Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते

D — drsunilahirrao, Sat, 05/03/2014 - 19:14
हलकेच शिरशिरी मग .. प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते ! प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू माणूस जात साली जातीवरुन जाते सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते माझेच दुःख माझ्या कंठावरुन जाते ! येशील का कधी तू, ते सांग आज राणी सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते आताच त्या सुखाने माझा लिलाव केला सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते मी कामगार आहे, मजला सुटी कशाला माझी सुटी तशीही घामावरुन जाते भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही खुर्चीवरुन येते, खुर्चीवरुन जाते निश्चित टेबलाच्या खालून काम होते सारीच काळजी बघ नोटांवरुन जाते स्वस्तात फार आता विकलास तू महात्म्या साली इमानदारी पोटावरुन जाते करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते ! डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
3148 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सस्नेह Sat, 05/03/2014 - 19:51 नवीन
लै भारी !
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 05/03/2014 - 19:55 नवीन
सगळेच शेर आवडले!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 20:19 नवीन
सॉरी...पण नाही जमलीय. बेटर लक नेक्स्ट टाईम.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 05/03/2014 - 20:22 नवीन
मी तर हलकीच शिरशिरी ओठांवरुन जाते ... हे वाचुन क्लिक केलं ... म्हटलं आता मस्त भन्नाट रोमँटिक कायत्री वाचायला मिळणार ... पण :(
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 20:31 नवीन
करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते हे अतिशय खरे आहे.
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sun, 05/04/2014 - 05:52 नवीन
@स्नेहांकिता, पैसा, जेनी धर्मराज मुटके, आत्मशून्य खूप खूप आभार !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 05/05/2014 - 06:39 नवीन
संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते कदाचित इथे मी स्वतःला रिलेट करु शकलो असेन आणि बाकीच्या शेरांमधे दुसरी ओळ प्रभावी झाली नसल्यानं असेल.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/05/2014 - 13:29 नवीन
>>करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते ! दंडवत स्वीकारा !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/05/2014 - 16:11 नवीन
+++१११ कडक!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ए
एस Wed, 05/07/2014 - 15:29 नवीन
बर्‍याच दिवसांनी चांगलं काव्य आलं बोर्डावर.
प्रामाणिकपणे सांगायचं तर शीर्षकावरून काहीतरी आलतूफालतू असेल असे वाटले होते त्यामुळे वाचायचंही टाळलं होतं. पण प्रचंड भेदक काव्य आहे. सलाम! मिपावरी येती ढीगभराने जिलब्या नजरेतुनि सहजी ही गज़ल सुटून जाते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
D
drsunilahirrao Wed, 05/07/2014 - 15:55 नवीन
धन्यवाद स्वॅप्स,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
D
drsunilahirrao Tue, 05/06/2014 - 08:45 नवीन
संजय क्षीरसागर, अतृप्त आत्मा, सूड आभारी आहे. एकदोन ठिकाणी अलामत चुकली आहे. त्यात जमेल तसे बदल करेन. उदा. हा एक शेर बदलून याप्रमाणे प्रेमात नेहमी या तू जिंकतोस मृत्यो माणूस जात साली धर्मावरुन जाते
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा