Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इमारत

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 05/05/2014 - 08:57
प्रस्तावना: हि माझी अजून एक हिंदी-उर्दू कविता आणि चाणक्यने केलेला तिचा मराठी अनुवाद.
एक इमारत है संग-ए-मर्मर मे तराशी हुई चौधवी चांद जब महीन कोहरा लिपटकर आता है तब मानो जन्नत की हूर लगती है वो इमारत ----- सुना है के ये इमारत किसी शाह ने अपने बेगम कि याद मे बनवायी है हां... होगा कोई इश्क का मारा ----- जब उसकी यांदे किसी आभिसारों की तरह बरसती होंगी तो वो शाह उस इमारत को देख के क्या सोचता होगा? हां... इश्क का मारा जो ठहराँ ----- फुतुर है ये मगर कल रात फिर उसी महीन कोहरे मे कई हाथोंको देखा था उस इमारत के तआकुब में कोई आदम तो दिखे नही.. बस हाथ हि थे और फिर रातभर वो परछाईओंका खेल चलता रहा ------ आखिर चांद थक के बुझ गया.. जब सुबह से कुछ पहले उन हाथोंको अपने हाथ जोडकर बक्षनेकी दुवा करता वो शाह भी थक कर जाने लगा तो उसकी आखोंमे कुछ जलते कतरे थे उसके 'ताज' का एक मोती गिर गया था... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/०४/२०१४) महीन= पातळ आभिसार = धबधबा फुतुर = वेडेपणा तआकुब = अविरत पाठलाग आदम = व्यक्ति कोण्या काळची गोष्ट आहे, एक राजा अन् एक राणी राणीच्या विरहात परंतू, राजाची स्वप्ने विराणी एकाकी झुरतसे राजा, रात्र रात्र राणीला स्मरत फर्मान सोडूनी घडविले त्याने, संगमरवरातले स्मारक दिमाखात मग उभा राहिला, ताज नावाचा एक महाल शुभ्र संगमरवरी ईमारत, चांदराती दिसे कमाल काय तिचे सॊंदर्य वर्णू, अप्सरा न्हाहून यावी सचैल चांदण्याने मग अंग टिपावे, रातीचे उरले प्रहर काल रात्री परी महाली , काय आक्रीत पाहीले छिन्नी हातोडा घेतलेले हात नुसते पाहिले भास मनाचा होता का जे दृष्य खरे जे देखले राजाचेही हात होते मागत काही मागणे मावळतीला चंद्र जाता, राजा हताश चालला चंद्र बांधता बांधता त्याने,डागही होता बांधला |- चाण्यक -| (०५/०५/२०१४)

प्रतिक्रिया द्या
3372 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 05/05/2014 - 09:27 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/05/2014 - 09:29 नवीन
मूळ मिकाची हिंदी कविता आणि चाणक्याने केलेला अनुवाद दोन्हीही सुरेख.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 05/05/2014 - 09:49 नवीन
मस्तं. दोन्ही कविता आवडल्या.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 05/05/2014 - 10:25 नवीन
मिकाची कविता 'पुन्हा' वाचली, 'पुन्हा' आवडली. खूप खूप खूप सुंदर. चाणक्य ह्यांचा भावानुवाद वेगळा लिहीला असता तर जास्त भावला असता. (असं 'माझं' मत, अकारण सूड उगवू नये ;) )
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/06/2014 - 17:08 नवीन
कविता आणि चाणक्याचा भावानुवाद दोन्ही आवडले. चाणक्याची कविता तर स्वतंत्रपणेही छान आहे. शकील बदायुनीच्या "एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है" आणि साहिरचं "इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़" यांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 05/10/2014 - 21:46 नवीन
वाह पैसा ताई. साहिरच्या 'ताजमहल' या नज्म मधल्या या ओळी. पूर्ण नज्म पण फार सुंदर आहे -
ताज तेरे लिये ईक मजहरे-उल्फतही (प्रेमाचे प्रतीक) सही तुमको ईस वादी-ए-रंगींसे (रमणीय स्थळ) अकीदत (श्रद्धा) ही सही मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे अनगिनत लोगोंने दुनियामे मुहब्बत की है कौन कहता है के सादिक (प्रामाणिक) न थे जजबे उनके लेकिन उनके लिये तशहीरका (प्रसिद्धी) सामान नही क्यों की वो लोग भी अपनीही तरह मुफलिस (गरीब) थे मेरी महबूब ! उन्हे भी तो मुहब्बत होगी जिनकी सन्नाईने (कारागिरी) बक्शी हैं इसे शक्ले-जमील (सौंदर्य) उनके प्यारोंके मकाबिर (कबर) रहे बेनाम-ओ-नमूद (नामोनिशाण नाही कुठे) आजतक उनपे जलायी नही किसीने कंदील एक बादशाहने दौलत का सहारा लेकर हम गरीबोंकी मुहब्बतका उडाया है मजाक मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे
वाह क्या बात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्पंदना Wed, 05/07/2014 - 00:27 नवीन
उर्दुवर इतकी जबरदस्त पकड मिका? स्पेशल्ली शिकलात की अशीच शिकत गेलात. खर सांगु? मला त्यातले थोडे शब्द नाही समजले. अन मुळ कविता चाणक्यांमुळे समजली उमजली अन भिडली. तुम्हा दोघांनाही सलाम!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/07/2014 - 03:25 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 05/07/2014 - 05:27 नवीन
मुळ हिंदी-उर्दू कविता चेपूवर वाचली होतीच, आता इथे पुन्हा वाचली. दोन्ही एकदम ब्येष्ट!!
  • Log in or register to post comments
म
मीराताई गुरुवार, 05/08/2014 - 13:46 नवीन
दोन्ही रचना उत्तम झाल्या आहेत. आवडल्या
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 05/11/2014 - 05:30 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 05/11/2014 - 06:13 नवीन
उर्दू कविता समजली नाही पण चाणक्याचा भावानुवादामुळे रचना समजायला सोपे झाले. अवांतरः ताजमहाल ही वास्तू पाहिलेली नाही पण ती कधीच आवडली नाही. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/11/2014 - 14:08 नवीन
पण मला आवडली ती उर्दू रचना ! फुतुर है ये मगर कल रात फिर उसी महीन कोहरे मे कई हाथोंको देखा था उस इमारत के तआकुब में कोई आदम तो दिखे नही.. बस हाथ हि थे और फिर रातभर वो परछाईओंका खेल चलता रहा क्लास !!! माझ्या एका मित्राची अशीच एक सुन्दर कविता आहे जमल्यास इथे डकवेन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/11/2014 - 14:25 नवीन
ताजमहल. नाही ती केवळ मुमताज आणि शहाजहानची समाधी मला दिसताहेत हजारो कारागिरांचे छाटलेले हात प्रत्येक पायरीवर ऐकूच येऊ नयेत आकाश किंकाळ्या शिल्पकारांच्या म्हणूण आत बेमालूपणने चाललाय अल्लाचा गजर आता टिकत नाही ताजमहलवर माझी नजर ताजमहल _ अमानुष क्रौर्य ताजमहल - छाटलेल्या हाताचं दीनवानं रूप ताजमहल - आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल विचारा, जवळून वाहणा-या यमुनेला ताजमहलचा काय इतिहास आहे ? अन तिच्या पाण्याला अजूणही रक्ताचा का वास आहे ? आपल्या शिल्पाची एवढी किंमत कधी कुणी चुकविली आहे ? दोस्तहो, ताजमहल दुसरं तिसरं काही नसून माझ्या माणसांच्या पृथ्वीच्या पाठीवरील गोठलेला अश्रू आहे ! (अनारंभ- राजेंद्र ना गोणारकर.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 05/12/2014 - 07:57 नवीन
आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल
व्वाह!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पाषाणभेद Fri, 05/16/2014 - 05:26 नवीन
वा वा बिरूटे सर, एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
च
चाणक्य Mon, 05/19/2014 - 03:20 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 05/11/2014 - 14:38 नवीन
या इमारतीवर इतक्या कविता झाल्या आहेत की त्या सगळ्या एकत्र केल्या तर ठेवायला ती इमारत देखील अपुरी पडेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा