पराचा पारवा होतो
किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो
अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो
किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते
किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो
इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते
जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो
तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू -
जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो
अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा ..
तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो
डॉ.सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद
(9)
ब
बबन ताम्बे
Mon, 05/05/2014 - 16:13
नवीन
सुंदर ! आवडले.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 05/05/2014 - 16:54
नवीन
चांगलय . यावरुन आख्या कवितेची एका वाक्यात वाट लावणारी गावाकडची म्हण आटवली . स्वतंत्र पुरुषविभाग नसल्यामुळे इथ देत नाय. इच्छुकानी व्यनी टाकावा.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/06/2014 - 09:21
नवीन
मस्त कविता.
अवांतरः बाकी पराचा "पारवा" अवतार किती मजेशीर असेल हा विचार आला आणि हसू आवरेना झालं.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/06/2014 - 09:38
नवीन
अहाहा काय मजेशीर दृष्य असेल ते. परा गुटरगुं गुटरगुं करत एखाद्या छतावर बसला आहे आणि छाती फुगवुन आणि पिस फुलवुन एका जागेवर गोल गोल फिरतो आहे.

- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/06/2014 - 10:52
नवीन
ओ पैजारबुवा, काय जीव घ्यायचा काय, हहपुवा झाली ना इकडे तो फटू बघून...
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Tue, 05/06/2014 - 12:27
नवीन
:)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 05/06/2014 - 15:05
नवीन
@जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो>>> मस्त शब्द!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 05/06/2014 - 16:46
नवीन
आवडली कविता
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Wed, 05/07/2014 - 18:51
नवीन
परा आजकाल येत नाही इकडे ... नैतर काही खर नव्हत बॉ.
- Log in or register to post comments