Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिझनेस फायनान्सः माहिती हवी आहे.

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Fri, 05/02/2014 - 07:41  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. लहानपणापासुनच पुढे जाऊन व्यवसाय सुरु करायची सुप्त ईच्छा मनामधे आहे. यंत्र अभियंता म्हणुन ६ वर्षांचा अनुभव झाला आहे. स्वतःचे मिडीयम स्केल मॅन्युफॅक्चरींग युनिट चालु करायच्या दृष्टीनी हालचाली चालु आहेत (अंदाज अहवाल बनविणे, यंत्रसामुग्री, इन्स्पेक्षन ईंस्ट्रुमेंट्स आणि गेजेस ई.ई. चा आढावा घेणे चालु आहे). सद्ध्या जी अंदाजपत्रके मागविली आहेत त्यानुसार यंत्रसामुग्री, लीजवरची जागा, कर्मचारीवर्गाचा सुरुवातीचा सहा महिन्याचा खर्च ई.ई. चा खर्च मिळुन प्रोजे़क्ट कॉस्ट १ कोटी ६६ लाख +- ५ लाख अशी मिळत आहे. आता भांडवलासाठी मी जी माहीती गोळा केलीये, त्याप्रमाणे सिडबी ही संस्था नव्या उद्योजकांना १० लाख ते १० कोटी ह्या मर्यादेमधे कर्ज देते. (सिडबी, शासकीय बँकानकडुन कर्ज मंजुर करुन घेते आणि उद्योजकांना देते.). ६ महिने ते १ वर्षाचा मोराटोरियम पिरिअड धरुन कमीत कमी ३ वर्ष ते जास्तीत जास्त ७ वर्षांमधे कर्जफेड अपेक्षित आहे (व्याजदर १३.५०%). माझ्या अंदाजाप्रमाणे १ वर्षाचा मोराटोरीअम पिरिअड धरुन आणि व्यवस्थित नफा मिळवुन सहा वर्षात कर्जफेड सहज शक्य आहे. सिडबी च्या चिंचवड येथील कार्यालयात चौकशी केली असता मला अशी माहिती मिळाली की प्रोजे़क्ट एस्टिमेटच्या कमीत कमी २५% आणि जास्तीत जास्त ३३% रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करायला लागेल. (सो मच फॉर एनकरेजिंग यंग एन्टर्प्रिनर्स). एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करणं मला एकट्याला अशक्य आहे. हे कर्ज कोलॅटरल फ्री आहे. उद्योग मंत्रालय कोलॅटरल सिक्युरिटीची हमी घेतं. पण ज्यानी माहिती दिली त्याला जास्त माहीती नाही असं त्याच्या बोलण्यावरुन जाणवत होतं. सिडबीच्या संकेत स्थळावर स्वहिश्श्याविषयी कुठलीही माहीती मला आढळली नाही. ह्यावरती मला स्वतःला दोन उपाय दिसत आहेत. १. पब्लिक लिमिटेड स्थापन करुन २५ ते ३३% भांडवल गोळा करणं. २. एकुण ३३% रक्कम कंपनीमधे भागीदार घेऊन करणं. (शक्यतो हे नकोय). ह्याबाबतीत अनुभवी मिपाकर मार्गदर्शन करु शकतील काय? माझे प्रश्ण असे आहेत. १. नव-उद्योजकांसाठी (मॅन्युफॅक्चरींग सेक्टर) काही योजना कोणाला माहीत आहेत का? २. सबसिडीच्या काही शक्यता आहेत का? ३. सिडबी मधे कमीत कमी किती स्वहिस्सा लागतो? ४. सी.आय.आय. चा कोणी सभासद इथे आहे का? सिडबी किंवा अजुन कुठली अशी संस्था कोलॅटरल फ्री कर्ज देते का जिथे स्वहिस्सा हा गौण भाग आहे?

प्रतिक्रिया द्या
35410 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

स
संजय क्षीरसागर Sun, 07/20/2014 - 12:43 नवीन
मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.
या चर्चेत, सीए विषयतज्ञ नाही काय?
१. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो.
तुमची मतं खोडली गेली याचा अर्थ तुम्ही, `मी अट्टाहास करतोयं' असा काढतायं.
२. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा.
असांसदीय भाषा आणि अध्याहृत अर्थ कुठे आहे? मी तर सरळ, साधं आणि तुमच्या प्रतिसादाला धरुनच लिहीलंय.
३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल.
विषयाला धरुन प्रतिसाद द्यावा हे बरं! या चर्चेवर मी `कुणाचं काय समजावून घेतलं नाही' आणि कुणाला `बरंच काही समजलंय' ते दाखवा.
४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात.
रेषा लहान-मोठी करणे वगैरे सारखं आडून लिहीण्यापेक्षा, जे आहे ते खुलेपणानं मांडण्यात असांसदीय काय आहे? तुम्ही जर मोकळ्यामनानं चर्चा वाचली तर धागाकर्त्याला माझ्या सर्व प्रतिसादांचा उपयोग झाला आहे, हे लक्षात येईल.
वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो...
ओपननेस तर माझ्याकडेही आहे, पण स्वतःची (अनुभवसिद्ध) मतं ठामपणे मांडणं आणि शिकण्याची तयारी असणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत.
असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.
तुमच्यासारखी `मनोधारणा' असणारे इथे अनेक आहेत. मी कुणाविषयी काही मत बनवत नाही. जो विषय असेल त्याला अनुसरुन प्रतिसाद देतो आणि मुद्दा तिथे संपतो. आणि अशा मानसिकतेला, मी ओपननेस म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/20/2014 - 15:09 नवीन
:) मी सर्वज्ञ आहे किंवा माझा जन्म सर्व जग सुधारायला झाला आहे असा माझा अजिबात समज नाही. त्यामुळे... समोर दगडी भिंत आली तर त्यावर डोके आपटून ती फोडण्याचा अट्टाहास करण्या ऐवजी तिला वळसा घालून पुढे जाणे योग्य असते, असे मला वाटते. कारण, वेळ व श्रम वाचतात आणि डोकेही शाबूत राहते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 07/20/2014 - 16:00 नवीन
चर्चा जमत नाही म्हटल्यावर लोक (नेहमी) काय स्टँड घेतात ते माहितीये, त्यामुळे आता घालतो वळसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/20/2014 - 16:15 नवीन
बघा, बघा... म्हणता म्हणता तुम्ही कोण्या दुसर्‍याशी सहमत झालात :) इतकं कठीण नाही ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 07/20/2014 - 16:54 नवीन
निरुत्तर झालेल्याला सतावू नये हा माझा शिरस्ता आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/20/2014 - 18:30 नवीन
हेच मी वर अगोदरच सांगितलेय ना वेगळ्या शब्दांत ! बघा परत एकदा सहमत झालात ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
माहितगार Sun, 07/20/2014 - 13:11 नवीन
मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते.
आपल्या मनातले कुणी बोलले की कसे छान वाटते तसे हे वाक्य वाचून वाटले. अर्थात मी सहसा 'अभ्यासक' असा शब्द सुचवतो/वापरतो म्हणजे त्यात अगदी चाहते/विद्यार्थी ते तज्ञ सार्‍यांचाच समावेश 'अभ्यासक' मध्ये होतो. बाकी आपल्याशी बहुतांश सहमत म्हणून +१ धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Sun, 07/20/2014 - 08:21 नवीन
बाय द वेऽऽऽ........आमचा पास ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 07/20/2014 - 10:43 नवीन
योग्य वेळी रिटायरमेंट घेतली ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
हेमन्त वाघे Wed, 04/08/2015 - 06:29 नवीन
कॅप्टन जॅक स्पॅरो हा आपला येक जुना धागा आहे .. तर सध्या काय चालले आहे ? आपला व्यवसाय सुरु झाला का? कारण मी पण येक startup - net based धडपडत आहे . तरी उपयोग होईल.. हेमंत
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/08/2015 - 06:55 नवीन
व्यनि करतो थोड्या वेळाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा