बिझनेस फायनान्सः माहिती हवी आहे.
नमस्कार मंडळी.
लहानपणापासुनच पुढे जाऊन व्यवसाय सुरु करायची सुप्त ईच्छा मनामधे आहे. यंत्र अभियंता म्हणुन ६ वर्षांचा अनुभव झाला आहे. स्वतःचे मिडीयम स्केल मॅन्युफॅक्चरींग युनिट चालु करायच्या दृष्टीनी हालचाली चालु आहेत (अंदाज अहवाल बनविणे, यंत्रसामुग्री, इन्स्पेक्षन ईंस्ट्रुमेंट्स आणि गेजेस ई.ई. चा आढावा घेणे चालु आहे). सद्ध्या जी अंदाजपत्रके मागविली आहेत त्यानुसार यंत्रसामुग्री, लीजवरची जागा, कर्मचारीवर्गाचा सुरुवातीचा सहा महिन्याचा खर्च ई.ई. चा खर्च मिळुन प्रोजे़क्ट कॉस्ट १ कोटी ६६ लाख +- ५ लाख अशी मिळत आहे.
आता भांडवलासाठी मी जी माहीती गोळा केलीये, त्याप्रमाणे सिडबी ही संस्था नव्या उद्योजकांना १० लाख ते १० कोटी ह्या मर्यादेमधे कर्ज देते. (सिडबी, शासकीय बँकानकडुन कर्ज मंजुर करुन घेते आणि उद्योजकांना देते.). ६ महिने ते १ वर्षाचा मोराटोरियम पिरिअड धरुन कमीत कमी ३ वर्ष ते जास्तीत जास्त ७ वर्षांमधे कर्जफेड अपेक्षित आहे (व्याजदर १३.५०%). माझ्या अंदाजाप्रमाणे १ वर्षाचा मोराटोरीअम पिरिअड धरुन आणि व्यवस्थित नफा मिळवुन सहा वर्षात कर्जफेड सहज शक्य आहे. सिडबी च्या चिंचवड येथील कार्यालयात चौकशी केली असता मला अशी माहिती मिळाली की प्रोजे़क्ट एस्टिमेटच्या कमीत कमी २५% आणि जास्तीत जास्त ३३% रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करायला लागेल. (सो मच फॉर एनकरेजिंग यंग एन्टर्प्रिनर्स). एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करणं मला एकट्याला अशक्य आहे. हे कर्ज कोलॅटरल फ्री आहे. उद्योग मंत्रालय कोलॅटरल सिक्युरिटीची हमी घेतं. पण ज्यानी माहिती दिली त्याला जास्त माहीती नाही असं त्याच्या बोलण्यावरुन जाणवत होतं. सिडबीच्या संकेत स्थळावर स्वहिश्श्याविषयी कुठलीही माहीती मला आढळली नाही.
ह्यावरती मला स्वतःला दोन उपाय दिसत आहेत.
१. पब्लिक लिमिटेड स्थापन करुन २५ ते ३३% भांडवल गोळा करणं.
२. एकुण ३३% रक्कम कंपनीमधे भागीदार घेऊन करणं. (शक्यतो हे नकोय).
ह्याबाबतीत अनुभवी मिपाकर मार्गदर्शन करु शकतील काय? माझे प्रश्ण असे आहेत.
१. नव-उद्योजकांसाठी (मॅन्युफॅक्चरींग सेक्टर) काही योजना कोणाला माहीत आहेत का?
२. सबसिडीच्या काही शक्यता आहेत का?
३. सिडबी मधे कमीत कमी किती स्वहिस्सा लागतो?
४. सी.आय.आय. चा कोणी सभासद इथे आहे का?
सिडबी किंवा अजुन कुठली अशी संस्था कोलॅटरल फ्री कर्ज देते का जिथे स्वहिस्सा हा गौण भाग आहे?
तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे.तो शेवटचा पॅराग्राफ सरळ सोप्या मराठीत आहे. आणि तो आहे तसाच, त्याच क्रमात, शब्दांची उलटसुलट करण्याचा द्रविडी प्राणायाम न करता, सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल. त्याचे शेवटचे वाक्य दिसायला प्रश्न दिसला तरी त्याचे उत्तर त्याच्या अगोदरच्या वाक्यातच आहे. अजून जास्त इस्काटून सांगणे म्हणजे तुमच्या प्रज्ञेचा अनादर होईल म्हणून इथेच थांबतो. कमॉन संक्षी, तुमच्यासारख्या प्रकांड विद्वानाकडून ही अपेक्षा नव्हती !मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.तुमचे मत व सल्ला जरूर द्या. त्याचे स्वागत आहे. पण, १. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो. २. दुसर्याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा. ३. दुसर्याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्यापैकी समजते हे तुम्हाला समजेल. ४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात. माझी प्रवासवर्णने हा माझ्या भटकंतीच्या छंदाचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. त्यात मी तज्ञ अजिबात नाही. पण वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते. असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.