Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विसर

आ — आनंदमयी, Sun, 04/27/2014 - 21:09
भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव आता तुला गाठायचा आहे तुझा गाव आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ हरवुदे वाट आडवळणी खट्याळ खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा तुला-मला जोडणारा तोड आता धागा नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू जायचीच निसटून हातातली वाळू सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा... राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून ..... -अदिती शरद जोशी

प्रतिक्रिया द्या
1785 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/28/2014 - 05:26 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/28/2014 - 11:38 नवीन
ठीक!
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 04/29/2014 - 14:17 नवीन
फारच सुंदर!! एका जोडीदाराचा जीवनप्रवास संपताना अशाच काही भावना सहचराच्या होत असाव्यात :(
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 04/29/2014 - 18:59 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 05/02/2014 - 10:59 नवीन
सुरेख! नि:शब्द.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा