्यातच काँग्रेसच्या आजवरच्या यशाचे गुपित दडलेय तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ऋ
ऋषिकेश Fri, 04/25/2014 - 06:08 नवीन
हा गुन्हा वा अपराध वाटत नाही. अधिक लोकांनी मतदान केल्याने नक्की काय फरक पडेल?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 04/25/2014 - 08:36 नवीन
रोचक! म्ह. स्वतः मतदानासारखी सोपी प्रोसेसही न करता, शासनव्यवस्थेत कसलेही योगदान न देता वर शासनावर टीका करायची आणि ती ऐकून घ्यायची? इतकं असेल तर मग राजकारणी लोकांनी स्वतःची वचने सांभाळली नाहीत असे म्हणण्याचा तरी नैतिक हक्क काय राहतो ओ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
च
चित्रगुप्त Fri, 04/25/2014 - 06:14 नवीन
मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का? नाही !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 04/25/2014 - 08:19 नवीन
अजिबार गुन्हा वगैरे नाही. नैतिक दृष्टया पण काही चुक नाही. सगळे चोर च उभे असतात, मतदान करणे म्हणजेच गुन्हा आहे अश्यावेळी. नोटा चा खरा उपयोग होईल असा कायदा झाल्याशिवाय मतदान करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मदनबाण Fri, 04/25/2014 - 07:49 नवीन
डांबिस काकांशी सहमत...
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 04/25/2014 - 08:16 नवीन
कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट होती. २ मतं एका पक्षाला तर २ मतं दुसर्‍या पक्षाला. आणि खरं म्हणजे लढत अशी त्या दोनच पक्षात असायची. मग आम्ही विचार करायचो की एवी तेवी आमची चार मतं एकमेकांची मतं काटणारच तर आहेत, मग कशाला जा-ये करायची. ह्यावेळी मात्र पक्ष ३ झाले आणि आमच्यातील एकाने पक्ष बदलला आणि मग चकरा मारून मारून नाव नोंदणी करून, त्याची खात्री करून आम्ही मत देत्साते झालो... पण मग कालपर्यंत आम्ही जात नव्हतो तो गुन्हा होता का?
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 04/26/2014 - 19:02 नवीन
मग त्यातले पण १-१ क्यान्सल करून दोघांनीच जायचे ना ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा